मला कधीच वाटत नाही..!

मला कधीच वाटत नाही..


मला कधीच वाटत नाही
मला सारं सुख मिळावं...
पण दु:खाने माझ्या भावनेला
कधी ना गिळावं...!

मला कधीच वाटत नाही
समोरच्याने मला योग्यच समजावं...
पण गैरसमज करून कधीच
चुकिचं न ठरवावं...!

मला कधीच वाटत नाही
मी प्रत्येक वेळी योग्यच असेन...
पण दिखावा करत अप्रामाणिक
मात्र नक्कीच नसेन...!

मला कधीच वाटत नाही
लोकांनी माझी प्रत्येक वेळी साथ द्यावी...
पण छोट्याशा स्वार्थासाठी गुंफलेली
नाती मात्र न तोडावी...!


©️®️ अबोली डोंगरे.