Login

तुझ्याच आयुष्याची वाटेकरी व्हायचे आहे भाग ४५

विजय तर सुखरुप घरी परत आला होता. पण सायलीची झालेली अवस्था बघुन सगळ्यांच्याच अंगावर काटा आला होता. दुसरीकडे विजयने केलेला पराक्रम आराद्याला कळला होता.

मागील भागात. 

विजयने त्याच्या सोबत असलेल्या सगळ्यांची त्याने भेट घेतली. जवळपास रात्रीचे १२ वाजत आले होते. मोहिते साहेबांनी हॉस्पीटलमधली सगळी अॅरेंजमेंट व्यवस्थीत लावली होती. त्यांच्या तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांना जे काही हॉस्पिटलला लागेल त्याची व्यवस्था करुन देण्याच्या सुचना केलेल्या होत्या. त्यामुळे हॉस्पीटलमध्ये जास्त गोंधळ उडाला नव्हता.

विजय मोहिते साहेबांसोबत निघाला. त्याने गाडी चालवायला नंदुकाकांकडे चावी मागीतली.

“तुझा हात तरी बरा हा का?? चालला गाडी चालवायला” मोहिते साहेब विजयला चिडून बोलले. तसा विजय बारीक तोंड करुन मागे बसला.

येताना भरधाव वेगाने गाडी आणणारे नंदुकाका आता जरा शांतपणे गाडी चालवत होते.

“काका जरा लवकर चला न” विजय हळुच नंदुकाकांना बोलला. तस मोहीते साहेबांनी विजय कडे कडक लुक दिला. विजय परत शांत बसला. सायलीला हॉस्पिटल मध्ये बघुन त्यालाही आता लवकर पोहोचायच होत. त्याचाही जीव खाली वर होत होता.

आता पुढे. 

तिकडे विजयच्या घरी पण सगळे आता रिलॅक्स झाले होते. राधीकाला आता सायलीची आठवण आली. तिकडे सायलीला पण ताई ची आठवण आली. मग दोघी एकमेकांना फोन लावत होत्या. दोघींचे फोन बिझी लागत होते. मग आराध्याने सोनाली च्या मोबाईलवर कॉल करुन, सायलीच राधीकासोबत बोलण करुन दिल होत.

सायली आता पुर्ण रिकव्हर झाली होती. विजय सकाळी पोहोचणार म्हणून सायली ने रात्री १२ वाजताच घरी जायचा हट्ट धरला. सगळयांनी तिला समजावणाच्या खुप प्रयत्न केला.

पण सायलीच म्हणणे होत की, “मला अस हॉस्पिटलमध्ये बघुन त्यांना खुप टेन्शन येईल, मला त्यांना घरीच भेटायच आहे.”

शेवटी वैतागून सायलीच्या वडीलांनी हॉस्पिटलची परमिशन घेऊन तिला घरी आणल होते. टिनाला मात्र घरी जायला सांगीतल होत. कारण आता विजय आणि सायली दोघही ठिक होते. वरुन तिच्या घरीही तिची आई एकटीच होती. मग मिहीर तिला घरी सोडुन मग तो त्याच्या घरी गेला.

रात्री १२.३० च्या सुमारास ही मिसेस मोहिते त्यांच्यासाठी जेवण घेऊन आल्या होत्या. त्यांनी सायलीला विजयची शपथ देऊन जेवायला सांगीतल होत. मग सगळ्यांनीच दोन दोन घास खाल्ले.

तिकडे विजयच्या घरी पण शेजारच्या काकूंनी सगळ्यांनाच जबरदस्ती खायला लावल होत.

सायलीने जेवताना विजयला कॉल लावला.

“तुम्ही जेवले का??” सायली

“जेवण करत बसलो तर उशीर होईल” विजय

“गप्प जेवण करुन घ्या. नाहीतर मी पण जेवणार नाही” सायलीने विजयला सुनावले. “काका ह्यांना जेवण करायला लावूनच पुढे निघा” सायलीने मोहिते साहेबांना जणु ऑर्डर सोडली होती.

मोहीतेसाहेबांनीही विजयला जेवणाच विचारल होत, पण त्याला घरी जायची घाई होती, मग ते तसेच निघाले होते. नंदुकाका़ंनी एक हॉटेल बघुन जेवायला गाडी थांबवली. मग सायली आणि विजय दोघांनी ही फोनवर एकमेकांना बघतच जेवण केली. जेवण झाल्यावर विजय गाडीत येथून बसला. बाकी मंडळी यायची बाकी होती. त्याने सहज गाडीतली म्युझिक सिस्टम चाळायला घेतली. तर त्यात आजचा गाडीचा टॉप स्पीड १९७ प्रतीतास इतका, तर अॅव्हरेज स्पीड ९३ चा शो होत होता, विजयला कळुन चुकल होत की किती भयानक वेगाने ते लोणावळ्याला आले होते. फक्त घाटाजवळ पोहोचल्यावर झालेल्या गर्दीमुळे त्यांना त्या हॉस्पिटल ला पोहोचायला वेळ लागला होता.

आता सायलीला शांत झोप लागली होती. विजय रात्री २ च्या सुमारास घरी पोहोचला. त्याला बघताच राधीकाने त्याला घट्ट मिठी मारली. ती परत रडायला लागली होती. त्याचा बाकी ग्रुपचेही डोळ पाणावले होते.

“काय रडु राहिलेत, हा बघा मी मस्त आलो कि नाही” विजय त्याची बत्तीशी दाखवत बोलला. मग रधीकाने, देवघरात जाऊन देवाचे आभार मानले.

आरती आणि सोनालीने विजयच्या पाठीवर दोन दोन चापट्याच मारल्या. मग त्या दोगी त्याला बिलगल्या. मग संदेशने मिठी मारली. मग प्रणाली आणि जियाने देखील त्याला हलकेच मिठी मारली. नंतर तो संकेत आणि राजेशला भेटला. मग तो प्राजक्ता जवळ गेला. आतापर्यंत रोखून धरलेल्या अश्रूंना आता तीने वाट मोकळी करुन दिली होती. परत सायलीचा फोन आला होता. तो राधीका ने उचलला.

“आले ग, तुझे सरकार” राधीका आत्ता कुठे हसली होती. सायलीच्या चेहऱ्यावर ही स्माईल आली. तिने मोबाईल वरच विजयला फ्लाईंग किस दिली. तसे सगळे विजय कडे बघायला लागले.

“काय??” विजय

“तिला रिप्लाय दे” प्राजक्ता. तसा विजय हसतच आतल्या रुममध्ये गेला.

“अरे देवा, लाजल वाटतं कोणतरी” सोनाली.

“चला झोपून घ्या आता, खुप उशीर झालाय” राधीका. “सगळ्या लेडीज आत चला, आणि जेन्टस ईथे हॉलमध्ये.”

“चला मग, आम्ही निघतो आता” बोलत मोहिते साहेबांनी विजयला मिठी मारली. त्यांचेही डोळे किंचीत पाणावले होते. पण त्यांनी तस दाखवल नाही. नंदुकाकांनीही विजयला भेटुन सगळ्यांचा निरोप घेतला.

सगळे झोपी गेले. संध्याकाळ पासुन बिथरलेली मन आता शांत झाली होती.

दुसऱ्या दिवशी सगळे लवकरच उठले होते. सायलीने जो विजयला कॉल केला होता, ७ वाजताच.

“तुम्ही येत आहात की मीच येऊ??” सायली लटक्या रागात बोलली.

“मीच येतोय.” विजय “आवरलं की येतो.”

“झाल समाधान” आराध्या ही रात्री सायली सोबतच होती.

तिने होकारार्थी मान हलवली. आवरुन झाल्यावर विजय सकट सगळा ग्रुप सायलीच्या घरी निघाला. प्राजक्ता, संकेत आणि राजेश सोबत त्यांच्या घरी निघुन गेले होते. राधीका तिच्या टुरवर निघुन गेली.

सायली तिच्या रुममध्ये तिची आई आणि आराध्या सोबत बसलेली होती. थोड्या वेळाने ति पटकन उठली.

“आले हे” बोलत ती दरवाजा कडे पळाली.

तिची आई आणि आराध्याने तिच्याकडे विचीत्र नजरेने बघीतल. ते पण दरवाजाकडे आले. दाराची बेल वाजणाच्या आतच सायली ने दार उघडल. विजय सोडुन बाकी सगळेच चक्रावले. तिच्या आईलाही शॉक बसला. आराध्याला तर साखरपुड्याच्या दिवशीच आठवल. तेव्हाही तिने विजय यायच्या आधीच तो आल्याच सांगीतल होत. त्याला बघताच सायली विजयला घट्ट बिलगली. तिच्या डोळयात परत अश्रूंची धार लागली होती. तिला बाकी दुनियाशी काही घेणे नव्हतं. एवढ्या दिवसांचा तिचा विरह आज संपला होता. तिने विजयच्या चेहरा हातात देत पटापट मुके घ्यायला सुरवात केली. सायलीच ते वागण बघुन विजयला अश्विनीची आठवण आली. ति जेव्हा कॉलेजच्या टुरसाठी दहा दिवस गेली होती. तिकडुन आल्यावर पहीले विजयला भेटुन त्याचे मुके घेतले होते.

“अग हो, जरा दम धर” आराध्या. पण तिच वाक्य सायलीच्या कानापर्यंत पोहोचलच नव्हतं. ति परत विजयच्या कुशीत शिरुन रडायला लागली.

सगळे सायलीला बघतच राहीले. तिचा तो वेडेपणा बघुन बाकीच्यांच्या काळजात चर्रर्रर्र झाल. कारण काही वेळासाठीच का असेना विजय फक्त बेपत्ता झाला तर तिची अशी अवस्था झाली. पण जर खरचं काही झाल असत तर… विचार करूनच सगळ्यांच्या अंगावर सरकन काटा आला. सगळा ग्रुप एकमेकांकडे बघत राहीला होता. सायलीच्या आईलाही जरा धक्काच बसला होता, तिच ते वागण बघुन.

“सरकार मला घरात तर येऊ देशील??” विजय. बराच वेळ दारातच उभे असल्याने विजय सायलीला बोलला होता. तस सायली ने त्याचा हात पकडत त्याला घरात आणल.

सायलीच्या आईने त्याच्या चेहऱ्यावरुन प्रेमाने हात फिरवला. त्यांच्याही डोळयात परत पाणी आल.

“काय भाऊराया, अस कोणी वागत का रे??” आराध्याचा आवाज कातरला होता. “एवढ्या वर्षातुन मला भाऊ भेटला होता.” तिने पण विजयला मिठी मारली.

“बहिणाबाई, माझ्यापासून तुमची काय सुटका नाहीये एवढ्या लवकर तरी.” विजय. तशी आराध्याने त्याला चापट मारली.

सायलीचे वडील नुकतेच आंघोळ करुन बाहेर आले होते. विजयला बघुन त्यांनीही विजयला मिठी मारली. मग विजयने बोलायला सुरवात केली.

“बरं बाबा, मी आपल्या कंपनीच्या पुण्यातल्या अथोरीटीला कळवल होत. ते पण आलेले होते. त्यांनी त्यांची चौकशी करुन रिपोर्ट तयार केले आहेत. ते येतीलचं तुम्हाला.” विजय

“म्हणजे तु सगळ करुन आलास?” सायलीचा वडील “मग साजिद??”

“हो, म्हणून तर मला मोबाईल ऑन करायला वेळ लागला न आणि साजिद सरांनाही खुप लागल होत. पुढच्या बसमध्ये होते ते. ते बोलण्याच्या परिस्थितीत पण नव्हते. मग मीच त्यांच्या मोबाईलमधून पुण्याच्या ब्रांचचा नंबर घेऊन फोन केले.” विजय

“मग त्याच मोबाईलवरुन आम्हाला फोन करायला काय झाल होत रे??” सायलीचे वडील चिडून बोलले.

“बोललो न, अॅक्सीडेंट झाल्या झाल्या आधी मी सगळ्यांना मेसेज केले होते. पण मेसेज सेन्ड व्हायच्या आधीच मोबाईल स्विच ऑफ झाला. ते माझ्या लक्षातच आल नाही. मी त्याच भरवशावर होतो की मी मेसेज केलाय. मग हॉस्पिटलमध्ये मी मोबाईल चार्जींगला लावला. सगळे व्यवस्थीत अॅडमीट झाल्यावर मग मी मोबाईल ऑन केला. ऑन केल्यावर मग ऑटोमॅटिक सेन्ड झाले.” विजयने खुलासा केला.

खुलासा करताना, त्याला हातात काच घुसलेली असतानाही मदतीसाठीच धावत असल्याचे त्याने काही सांगितले नाही. त्याने सगळ्यांना मेसेज ही मोबाईल चार्ज केल्यानंतरच केले होते ते पण सांगीतल नाही. कारण अपघात झाल्यावर त्याने पहीले मदतीसाठी प्राथमिकता दिली होती. जो त्याचा मुळात स्वभाव होता.

(खरं सांगीतल असत तर त्याला शिव्या देणारी, भांडणारी सगळीच माणसं आज एकत्र होती न. कुठे रिस्क घ्यायची, नाही का??)

तोवर सायली ने सगळ्यांसाठी चहा बनवला होता. सगळ्यांना चहा दिल्यावर ती परत विजयला बिलगून बसली. त्याचा हात हात पकडुन. आता आई बाबांसमोर अस बसलेल बघुन विजयला ते थोड ऑकवर्ड वाटल.

“अगं, आई बाबा आहेत समोर, ते तरी बघ” विजय हळुच सायलीच्या कानात बोलला होता. तशी ती थोडी बाजुला सरकली, पण त्याचा हात काही सोडला नाही. सायलीच्या आईने विजयच्या मनातले भाव ओळखले आणि डोळयांनीच त्याला असु दे बोलत आश्वस्त केल.

थोड्या वेळाने सायलीच्या आईच लक्ष प्रणालीकडे गेल, जी महेश सोबतच बसली होती. त्या जरा गोंधळल्या.

“ही कोण ग??” सायलीच्या आईने हळुच आराध्याला विचारल होत.

“ती महेशची होणारी बायको??” आराध्या

“बायको??” सायलीची आई परत गोंधळल्या.

“त्या दिवशी तर ही कचाकचा भांडत होती त्याला. त्या प्राईम कॅफे मध्ये” सायलीच्या आईने दोघांनाही प्राईम कॅफे मध्ये पाहीलेल होत. आराध्याने तिचे डोळे विस्फारले. तेवढ्यात विजयच लक्ष ह्या दोघींकडे गेल. त्यांना खुसुरपुसर करताना पाहुन विजयला वेगळीच शंका यायला लागली की त्याचा कारनामा त्यांना कळला का काय?

“काय झाल, बहिणाबाई” विजय त्यांचा कानोसा घेत बोलला. मग आराध्याने सायलीच्या आईची शंका बोलुन दाखवली. मग प्रणालीच बोलली.

“ट्रिट द्यायला मी बोलावलं होत त्याला आणि साहेबांनी बसल्या बसल्याच तिथल बिल देऊन टाकल होत. मला ट्रिट देऊच दिली नाही. मग मला राग आला होता.” प्रणाली

“कसली ट्रिट गं??” सायली ची आई. मग प्रणालीने त्या रात्रीची परत एकदा कॅसेट वाजवली.

“अच्छा, असेच आहेत हे सगळे” सायलीची आई “बरं हीची ओळख??” जियाकडे बघत त्या बोलल्या.

“ही जिया, माझ्या आत्याची मुलगी” विजय. जिया प्रणालीच्या बाजुलाच बसलेली होती. “प्रणाली आणि जिया दोघी हॉस्टेलवरच असतात सोबत.”

सायलीच्या आईला प्रश्न पडला होता की हॉस्टेल वर का रहातात म्हणून, पण मग नंतर सायलीला विचारु म्हणून त्या काही बोलल्या नाहीत. सायलीचे वडील तयारी करुन बाहेर आले होते.

“पुढच्या विक मध्ये तु तुझी पोस्ट जॉईन कर, इंजिनीअर म्हणून. बाकी फॉरमॅलिटी मी पुर्ण करुन घेईल.” सायलीचे वडील विजय कडे बघत बोलले आणि शॉरुमवर निघुन गेले.

सायली आज काय विजयच्या बाजुने हलायच नाव घेतच नव्हती. आज विजयने कोणाला टिव्ही लावूनच दिला नव्हता. कारण न्युज ला अजुनही त्याच अपघाताची बातमी चालु होती आणि तिथल्या लोकांनी रेकॉर्ड केलेले व्हिडिओ न्युजवाले चॅनलवर दाखवत होते. त्यांच्या गप्पा गडबड सुरू झाल्या होत्या. सगळा ग्रुप त्याच्या जुन्या रंगात अवतरला.

सायली ची आई जेवणाच्या तयारीला लागली. सायली उठली तिला आज तिच्या हातानेच बनवायच होत. बाकी जणी तर होत्याच सोबत.

गप्पा मारता मारता सायली च्या आईने प्रणालीला विचारल, “मग तुझे आई वडील कुठे असतात??”

प्रणालीचे डोळे पाणावले.

“तिला आई बाबा नाहीयेत” सायली हळुच तिच्या आईच्या कानात बोलली.

“अस कस कोण नाही?? आपण आहोत न” सायलीची आई “मी आहे, बाबा आहेत. बाहेर तीन तीन भाऊ आहेत.”

तसा प्रणालीला ठसका गेला. बाकी जणी पण हसायला लागल्या. सायली ची आई गोंधळली.

“मावशी कशाला जखमेवर मिठ चोळताय??” प्रणाली लगेचच तिच्या मुळ रुपात अवतरली.

“म्हणजे??” सायली ची आई

“तिला पण विजय आवडतात” सायली हसतच बोलली.

“अस होय.” सायली ची आई “बरं आणि मावशी काय ग?? आई बोललीस तरी चालेल मला.” त्यांनी प्रणलीला जवळ घेतल. प्रणालीला भरुन आल होत.

तेवढ्यात मोबाईल चाळणारी आराध्या किचन मधुन पटकन बाहेरच्या हॉलमध्ये आली.

“भाऊराया जरा चल न. काम आहे थोड” आराध्या तिचा आवाज शांत ठेवण्याचा प्रयत्न करत बोलली. तिने विजयच्या उत्तराची वाट न बघताच त्याचा हात धरुन थेट सायलीच्या रुममध्ये त्याला घेऊन गेली. बाकी गोंधळले की हिला काय झाल अचानक म्हणुन.

विजय ही गोंधळातच तिच्या मागे गेला. जसा आराध्या ने रूमचा दरवाजा बंद केला. तसा विजयच्या खांद्याला रागातच धक्का मारत आराध्या चिडुन बोलली, “काय समजतो काय रे तु स्वतः ला?” मग तिने हातात येईल ति वस्तु विजयला फेकुन मारायला सुरवात केली. त्याला लागणार नाही हे बघुनच ती फेकत होती. आज तिने तिच्या बहिणीचा हक्क दाखवला होता. आज पहील्यांदा त्याने आराध्याला एवढ चिडताना पाहील होत.

“अग हळु, लागेल न मला. झालय काय ते तरी सांगशील??” विजय तिचा वार चुकवत बोलत होता.

“दोघींची शपथ घेऊन बोलला होतास न, की काहीच उपद्व्याप करणार नाहीस “ आराध्या चिडून बोलत होती “मग हे काय आहे??” मोहीते साहेबांनी टिव्ही वरच्या न्युजची मोबाईल मध्ये व्हिडीओ शुट करुन आराध्याला पाठवली होती.

विजयच्या हातात काच घुसलेली असतानाही त्याची मदतीसाठी चाललेली धावपळ होती त्या व्हिडिओ मध्ये. न्युज वाल्यांनी ती व्हिडिओ चांगलीच उचलुन धरलेली होती. विजय थोडा शांत झाला.

“आई बाबा अशा अपघाताच्या वेळेस गाडीत अडकून पडलेले असताना जर तु कोणाला आवाज दिला आणि तुला कोणीच मदत केली नाही तर कस वाटेल??” विजय त्याची बाजु मांडुन बघत होता.

“ते कळल मला, म्हणून तो व्हिडिओ मी सायुला दाखवला नाही. पण मग तुला एवढ पण भान कस राहील नाही रे?? तुला काही झाल असत मग?? एकतर एवढ्या वर्षानंतर मला एक भाऊ भेटलाय” आराध्याच्या पापण्या ओलावल्या. “मी आणि ताई तर आमच्या संसारात राहु रे. पण मग सायुच काय?? बघीतलस न तिच्याकडे, काय अवस्था करुन घेतली होती तिने स्वतःची??

“अस कस होईल, तुम्ही असताना “ विजयने हळुच आराध्याला मिठीत घेतल.

“पण आज न उद्या ती व्हिडिओ सायु आणि बाकी जण तर बघतीलच न??” आराध्या

“त्यात माझी पाठ आहे फक्त” विजय बोलून गेला. मग त्याला आठवल “एक मिनीट तुला कस कळल की मी आहे तो??”

“”फक्त पाठची नाही, तुझ्या थोबाडाची व्हिडिओ पण होती, ती बाबांनी जबरदस्तीने डिलीट करायला लावली न्युजवाल्यांना आणि ज्यांच्या ज्यांच्याकडे होती त्या सगळ्यांना.” आराध्या “त्यांना पण कळल तु का केल अस. बाबा त्यांचा तरुणपणात पण असेच होते म्हणून ते तुला काहीच बोलले नाहीत.”

दोघही बाहेर आले. तसे बाकी त्यांच्याकडे गोंधळुन बघु लागले.

“तो एक आमचा जुना हिशोब आठवला होता” आराध्या ने विषय टाळला “तोच क्लिअर केला आज.”

किचन पर्यंत तर आवाज काही गेला नव्हता त्यामुळे किचनमधल्यांना काहीच कळल नव्हता की बाहेर काय झाल ते. यथावकाश जेवण पण आटोपली. मग निरोप घेत जो तो आपापल्या घरी गेले. त्या दिवशीही कोणी नाही कोणी विजयला भेटायला येतच होते. कोणी झापत होत, तर कोणी प्रेमाने विचारपूस करत होत.

संध्याकाळी ७ वाजताच सायली विजयच्या घरी प्रगट झाली. सोबत आराध्या होतीच. आता घरात ते तिघच होते. सायली विजय जवळ जाऊन बसली, त्याचा हात हातात घेतला.

“तुम्हाला काही झाल असत तर कशी जगली असती मी??” सायली

“हे बघ, एकतर आपल्याकडून होणारी काम जोपर्यंत पुर्ण होत नाही, तोवर तो वरचा काही आपल्याला त्याच्याकडे बोलवत नाही.” विजयने तिचा हात घट्ट पकडून घेतला. “आपण तर फक्त त्याच्या हातातली कटपुतली आहोत. मृत्यू आहे शेवटी, तो कोणाला चुकलाय का?? नाही ना??”

“ज्या दिवशी तुम्हाला तो येईल न, त्याच्या आधी तुमच्या स्वागतासाठी मी तिथे जाईल.” सायलीने नेहमीप्रमाणे तिच्या केसांची बट कानामागे सारत किचनमध्ये गेली.

विजय सायलीकडे बघतच राहीला. 

क्रमशः

0

🎭 Series Post

View all