अंबिकाला सातवा महिना लागला. आता तिचं पोट छान बाहेर दिसायला लागलं. रविवारी दुपारी अंकुरला जवळ घेऊन बसली असतांना अंकुरने विचारलं,
"मम्मा तुझ्या पोटात बेबी आहे का?"
"हो." अंबिका स्मित हास्य करून त्याला म्हणाली, "पण तुला कसं माहीत?"
"आमच्या टीचरचंही असंच पोट फुगलं आहे. नकु म्हणत होता त्यात बेबी आहे." अंकुर निरागसपणे म्हणाला.
अंबिका परत त्याची कॉपी बघू लागली. त्यानं एक नजर अंबिकावर टाकली मग तिला विचारलं, "हा बेबी आल्यावर तु मला तुझ्या जवळ झोपू नाही देणार ना?"
"हो." अंबिका स्मित हास्य करून त्याला म्हणाली, "पण तुला कसं माहीत?"
"आमच्या टीचरचंही असंच पोट फुगलं आहे. नकु म्हणत होता त्यात बेबी आहे." अंकुर निरागसपणे म्हणाला.
अंबिका परत त्याची कॉपी बघू लागली. त्यानं एक नजर अंबिकावर टाकली मग तिला विचारलं, "हा बेबी आल्यावर तु मला तुझ्या जवळ झोपू नाही देणार ना?"
अंबिका गम्भीर झाली, "असं का म्हणतोय? तु माझं बाळ आहेस. तुला मी माझ्या पासून कधीच दूर करणार नाही." अंबिकाने त्याला आपल्या मिठीत घेतलं आणि स्वतःला म्हणाली,
"तसंही हे बाळ आपल्या सोबत राहणार नाही. मी फक्त देवकी बनून त्याच्या जन्माचे निमित्त मात्र होतेय."
"तसंही हे बाळ आपल्या सोबत राहणार नाही. मी फक्त देवकी बनून त्याच्या जन्माचे निमित्त मात्र होतेय."
आठवा महिना संपत आला तसं खुर्चीतुन उठा बसायला अंबिकाला त्रास होऊ लागला. पाठीचं दुखणं वेगळं. मिस्टर आनंद जाईला सर्व दिसायचं. म्हणून एक दिवस त्यांनी अंबिकाला फोन करून एक फाईल घेऊन यायला सांगितली. अर्थातच अंबिकाला आधी सारखं लवकर फाईल घेऊन आत जाता आलं नाही. मिस्टर आनंद जाईने घड्याळात बघितलं आणि बोलले,
"नाशिककर मला वाटतं तुम्ही मॅटर्निटी लिव्ह घेऊन घ्यावी आता. तुम्हाला त्रास होतो तर होतोच पण ऑफिसचं कामही हॅम्पर होतंय. तुमच्या स्पीडने काम केलं तर कंपनीच मार्गाला लागेल."
अंबिकाला त्यांचा खूप राग आला. नेहाही तिथेच होती. तिला वाटलं ही काहीतरी बोलणार म्हणून ती अंबिकाला समजावून म्हणाली,
"हो गं घरी आराम कर, मॉर्निंग, इव्हनिंग वॉकला जात जा. अंकुरला वेळ दे. त्याची परीक्षाही असेल ना आता."
"ओके मॅम तुम्ही म्हणणार तसं करेल मी." अंबिका नाराजीनेच केबिन बाहेर पडली. आपलं एक एक सामान आठवणीने घेऊ लागली. चार वर्ष पूर्ण झाली तिला ऑफिसमधे, त्या सीटवर बसून. हे ऑफिस म्हणजे दुसरं घरंच झालेलं तिच्यासाठी. बाळ झाल्यावर परत त्या सीटवर बसायला नाही मिळणार, ना या ऑफिसच्या आवारात येता येईल. म्हणून तिचं मन भावूक झालं. पण हे कधीतरी होणार होतंच. लवकर झालं. यात इतकं काय रडायचं? Nothing is permanent. असं स्वतःला समजावून जड पावलांनी ती ऑफिस बाहेर पडली.
अंबिकाने स्वतःला अंकुरमधे आणि मागे पडलेले छंद जोपासण्यात व्यस्त केलं. मिसेस जाईने अंबिकाच्या मागे खूप कुरकुर लावली जाई निवास वर सोबत राहायला चालण्यासाठी पण तिने एक ऐकलं नाही आणि ती काही राहायला गेली नाही. मिस्टर आनंद जाईला तेच बरं वाटलं नाहीतर मिसेस जाईने अंबिकाच्या नाकात दम आणला असता इंस्ट्रक्शन देऊन देऊन.
"अंबिकाला नऊवा महिना सुरु झाला. डोहाळ जेवण तर व्हायलाच हवं. नाहीतर बाळ हावरट आणि चोर प्रवृत्तीचं होतं." सारिका मिसेस जाईला म्हणाली.
"ते मला माहित नाही. पण पिढीजात संस्कार व्हायला हवे." मिसेस जाई म्हणाल्या, "तु या दोन तीन दिवसातच छानशी तारीख ठरवून चांगल्या इव्हेन्ट कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दे. आपल्याला खूप मोठा कार्यक्रम नकोय. आपण 15-20 पुरे. पण सजावट पूर्ण हवी. मी आनंद सोबत बोलते."
"हो हो !" सारिका कळ लावून निघून गेली.
मिसेस जाईने मिस्टर आनंद जाईला डोहाळ जेवणाबद्दल सांगितलं.
"तुम्ही हवं ते करा. मी तुमच्यात अजिबात इंटरफेअर करणार नाही." मिस्टर आनंद जाई.
"तुम्ही हवं ते करा. मी तुमच्यात अजिबात इंटरफेअर करणार नाही." मिस्टर आनंद जाई.
"मला माहितेय ते. पण बाळाच्या बापाची उपस्थिती गरजेची आहे कार्यक्रमात. बाळाला आशीर्वाद द्यायला."
"सॉरी आम्ही नाही येऊ शकत." मिस्टर आनंद जाई
"तिला खाता यावं म्हणून कॅन्टीनमधे सर्वांना मेजवानी देऊ शकता, तिच्या मुलाला खेळणी देऊ शकता मग उघड उघड कार्यक्रमात हजेरी का नाही लावू शकत? आणि तसेही जग जाहीर झालंच आहे अंबिका आपल्याला सरोगेट मदर बनून बाळ देतेय. मग उगाच इशू बनवू नका." मिसेस जाई म्हणाल्या. मिस्टर आनंद जाई पुढे कार्यक्रम अटेंड केल्या शिवाय इतर पर्याय उरला नाही.
जाई निवास अगदी सिनेमात दाखवतात तसाच सजला होता. ऑफिस आणि जाई परिवारच्या जवळच्या 20-25 लोकांना फक्त आमंत्रण होतं. हॉल मधे एक सुंदर पाळणा फुलांनी सजवण्यात आला. हिरवीकंच पैठणी घालून, सोळा शृंगार पूर्ण करून असलेल्या अंबिकाला पाळण्यावर बसवण्यात आलं. सगळं अगदी तसंच होतं जसं अंबिकाला अंकुरच्या वेळी असावं असं वाटत होतं.
तिच्या मनात आलं, "देव काही ना काही कमी ठेवतोच आयुष्यात. तेव्हा बाळ पूर्ण हक्काने माझंच होतं पण यापैकी कोणताच आनंद माझ्या वाट्याला आला नाही आणि आज सर्व काही मना जोगते घडले आहे पण त्याचा आनंद मला उपभोगता येत नाहीये कारण या बाळावर माझा काहीच हक्क नाही.
दात है तो चणे नहीं, चणे है तो दांत नहीं. असं झालं माझं"
अंकुरही तिच्या मागोमाग होताच. मिसेस जाईने प्रमिलाला तिथून बाहेर खेळायला ने सांगितलं. पण अंबिकाने तिला थांबवलं. मिस्टर आनंद जाईनेही तिच्या बोलण्याला दुजोरा दिला आणि अंकुरला तिच्या सोबत पाळण्यात बसवलं.
मस्त गाणी झाली. अंबिकाला हळदी कुंकू लावून तिची ओटी भरण्यात आली. मिसेस आणि मिस्टर जाईने तिच्या ओटीत सोन्याचा नेकलेस आणि एक पन्नास लाखाचा चेक ठेवला. अंबिकाला ते आवडलं नाही पण ती काहीच बोलली नाही. कारण ही ती वेळ नव्हती. समोर पाहुणे मंडळी त्यांच्या समोर उगाच तमाशा नको म्हणून ज्याने जे दिलं तिने आनंदाने स्वीकारलं.
मग वेगवेगळ्या मिठाईच्या वाट्या झाकून असलेलं एक मोठं ताट अंबिका समोर ठेवण्यात आलं. तिने एका वाटी वरून झाकण काढलं. \"जिलेबी\", दुसऱ्या वाटी वरून झाकण काढलं, \"बर्फी\", तिसऱ्या वाटी वरून झाकण काढलं, \"पेढा\", सर्वांनी तिला शुभेच्छा दिल्या. जेवणं झाली. कार्यक्रम संपला. अंकुर प्रमिला सोबत खेळायला बाहेर निघून गेला. मिसेस जाई पाहुण्यांना सोडायला बाहेर गेलेल्या.
दोन तास एक सारखं बसून अंबिकाचे पाय चांगलेच सुजले. तिला वॉशरूमला जायची इच्छा झाली. ती पाळण्यावरून उठायला पाहत होती. पण तिला उठता येत नव्हतं. तिला अवघडलेलं बघून बाजूलाच फोनवर मेसेजेस बघत असलेल्या मिस्टर आनंद जाईने तिला हात दिला. अंबिकाला काय करावं प्रश्न पडला. पण वॉशरूम मधे जाणंही गरजेचं होतं. आजूबाजूला दुसरं कोणी मदत करणारं दिसत नव्हतं. म्हणून तिने हात त्यांच्या हातात दिला. त्यांनी तिला खांद्याला पकडून उठायला मदत केली. अगदी तेव्हाच आत येत असलेल्या मिसेस जाईने हे सर्व बघितलं. त्यांचं डोकं ठणकलं. अंबिका वॉशरूममधे जाऊन आली.
"मला हे दागिने आणि हा चेक नको आहे." अंबिका मिसेस जाईला म्हणाली, "झालंच तर एक साधीशी नौकरी द्या दिल्ली, मुंबई, म्हणजे कुठेही. मी अंकुरला घेऊन राहीन तिथे."
"तुला असेल पण आम्हाला दिलेलं परत घ्यायची सवय नाही. तेव्हा हे तुझ्याच जवळ ठेव आणि बाळ झाल्यावर परत आमच्या आयुष्यात येऊ नकोस." मिसेस जाई म्हणाल्या.
"मी नाहीच येणार. वचन दिलं आहे तुम्हाला." अंबिका.
"मग हे नौकरीचं नाटक कशाला? कोणाला दाखवायला? आनंदला ना, कि किती बिचारी आहेस तु?" मिसेस जाई.
"मॅम असं काहीच नाही." अंबिका कळवळून म्हणाली.
"मग कसं अंबिका? तुम्हाला काय वाटतं मला दिसत नाही तुमच्यात काय सुरु आहे? पण याद राख तु कितीही प्रयत्न केला तरीही आनंद तुला कधीच मिळणार नाही." मिसेस जाई ठणकावून बोलल्या.
अंबिकाला समजत नव्हतं मिसेस जाईला कसं समजावून सांगावं कि तिला मिस्टर आनंद जाईमधे इंटरेस्ट नाही. तेवढ्यात प्रमिलाने तिथे येऊन विचारलं,
"अंकुर आला का इकडे?"
"नाही?" अंबिका घाबरून उत्तरली, "तुझ्या सोबत होता ना तो?"
"हो, होता तो माझ्या सोबतच पण पंधरा मिनिट पूर्वी मी वॉशरूम मधे जाऊन आले तर तो बाहेर खेळत नव्हता. मी बाहेर पूर्ण गार्डन बघितलं पण तो कुठेच दिसत नाहीये."
"हो, होता तो माझ्या सोबतच पण पंधरा मिनिट पूर्वी मी वॉशरूम मधे जाऊन आले तर तो बाहेर खेळत नव्हता. मी बाहेर पूर्ण गार्डन बघितलं पण तो कुठेच दिसत नाहीये."
"अंकुर, अंकुर !" अंबिकाला दरदरून घाम फुटला. तिला श्वासही घेता येईना. जन्म दिलेलं, एकटीनं वाढवलेलं मुल हरवलं होतं आणि पोटात असलेल्यावर हक्क नव्हता. तिला रडावं वाटत होतं. घशातून शब्द बाहेर पडेना. ती खाली बसली. मिसेस जाई घाबरल्या. त्यांनी ड्रॉयव्हरला गाडी काढायला सांगितलं. प्रमिला मिस्टर आनंद जाईला बोलवायला त्यांच्या खोलीत गेली. बघते तर अंकुर त्यांच्या बाजूला बसून त्यांच्या मोबाईलवर नाच रे मोरा गाणं बघतोय आणि ते लॅपटॉपवर काम करत आहेत. तिच्या तोंडातून शब्द फुटेना. तिला असं डायरेक्ट खोलीत आलेलं बघून त्यांनीच विचारलं,
"काय झालं?"
"अंबिका मॅडमला कसंतरीच होतंय." प्रमिला म्हणाली. तसे मिस्टर आनंद जाई लॅपटॉप बंद करून उठले.
ते धावतच खाली गेले. त्यांच्या पाठोपाठ प्रमिला अंकुरला घेऊन गेली. अंबिका घामाने लथपथ झाली होती. मिसेस जाईला सुचत नव्हतं तिला कसं गाडीत नेऊन बसवावं. मिस्टर आनंद जाईने तिला उचलून घेतलं.
"अंकुर !" ती म्हणाली. तशी प्रमिला अंकुरला घेऊन तिच्या जवळ आली.
"मॅम सॉरी. हा घरातच होता. मला दिसला नाही." प्रमिला गहिवरून म्हणाली.
"असुदे. लक्ष ठेव." अंबिका महत्प्रयत्नाने इतकंच बोलू शकली.
"आनंद चला गाडीत घ्या तिला." मिसेस जाईनी आवाज दिला.
अंबिकाला दवाखान्यात नेण्यात आलं.
"ब्लड प्रेशर चांगलंच वाढलं आहे. आम्ही कमी करायचा प्रयत्न करतोय." डॉक्टर अंबिकाला तपासून म्हणाली.
"मॅम सॉरी. हा घरातच होता. मला दिसला नाही." प्रमिला गहिवरून म्हणाली.
"असुदे. लक्ष ठेव." अंबिका महत्प्रयत्नाने इतकंच बोलू शकली.
"आनंद चला गाडीत घ्या तिला." मिसेस जाईनी आवाज दिला.
अंबिकाला दवाखान्यात नेण्यात आलं.
"ब्लड प्रेशर चांगलंच वाढलं आहे. आम्ही कमी करायचा प्रयत्न करतोय." डॉक्टर अंबिकाला तपासून म्हणाली.
"हो डॉक्टर प्लीज काहीतरी करा. तुम्हाला हवे तितके पैसे मिळतील. पण बाळ सुखरूप हवं आम्हाला." मिसेस जाई म्हणाल्या.
"मॅम पैशांचा प्रश्न नाही." डॉक्टर बोलता बोलता थांबली. "मग काय प्रॉब्लेम आहे डॉक्टर?", मिस्टर आनंद जाई टेंशन मधे आले.
"अशा परिस्थितीत आम्ही बाळ किंवा आई कोणा एकालाच वाचवू शकू असं दिसतंय." डॉक्टर खाली मान घालून म्हणाली तसे मिस्टर आनंद जाईच्या तोंडातून निघून गेलं,
"आईला वाचवा."
मिसेस जाईने चमकून त्यांना बघितलं आणि रडवल्या चेहऱ्याने म्हणाल्या.
"मला बाळ हवं आहे. आनंद मला हे बाळ हवं आहे. या बाळासाठी मी खूप वाट बघितली आहे."
"मॅम पैशांचा प्रश्न नाही." डॉक्टर बोलता बोलता थांबली. "मग काय प्रॉब्लेम आहे डॉक्टर?", मिस्टर आनंद जाई टेंशन मधे आले.
"अशा परिस्थितीत आम्ही बाळ किंवा आई कोणा एकालाच वाचवू शकू असं दिसतंय." डॉक्टर खाली मान घालून म्हणाली तसे मिस्टर आनंद जाईच्या तोंडातून निघून गेलं,
"आईला वाचवा."
मिसेस जाईने चमकून त्यांना बघितलं आणि रडवल्या चेहऱ्याने म्हणाल्या.
"मला बाळ हवं आहे. आनंद मला हे बाळ हवं आहे. या बाळासाठी मी खूप वाट बघितली आहे."
मिस्टर आनंद जाईने त्यांना आपल्या मिठीत घेतलं. त्या हमसून हमसून रडू लागल्या.
अंबिकाला ऑपरेशन थियेटर मधे नेण्यात आलं. थोड्याच वेळात ऑपरेशन थियेटरचा लाईट बंद झाला.
क्रमश :
तळटीप :
या कथेचा लेखिकेच्या परस्पर आयुष्याशी किंवा इतर कोणाशी काहीही संबंध नाही. ही निव्वळ काल्पनिक आणि आजूबाजूच्या सामाजिक वातावरणाला बघून सुचलेली मनोरंजनपर, स्त्रियांना प्रेरित करण्यासाठी लिहिलेली कथा आहे.
तळटीप :
या कथेचा लेखिकेच्या परस्पर आयुष्याशी किंवा इतर कोणाशी काहीही संबंध नाही. ही निव्वळ काल्पनिक आणि आजूबाजूच्या सामाजिक वातावरणाला बघून सुचलेली मनोरंजनपर, स्त्रियांना प्रेरित करण्यासाठी लिहिलेली कथा आहे.
लेखिका : अर्चना सोनाग्रे वसतकार
फोटो : साभार गुगल वरून
फोटो : साभार गुगल वरून
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा