समिधा आणि अमोल हॉस्पिटलच्या रिसेप्शन वर पोहोचले. "हे रिसेप्शन आहे, ओके! माझं काम झालं मी जाते." समिधा बोलली आणि जायला पलटली.
"पेशंटचे नाव?" रिसेप्शनीस्टने विचारलं.
"अंबिका, थोड्या वयस्कर आहेत." अमोल गंभीर झाला, "शुद्धीत नाही आल्या दोन दिवस झाले म्हणून ICU मधे आहेत."
"पुरे ! रूम नंबर 112, सी विंग." रिसेप्शनिस्टने माहिती पुरवली.
अमोल तिकडे जायला पलटला तो त्याला समिधा तिथेच कसल्यातरी गहन विचारात मग्न उभी दिसली.
"अरे तुम्ही गेल्या नाही?" अमोलने तिला विचारलं.
अमोल तिकडे जायला पलटला तो त्याला समिधा तिथेच कसल्यातरी गहन विचारात मग्न उभी दिसली.
"अरे तुम्ही गेल्या नाही?" अमोलने तिला विचारलं.
"ते सोड, मला तु ज्यांना भेटायला आलाय त्यांचा फोटो दाखव." समिधा घाईत त्याच्या मोबाईल कडे इशारा करून म्हणाली.
"ए बाई, लग्न झालेला आहे माझा मित्र." अमोल मोबाईल पकडलेला हात हवेत उंचावत म्हणाला.
समिधा रागातच डोळे मिटून तोंडातल्या तोंडात काहीतरी बडबडली.
"असं शिव्या नाही द्यायचं तोंडातल्या हो. स्पष्ट बोला काय ते?" अमोल तिला चिडवत म्हणाला.
"तुमच्या मित्राच्या आईचा फोटो दाखवा मला. कारण मीही एका अंबिकाला ओळखते. अमेरिकेत परत जायच्या आधी त्यांना भेटायला म्हणून फोन केला. पण त्या उचलतच नाहीये. म्हणून भीती वाटतेय कधी त्या ह्याच तर नाहीत?" समिधाने स्पष्टीकरण दिले, "आता तरी दाखवा फोटो."
ती अमेरिकेत जातेय हे ऐकून अमोलचा चेहरा पडला. पण आता इतर काही बोलणे ठीक नाही म्हणून त्याने इंस्टाग्रामवर अंकुर आणि अंबिकाचा असलेला फोटो समिधाला दाखवला.
"OMG! आता काही दिवस पूर्वीच तर भेटली मी यांना. सगळं काही ठीक दिसत होतं. अचानक काय झालं?" समिधा फोटो बघून म्हणाली. तिचे डोळे भरून आले. आताच काही क्षणापूर्वी इतकं छान हास्य असलेल्या चेहऱ्याला रडवलेला बघून त्याला कसं तरीच झालं. तिला काय बोलावं हेही तिला समजत नव्हतं.
तो तिच्या जवळ खुर्चीत बसला. त्याने खिशातून रुमाल काढून तिला दिला. तिने नाक, डोळे पुसून रुमाल परत त्याला देऊ केला. शेम्बुड शिंकरलेला तो रुमाल पाहून त्यानं चेहरा बनवला आणि तिला म्हणाला,
"असू द्या तुमच्या जवळ !"
तिने रागाचा एक कटाक्ष त्याच्यावर टाकला आणि रुमाल आपल्या जीन्सच्या खिशात ठेऊन दिला. उठून अंबिकाच्या रूमकडे निघाली.
तिकडे नेहा अंबिकाच्या बाजूला बसून, तिचा हात आपल्या हातात घेऊन तिच्याशी बोलत होती. तिला माहित होतं कि अंबिका शुद्धीत नाही. तरीही ती बोलत होती या आशेत कि हे सर्व ऐकून कदाचित तिचे सेन्स तिला शुद्धीत आणतील.
"अंबिका प्लीज उठ आता. किती झोपणार आहेस? तुला माहितेय मिस्टर आनंद जाईची सर्व ऑपरेशन व्यवस्थित पार पडली आहेत. त्यांचा जीव धोक्यातून बाहेर आला आहे." नेहा तिला सांगत होती, "मला माहितेय तु खूप स्ट्रॉंग आहेस. मग हे छोटंसं टेंशन का घेऊन बसलीस? का इतका ताण देतेय स्वतःला? अंकुर किती काळजीत आहे आणि समिधा तिला माहित झालं तर किती त्रास होईल तिला. तिला तर तुझ्यात तिला हवी होती ती आदर्श आई दिसते. किती लवकर अटॅच झाली ती तूझ्याशी? म्हणा जन्मदात्री आई आहेस तु तिची. मग कशी अटॅच होणार नाही ती?"
"माझी जन्मदात्री आई?" दारात उभ्या समिधाने जवळ जवळ सर्वच ऐकलं. तिचं डोकंच उठलं. तिने नेहाचा हात पकडून तिला बाहेर आणलं.
"हा सर्व काय गोंधळ आहे नेहा?" समिधाने नेहाला विचारलं. नेहा भांबावली. अगदी अनपेक्षितपणे समिधाने सर्व ऐकलं. त्यामुळे तिला काय सांगावं, त्यावेळी असलेली परिस्थिती कशी समजावून सांगावी? तिचाही गोंधळ उडाला. वयोमानाने तिलाही असं सर्व तापदायक वाटलं.
"मी काय विचारतेय नेहा? बोलणार का काही?" समिधाने परत तिला विचारलं, "असू द्या मी माझ्या आईला, म्हणजे मिसेस जाईलाच जाऊन विचारते खरं काय ते?"
समिधा तिथून जायला पलटली तो समोर अंकुर मिस्टर आनंद जाईला व्हिल चेयर वर बसवून घेऊन आलेला.
"डॅडा आता तुम्हीच सांगा काय खरं ते? नेहा कसं काय म्हणू शकते कि अंबिका माझी आई आहे म्हणून?" समिधाने त्यांना विचारलं.
"सर आय एम सॉरी. मला नव्हतं माहित समिधा इथे आहे म्हणून. मी तर बस..... "
"अंबिकाला शुद्धीत आणायचा प्रयत्न करत होती." मिस्टर आनंद जाईने नेहाला मधेच थांबवून वाक्य पूर्ण केलं.
"हो !" नेहा.
"डॅड तुम्ही मला सांगणार का काय सुरु आहे ते?" समिधाने परत विचारलं.
"ते काय सांगणार? मीच सांगते तुला सर्व." मिस्टर आनंद जाईच्या मागे मागे आलेल्या मिसेस जाई समिधाला म्हणाल्या. त्या खूप संतापात दिसत होत्या. मिस्टर आनंद जाईच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसून येत होता.
"ते काय सांगणार? मीच सांगते तुला सर्व." मिस्टर आनंद जाईच्या मागे मागे आलेल्या मिसेस जाई समिधाला म्हणाल्या. त्या खूप संतापात दिसत होत्या. मिस्टर आनंद जाईच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसून येत होता.
"काळजी करू नका मी सर्व खरं खरंच सांगेल तिला." मिसेस जाई बोलल्या आणि समिधाला एकीकडे घेऊन गेल्या.
हे सगळं दुरून बघत असलेल्या अमोलचे तर डोकं चक्रावुन गेलं तसेच समिधाची कीवही आली कि तिच्यासोबत हे सर्व काय होतंय?
हे सगळं दुरून बघत असलेल्या अमोलचे तर डोकं चक्रावुन गेलं तसेच समिधाची कीवही आली कि तिच्यासोबत हे सर्व काय होतंय?
अंकुरचा चेहरा चिंताग्रस्त झाला. तो मिस्टर आनंद जाईला म्हणाला, "तुम्ही प्लीज एकदा आईशी बोला ना ! तिने कधी सांगितलं नाही कि कोणाला बोलली नाही पण तिचा खूप जीव तुमच्यात. तिला खूप गरज आहे तुमची. तुम्ही ठीक आहात हे समजताच ती नक्कीच प्रतिसाद देईल डॉक्टर्सच्या प्रयत्नाना."
"असं असेल तर मलाही तेच वाटतं." अंबिकाला बघायला आलेले डॉक्टर बोलले, "प्रयत्नांती परमेश्वर. आपण आपले सर्व प्रयत्न करून बघायला हवेत."
"मला माहित आहे सर्व. ती आहेच अशी. जे तिला भोगावं लागलं ते इतर कोणाच्या वाट्याला येऊ नये म्हणून अतोनात प्रयत्न करणारी. ती लवकरच बरी होईल बघ. घेऊन चल मला तिच्या जवळ." मिस्टर आनंद जाई अंकुरला म्हणाले.
तो मिस्टर आनंद जाईला घेऊन अंबिकाच्या खोलीत शिरला. अंबिका शांत पडून होती. त्यांनी अंबिकाचा हात हातात घेतला. त्यांना अवघड वाटू नये म्हणून अंकुर खोली बाहेर आला.
"माझं वय झालंय अंबिका. मी आता जास्त दिवस जगेल असंच मला वाटत होतं. पण तु परत आयुष्यात येत असणार तर मी आणखी विस वर्ष नक्कीच जगेल. पण त्यासाठी तु सोबत असणं महत्वाचं आहे. मग दुरून का असेना, तुझं स्वस्थ, सुखरूप असणं माझ्या साठी खूप आवश्यक आहे. प्लीज लवकर बरी हो आणि आधी सारखीच मला खडूस टीचर म्हण बरं. खूप छान वाटेल मला." मिस्टर आनंद जाई अंबिकाला म्हणाले. पण अंबिकाचा काहीच प्रतिसाद नाही हे पाहून त्यांचा धीर सुटला.
त्यांचे डोळे भरून आले. त्यांनी पापण्या मिटताच त्यांचे अश्रू टप टप अंबिकाच्या हातावर पडले तशी तिच्या हाताची हालचाल झाली. हे बघताच मिस्टर आनंद जाईचा चेहरा प्रफुल्लित झाला. त्यांनी डॉक्टरला आवाज देऊन अंबिकाने हात हलवल्याचं सांगितलं.
डॉक्टरने लगेच परत तिच्यावर उपचार सुरु केले आणि आश्चर्य म्हणजे तिचा हार्ट रेट सामान्य होऊ लागला. ती लवकरच शुद्धीत येईल अशी आशा डॉक्टरांनी बोलली. अंकुरने मिस्टर आनंद जाईच्या पायावर डोकं ठेवलं.
"मी माझ्या जन्मदात्या बाबाला कधीच बघितलं नाही पण तुमच्याकडे जेव्हाही बघितलं, एका आदर्श पित्याची झलक तुमच्यात दिसून आली. मी तुमचे उपकार कसे फेडू?" अंकुर मिस्टर आनंद जाईला हात जोडून म्हणाला.
त्यांनी फक्त स्मित हसून त्याच्या पाठीवर थोपटलं. तिकडे मिसेस जाईने समिधाला सर्व हकीकत जशीच्या तशी सांगितली. समिधाला खूप दुःख झालं कि तिच्या जन्मदात्रीने तिला जन्मताच स्वतः पासून दूर केलं आणि आनंदही झाला कि तिला जिची आई म्हणून ओढ वाटली ती खरोखरच तिची आई निघाली. ती लगेच अंबिका जवळ आली. मिसेस जाईवर आभाळ कोसळलं. त्या एकट्या पडल्या. त्यांना वाटलं आता हे एकटेपणच त्यांचं नशीब.
अंबिकावर उपचार सुरु होते. ती उपचारांना प्रतिसाद देतेय हे बघून डॉक्टरने ती लवकरच शुद्धीत येईल असं सांगितलं. समिधा तिथेच अंबिकाच्या खोली समोर खुर्चीत बसली.
दुसरा दिवस उजाडला. अमोलला तिची अवस्था बघवली जात नव्हती. तिने काहीतरी खावं म्हणून तो सर्वांसाठी कॉफी आणि सॅन्डविच घेऊन आला. पण तिला काहीच खा वाटेना. अंकुरने समजावून तिला सॅन्डविच खायला लावलं.
अखेर अंबिका शुद्धीत आली. डॉक्टरने ही गोड बातमी सांगताच सर्वांच्या जीवात जीव आला. नर्सने अंबिकाला बसलं केलं. समिधा जाऊन तिला बिलगली.
"मला वाटलंच होतं आपल्यात काहीतरी कनेक्शन आहे म्हणून आणि बघ किती मोठ्ठ कनेक्शन निघालं ते. तु लपवलं पण आलंच सर्वांच्या समोर. आता आमच्या सोबतच राहायचं. समजलं !" समिधा भावनेच्या भरात बोलून गेली.
अंकुर मिस्टर आनंद जाईला घेऊन आला. नेहा, अमोल आणि मिसेस जाईही खोली बाहेर होत्याच.
समिधाचं भाबडं बोलणं ऐकून अंबिका तिच्या डोकयावर हात फिरवून म्हणाली, "गुणाची माझी बाळ, मी आहेच तूझ्या सोबत. तुला सोडून कुठेच जाणार नाही. पण त्या आईला का विसरतेस जिने तुला लहानाचे मोठे केले. तुझं पालन पोषण केलं. इतकं छान वळण लावलं."
"नाही अंबिका. मला वाटतं खरंच मी अडसर ठरल्या सारखी वाटतेय तुमच्या सगळ्यांच्या मधात." मिसेस जाई अंबिकाला म्हणाला, "मला मोकळं कर यातून. प्रायश्चित करू दे मी केलेल्या गुन्ह्याचे."
"काहीही बोलू नका बरं तुम्ही. जे काही झालं ते माझ्या संमतीने झालं. त्यात तुमचा दोष नाही. मीच उगी लोड घेतला आणि सर्वांना टेंशन दिलं. मलाच माफ करा सर्व." अंबिका हात जोडून म्हणाली.
"झालं तुम्हा दोघींचं? आता माझं ऐका. झालं गेलं गंगेला वाहा आणि स्वतःला जपा. टेंशन घ्यायचं वय नाही राहालं आपलं आता." मिस्टर आनंद जाई स्मित करून म्हणाले, "छान मिळून मिसळून राहायचे दिवस आपले. अंकुरची काळजी मिटली आता फक्त समिधाचं शिक्षण आणि लग्न तेवढं आटोपून आपण निर्मुक्त हिमालयात राहायला जाऊ."
"हे हे डॅड, मी लग्न नाही करणार हो." समिधा लटका राग आणुन म्हणाली पण अमोलच्या चेहऱ्यावर मात्र गोड हसू पसरलं.
समाप्त !
तळटीप :
काही अपरिहार्य यांत्रिकी अडचणीमुळे मला कथेचा अंतिम भाग लिहायला वेळ लागला. यापुढेही भाग लिहायचे आहेत पण नारीवादी कथा मालिका स्पर्धेत चाळिसच भाग लिहायचे असल्याने मी कथा इथेच समाप्त करतेय.
काही अपरिहार्य यांत्रिकी अडचणीमुळे मला कथेचा अंतिम भाग लिहायला वेळ लागला. यापुढेही भाग लिहायचे आहेत पण नारीवादी कथा मालिका स्पर्धेत चाळिसच भाग लिहायचे असल्याने मी कथा इथेच समाप्त करतेय.
या कथेचा लेखिकेच्या आयुष्याशी किंवा इतर कोणाशी काहीही संबंध नाही. ही निव्वळ काल्पनिक आणि आजूबाजूच्या सामाजिक वातावरणाला बघून सुचलेली मनोरंजनपर, स्त्रियांना प्रेरित करण्यासाठी लिहिलेली कथा आहे.
लेखिका : अर्चना सोनाग्रे वसतकार
फोटो : साभार गुगल वरून
फोटो : साभार गुगल वरून
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा