Login

नवऱ्याचे रक्षाबंधन 3

सुधाची धडपड तिच्या नवऱ्यालाही रक्षाबंधनचा अनुभव देण्यासाठी.
भजे तळून होताच सुधानेही तयारी केली. साकेत गौरीची तयारी करून तिला घेऊन आला. दोघेही छान छान कपडे घालून होते. सुधा दोन राख्या पुजेच्या ताटात घेऊन हाॅलमधे आली. तिने आधी छोट्या गौरीला टीका लावून ओवाळलं, तिच्या हातावर तिचे आवडते छोटा भीम  कार्टून आणि लाइट असलेली राखी बांधली, पेढा खाऊ घातला. ती खूप खूष झाली. घरभर सुपरमॅन सारखा हात पुढे करून धावू लागली.

मग पाळी आली साकेतची. राखी बांधून झाल्यावर तो म्हणाला, "तुला माझ्याकडून काही हवं आहे का? तु तुझ्या दादाला ओवाळायला माहेरी न जाता इथे थांबलीस म्हणून विचारतोय?"

ती काहीच न बोलतां आत गेली. जेवणाची ताटं घेऊन आली. काहीही रोक टोक न करता त्याला जे जसं वाटलं तसं खाऊ दिलं. त्याने तृप्ततेची एक ढेकर दिली.

"बाबाने आवाज केला", म्हणत गौरी खूप खूप हसली. साकेतला त्याच्या आईची तिव्र आठवन झाली. पण गावाला आता आधीसारखं जाणं होत नव्हतं आणि आईला गाव सोडून करमत नव्हतं.

"थॅंक्यु सुधा!" सुधाचा हात हातात घेऊन तो तीला म्हणाला, "खूप दिवसांनी लग्न व्हायच्या आधी आई जसं जेऊ घालायची ना तसा फिल आला आज."

"हो ना! अरे मला कळते तुझे मन. म्हणूनच तो फिल देण्यासाठी मी आज माहेरी न जाता इथे थांबली." सुधा स्मित हास्य करून त्याला म्हणाली.

"म्हणजे तुझे भांडण वगैरे काहीच नाही झाले तुझ्या दादा वहिनी सोबत?" त्याने तिला विचारले.

"नाही मुळीच नाही. काय झाले ना, नुकतेच फेसबुकवर एका लेखात वाचलं होते मी की जसे लग्न झालेल्या स्त्री साठी तिचा भाऊ तिचे माहेर असतो तसे लग्न झालेल्या मुलासाठी माहेर हे त्याची बहीण असते. पण तुला बहीण नाही, आईबाबा इथे नाहीत. मानलेल्या बहीणींचा अतापता नाही. म्हणून आज रक्षाबंधनाचा एक दिवस तुला माहेरचा फिल द्यायचे ठरवले. बस इतकेच." सुधा त्याचा हात हातात घेऊन बोलली.

साकेतचे डोळे भरून आले. लग्न झालं तेव्हापासून ती त्याची आई व बायको तर झालीच होती. पण आज ती त्याची बहीणही झाली. मात्र तो अजूनही फक्त नवरेपनातच अडकलेला होता. त्याने तिच्या चेहऱ्याला आपल्या हातांच्या ओंजळीत घेऊन तिच्या कपाळावर ओठ टेकवून चुंबन घेतले.

"किती विचार केलास तु माझ्या भावनांचा. मी सदैव ऋणी राहणार तुझा." साकेत तिला म्हणाला.

"काहिही काय साकेत. आपण एकमेकांसाठी आहोत, आपण एकमेकांचा विचार नाही करणार तर कोण करेल?" तिने साकेतला प्रश्न विचारला.

"हो ते तर आहेच पण यामुळे तुझ्यावर माझ्या अपेक्षांचे ओझे वाढणार हं." साकेत हसून तिला म्हणाला.

"चालेल मला." सुधा त्याला म्हणाली, "पण काय रे तु इतके काही करतोस आमच्यासाठी. तुलाही मग आमच्या अपेक्षांचे ओझे तूझ्या खांद्यावर आहे असे वाटते का?"

"नाही गं, मी माझे कर्तव्यच पार पडतो. चल सांग मग राखीची भेट म्हणून काय देऊ तुला?" साकेतने तिला विचारले.

"तसे तर सर्वच आहे माझ्याकडे. तेव्हा तुम्हाला हवे ते द्या." ती उत्तरली.

त्याला आठवले मागील दोन महिन्यांपासून सुधा शाॅपिंगला चल म्हणून मागे लागली होती. पण त्याला काही जमले नाही.

"उद्या संध्याकाळी ऑफिस मधून लवकर यायचा प्रयत्न करतो. शाॅपिंग आणि डिनरला घेऊन जाऊ आपण." त्याच्या या आश्वासक शब्दांनीच ती सुखावली. अशाप्रकारे सुधाने तिच्या नवऱ्याचे रक्षाबंधन पार पाडले. तुम्हाला ही कल्पना कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच कळवा.

धन्यवाद.
0

🎭 Series Post

View all