Login

मी माझी किंमत करतो मी माझ्यावर प्रेम करतो

आधी स्वतावर प्रेम करायला शिका मग इतरांवर प्रेम करा

        प्रत्येक व्यक्तीला मग तो पुरूष असो  किंवा स्त्री किंवा लहान मुले असो प्रत्येकाला असे वाटते की आपल्या आयुष्यात कोणीतरी असे असावे ज्याने,जिने फक्त अणि फक्त आपल्यावरच प्रेम करावे.आपल्यासाठीच त्याने,तिने जगावे. आपल्यापासूनच त्याची,तिची दिवसाची सुरुवात अणि रात्रीचा शेवट व्हावा.आपल्याला त्याने,तिने खूप जीव लावावा.आपल्याला काय हवे काय हवे काय नको याची त्याने,तिने काळजी घ्यावी.त्याने,तिने आपले खूप लाड करावे आपल्यावर त्याने,तिने जीवापाड प्रेम करावे.       

  असे प्रत्येक व्यक्तीला वाटते पण प्रत्येक व्यक्तीच्या ईच्छा अपेक्षा पूर्ण होतात का? नाही याला कारण जसे आपल्याला स्वातंत्र्य आहे की आपण कोणावर प्रेम करावे तसे इतरांनाही त्यांच्या आयुष्यात स्वातंत्र्य असते की त्यांनी कोणावर प्रेम करावे कोणाला जीव लावावा.कोणासाठी जगावे,कोणाची काळजी घ्यावी.कोणावर आपल्या प्रेमाचा वर्षाव करावा.आपण कोणालाही आपल्यावर प्रेम करण्यासाठी बळजबरी करु शकत नाही.अणि जरी बळजबरी केलीच तरी ती व्यक्ती फक्त शरीराने आपल्या सोबत असते पण तिचे मन कोणा दुसर्याच्याच आठवणीत रमलेले असते.      

   मग आपण खुपच निराश होतो की मी कोणावर तरी खूप प्रेम केले होते पण त्या व्यक्तिने कधी माझे प्रेम समजूनच घेतले नाही.माझी कदर केली नाही.माझे प्रेम स्वीकारलेच नाही.माझे प्रेम नाकारले.मग आपण दिवसरात्र त्याच व्यक्ती विषयी विचार करत बसतो की त्या व्यक्तीने माझ्यासोबत असे का केले का तिने माझे प्रेम समजूनच घेतल नाही.का ती मला सोडून गेली माझे प्रेम कुठे कमी पडले.असे आपण मनातल्या मनात विचार करत बसतो आणि स्वताला त्रास करून घेत असतो.पण चुक खरी कुठे झाली हे आपल्याला कधी कळतच नाही.      

   खर पाहावयास गेले तर परमेश्वराने सगळयांना सारखेच बनवले आहे.जसे आपल्याला परमेश्वराने आपले मन दिले आहे तसे त्या समोरच्या व्यक्तीलाही ते दिलेले असते.जसे आपल्याला एक हदय परमेश्वराने दिले आहे तसे त्या समोरच्या व्यक्तीलाही परमेश्वराने दिलेले असते.जस आपल्याला अधिकार आहे ठरवण्याचा की आपल्या हृदयात कोण असावे कोण नसावे कोणी आपल्या हदयावर राज्य करावे तसाच अधिकार त्या समोरच्या व्यक्तीलाही परमेश्वराने दिलेला आहे.मग आपल्याला स्वताच्या ईच्छा़पुर्तीसाठी दुसर्‍याला त्याची ईच्छा मारुन आपल्यावर बळजबरी प्रेम करायला लावण्याचा काय अधिकार आहे ?त्या व्यक्तीनेही आपल्यावर प्रेम करावे ही जबरदस्ती लादण्याचा आपल्याला तरी काय अधिकार आहे?    

   ही गोष्ट खरी आहे की आपल्याला मनापासून वाटते की आपल्या इतके प्रेम त्या व्यक्तीला दुसरे कोणीच करु शकणार नाही.अणि आपल्याला मनापासून वाटते की ती आपल्या सोबत खूप आनंदी राहिल पण त्या व्यक्तीला आपल्याला तिच्याविषयी जे वाटते ते आपल्याविषयी वाटतच नसेल तर ?आपल्याला खूप मनापासून वाटते की तिच जग मी आहे अणि माझे जग तिच्यात सामावले आहे पण तिचे जग कोणी दुसराच असेल तर काय करणार? मग काय करणार? बळजबरी तिला पळवून नेऊन तिच्याशी लग्न करणार?का तिने आपल्या प्रेमाचा स्वीकार केला नाही म्हणून तिच्यावर अँसिड फेकणार ? तु माझी झाली नाही तर मी हया जगात इतर कोणाचीच तुला होऊ देणार नाही.     

    मग तुम्ही म्हणाल की ह्यावर उपाय काय? मग कधी  आपण आयुष्यात कोणावर प्रेम करायचच नाही का ?आपल्याला कोणी प्रेम करावे आपण कोणावर प्रेम करावे अशी ईच्छा,अपेक्षा ठेवायचीच नाही का ? तसे अजिबात नाही.प्रेम ही फार पवित्र भावना आहे.अणि ते केलेच पाहिजे.पण अशा ठिकाणी ते प्रेम करा प्रेम लावा जिथून तुम्हाला निराशा हाती येणार नाही.करायचेच आहे तर स्वतःवर प्रेम करा ना कोणातरी अशा व्यक्तीवर प्रेम करायच ज्याला आपल्या प्रेमाची अजिबातच कदर नाही.अणि पदरी निराशा पाडुन घ्यायची त्यापेक्षा स्वतःवर प्रेम करा ना     

    खुप जणांना प्रश्न पडत असेल किती वेडा माणुस आहे काही पण मनाला वाटेल ते बोलू राहिला.पण खरच आयुष्याच खर सत्यच हेच आहे.आज मिळालेला मनुष्य जन्म आपल्याला पुन्हा कधी मिळणार हे पण आपल्याला माहित नाही अणि पुन्हा तो मिळेल का हे सुदधा आपल्याला माहिती नाही.मग एवढ अनमोल आयुष्य आपण असेच घालवायचे  का ?मग जे तुम्ही प्रेमात पडल्यावर जिच्यावर प्रेम करतात त्या व्यक्तीसाठी करतात तेच स्वतासाठी करुन बघा ना.    

    तिला आवडण्यासाठी जितके आपण स्वताला जपतो तितकेच आपण स्वताला आवडण्यासाठी जपले तर आयुष्य किती सुंदर होऊन जाईल.कोणीतरी दुसर्‍या व्यक्तीने आपले हटट आपले लाड करावेत,पुरवावेत अशी ईच्छा,अपेक्षा मनात बाळगण्यापेक्षा स्वताच स्वताचे हटट पुरवा ना.स्वताला आवडेल ते खा आवडेल ते कपडे घाला स्वताला आवडेल अशी प्रत्येक गोष्ट करा याचे अनेक फायदे आहेत तुमचा अपेक्षाभंग होणार नाही.तुम्ही आत्मनिर्भर बनाल अणि सगळयात महत्वाचे म्हणजे कोणावर अवलंबून राहण्याची गरज तुम्हाला अजिबात जाणवणार नाही.     

     अणि हा माझा माझ्या आयुष्यातील स्वताचा वैयक्तिक अनुभव आहे की आपण जितके इतरांवर अवलंबून राहतो, त्यांना अति महत्त्व देत जातो तितकच त्यांच्या आयुष्यात आपले महत्त्व हे कमी होत जाते.अणि मग आपल्या पदरी येते ती फक्त अणि फक्त निराशा,दुख वेदना इत्यादी.    

   मग आपल्याला खुप त्रास होतो की आपण कोणावर तरी खूप प्रेम केल होत कोणाला खूप जीव लावला होता,कोणासाठी तरी खूप काही केले होते पण त्या व्यक्तीला आपल्या प्रेमाची कदर नव्हती. तिने आपल्याला कधी समजूनच घेतल नाही.आपल्या मनात तिच्याविषयी असणार्‍या भावनांना तिने कधी समजूनच घेतल नाही.हे असे का होते? याला कारण असे की आपण इतरांकडून काही जास्तच अपेक्षा ठेवुन असतो ज्या आपल्या दुखाच,निराशेच ,वेदनेची मुळ ठरतात.म्हणुन कोणावर प्रेम करायचेच असेल तर निरपेक्ष,निस्वार्थ भावनेने करा नाहीतर हाती फक्त अणि फक्त निराशाच येणार.   

    अणि प्रेम करायचेच असेल तर स्वतःवर प्रेम करा ना इतके प्रेम करा की इतर व्यक्ती सुदधा आपोआपच तुमच्या प्रेमात पडले पाहिजे.स्वताला इतक सक्षम बनवा की कोणापेक्षा मी कमी आहे असे तुम्हाला अजिबात वाटलच नाही पाहिजे.इतरांच्या नजरेत मोठे होण्यापेक्षा त्यांना मोठे दिसण्यापेक्षा स्वताच्या नजरेत मोठे व्हायला शिका आयुष्य खुपच सुंदर होऊन जाईल.   

   अणि रोज आरशासमोर उभे राहून स्वताला सांगा की मी माझी किंमत करतो अणि मी फक्त माझ्यावर प्रेम करतो.मग बघा आयुष्य किती सुंदर वाटायला लागते.           

   (युवा लेखक :योगेश सोनवणे एम ए दितीय वर्ष मराठी)

0