Login

नवऱ्याचे रक्षाबंधन 2

एका स्त्री ची धडपड बहीण नसलेल्या नवऱ्याला राखी बांधून एका दिवसापुरते त्याला या आंबट गोड नात्याच अनुभव देण्यसाठी ा
''नाही ग माझी माय, ना ते नाराज आहेत ना मी भांडली त्यांच्याशी ना आमच्यात काही इशू आहे.'' एक उसासा घेऊन सुधाने अखेर तिच्या मनातील गोष्ट आईला सांगितली, ''अगं त्यांना सख्खी बहिण नाही आहे ना म्हणून म्हटलं हे रक्षाबंधन त्यांची बहीण बनून त्यांच्या सोबत राहीन. त्यांच्यासाठी छान गोड धोड बनवणार. आपल्याकडे तर पद्धतही आहे बहिण नाही आली तर बायकोने राखी बांधायाची आणि नाहीतरी रक्षाबंधनचा अर्थ आपली रक्षा करणाऱ्याला राखी बांधने असाच होतो ना."

"हो मग इकडे येऊन कर ना ते सगळे. इथे यायला काय हरकत आहे?" आई आपली तिच्या प्रश्नावर ठाम.

"अगं तिथे आले तर मी माहेरच्या कोषात जायची व त्यांना जाणीव व्हायची कि ते त्यांच्या बायकोचे माहेर आहे. त्यांच्या बहिणीचे घर नाही. बस इतकेच ग!'' सुधाने सरळ सोप्या भाषेत आईला समजावून सांगायचा प्रयत्न केला.

''बरं बाई! आता काय बोलू तुला. तुझे यायचे नक्की झाले कि कळव मला. ठेवते फोन आणि काही मदत लागली  तुला तर सांग तसे फोन करून.'' आई तिला म्हणाली.

''हो!'' सुधाने कॉल कट केला.

अशाप्रकारे सुधाने या वर्षी रक्षाबंधनला नवऱ्या सोबत राहायचे पक्के केले. साकेत, सुधाचा नवरा, त्याला वाटले जवळच दोन तासावर सुधाचे माहेर असल्याने ती सकाळी जाईल माहेरी. मात्र पार दुपार झाली तरीही ती काही घराबाहेर पडली नाही. उलट तिने साकेतला फोन करून संध्याकाळी घरी लवकर यायला सांगितले. त्याला वाटले तिची तब्येत बिघडली की काय? तो काम संपवून लवकरच घरी गेला.

बघतो तर सुधा सामान्यच. घरही अगदी छान आवरलेले. मग ही माहेरी का नाही गेली? त्याला वाटले नक्कीच बहिन भावात किंवा भावजयी सोबत सुधाचे वाजले बहुतेक. अशात तिला काही न विचारन्यातच त्याने आपली भलाई समजली. तो चार वर्षाच्या गौरीला खेळवत हॉलमध्ये बसला. सुधाने संध्याकाळी साकेतच्या आवडीचे जेवण बनवले. कांदा भजींच्या घमघमाटाने साकेत स्वयंपाक खोलीत ओढल्या गेला. सुधाने त्याला आवडते तशी भरपूर सुकमेवा घालून खीर, पुरण पोळी, कोफ़्ता करी, तेल लावुन साध्या पोळ्या(एरवी फुलके असतात जे त्याला नको वाटतात, पण हेल्थसाठी सुधाचा आग्रह.) चिचोनी, तळलेले पापड, कुरडई, काकडीची कोशींबिर.

"बघूनच पोट भरशील का? हातपाय धुवून घे, देवा समोर दिवा लावून गौरीला घेऊन ये जेवायला." सुधा त्याला म्हणाली. त्यानेही होकारार्थी मान हलवली.

"कपडे काढून ठेवले आहेत बेडवर. तेच घाला. तुम्हाला ओवाळते. मग वाढून देते." सुधा भजे तळत त्याला म्हणाली.

'आज काही विशेष आहे का? म्हणजे मी विसरलो का काही?' तो स्वताशिच पुटपुटला. तरीही तीने ऐकलं. रक्षाबंधनला तिला इथेच पाहून तो बुचकळ्यात पडल्याचे तिला समजले. ती त्याला  हसून म्हणाली,

"अहो साकेत, तसलं काहीच नाही. जा आता लवकर अटपा. स्वयंपाक थंडा होईल नाहीतर."
0

🎭 Series Post

View all