Login

ह्या बायका

किती हौस असते नाही काही जणांना ह्या वयात ही
ह्या बायका.

मी कार मधे ड्रायव्हिंग सीटवर बसलो, वऱ्हाडातील मंडळी सोबत ही, म्हणजेच वीणा माझी बायको, आणि ताई शोभा दोघी बोलत उभ्या होत्या.
"बरं -निघूया, छान झाला होs कार्यक्रम. ,लग्न खूपच छान झालं ,खूप मजा आली.सुन ही छान आहे. आता या विश्रांती घ्यायला चार दिवस पुण्याला.नव्या सुनेला घेऊन, वगैरे वगैरे निरोपाचे बोलणे अगदी कार मध्ये बसे बसे पर्यंत चालले होते.
कंटाळून मी गाडी स्टार्ट केली तेव्हाही बायकांचं काचेतून “बरयभेटू “वगैरे चालूच होत गाडी पुढे गेली तशी मागे मागे पहात हात हलवणे ही झाले,.शेवटी वर्हाडी दिसेनासे झाले (बहुतेक घरात निघून गेलेले असावे).
आता दोघी बाया जरा स्थिरस्थावर झाल्या भाऊजींनी डोळे मिटून" मी झोपतो जरा म्हणत थोड्याच वेळात ते घोरायलाही लागले…”
.
मी गाडी चालवत होतो त्यामुळे मला झोपणे शक्य नव्हते आता दोघींनी फोन हातात घेतले.

मी म्हणजे वसंता, आणि माझी बायको वीणा आम्ही माझ्या पुतण्याच्या लग्नाला म्हणून तळेगांव ला आलो होतो.
चार दिवस राहून परत आपल्या गावीपुण्याला निघालो परतताना माझी एक चुलत बहीण शोभा आणि भाऊजी पण आमच्या गाडीत होते.
पाच मिनिटाच्या शांततेनंतर "अगं वीणा ह्या विडियो मध्ये मधु बघ काय नाचते आहे आणि सुधीर भाऊजी पण्….
”शोभा ने आपला मोबाईल समोर करतं म्हंटले!”

हो ग --काय नाचले गं

"कित्ती हौस असते नाही काही जणांना"या वयातही ? शोभा कौतुकाने बोलली”.

हं - असतात काही काही लोक हौशी नाहीतर आपल्याकडे… .—वीणा निश्वास सोडत बोलली.

.मला आठवले मागे एका लग्नात स्टेज वर ची डांसर तिच्या सोबत डांस करायला आमंत्रित करत होती इतक्या सुंदर अदा पाहून कोणालाही तिच्या बरोबर नाचावेसे वाटणार . माझ्या शेजारी बसलेले दोघं उठले त्यांनी मलाही आग्रह केला. मी आपण कुठे कमी नको दिसायला म्हणून लावले जरा ठुमके त्या सुंदरी सोबत

घरी आल्यावर मला" अहो काय तुम्ही? त्यांनी म्हटले म्हणून लगेच नाचायला काय लागला? बरं दिसतं कां?” म्हणून खूप तासले होते वीणाने!

म्हणून यावेळेस मी चुपचाप बसलो .
या बायकांच केव्हा काय मनात असेल प्रत्यक्ष ब्रम्हदेवाला हीसांगता येणार नाही...

दोघींच्या गप्पांना अगदी ऊत आला होता “ नेमकं कौतुक करताते कि—?

”अगं आणि हळदीच्या दिवशी त्या पिवळी साडीवाल्या मोठे गुलाबाचे फुल लावलेल्या कोण होत्या ग? काय भसाभसा हळद लावत होत्या सगळ्यांना . साड्यांचा अगदी सत्यानाश झाला आता ड्रायक्लिनच कराव लागेल साडीला. इती वीणा..

आता तिथे सगळ्याच पिवळ्या साड्या नेसून उभ्या होत्या ते आजकाल सिरीयल मध्ये पाहून सगळ्यांनाच हूरुप आलाय.
" मग काय --आपल्या वेळेस कुठे होत असं हे सगळ ?
आता हे कौतुक म्हणायचं की असुया मी मनात विचार करत होतो .

तेवढ्यात भाऊजी उठले ,"अरे वसंता चहा प्यायचा का ?
“हो बाई चार दिवसांत मनासारखा चहा काही मिळाला नाही.”
मला हीआता गाडी चालवून बराचवेळ झाला ,थोडा विश्राम घ्यावा म्हणून एका ठिकाणी गाडी थांबवली.

चहा घेताना काही खायला मिळतंय का पाहून काही खाणार का विचारताच शरदभाऊजी म्हणाले’ ते लाडू चिवडा आहे ना ते काढ की!’

नको– असू द्या ते घरी न्यायला आहे.
दोनच तर पाकीट दिली ऊषा ने. शोभाताई ने बाण सोडला “

‘हो ना नुसतं म्हणत होती घेऊन जा हवं तेवढं पण देताना??

‘अग तिच्या माहेरचे अजून राहणार आहे त्यांच्याबरोबर द्यायची असतील”

‘मीच नको म्हणाले कोणाला आजकाल वेळ आहे खायला ते गोड.?
‘मग काय शोभा ने ही री ओढली .’
पोट पूजा झाली तशी बायकांना थोडी सुस्ती आलीशी वाटली. मला तर झोपायला चान्सच नव्हता.

तुम्ही तर काहीच खाल्लं नाही शरदराव ?’

‘ नको पोट जरा गडबड करतय असं वाटतं, ढेकर मारत भाऊजी म्हणाले!’

"हो ना- लग्न घरात जेवण वेळी अवेळी होतात मी आपल सहज बोललो"

‘मुलीकडच्यांना वेळेचं काही भानच नव्हतं !लग्नाचा मुहूर्त ही केव्हाच टळून गेला.आजकाल नाचायचं प्रस्थ वाढतं आहे न! वीणा ची गाडीपरत सुटली आणी त्यामुळेच सगळ्या लाच उशीर झाला .’

‘आणि ते उचलून धरले होते मुलाला तेही नाही आवडलं.!’

“हो न शोभा ने वीणा च्या सुरात सूर मिसळला
विहिणींची पंगत ,दोन वाजले. सगळा देशस्थीकारभार.आणि जेवण ही काही खास नव्हतं.’

ते आजकाल पास्ता, नुडल्स, पावभाजी सगळं पंजाबी स्टाईल च किती स्टाल?प्लेट धरून हात दुखले.आणी आग्रह करणार कोणी नाही.

“ हो ना ! वीणा ला हुरुप आला “आमच्या राधाच्या लग्ना त काय सुंदर पुरणपोळ्या, उकडीचे मोदक, काजूची उसळ काय सुंदर मेनू ठेवला होता .’
आमच्या बाईसाहेब आपल्या कौतुकाचा चान्स असा कसा सोडणार? मला मात्र त्यावेळेसच केटरर्स च बिल आठवलं .
‘मग काय सांगावं लागतं! जातीने लक्ष द्यावं लागतं.”

वीणा आपल्याच कौतुकात रमली होती ते फारसे आवडले नाही म्हणून शोभाने मुद्दाम नवीन विषय उपसला.
“ तुम्ही काय आहेर केला ग वहिनी?’

आम्ही तर कॅश देणं पसंत करतो, उगाचच त्या साड्या गोळा करत बसा. वीणा आपल्याला काय कमी आहे अश्या थाटात.”

“हो पण बंद पाकिटात किती दिले कोणाला कळणार? म्हणून मी तर व्यवस्थित आहेर केला उगाचच कमी पणा नको.”

“ हो पण आवडलं तर ठीक नाहीतर ?वीणाने आपली बाजू बळकट केली.”

शोभाने आपल्या मनातली मळमळ बाहेर काढली” आमच्या मनीच्या लग्नात इतक्या साड्या आल्या मला पण एक धड नाही. आता सांग मी जरा सावळी आहे म्हणून काय झालं सगळ्यांनी फिक्क्या रंगाच्या साड्या दिल्या. अगदी विहिणबाईंनी पण…
मग काय केलं त्या साड्यांच?बायकोने री ओढली,
काही नाही मी सर्व इकडे तिकडे पास केल्या तरी त्यानी मुद्दाम खोचकपणे विचारले ‘नेसली होती कां मी दिलेली साडी? पाचहजार रुपयाची होती”. रंगही किती छान तुम्हाला शोभेल असा आकाशी”.
इतका राग आला होता ना मला.’

या बायकांना अगदी रंगासकट साड्या लक्षात कशा राहतात? आम्हा पुरुषांना कोणता शर्ट पीस आपल्या हातात पडला तेही आठवत नाही कारण तो पाहीपर्यंत बायकोच्या हातात आणि मग लगेच पेटीत जाऊन पडलेला असतो.

वहिनी तुला नेमकी नीळ्या रंगाची साडी आणि मला हिरवी मिळाली आहेराची.
अय्या हो ना वन्स तुम्ही हिरवी नेसली होती आणि मी नीळी परत तेच रंग मिळाले..
मी काय म्हणते आपण एक्सचेंज???
हो अगदी मनातलं बोललात..
ठरलं तर लगेच बॅग मधून साडी काढून बदलली गेली आता दोघी रिलॅक्स होत्या.

बऱ्याच उखाण्या पाखळ्या करून दोन्ही बायका थकलेला दिसत होत्या.
आता पुणे येण्यात होते,थोड्याच वेळात भाऊजी म्हणाले वसंता अरे आम्हाला या पुढच्या स्टॉप वर उतरव तिथून जाऊ घरी आम्ही “!

शोभा व भावजी उतरले.

बरय आता कधी भेट?
लवकरच मंगळागौरी ला बोलावण आलं तर!
पाहू म्हणत ते पुढे गेले.

आता गाडीमध्ये बायको आणि मी दोघंच, काय बोलणार ?
तरी मी म्हटलं “ शोभा होती बरोबर म्हणून बरं झालं नाही? वेळ कसा गेला कळल नसेल. “

“हं ,--ही शोभा ना महाकुचकट आहे हो! कुणाचं कौतुक म्हणून नाही! ऐकत होता ना किती नांव ठेवत होती? अशीच आहे म्हणून तर पटत नाही घरात सुनेशी बायकोने मनात साचलेलं सगळं आत्ताच काढून टाकलं .
आपल्या बरोबर यायच होते म्हणून जरा गोड बोलत होती, नाही तर आपल्या मीता ला खूप नाव ठेवत असते, सांगत होती तिचीच सून.

चला-- घरी गेल्यावर सुनबाई समोर नवा भिडू नवा संवाद परत हीच रेकॉर्ड नव्या स्वरूपात ऐकायला मिळणार असे मनात म्हणत मी गाडी घराकडे वळवली...

तिकडे शोभा आणि शरदराव रिक्शात” बरं झालं वसंता भेटला इथ पर्यंत आरामात येता आलं नाही तर इतक सामान ! शरदराव म्हणाले.

हो पण“काय तो गाडी चा तोरा आहे वीणा ला माझं तर अंग आंबून गेलं त्या डब्ब्यात, फार गर्व आहे “म्हणे कॅश दिली” पाकिटात किती दिले कोणाला कळणार,?

चला एकदाच घर आलं, दोन्ही जोडपी आपापल्या घरी पोचली.
पुढच्या वेळी नवा भिडू नवी गंमत….
—----------------------------------------------