सुगंधाच्या लग्नाचा मंडप सजला होता.आज हळदीचा कार्यक्रम होता... सुगंधाचा सारा परिवार खुश होतो.मोठ्यावहिणीची लाडकी सुगंधा आता काही काळापुरती ह्या घरची सोबती होती...आई बाबांची लाडकी छोट्या गौरवची मस्तीकरणारी बहिण ...अशी ही सुंगधा सारं घर रिकामं करून सासरी जाणार होती....
सुंगधा तीच्या भावी संसाराची स्वप्नं रंगवत होती तोच वहिणीचा आवाज आला...
"माई...अहो दोन दिवस आहात तर या हो खाली ,जरा आमच्यासोबत बसा ...आता तुम्ही पाटलीनबाई होणार मग थोडीच वाट्याला येणार आमच्या.... गरिबांच्या घरी यायला लाज नाही ना? वाटणार...".
वहिणीचा आवाज ऐकून... सुगंधा धावतच खाली आली..
"काय?वहिनी तुम्ही..अहो माहेर ते माहेर ना?..,व तुला व ह्या घराला कशी बरं विसरेन मी...असू दे सासर माझं कितीही मोठं...पण माझ्या माहेरची प्रेमाची श्रीमती त्यापुढे फिकी हं..!"
बोलता बोलता.. सगुणाला रडूच कोसळलं.आईचेही डोळे भरून आले.वहिनीने सगूणाला घट्ट मिठीत घेतलं..
"अहो माई.. तुम्ही जीव आहात आमच्या,मी सहजच हसली हो...!,हे घर कायमचं तुमच्या स्वागताला असेन बघा,चला तुमच्या आवडीचे जेवण बनवलं ते खाऊन बघा बरं... बटाट्याच्या चकत्या,मुगाचा शिरा व खासकरून आलूच्या वड्या केल्यात.."
"व्वा वहिनी किती गं गोड आहेस तु...अशी वहिनी सगळ्यांनाच भेटो..."
सगुणा सगळ्यांसोबत जेवायला बसली.पण सगळ्यांच्या प्रेमानेच तीचं पोट भरलं होतं.. थोड्यावेळाने मेहेंदीवाली येणार असं शमा आत्या बोलतं होती..
"सगुणा ..पोटभर जेवून घे हाताला मेहेंदी लागली कि जेवता नाही येणार बरं..."
आत्याने सगुणाला जरा धमकावलं... तोवर सा-यामैञिणीही येऊन गेल्या होत्या... मेहेंदी झाली.दुस-या दिवशी हळद आनंदाने सगळ्यांचेच चेहेरे खुलले होते..
का? नाही आनंद होणार सगुणा एका मोठ्या घरची सून होणार होती... तालुक्यात नाव होतं.गावचे पाटील, चारचौघात मात्तबर असं घराणं श्रींमती वैभव व सोबत समाधान सारखा देखणा साथिदार... काहिच कमी नव्हतं असं घर ... सुस्वभावी सासू व सासरे तर एक सामाजिक कार्यकर्ते त्यामुळे लग्नानंतर तीला त्या घरी जबाबदारीने वागावे लागणार होते...घराण्याची शान ,व मोठी सून होती सगूणा...
कांदेपोह्यांच्या कार्यक्रमात सासूबाई म्हणाल्या होत्या,"सगुणा व वहिनीचे नातें बहिणींसासखेच दिसते...मला आवडला तीचा स्वभाव, वहिनीला बहिणीची माया देणारी मुलगी, सासरही आपलसं करेल बरं...माझं घर योग्य हातात जातंय.... बघ निता तुलाही असंच सगुणाशी जमवून घ्यायचं आहे...नाते एकदा फुललेत ना?मग घरात गोकुळ नांदत..हो ना?वहिनबाई..".
सगुणाच्या आईनेही त्यास दुजोरा दिला होता.
"सगुणा आमची लाडकी आहे हो...!,पण कोणत्याही कामात कमी नाही बरं .. तुमच्या घराच गोकुळ करेल यात शंका नाही..पण माहेरच्या सावलीत राहू द्या बसं..."
"अहो .. असं कसं माहेर ते माहेर, तुम्हाला कशी विसरेन ती,तीने विसरूही नये ना?पण जबाबदाऱ्या जास्त राहातील त्या तीने चोख पार पाडाव्यात बसं इतकीच इच्छा माझी ... बाकी संस्कारात ती निपुण आहेच".
सासूबाईंच्या बोलण्याने सारेच निश्चित होते.योग्य घरी सगुणा जात आहे याचा आनंदही...
सगुणा ची हळद झाली.बघता बघता लग्नही लागलं सारे सोपस्कार छान पार पडलेत पाटिल मंडळी खुश होती..देखणी सगुणा पाटलीची सून शोभून दिसतं होती...समाधान तर खुपच खुश होता...का? नाही असणार एका सनकी मुलाला संस्कारी व चांगली जीवनसाथी भेटण त्याच नशिब होतं..मंडपात तशी कानोकान कुजबुज सूरू होती ती शमा आत्या व आईच्या कानी पडली होती...
शमा आत्या म्हणाली,"वहिनी लोकांना कुणाचं चांगलं सहन होत नाही..आपली सगुणा गुणी आहे... असू दे नवरा कितीही खट्याळ पण ती संसार चांगलाच करेल बघं... फक्त तु तीला भरीस घालू नकोस बरं...नाहि तर तीची सहनशीलता कधीच वाढणार नाही...व कायमची माहेरवाशीण होऊन बसेल ती... कोणाला ञास होत नाही गं...मुलीला नवीन घरात स्वतःला ढाळावचं लागतं ना?".
"हो ना?वन्स... तुम्ही किती सहन केलंत पण आज सारं ठिक झालंच ना?"
"तेच म्हणते मी वहिनी... फक्त लाडकी लेक म्हणून जास्त भरीस घालू नका म्हणजे संसार मार्गी लागतोच गं...".
ननंदेच्या बोलण्याने सगुणा च्या आईला जरा धीर आला..मुलगी शेवटी परक्याचे धन दुसऱ्या घराची शोभा त्या घराचं गोकुळ झालं तर आपले संस्कार कारणी लागलेत ह्या विचारांने आनंदाने त्यांनी सारं ऐकू आलेलं कानामागे टाकलं...
धुमधडाक्यात लग्न झालं.सगुणाची पाठवणी ही पाटलांना शोभेल अशीच झाली..मुलाकडची मंडळी नाराज नाही होणार याची काळजी घेतली होती सगुणा च्या घरच्यांनी..सारं आनंदातच पार पडलं..पाठवणीच्यावेळी ननंद भावजयीच प्रेम बघून सारा मंडप हेलावला होता...
वहिनी म्हणाली,"माई माहेरी यायला कंटाळा करू नका हं..!,हे घर कायमचं तुमची वाट बघेन..". दोघींनाही हुंदका दाटला होता.पण जगरितीने सगुणा हा उंबरा आता परका होतं होता..ती आता फक्त एक माहेरवाशीण म्हणून ह्या घरी ओळखली जाणार होती..
भरल्या डोळ्यांनी तीने गर्दीत त्या सर्व घराला न्हाळत... समाधानच्या सोबतीने सासरची वाट धरली...आता नविन जीवन व नविन घराचा उंबरा सुगुणाची वाट बघत होतो.तिच्या जीवनाची दुसरा टप्पा सुरू होणार होता...मनात एक रूखरूख होती,पण सोबतीला एक नविन आशाही होती.
क्रमशः...
(पुढील भागात जाणुन घेऊ सगुणाच्या पुढच्या प्रवासाचे चित्र)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा