मागील भागात.
संध्याकाळी ७ वाजताच सायली विजयच्या घरी प्रगट झाली. सोबत आराध्या होतीच. आता घरात ते तिघच होते. सायली विजय जवळ जाऊन बसली, त्याचा हात हातात घेतला.
“तुम्हाला काही झाल असत तर कशी जगली असती मी??” सायली
“हे बघ, एकतर आपल्याकडून होणारी काम जोपर्यंत पुर्ण होत नाही, तोवर तो वरचा काही आपल्याला त्याच्याकडे बोलवत नाही.” विजयने तिचा हात घट्ट पकडून घेतला. “आपण तर फक्त त्याच्या हातातली कटपुतली आहोत. मृत्यू आहे शेवटी, तो कोणाला चुकलाय का?? नाही ना??”
“ज्या दिवशी तुम्हाला तो येईल न त्याच्या आधी तुमच्या स्वागतासाठी मी तिथे जाईल.” सायलीने नेहमीप्रमाणे तिच्या केसांची बट कानामागे सारत किचनमध्ये गेली.
विजय सायलीकडे बघतच राहीला होता.
आता पुढे.
विजयने आराध्या कडे पाहील, “काय होत हे??”
“तुझ्या पराक्रमाचे साईड इफेक्ट” आराध्या “यापुढे काही करताना न, जरा विचार करुन करत जा.”
तेवढ्यात राहुल, संदेश आणि महेश सोबत तिथे येथून धडकले. त्यांच्या मागे आरती आणि सोनाली. त्यांनी सोबत येतानाच पावभाजीच साहित्य आणलेल होत. त्यांनी ते विजयच्या हातात दिल.
“आज आम्हाला तुम्हा दोघांच्या हातची पावभाजी खायची आहे.” राहुलने ऑर्डर सोडली. सायली ने ही किचनच्या दारातून ते ऐकल. मग विजयही ते साहित्य घेऊन किचनमध्ये गेला. आज सायली पहिल्यांदा विजयला भाजी बनवताना बघत होती. त्याचे एखाद्या सराईत शेफ प्रमाणे हात चालत होते. सायली ते बघतच राहीली.
“अस तर, रात्री १२ ला व्हायची ती पावभाजी” सोनाली किचनच्या दारातून बोलली. तिने सायलीला विजय कडे टक लावुन बघताना पाहिल होत.
“तरीच म्हटलं, अजुन कोणी कस आल नाही चिडवायला.” सायली “आता आलीच आहेस तर ये, आरतीला ही बोलव, तुझ्या बाजुलाच लपली आहे न”
तशा त्या दोन्ही मदतीला आल्या. मस्त पावभाजीचा बेत झाला होता. आता तर रुद्र पण येऊन पोहोचला. त्यालाही जीव धोक्यात टाकुन काम करण्याची सवय, त्यामुळे विजयने काही वेगळ केल्याच त्याला जाणवले नव्हत. उलट त्याला त्याच्यासारखे कोणतरी भेटल याचा जास्त आनंद झाला होता.
घरात आल्या आल्या त्याने विजयला मिठी मारली, “मला वाटल, माझ्या सारख वेड दुसर कोणी सापडणार नाही. पण भेटलं बाबा कोणीतरी.” रुद्र आनंदाने बोलला. “अरे एवडुस तर लागलं. याने काय होतय त्याला” रुद्र ने विजयच्या हाताला बघत त्याची बाजु धरली.
“खबरदार त्याला झाडावर चढवलस तर” सोनाली आणि सायली एकत्रच ओरडल्या. आता होणारी बायको आणि बहीण एकत्रच चिडल्या म्हटल्यावर रुद्र शहाण्या बाळा सारखा शांत बसला.
“मग काय तर, आम्ही इथे समजावण्यच्या मागे लागलोय” आरती “आणि ह्यांच्य काय तर लगेच कौतुक सुरू केल.”
“तु नको टेन्शन घेऊस” रुद्र हळुच विजयच्या कानात बोलला “मी तुझ्याच बाजुने आहे.” तसा विजय पण हळुच हसला.
सोनाली आणि सायली ने दोघांकडे रोखुन बघतच जेवण मांडली.
यावेळी ही सायली स्वतःच्या हाताने विजयला चारत होती. सगळे त्यांच्याकडे बघत राहिले.
“तुम्हाला चारायचे असेल एकमेकांना तर चारु शकता, तुम्हाला कोणी अडवल नाहीये” सायली हसतच सगळ्यांकडे बघुन बोलली.
तसे सगळेच गालातच हसले.
“बर, उद्यासाठी तयार रहा.” राहुल
“का??” विजय
“घरचे येणार आहेत, तुझ्या सत्काराला” महेश
तस विजयला टेन्शनच येत ऊद्याच. सगळ निघत होते पण सायली काही निघायचे नाव घेत नव्हती.
“काय ग?? आत्ता पासुनच मुक्काम थांबायचा विचार आहे का??” आरती सहज बोलुन गेली.
“हो” सायली निर्विकार होत बोलली. तसा झटकाच बसला सगळ्यांना.
“म्हणजे मी आणि आरु दोघी ग” सायली डोळा मारत हसली.
तस विजयला टेन्शन आल. “ऐक न, असही लग्नानंतर तु इथेच येणार आहेस न?? लग्नाआधीच कस?” त्याने रुद्रकडे पण इशारा केला.
“आपला साखरपुडा झालाय आणि मी न सगळ्यांची परमिशन काढुन आलीये, अगदी ताई ची सुद्धा.” सायली “जर तुम्हाला रहायच नसेल ना तर तस सांगा. एकतर तुमच्या बहीणीलाही आजकाल खुप भाव लागायला लागलाय. कुठल्याही गोष्टीसाठी तयार करायला” सायली आराध्या कडे बघत बोलली. मग विजयही काही बोलला नाही.
“ती आता कोणाची नाही ऐकणार, तिला तिचा पंधरा दिवसांचा कॅटलॉग भरुन काढायचा असेल” रुद्र हळुच विजयच्या कानात बोलता बोलता खुद्कन हसला. तस विजय ही लाजला.
आज सायलीला खुप सा-या गप्पा मारायच्या होत्या विजय सोबत. म्हणून तिने आराध्याला काहीच न विचारता तिचच नाव पुढे करून विजयच्या घरी रहाण्याची परमिशन मागीतली होती. नंतर तीने आराध्याला सांगीतल होत. तेव्हा आराध्या जरा चिडली तिच्यावर की तिला न विचारता का केल म्हणून अस. मग सायली तिच्यावर रुसून बसली होती. पुर्ण दिवस ती आराध्या सोबत बोलली नव्हती. ती बोलतच नाही म्हटल्यावर आराध्याला आता कसतरीच व्हायला लागल होत. शेवटी मैत्रीणी जरी असल्या, तरी त्यांच नात सख्ख्या बहीणीप्रमाणे होत.
“अग बावळट, मला विचारल नाही म्हणून मी चिडली नाही, पण अस लग्नाआधीच तिथे मुक्काम थांबायच ठरवण्यासाठी का विचारल नाही. अस म्हणणं होत.” आराध्या
“तेवढ कळत मला, म्हणून तुला पण सोबत घेणार होती. पण जाऊदे न, माझी काळजीच नाही कोणाला” सायली ने आराध्या ला इमोशनल ब्लॅकमेल करायला सुरवात केली. ही तिचीच आयडीया असायची जेव्हा कधी आराध्या ला कोणत्या गोष्टीसाठी तयार करायच असल का. ते आराध्या ला पण कळत होत. पण दोघींचा एकमेकींवर एवढा जीव होता, की बास रे बास. मग तेव्हा कुठे ती तयार झाली.
बाकी सगळे तर गेले होते. आता फक्त विजय, सायली आणि आराध्याच घरात होते. तस सायली च्या वडीलांनी विजयला आधीच कल्पना दिली होती. सायली ने जेव्हा परमिशन मागीतली होती. पण मग विजयनेही शेवटचा प्रयत्न करुन पाहीला होता. पण तिच ते स्वागताच वाक्य एकुन ती किती सिरीयस आहे याची जाणीव त्याला झाली होती.
येतानाच त्यांनी खुप सारे पॉपकॉर्न ची पाकीट आणली होती. ते पटकन कुकरला लावुन पॉप कॉर्न तयार केले. मग टीव्हीला मुव्ही लावली. विजयने त्या अंथरून पसरलेल होत, त्यावर तिघेही पसरुन बसले. विजय, त्याच्या बाजुला सायली आणि तिच्या बाजुला आराध्या.
“माझा आवाज कधी रेकॉर्ड केलास तु??” विजय
“आपल्या डान्स च्या फायनल प्रेझेंटेशन पासुन मी तुमचा आवाज रेकॉर्ड करतेय” सायली
इकडे आराध्या खुदकन हसली.
“पण तुमच्या बहीणीला काही काम नाहीत, लगेच टाकाला व्हिडिओ ग्रुपवर” सायली आराध्या कडे बघत बोलली.
तेवढ्यात आराध्या चार फोन वाजला. राहुलचे होता. तशी ती आतल्या रुममध्ये गेली.
“हममम आत्ता आठवण आली का माझी??” आराध्या
“तस नाही ग, कसा गेला कालचा दिवस बघीतला न” राहुल
“हमममम” आराध्या
“काय म्हणतायेत आपले लव्ह बर्ड्स, त्यांना तु डिस्टर्ब तर नाही करत ना??” राहुल
“काय करतील, चालुये चिवचीवाट त्यांचा आणि मी त्यांना डिस्टर्ब तेव्हा करेल न, जेव्हा ते मला दुसऱ्या रुममध्ये जाऊ देतील. तिघेही मस्त गप्पा मारत बसलोय, मुव्ही पण चालुये.” आराध्या. मग थोडा वेळ दोघांनाही बोलुन फोन ठेवुन दिला. ती परत बाहेर येऊन बसली.
मुव्ही संपल्यावरही बराच वेळ त्यांच्या गप्पा रंगल्या होत्या. मग आराध्या थोडी थोडी पेंगायला लागली. ती तशीच पसरत पसरत कमी झोपली दोघांनाही कळल नाही.
रात्र भर दोघांच्याही गप्पा चालु होत्या, न त्याच्यात वासना होती न टिपीकल कपल सारखे “बाबु शोना जादु टोना” होत. फक्त निखळ मैत्रीच्या गप्पा, भविष्यातील रंगीबेरंगी स्वप्नांच्या. साखरपुडा झाला असल्याने त्यांना तशी बंधन नव्हती. पण त्यांना कसलीही घाई पण करायची नव्हती.
“खुर्रर्रर्र्, टक टक टक टक”…… . ….. “खुर्रर्रर्र टक टक”…… .. . “खुर्रर्रर्र टक टक टक टक टक”
असल्या कसल्या तरी आवाजाने आराध्या ची झोप चाळवली. तीने डोळे किलकिले करत पाहीले तर दोघही ल्युडोचा गेम खेळत होते. मग तिने मोबाईल पाहीला तर रात्रीचे ३.३० वाजले होते. तिने डोक्यालाच हात लावला.
“अरे लव्ह बर्ड्स, उद्या तुम्हाला नसेल जायच कुठे, पण मला तर जाव लागेल न” आराध्या “मी जर उशीरा गेली न तर माझ्या त्या लव्ह बर्ड चा अँग्री बर्ड व्हायचा.” आराध्या काकुळतीला येऊन बोलली. तस दोघांनीही तिच्या शब्दाचा मान ठेवत तो गेम बंद केला. तेव्हा कुठे आराध्या निट झोपली.
विजयने मग मोबाईलला हेडफोन लावुन त्यावर गाणे प्ले केल. एक त्याच्या कानात तर एक सायली च्या कानात हेडफोनचे बडस दिले. मग सायली विजयच्या खांद्यावर डोक ठेवुन बसली. १९९०-२००० च्या दशकातील लव्ह साँग्स ऐकत होते. प्ले लिस्ट मध्ये एक गाण लागलं
तस सायली ने हळुच विजयचा हात हातात घेतला.
जब कोई बात बिगड़ जाये, जब कोई मुश्किल पड जाये
तुम देना साथ मेरा, ओ हमनवाज़
जब कोई बात बिगड़ जाये, जब कोई मुश्किल पड जाये
तुम देना साथ मेरा, ओ हमनवाज़
(सायली ने विजयच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवला
जणु ति तिच मन या गाण्यातून व्यक्त करत होती.)
ना कोई है, ना कोई था, जिन्दगी में तुम्हारे सिवा
तुम देना साथ मेरा, ओ हमनवाज़
तुम देना साथ मेरा, ओ हमनवाज़
हो चांदनी जब तक रात, देता है हर कोई साथ
तुम मगर अंधेरो में, ना छोड़ना मेरा हाथ
हो चांदनी जब तक रात, देता है हर कोई साथ
तुम मगर अंधेरो में, ना छोड़ना मेरा हाथ
जब कोई बात बिगड़ जाये, जब कोई मुश्किल पड जाये
तुम देना साथ मेरा, ओ हमनवाज़
ना कोई है, ना कोई था, जिन्दगी में तुम्हारे सिवा
तुम देना साथ मेरा, ओ हमनवाज़
वफादारी की वो रस्में, निभायेंगे हम तुम कसमें
एक भी सांस जिन्दगी की, जब तक हो अपने बस में
वफादारी की वो रस्में, निभायेंगे हम तुम कसमें
एक भी सांस जिन्दगी की, जब तक हो अपने बस में
जब कोई बात बिगड़ जाये, जब कोई मुश्किल पड जाये
तुम देना साथ मेरा, ओ हमनवाज़
ना कोई है, ना कोई था, जिन्दगी में तुम्हारे सिवा
तुम देना साथ मेरा, ओ हमनवाज़
दिल को मेरे हुआ यकीन, हम पहले भी मिले कहीं
सिलसिला ये सदियों का, कोई आज की बात नहीं
जब कोई बात बिगड़ जाये, जब कोई मुश्किल पड जाये
तुम देना साथ मेरा, ओ हमनवाज़
जब कोई बात बिगड़ जाये, जब कोई मुश्किल पड जाये
तुम देना साथ मेरा, ओ हमनवाज़
ना कोई है, ना कोई था, जिन्दगी में तुम्हारे सिवा
तुम देना साथ मेरा, ओ हमनवाज़
तुम देना साथ मेरा, ओ हमनवाज़
पुर्ण गाण संपेपर्यंत सायली विजयच्या डोळ्यात बघत होती. दोघही एकमेकांच्या डोळ्यात हरवले होते. सायली ने हळुच तिचे ओठ त्याच्या ओठावर टेकवले. आज बराच वेळ ते एकमेकांना किस करत राहिले. जेव्हा एकदमच श्वास घ्यायला दोघांनाही जड झाल तेव्हाच ते थांबले होते.
विजयने सायलीच्या गालावरुन हात फिरवत तिच्या मानेवरुन तिच्या ह्रदयावर येऊन थांबवला. सायलीच्या पुर्ण शरीरात रोमांच उसळला.
“जो पर्यंत हे ह्रदय चालु आहे, तोवर ह्या ह्रदयाला काही होणार नाही.” एक हात विजयने त्याच्या ह्रदयाला हात ठेवत बोलला. सायलीच्या चेहऱ्यावर एक समाधान झळकल.
ते परत गाणे ऐकायला लागले. ते ऐकत ऐकत तिला कधी झोप लागली तिलाच कळल नाही. थोड्यावेळाने विजयही तिच्या डोक्यावर त्याच डोक ठेवुन झोपी गेला.
सकाळच्या अलार्मच्या आवाजाने आराध्याला जाग आली. तीने उठुन पटकन तो बंद केला. मग तिने त्या दोघांवर नजर टाकली. जे बसल्या बसल्या एकमेकांवर डोक ठेवुन झोपलेले होते. आता पहाटे ४ ला झोपल्यावर सकाळी लवकर तरी कशी जाग येईल नाही का?? मग आराध्यानेही त्यांना डिस्टर्ब न करता, तिच आवरायला गेली. थोड्याच वेळात सायलीलाही जाग आली. तीने पाहील तर तिचा एक हात त्याच्यावर होता. त्याचा एक हात सायलीच्या माने मागुन तिच्या खांद्यावर आलेला होता. जो तिला कवेत घेऊन झोपला होता. त्याला एवढ जवळ आलेल पाहुन, तिच्या ह्रदयाचा गती परत वाढायला लागली. त्याचा तो झोपेतला निरागस चेहरा पाहून सायलीला त्याला किस करण्याचा मोह झाला होता. पण तो एवढा क्युट दिसत होता न, की ति त्याला फक्त बघतच राहिली होती.
आता विजयलाही जाग येत होती. बसल्या बसल्या झोपल्याने त्याची मान अवघडलेली होती. ती आता भरुन आल्याने त्याला जाग आली होती. डोळ उघडल्या उघडल्या त्याला समोरच सायली दिसली. तशी त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली.
“गुड मॉर्निंग सरकार” बोलत विजयने तिच्या ओठावर त्याचे ओठ टेकवले. तशी सायली लाजली. मग दोघेही पटकन उठले. मग आराध्या बाहेर आली.
“झालं आवरुन तुझ??” विजय
“माझ आवरुन पंधरा मिनिटे झाली. त्या नंतर अजुन १५ मिनीट मला आतच थांबाव लागल तुमच्यामुळे” आराध्याला त्यांना डिस्टर्ब करायच नव्हत.
“तु डायरेक्ट आली असतील न, तरी चालल असत.” सायली
“म्हणजे तुम्हाला नेहमीच ओपन स्पेस मध्ये सगळ्यांसमोरच किस करायची असते का??” आराध्या दोघांकडे रोखुन बघत बोलली. तसे दोघ लाजले. मग सायली गालातच हसत तिच आवरायला गेली.
“बहिणाबाई, “चिडवुन झाल असेल तर चहाच बघा” विजय
मग आराध्या पण हसतच किचनमध्ये गेली. विजयने त्याच फेसबुक अकाऊंट चाळायला घेतल. तर सोशल मिडीयावर ही त्याचा तो पाठमोरी व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. मोहीते साहेबांनी चेहरा असलेला व्हिडिओ डिलीट करायला लावल्याने तो नक्की कोण आहे हे व्हायरल झालेल्या व्हिडिओ मधुन कळुन येत नव्हतं. अज्ञात व्यक्ती म्हणून तो प्रचंड व्हायरल झाला होता. आराध्या चहा घेऊन आली होती.
“बघीतले न, कोणालाच कळल नाही की तो मी आहे म्हणून” विजय फुल कॉन्फिडन्स ने बोलला होता.
“तुला खरचं अस वाटत, की तुला कोणीच ओळखल नाही??” आराध्या “ज्या मुलीला तु यायच्या आधीच तु आल्याची जाणीव होते तिला कळणार नाही की तु तो आहेस म्हणून.”
तसा विजय शांत झाला.
“तुझा तो व्हिडिओ सगळ्यांनीच पाहिलाय आणि ओळखल सुध्दा” आराध्या. तस विजयने चमकून तिच्याकडे पाहील.
“मग बाबांनी सगळ्यांना समजावल, तेव्हा कुठे सगळे शांत झालेत” आराध्या.
“म्हणून तुम्ही काल मुक्काम आले होते का??” विजय
“नाही, काल सकाळी आपण निघुन गेल्यानंतर लगेचच पंधरा मिनीटांनी मॅडमनी माझ्यावर तो बॉम्ब फोडला होता. नंतर मग सगळ्याना ते समजल होत. म्हणून ते सगळेच आज येत आहेत” आराध्या.
सायली तिच आवरुन बाहेर आली. विजयने ही तोंड धुवुन घेत दोघींसोबत चहा घेतला. मग विजय आंघोळीसाठी गेला.
“मग किती गप्पा मारल्या??” आराध्या
तिच बोलण ऐकुन तिने आराध्याला मिठी मारली, “सॉरी ग, काल तुला काहीच न विचारता केल आणि थँक्यू माझ्या वेडेपणाला साथ दिलीस.” सायली
तसा आराध्या ने तिला जोरात चिमटा काढला.
“बोलशील परत??” आराध्याला तिने थँक्यू आणि सॉरी बोललेल आवडल नव्हत. असही त्यांचा तो अलिखित नियम होता की कोणी कोणालाही थँक्यू आणि सॉरी बोलणार नाही म्हणून.
“नाही नाही, सोड न दुखतंय” सायली. तेव्हा आराध्या ने तिला सोडल. मग सायलीने तिघांनाही नाश्ता बनवला. नाश्ता करेपर्यंत बाकी ग्रुपचे आई वडील विजयच्या घरी आले. अनु तर आल्या आल्या बिलगली होती त्याला, “काय रे दादा, नेहमीच आमचा जीव गॅसवर ठेवतोस.”
मग सगळ्यांनीच विजयची विचारपुस केली. मग ते पण त्यांच्या घरी परत गेले. थोड्यावेळाने तो बसमधला स्टाफ पण आला. शेवटी विजयने दाखवलेल्या प्रसंगवधानामुळे ते आज वाचले होते. मिहीर आणि टिना त्यांना घेऊन आले होते. त्यांनाही विजयला भेटायची ओढ लागली होती.
घरात आल्या आल्या दोघांनीही विजयला मिठी मारली. तस बाकीच्यांनी ही विजयचे आभार मानायला सुरवात केली.
“अरे मी थोडी काही केल होत. ती तर ड्राईव्हवर दादांची स्किल होती.” विजय
“पण ऐन वेळेला ते सुचण आणि मन शांत ठेवुन ते शांतपणे सांगण, ते पण अगदी मोक्याच्या क्षणाला सगळ्यांनाच जमत नाही.” ड्राईव्हर
“आजतक इसने किसी की सुनी है, जो ये खुद पे कोई चीज लेगा” टिना ने रागातच त्याला टोमणा मारला होता.
“अब तो गुस्सा छोड दो, मेरी जान” विजय तिच्या खांद्याला पकडत बोलला. “देखो एकदम ठिक हुं, आपकी दुवा से.”
“हा, हमारी जान को गले में लटकाओ, और गुस्सा भी ना करो.” टिना काही तिचा राग सोडायला तयार नव्हती. सायलीला पाहुन ति खुप घाबरली होती, जेव्हा ती बेशुध्द पडली होती.
विजयने तिला हलकेच मिठीत घेतल.
त्यांचाही चहापाणी सायली आणि आराध्या दोघींनी केल होत. सायली ने त्या पंधरा दिवसात विजयच पुर्ण घर समजुन घेतलेल होत. त्यामुळे तिथे तिला काही करायला, शोधायला अडचण येत नव्हती.
राधीकाही लवकरच आली. तिला विजय सोबत बोलायला जास्त वेळ भेटलेच नव्हता. संध्याकाळ होत आलेली होती. त्या दोघांनी आज आराध्याला ऑफिसवर जाऊच दिल नव्हत. मग राहुलने ही तिला त्यांच्यासोबत रहाण्यासाठी सांगीतले होते.
फ्रेश झाल्या झाल्या राधीका विजय जवळ येऊन बसली. त्याच्या चेहऱ्यावरुन प्रेमाने हात फिरवला. त्याला जवळ घेतल आणि पुढच्या क्षणाला त्याचा गाल लाल झाला.
क्रमश:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा