चप्पल काढायला गेली तर दारात जेन्टस बूट. कोण असेल? कशाला आला असेल? ललित असेल का? अंकुरला घेऊन जायला तर नाही आला ना? या विचारातच तिने बेल वाजवली पण कोणी दार उघडेना.
काय झालं असेल? या भीतीने अंबिकाच्या पोटात गोळा आला. श्वास भरून आला. भर थंडीच्या दिवसातही तिला घाम सुटला. तिने दार ठोटवायला दारावर हात मारला तसं दार आपोआप उघडल्या गेलं. लोटलेलंच होतं बहुतेक.
"प्रमिला असं कसं करू शकते?" अंबिकाच्या मनात आलं. आत जाऊन बघते तर घर आधीच फुग्यांनी भरलेलं आणि अंकुर मिस्टर आनंद जाईच्या मांडीवर बसून लॅपटॉप सारखं एक खेळणं खेळतोय. अंबिकाला तिच्या डोळयांवर विश्वास बसला नाही.
"स्वप्न बघतेय का मी दिवसा ढवळ्या?" ती स्वतःशीच बडबडली आणि तिने परत दार ओढून घेतलं आणि परत लोटलं. पण आतलं चित्र काही बदललं नाही.
सुप्त मनाच्या सुप्त इच्छा ! तिच्याही सुप्त मनात खूप वेळा यायचं मिस्टर आनंद जाई सारखा बाबा अंकुरला मिळाला असता तर? पण असं काही सत्यात होणं नाही हे माहित असल्यामुळे समोर त्या दोघांना बाप लेका सारखं खेळताना बघून तिची मानसिक स्थिती चांगलीच गुंता गुंतीची झाली.
झालं असं की अंबिकावर लक्ष ठेवता यावं, तिला काही अडचण येताच त्यांना कळावं म्हणून मिस्टर आनंद जाईने त्यांच्या केबिनच्या दारा जवळ असलेल्या CCTV चा पूर्ण फोकस अंबिकावर ठेवला होता आणि ऑफिसच्या सर्व CCTV शी कनेक्टेड एक स्क्रीन त्यांच्या लॅपटॉपवर आणि एक सिक्योरिटी केबिन मधे होती.
दुपारी अंकुरचा कॉल येताच अंबिकाची झालेली परिस्थिती बघून नक्कीच अंकुर बद्दल काहीतरी टेंशन आहे याचा अंदाज त्यांना आला. नक्की काय झालं ते माहित करण्यासाठी म्हणून त्यांनी प्रमिलाला फोन केला तेव्हा त्यांना सगळी कल्पना आली व ते अंबिकाला काहीच न सांगता अंकुरसाठी केक आणि खेळणी घेऊन गेले.
"अरे मॅडम आल्या तुम्ही?" मिस्टर आनंद जाईसाठी पाणी आणि चहा घेऊन आलेली प्रमिला अंबिकाला म्हणाली. तसा अंकुर धावत तिच्याजवळ गेला.
"ममा तुझे सर नाशिकला गेले होते म्हणे. बघ बाबानी तुझ्या सर सोबत मला किती छान छान बर्थडे गिफ्ट पाठवलं आहे." अंकुर तिचा हात धरून तिला आत घेऊन गेला आणि एक एक खेळणं दाखवू लागला, "हा डोरेमॉन, हा शिन चॅन आणि हे टॉय लॅपटॉप, यात सुंदर गाणी आहेत, A, B, C, D आहे, 1, 2, 3, 4 आहे."
"मी जातो आता." मिस्टर आनंद जाई पाणी पिऊन जायला उठले.
"अरे सर येतो म्हणायचं असतं, जातो नाही." अंकुर त्यांना म्हणाला आणि खेळण्यात गुंग झाला.
"हो येतो मी." मिस्टर आनंद जाई म्हणाले.
"एक मिनिट थांबा सर." अंबिका त्यांना थांबवत म्हणाली, "ह्या सगळ्या वस्तूंची किंमत सांगा आणि पैसे घेऊन जा."
"कशा कशाची किंमत लावणार आहात तुम्ही नाशिककर? एका बिन बापाच्या लेकराला थोडासा आनंद दिला यात गैर काय?" मिस्टर आनंद जाईने तिला भावूक होऊन विचारलं. त्यांची नजर तिच्या हातातल्या ब्लॅंकेट वर गेली, "तुम्हीही तेच करणार होत्या ना?"
"हो कारण मी त्याची आई आहे. तुमचा मात्र त्याच्याशी काहीही संबंध नाही." अंबिका कठोर शब्दात म्हणाली.
"असा कसा संबंध नाही असं म्हणता? ज्या शरीरात तो नऊ महिने वाढला आणि जन्माला आला, त्याच शरीरात आमचंही बाळ वाढतंय. मला वाटतं इतका संबंध पुरेसा आहे." मिस्टर आनंद जाई.
"हो, पण हा संबंध अगदीच तात्पुरता आहे. म्हणून म्हणतेय नको त्या गोष्टींची सवय नका लावू त्याला." अंबिका कळवळून म्हणाली.
"तुम्ही हो म्हणणार तर मी अतुट असा संबंध जोडायलाही तयार आहे." मिस्टर आनंद जाई तिच्या नजरेला नजर देऊन म्हणाले.
अंबिका अवाक होऊन त्यांना बघू लागली.
"मिसेस जाईला माहित झालं तर काय म्हणतील त्या? असं कसं पुरुष हवं तेव्हा वर्षांपासून अर्धांगिनी म्हणून सोबत असलेल्या स्त्री ला हवं तेव्हा दूर करून एखाद्या पर स्त्रीला जवळ करायचा विचार करतात? मिस्टर आनंद जाई तर त्यातले नव्हते वाटत. आपलंच चुकलं. मिसेस जाई म्हणत होत्या ऑफिसला जाऊ नको. मिस्टर आनंद जाई गुंततील तुझ्यात. ऐकलं नाही त्यांचं आणि बघ आता काय झालं?"
अंबिकाच्या डोक्यात एका मागून एक धडधड विचारांनी मारा केला. तिचा गळा सोखून आला. तिने डोक्याला हात लावला.
"अंबिका, तुम्ही ठीक आहे." मिस्टर आनंद जाईने तिला आधार देत विचारलं.
"तुम्ही प्लीज जा इथून. प्लीज!" अंबिका बसायला खुर्ची शोधत त्यांना म्हणाली.
"हो मी जातो. तुम्ही प्लीज टेंशन घेऊ नका. पण हेही विसरु नका मी आहे सदैव तुम्हाला आधार द्यायला." मिस्टर आनंद जाई.
"मला नकोय तुमचा आधार, मला कोणीच पुरुष नको आहे माझ्या आयुष्यात." अंबिका ओरडली आणि जमिनीवर कोसळली.
"सर तुम्ही किंमत नाही सांगितली खेळण्यांची." अंबिकाने परत विचारलं तसे मिस्टर आनंद जाई त्यांच्या विचार चक्रातून बाहेर आले. हे सगळं फक्त एक दिवा स्वप्न होतं हे बघून त्यांना खूप बरं वाटलं. त्यांनी डोळे मिटले आणि अंबिकाला काहीच उत्तर न देता ते घरातून बाहेर पडले.
"अरे असं कसं जाता काहीच न सांगता. थांबा !" अंबिका कमरेवर हात ठेऊन त्यांच्या मागे जात त्यांना म्हणाली. पण ते काही थांबले नाही.
"मॅडम तुम्ही का धावपळ करताय?" प्रमिला तिला थांबवून म्हणाली, "उद्या ऑफिसला जाणारच ना तेव्हा बोला काय ते."
"अरे हो, उद्या बघतेच यांना. खडुस टीचर कुठले." अंबिका रागात म्हणाली. पण अंकुरच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तिला आत्म संतुष्टी मिळाली. अंकुर सोबत खेळून रात्री मिस्टर आनंद जाईच्या विचारातच ती निवांत झोपली.
दुसऱ्या दिवशी ऑफिसमधे जाताच अंबिकाने, अंकुरला मिस्टर आनंद जाईने दिलेल्या सर्व वस्तूंची अंदाजे किंमत लावून, लिस्ट बनवून, त्या लिस्ट सोबत तितके पैसे चपराशीला मिस्टर आनंद जाईला द्यायला सांगितलं.
त्यांना ती लिस्ट बघून खूपच राग आला. पण अंबिकाची नाजूक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी डोकं शांत केलं व त्या लिस्ट मधे त्यांनी तिला जितक्या वेळी कारने घरी सोडून दिलं तितक्या वेळचे पैसेही ऍड करावे असं लिहिलं.
अंबिकाने आठवून आठवून किती वेळा घरी सोडलं त्याचेही पैसे जोडले आणि चपराशीला लिस्ट व पैसे दिले.
मिस्टर आनंद जाईनी परत त्यात मित्राच्या फ्लॅटचा (ती राहत असलेला) खरा रेंट लिहून पाठवला.
तिने ब्लँक चेक सही करून आत पाठवला.
ते बघून त्यांनी तिला वाचवतांना झालेली जखम व आलेला खर्च त्याबद्दल लिहून अंबिकाला पाठवलं.
ते पाहून तिला भोवळच आली. पण तिनेही आज सर्व हिशोब बरोबर लावायचं ठरवलं आणि माझ्या सॅलरीतून कापा असं लिहून चिट्ठी चपराशीला दिली.
"मी नाही जाणार हो आत आता. सर जाम चिडतात." त्यांच्या चिठ्यांची देवाण घेवाण करून थकलेला चपराशी म्हणाला, "इथल्या इथे चिठ्ठी चिठ्ठी खेळता. आत जाऊन बोला की त्यांच्याशी सरळ. डोहाळे लागलेत की काय तुम्हाला असं आईचं पत्र खेळायचे. पण मी थकलोय हा माझ्या बायकोचे डोहाळे पुरवून. आणि ऑफिस मधे इतरही कामं आहेत हो मला." चपराशी वैतागून नॉन स्टॉप बडबड करू लागला.
"मी कशालाच याला म्हटलं चिठ्ठी दे म्हणून आत. कसं थांबवू याला? किती बडबडतोय हा?" अंबिका त्याची बडबड ऐकून डोक्याला हात लावून स्वतःला म्हणाली.
"आतापर्यंत चिठ्ठी परत का नाही? अंबिकाला टेंशन तर नाही आलं, इतकी जास्त रक्कम द्यावी लागेल म्हणून? मीही आततायीपणाचा करतो. पण तीही कशी वागते? मला द्यावं वाटलं म्हणून मी दिलं अंकुरला गिफ्ट. हिला काय गरज वाईट वाटायची? हा पण तिचा मुलगा आहे तो आणि स्वाभिमान दुखावला असेल? स्वाभिमान की अभिमान? असो जेही. ती ठीक आहे की नाही बघायलाच हवं." या विचारात इकडून तिकडे येर झाऱ्या मारणाऱ्या मिस्टर आनंद जाईला बघून जिग्नेश हळुच खुद्कन हसला. त्यांनाही हसू आलं. ते सरळ अंबिकाला बघायला केबिन बाहेर गेले.
अंबिका डोक्याला हात लावून बसलेली आणि चपराशी बडबडत असलेला. तो शांत व्हावा म्हणून मिस्टर आनंद जाई त्याला ऐकू जाईल असं खोकलले. तसं अंबिकाचंही लक्ष त्यांच्याकडे गेलं. दोघांची नजरा नजर झाली. तोच चपराशीचा मोबाईल वाजला,
"टिक टिक वाजते डोक्यात
धडधड वाढते ठोक्यात,
कधी जमीन कधी नभि,
संपते अंतर झोक्यात......
धडधड वाढते ठोक्यात,
कधी जमीन कधी नभि,
संपते अंतर झोक्यात......
टिक टिक वाजते डोक्यात
धडधड वाढते ठोक्यात.
धडधड वाढते ठोक्यात.
नाही जरी सरी तरी,
भिजते अंग पाण्याने,
सोचू तुम्हे पलभर भी,
बरसे सावन जोमाने,
भिजते अंग पाण्याने,
सोचू तुम्हे पलभर भी,
बरसे सावन जोमाने,
शिंपल्यांचे शोपिस नको
जीव अडकला मोत्यात......
जीव अडकला मोत्यात......
"अगं बाई तुझ्या डोहाळ्यांपायी मला वेड लागल असं दिसतय. कधी एकदा हा नववा महिना पूर्ण होतो आणि ते खादाड पोर बाहेर येतं असं झालंय मला." चपराशी फोनवर त्याच्या बायकोशी बोलत बाजूला निघून गेला. तसे अंबिका आणि मिस्टर आनंद जाई भानावर आले.
मिस्टर आनंद जाई केबिनच्या आत गेले तर अंबिका चिठ्ठी ड्रॉवरमधे टाकून आपलं काम करू लागली. दोघांना स्वतः वरच खूप हसू येत होतं. अगदीच लहान मुलांसारखं बालिश वागतोय का आपण? असं झालं.
चपराशीला त्याच्या बायकोच्या डोहाळ्यांबद्दल बोलतांना ऐकून मिस्टर आनंद जाईच्या मनात आलं, "अंबिकालाही काही खावंसं वाटत असेल का? पण खायची इच्छा झाली तरीही तिच्या जवळ कोण आहे तिचे डोहाळे पूर्ण करायला? विचारावं तिला काय हवं ते? पण ती परत हिशोब घेऊन बसेल."
इकडे अंबिकाच्याही डोक्यात तेच सुरु होतं. किती नशीबवान या चपराशीची बायको. किती प्रेम करतो हा तिच्यावर, वैतागतो पण सर्व डोहाळे पूर्ण करायचा आटोकाट प्रयत्न करतोय. आणि एक मी अंकुरच्या वेळी ललितला नौकरी नव्हती म्हणून खायच्या काय इतरही सर्वच इच्छांना तिलांजली. तुझा बाबा (पोटावर हात ठेऊन) सगळंच आणुन द्यायला तयार आहे पण मला नकोय. पण तु काळजी नको करू. जितकं होईल तितकं मी तुझ्या इच्छा पूर्ण नक्की करेल.
घड्याळात पाच वाजले. सुट्टी व्हायला अर्धा तास बाकी तसा चपराशी एका चाट वाल्याला त्याच्या सामाना सोबत घेऊन आला. कॅन्टीन एरियात छान टेबल सजवला गेला. सर्व एम्प्लॉईजला बोलवण्यात आलं. पाणीपुरी, दहीपुरी, दाबेली आणि भेळ असा बेत होता. आणि गरम गरम जिलेबीही कॅन्टीनमधे बनवणं सुरु झालं.
"कोणत्या खुशीत?"
"कोण देतंय पार्टी?"
"अचानक कसं काय?"
"कोण देतंय पार्टी?"
"अचानक कसं काय?"
अशी विचारणा झाली.
"जिग्नेश सर कडून आहे. लग्न जुळलं त्यांचं." चपराशी त्याला मिस्टर आनंद जाईने सांगितलं तसंच बोलला. जिग्नेशनेही हसत हो म्हटलं.
"जिग्नेश सर कडून आहे. लग्न जुळलं त्यांचं." चपराशी त्याला मिस्टर आनंद जाईने सांगितलं तसंच बोलला. जिग्नेशनेही हसत हो म्हटलं.
अंबिकाला आश्चर्य वाटलं.
"शेजारीच बसून होती याच्या मग मला का नाही सांगितलं सकाळपासून याने?" तिचा मेंदू विचार करू लागला, "मिस्टर आनंद जाईने तर त्याच्या नावाने सगळी अरेंजमेंट केली नाही?"
"शेजारीच बसून होती याच्या मग मला का नाही सांगितलं सकाळपासून याने?" तिचा मेंदू विचार करू लागला, "मिस्टर आनंद जाईने तर त्याच्या नावाने सगळी अरेंजमेंट केली नाही?"
तिने सारिकाशी बोलत असलेल्या मिस्टर आनंद जाईवर एक नजर टाकली. त्यांनी मात्र तिच्याकडे बघूनही न बघितल्या सारखं केलं.
"अंबिका अगं तुझ्यासाठी तर मेजवानीच आहे ही. बघ बरोबर तुला आवडतील अशेच सर्व पदार्थ बोलवलेत जिग्नेशने." नवीनच जॉईन झालेली केतकी तिला म्हणाली, "चल एक एक प्लेट खाऊ सगळं."
केतकी हात धरून अंबिकाला टेबल जवळ घेऊन गेली, "जिग्नेश तुझ्या प्रिय कलीगसाठी छान चाट बनवून दे बरं."
"हो हो नक्कीच. त्यांच्यासाठीच तर इतकी उठाठेव करण्यात आली." जिग्नेश बोलला.
अंबिकाने चमकून त्याच्याकडे बघितलं. तिची शंका दृढ झाली. तिला दाल में काला वाटल्यामुळे काहीच खायचं मन नव्हतं पण नेहाने मस्त पैकी पुरी च्या आत फरसाण, उकडलेला आलू, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, त्यावर दही, शेव आणि थोडा चॅट मसाला, चिंचेची चटणी व त्यावर कोथिंबीर अशी दहीपुरीची प्लेट तिच्या हातात दिली आणि तिला राहवलंच नाही. मग गरम गरम जिलेबीवरही ताव मारण्यात आला.
अंबिकाने चमकून त्याच्याकडे बघितलं. तिची शंका दृढ झाली. तिला दाल में काला वाटल्यामुळे काहीच खायचं मन नव्हतं पण नेहाने मस्त पैकी पुरी च्या आत फरसाण, उकडलेला आलू, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, त्यावर दही, शेव आणि थोडा चॅट मसाला, चिंचेची चटणी व त्यावर कोथिंबीर अशी दहीपुरीची प्लेट तिच्या हातात दिली आणि तिला राहवलंच नाही. मग गरम गरम जिलेबीवरही ताव मारण्यात आला.
मिस्टर आंनद जाईला परत एकदा त्यांचं मिशन फत्ते झाल्याचा आनंद झाला.
क्रमश :
तळटीप :
या कथेचा लेखिकेच्या परस्पर आयुष्याशी किंवा इतर कोणाशी काहीही संबंध नाही. ही निव्वळ काल्पनिक आणि आजूबाजूच्या सामाजिक वातावरणाला बघून सुचलेली मनोरंजनपर, स्त्रियांना प्रेरित करण्यासाठी लिहिलेली कथा आहे.
तळटीप :
या कथेचा लेखिकेच्या परस्पर आयुष्याशी किंवा इतर कोणाशी काहीही संबंध नाही. ही निव्वळ काल्पनिक आणि आजूबाजूच्या सामाजिक वातावरणाला बघून सुचलेली मनोरंजनपर, स्त्रियांना प्रेरित करण्यासाठी लिहिलेली कथा आहे.
लेखिका : अर्चना सोनाग्रे वसतकार
फोटो : साभार गुगल वरून
फोटो : साभार गुगल वरून
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा