मामाने ऑफिसमधून सुट्टी काढावी असा बेत ठरवला होता...काही देव दर्शन करू म्हणून तिकीट बुक केली होती...तर पर्वा शीतल येणार म्हणून तिला घ्यायला फक्त मीच का जाऊ...सोबत सुधाला ही घेऊन जातो...तितकंच तिला ही बाहेर घेऊन गेलेले बरेच दिवस झाले आहेत..ती ही बाहेर पडेन...एअरपोर्ट पाहील....आणि आता आई ही काही बोलणार नाही..तिला थोडे ह्या चौकटी बाहेर काढू...म्हणजे तिला खूप बरे वाटेल...नाहीतरी तिला तसा काही विरंगुळा नाही मिळत..शीतल येते तर ती दोघांना पाहून खुश होईल...तिला ह्या निमित्ताने काही वेळ माझ्यासोबत घालवता येईल...
शीतलची फ्लाईट संध्याकाळी उतरणार होती..आणि सगळे औपचारिकता करून ती बाहेर येणार होती...म्हणून मामा म्हणजे मोहित ने ठरवले की आपण घरातून 12 वाजता निघू म्हणजे त्या दरम्यान कुठे तरी दोघेच फिरून येऊ मग 6 च्या दरम्यान विमान तळावर जाऊ...त्याने ही सगळी संधी साधत सुधाला मुंबई दर्शन करून आणू हे ही ठरवले होते... आईला त्यातले सांगितले तर पुन्हा नको ते ऐकावे लागणार..
त्याने तसे ठरवले आणि काही वेळात आई ने विचारले मोहितला..."अरे बाबा तू काय ठरवलेस ,कधी येणार शीतल आणि तू कधी जाणार आहेस तिला आणायला...तिला काही माहीत नाही हो आपल्या मुंबईची... लेकरू हरवून जायचे नाहीतर...मी तर म्हणते ती जर 8 वाजता येणार असेल किंवा त्या आधीच येणार असेल तर तसे जाण्याचे ठरवा तुम्ही दोघे..."
आईचे हे बोलणे ऐकताच मोहित ही खुश झाला ,आज कधी नव्हे ते आई स्वतः म्हणाली होती ,की तुम्ही दोघे जा...आणि वेळेच्या आधी जा...म्हणजे जे मला हवे होते तेच आई म्हणाली..म्हणजे मी सुधाला घेऊन जायला बिनधास्त मोकळा.....आई बदलली होती जरा...वागण्यात फरक दिसत होता...एक शीतल काय येणार म्हंटल्यावर तिला आवडेल तसे वागायचे ठरवले होतेच...कारण शीतल ला आजीचा हा स्वभाव आणि तिचे मामी सोबतचे वागणे ,आणि मामीला दिली जाणारी वागणूक आवडत नाही ह्याबद्दल ती आजीसोबत बोलली होती आणि ही वागणूक सुधारली नाही तर मी मुंबईला तुझ्या कडे येणार नाही अशी धमकी दिली होती...म्हणून की काय आजी आता चांगले वागण्याचा प्रयत्न करत होती...शीतल महत्वाची आहे म्हणून आपल्या वागण्यावर जरा ताबा ठेऊन सासुबाई वागत होत्या...
सुधा, "मोहित शीतल कधी पोहचणार आहे विचार तिला ,मग आपण तशी कॅब बुक करून जाऊ "
मोहित तयारी करत होता पण तो वेळे आधीच तयार झाला होता, तो खूप आधी तयार झाला हे पाहून सुधाला काही कळत नव्हते..
त्याने तिला इशारा केला, चल उरक लवकर आपल्याला वेळ होत आहे ,सगळे कसे वेळेवर व्हायला हवे...उगाच उशीर नको ग...
त्याचे इशारे समजत नव्हते तिला...अजून तर वेळ आहे खूप आपल्याकडे तरी हा असे का वागत असेल...
तिला सांगून ही कळत नाही हे पाहून सासुबाई म्हणाली ,"अग उठ काय बघत बसली आहेस तू, जर तो म्हणत आहे तर हो तयार ,का उगाच वेळ वाया घालवतेस तू...माझ्या नातीला वेळेत घेऊन या, नाहीतर ती तुम्हाला तिकडे शोधत बसेल.."
सुधा उठली आणि मोहित कडे पुन्हा
पाहू लागली, "काय रे ,अजून खूप वेळ आहे ना ,कॅब तासात पोहून देईल आपल्याला मग का उगाच "
पाहू लागली, "काय रे ,अजून खूप वेळ आहे ना ,कॅब तासात पोहून देईल आपल्याला मग का उगाच "
मोहित, "तू चल लवकर ,आता काही विचारू नकोस ,आणि मी ही काही सांगणार नाही तुला. "
ती लगेच साडी घालण्या करीता साडी काढते ,तितक्यात तो तिला म्हणतो, "तो ड्रेस काढ जो तुला तुझ्या बिर्थडे ला घेऊन दिला होता, तो blue ड्रेस...अनारकली...तो तुला खूप छान दिसतो तो...स्लीवलेस....हो पण त्यावर तुझे ते लोंबते कानातले घाल न विसरता... मला आवडतात ते.."
ती बघतच रहाते... ती बाहेर बसलेल्या सासूबाईकडे बघत ,त्याला म्हणते, "हळू बोल आई बसल्या आहेत बाहेर, त्यांना काय वाटेल."
सासुबाई आवाज देत, "घाल ग काही ही ,मी आज काही ही बोलणार नाही ,माझी नात येते ,आज कसली ही चौकट तुला बांधील नाही...तू फक्त वेळेत जा.."
सासुबाई इकडे माळ चाळत बसतात...त्यांचे मन आता फक्त नातीच्या भेटीसाठी आतुर झाले होते.
आजीचे खूप वय झाले होते. तिला मुलाचे मुल बघण्याची खूप इच्छा होती...पण 10 वर्षे झाली तरी त्याला काही मुल झालेच नाही..मग सहाजिक आहे सुनेचा राग राग सुरू झाला... तिच्या मुळे वंशाला दिवा तर नाहीच पण पणती ही लाभली नाही ह्याचे दुःख होते... तो मोठ्या नौकरीला होता आणि हे पाहून सुधाच्या घरच्यांनी सुधासाठी हे स्थळ पाहिले...सुधा ही मोठ्या घरची मुलगी...शिक्षण post graduate....कला शाखेतून पूर्ण केले होते.... आर्टस्ची ती विद्यार्थी..
कथा ,कविता, नाटकं...ह्या तिच्या खास आवडीचे.. मोहितला ही हे आवडायचे पण तो सायन्स चा असल्याने तो ह्यात रमू शकला नाही...लगेच शिक्षण पूर्ण केले आणि लगेच नौकरी...तर लगेच सुधाचे स्थळ आले....
कथा ,कविता, नाटकं...ह्या तिच्या खास आवडीचे.. मोहितला ही हे आवडायचे पण तो सायन्स चा असल्याने तो ह्यात रमू शकला नाही...लगेच शिक्षण पूर्ण केले आणि लगेच नौकरी...तर लगेच सुधाचे स्थळ आले....
क्रमशः.....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा