मागील भागात.
थोड्यावेळाने तो बसमधला स्टाफ पण आला. शेवटी विजयने दाखवलेल्या प्रसंगवधानामुळे ते आज वाचले होते. मिहीर आणि टिना त्यांना घेऊन आले होते. त्यांनाही विजयला भेटायची ओढ लागली होती.
घरात आल्या आल्या दोघांनीही विजयला मिठी मारली. तस बाकीच्यांनी ही विजयचे आभार मानायला सुरवात केली.
“अरे मी थोडी काही केल होत. ती तर ड्राईव्हवर दादांची स्किल होती.” विजय
“पण ऐन वेळेला ते सुचण आणि मन शांत ठेवुन ते शांतपणे सांगण, ते पण अगदी मोक्याच्या क्षणाला सगळ्यांनाच जमत नाही.” ड्राईव्हर
“आजतक इसने किसी की सुनी है, जो ये खुद पे कोई चीज लेगा” टिना ने रागातच त्याला टोमणा मारला होता.
“अब तो गुस्सा छोड दो, मेरी जान” विजय तिच्या खांद्याला पकडत बोलला. “देखो एकदम ठिक हुं, आपकी दुवा से.”
“हा, हमारी जान को गले में लटकाओ, और गुस्सा भी ना करो.” टिना काही तिचा राग सोडायला तयार नव्हती. सायलीला पाहुन ति खुप घाबरली होती, जेव्हा ती बेशुध्द पडली होती.
विजयने तिला हलकेच मिठीत घेतल.
त्यांचाही चहापाणी सायली आणि आराध्या दोघींनी केल होत. सायली ने त्या पंधरा दिवसात विजयच पुर्ण घर समजुन घेतलेल होत. त्यामुळे तिथे तिला काही करायला, शोधायला अडचण येत नव्हती.
राधीकाही लवकरच आली. तिला विजय सोबत बोलायला जास्त वेळ भेटलेच नव्हता. संध्याकाळ होत आलेली होती. त्या दोघांनी आज आराध्याला ऑफिसवर जाऊच दिल नव्हत. मग राहुलने ही तिला त्यांच्यासोबत रहाण्यासाठी सांगीतले होते.
फ्रेश झाल्या झाल्या राधीका विजय जवळ येऊन बसली. त्याच्या चेहऱ्यावरुन प्रेमाने हात फिरवला. त्याला जवळ घेतल आणि पुढच्या क्षणाला त्याचा गाल लाल झाला.
आता पुढे.
सायली आणि आराध्या दोघी शॉक झाल्या. विजय गालाला हात लावून बसला होता.
“आजवर माझी काळजी कधी केली नाहीस, का तर आज न उद्या माझी काळजी करायला कोणीतरी भेटेल. ते पण अॅकसेप्ट केल रे मी. पण मग तुला आता हिची पण काळजी नाही का??” सायली कडे बोट करत राधीका त्याला ओरडली होती.
तिने पण तो व्हिडिओ पाहीला होता. मोहिते साहेबांनी जरी त्याची बाजु समजावून सांगितली होती. तरी राधीकाला सायलीची जास्त काळजी होती. कारण तिची झालेली अवस्था सगळ्यांनीच पाहिलेली होती.
राधीका परत त्याच्यावर हात उचलणार तेवढ्यात सायलीच मध्ये गेली, “त्यांच्याकडून मी सॉरी म्हणते, पण मारु नको न त्यांना. तु फक्त बोलली नव्हती तर पुर्ण रात्र त्यांनी तापात काढली होती.”
तिच ते वाक्य ऐकून राधीका लगेच तिला आलेल्या रागातून बाहेर आली. तिने परत विजयला घट्ट मिठीत घेतल.
“अस जीवावर उदार नको होते जाऊ रे, आता तु एकटा नाहीये, तुझ्यावर कोणतरी अवलंबुन आहे.” राधीका
विजयने त्याच्या दोन्हीही बहीणींकडुन चांगलाच मार खाल्ला होता. थोडा वेळासाठी परत पापण्या ओलावल्या होत्या.
थोडा वेळ शांततेच गेला. मग सायली सगळ्यांसाठी चहा टाकला. तो पिल्यावर मग सायली आणि आराध्या दोघांचाही निरोप घेऊन तिथुन निघाल्या.
दुसऱ्या दिवशी एक महिला पत्रकार, विजयच्या घरी येऊन पोहोचली. तिला विजयची मुलाखत घ्यायची होती. ती कालच येणार होती. पण काल सगळेच असल्याने विजयने तिला आज बोलावले होते.
“मॅडम मुलाखत घ्यायची, तर त्या पोलीसांची घ्या, जे काही मिनिटात मदतीसाठी हजर होते. त्या अॅम्युलन्सच्या ड्रायव्हरची घ्या, ते देखील त्यांच्या जीवाची पर्वा न करता सगळ्यांना हॉस्पीटलमध्ये सोडत होते. तिथल्या स्थानिक लोकांची घ्या ते पण वेळ न दवडता, धावले होते मदतीसाठी. आमच्या त्या ड्राईव्हवर दादांची घ्या. त्यांच्या प्रसंगवधानामुळे आम्ही वाचलो. मी काय केल, माझी कशाला” विजयने मुलाखत द्यायला नकार दिला.
“सगळ माहितीये, त्या सगळ्यांची झाली घेऊन आणि तुम्ही जे काही, काहीच केल नाही न ते पण आम्हाला माहितीये.” पत्रकार हसतच बोलली. “मला फक्त एवढच विचारायच आहे, की मोहीते साहेब आणि तुमचा काय संबंध आहे? कारण त्यांनी तुमचा शोध घ्यायला स्पेशल ऑर्डर सोडल्या होत्या पोलीसांना.”
मोहिते साहेब राजकारणातील गाजलेल्या व्यक्ती होत्या. त्यांनी घरुन निघताना, विजयचा फोटो पाठवुन त्याचा शोध घ्यायला सांगितलेला होता. जो कोणी तरी त्या पत्रकाराला सांगुन दिल होत. विजयला राजकारणाचाही अंदाज आलेला होता.
“कस असत न. जेव्हा आपला मित्र अडचणीत असतो न, तेव्हा तो कोणी खासदार नसतो, ना कोणी इतर काही. त्याला फक्त एकच दिसत की त्याचा मित्र अडचणीत आहे आणि त्याला माझी गरज आहे. मोहीते साहेबांचे जिवलग मित्र मी. देसाई यांच्या मुलीसोबत माझ लग्न ठरलेले आहे आणि माझच नाव मिसींगमध्ये गेल्याने बाबांना टेन्शन आल होत. कारण ती न्युज बघुन सायली म्हणजे मी. देसाईंची मुलगी तब्येत बिघडली होती. आता काय कराव त्यांना कळतं नव्हत. अशा वेळेस मोहीते साहेब त्यांच्या ऑफीसमध्ये बसूनही त्यांच्या मित्राच मन वाचुन गेले होते आणि त्यांच्या मित्राच्या अडचणीत ते धावुन आले. त्यांच्या माणसांसाठी मोहीते साहेब नेहमीच पाठीशी रहातात. त्या अपघाताच्या ठिकाणी सर्वात पहिले पोहोचलेले नेते म्हणजे तेच होते. तु्म्हालाही कळल असेल ते. फक्त मलाच नाही. त्यांनी अपघातात सापडलेल्या प्रत्येकाची निट ट्रिटमेंटची सोय करुन त्यांची नीट चौकशी केली होती.”
विजयने सगळ श्रेय मोहीते साहेबांकडे लोटल.
“तुमच्या हाहात काच घुसलेला असतानाही, तुमची मदतीसाठी चालु असलेल्या धावपळीचा व्हिडीओ चांगलाच गाजला, त्याबद्दल काय सांगाल” पत्रकार
“अहो, काच घुसली म्हणजे, छोटीशी काच होती. वरच्या वर असल्याने ते मला जाणवल नाही आणि गंभीर जखमी झालेल्यांना लवकर पोहोचवण गरजेच होत.” विजय
कॅमेरामनने कॅमेरा ऑफ केला. विजयला हातमिळवणी करताना, त्यांचे डोळे जरा पाणावले.
“काय झाल, माझ काही चुकलं का??” विजयने त्यांच्या डोळ्यात पाणी बघुन विचारले.
“काच किती वरच्या वर होती, ते माझ्या बाबांनी निट पाहीली होती. बसची जाड काच होती न ती, जवळपास एक सेंमी. आत घुसली होती न??” पत्रकार
तसा विजय चपापला. ताई सकाळीच टुरवर गेल्याने घरात दुसर कोणी नव्हतं. याच त्याला आता समाधान वाटले होत.
“तु.. तुम्हाला कस कळलं??” विजय
“ज्या पोलीसांनी तुम्हाला झापुन हॉस्पिटलला पोहोचवल न, त्यांचीच कन्या आहे मी.” पत्रकार
“ओह, अच्छा. त्यांची पण बरीच दगदग झाली होती.” विजय
“तुमच्यासारखी माणस ह्या जगात आहेत, म्हणून ही दुनिया व्यवस्थित चालु आहे. नाहीतर आजवर मला फक्त स्वार्थी माणसे भेटली. म्हणून तुम्हाला भेटायला खास पुण्यावरुन आली” पत्रकार.
“सगळी त्याची कृपा, मी फक्त निमित्त मात्र.” विजय
“सेम, माझ्या बाबांप्रमाणे बोलता. म्हणूनच त्यांनी काच किती घुसली होती हा प्रश्न मला टाळायला लावला होता. म्हणूनच मी तो ऑफ कॅमेरा घेतला.” पत्रकार
“खुप खुप धन्यवाद, त्याबद्दल तुमचे, नाहीतर आता फक्त बहीणींचा मार भेटलाय, तुमच ऐकल असत तर सगळ्या ग्रुपने मला तुडवलच असत.” विजय हसत बोलला. “बसा चहा टाकतो.”
“असु दे, नंतर कधीतरी “ पत्रकार
“होईल ओ, तुम्ही एवढ माझ्यासाठी केले. आता थोडा अजुन वेळ द्या मला.” बोलुन विजय चहा बनवायला गेला सुध्दा.
तो चहा घेऊन ती पत्रकार विजयचा निरोप घेत निघुन गेली. त्याच स्टेटमेंट त्या पत्रकाराने न्युजला दिल.
“शोभते जोडी हो, बरोबर नगाला नग भेटलेत तुम्ही” मिसेस मोहिते, मोहीते साहेबांकडे बघत बोलल्या. तसे ते दोघही हसले. तेवढ्यात सायली च्या वडीलांचाही त्यांच्या मित्राला फोन आला, “काय जोडीदार भेटलाय राव तुला.”
“हिच बोलण तुला तिथे ऐकु आल की काय??” मोहीते साहेब “ती पण आत्ता तेच बोलत होती मला.” तसे ते तिघेही खळखळून हसायला लागले.
नंतर ती मोहीते साहेबांकडे गेली. तिथेही तिने त्यांना तोच प्रश्न विचारला की, “तुमच विजय सोबत काय नात आहे, जे स्पेशल त्याला शोधण्यासाठी पोलीसांची वेगळी टिमच करायला सांगितली??”
“त्याला पाहील की, मला माझ्या तरुणपणाची आठवण येते. त्याला मी माझा मुलगा समजतो. हवं तर मानसपुत्र समजा. तुम्ही तर त्याला भेटुन आल्या आहात. तो कसा आहे ते ही तुम्हाला कळल असेलच.” मोहीते साहेब “आणि तिथे फक्त मिच नव्हतो. आमच्या पक्षाचे बरेच स्थानिक नेते, लोक होती. ज्यांनी मदत केली. इतका गोंधळ होता तिथे, की पोलिसांना सगळ संभाळण जड जात होत. मग आमच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक लोकांना हाताशी धरुन पोलीसांना मदत केली. एवढच झालय.”
त्या पत्रकारने मोहीते साहेबांच स्टेटमेंट न्युज ला दिल.
आता सगळच नॉर्मल झाल होत. राहुल त्याच्या नवीन ब्रांचच्या ओपनींगसाठी विजयच्या परत येण्याची वाट बघत होता. तो परत आल्यावर राहुलने त्या दिशेने हालचाल करायला सुरवात केली. इकडे सायलीला मात्र आता लग्नाची घाई झाली होती. त्याच्यापासूनचा दुरावा आता तिला सहन होत नव्हता. फक्त ती बोलुन दाखवत नव्हती.
दिवाळी जवळच आली होती. लक्ष्मीपुजनला राहुलच्या नवीन ब्रांचची ओपनिंग ठेवली होती. दिवाळीचा फराळ दरवर्षीप्रमाणे आरतीच्या घरी तिची आई बनवणार होती आणि सुट्टीचा दिवस बघुन बाकी सगळा ग्रुप त्यांचा घरी जमणार होता. दिवाळीचा फराळ बनवण्यात आरतीच्या आईचा हात कोणी पकडु शकत नव्हतं, एवढा उत्तम चवीचा त्या बनवत होत्या.
रविवारचा दिवस होता. सगळे सकाळीच पोहोचले होते. तोवर आरतीच्या आईने सुरवात देखील केलेली होती. भाजणीचा खमंग वास पुर्ण घरात दरवळत होता. जसा ग्रुप घरात पोहोचला, सगळ्यांनी त्यांची त्यांची काम वाटुन घेतली.
थोड्यावेळाने प्रणाली आणि जिया देखिल येऊन पोहोचल्या होत्या. प्रणाली बद्दल आधीच घरात सांगुन दिलेले होते.
“ही प्रणाली आणि ही विजयची बहीण जिया” आरतीने तिच्या घरच्यांना दोघींची ओळख करुन दिली.
“अच्छा, म्हणजे महेशची वेसण हिने घेतली का?? आरतीची आई जशी बोलली, तशी प्रणाली लाजली.
“हे बघ, तो लाजण्याचा प्रोग्राम नंतर कर. यातल तुला काय येत ते सांग??” आरतीची आई
“आजवर मी फक्त जेवण बनवलयं, हे नाही कधी” प्रणाली
“ये मग, बस माझ्या बाजुला, नाहीतर तुझी सासु बोलायची, पोरीला काही शिकवल नाही म्हणून” आरतीची आई.
तिला एवढ हक्काचे कोणीतरी बोललेल पाहुन, तिला जरा भरुनच आल. ती पटकन आरतीच्या आईच्या बाजुला जाऊन बसली.
थोडा वेळ गेला तोच आरतीची आई बोलली, “राहुल, संदेश आणि महेश तुम्ही वर टेरेसवर जाऊन फक्त पापड वाळवत बसा. जा निघा तर” आरतीची आई जणु त्यांना हाकलतच होती.
त्यांच पण बरोबर होत, ते तिघेही मदत करण्यापेक्षा त्यांच्या होणाऱ्या बायकांना नुस्ते त्रास देत होते. त्यांना वाटले कोणी बघत नाही, पण आई शेवटी आई असते. त्यांना कळलही नसत, पण प्रणालीच्या अंगातही कमी किडे नव्हते. बाकीच्या दोघी तर लाजुन काही बोलत वा करत नव्हत्या. पण महेश त्रास देतोय म्हणून प्रणालीने डायरेक्ट त्याला गरम चमच्याचा चटका दिला होता, तसा तो ओरडला होता. त्याचा आवाज आरतीच्या आईने ऐकला, त्यांना जे समजायच आहे ते समजल होत.
दिवाळीत पापड पण बनवले काय??” संदेश गोंधळला.
“अरे आपल्या भाषेत स्पष्ट सांगायच झाल तर, त्या तुम्हाला इथुन हाकलत आहेत” विजय हसायला लागला. तसे सगळेच हसायला लागले. तसे ते तिघ बारीक तोंड करत किचनच्या बाहेर पडले.
“विजय कडुन जरा शिका काही, बघा तर कामाच्या वेळी फक्त काम करतोय, नाहीतर तुम्ही.” आरतीची आई चिडून बोलली. बाकी तिघी चौघी तर गालातल्या गालात हसत होत्या.
पुर्ण दिवस त्यांचा फराळ बनवण्यात गेला. सगळ्यांचीच मदत असल्याने, जवळपास सगळाच बनवुन झाला होता. चिवडा, चकली, करंजी, रवा लाडु, शंकर पाळ्या असुन दोन तीन पदार्थ बनवुन झालेले होते. सगळ्यांना चांगल दोन तीन महिने पुरेल एवढ होत ते.
ह्यावेळेस सायली, आराध्या, प्रणाली आणि जियानी सगळ व्यवस्थित समजुन घेतल होत.
लक्ष्मीपुजनला राहुलच्या ब्रांचची ओपनिंग झाली. जवळपास सगळेच उपस्थित होते. त्याला, महेश आणि संदेश ला सगळ्यांनीच अभिनंदन केल होत. दिवाळी ही सगळ्यांचीच एकदम मस्त गेली होती. दरवर्षी प्रमाणे एक दिवस शारदा आश्रमात जाऊन त्यांनी त्या लहान मुलांसोबत लहान होऊन दिवाळी साजरी केली होती. फटाक्यांच्या आवाजापेक्षा त्या लहान मुलांच्या आनंदाच्या आवाजाने त्यांना जास्त समाधान भेटल होत.
भाऊबीजेला विजयने राधीकाकडुन ओवाळून घेतल्यावर, तो प्राजक्ता, आराध्या आणि अनुकडे जावुन त्यांच्याकडून ओवाळून घेतल होत. ह्यावेळेस जिया एकटीच आली होती. विजयला ओवाळायला.
राहुल महेश आणि संदेश सोबत त्यांच्या नवीन ब्रांचमध्ये शिफ्ट झाला. वाशीला ते ऑफिस सेट केल होत. काही दिवसांनी सायली देखिल आराध्याला जॉईन झाली. मिहीर आणि टिना थोडे नाराज झाले. पण शेवटी आयुष्य आहे. सगळच सोबत नाही रहात. नियमीत भेट राहील या शब्दावर त्यांनी सायलीला सोडल होते.
विजयी आता इंजिनीअर म्हणून फुल टाईम सर्व्हीस सेंटरला जॉईन झाला. त्याचा पेमेंट पण आता खुप वाढला होता. त्याच्या परत येण्याने शॉरुम आणि मागच्या सर्व्हिस सेंटर जणु पुन्हा चार्ज झाले होते.
तुळशी विवाह झाल्यावर राधीकाच्या लग्नाचा मुहुर्त काढण्यात आला होता. तारीख ठरवायला काका-काकु, आत्या, राजेश त्याच्या घरच्यांसोबत आणि आरती तिच्या घरच्यांसोबत, बाकी ग्रुप तर होताच. सायली तर आता हक्काने फिरत होती घरात. सगळ विधीवत करण्याचे ठरवले होते. जिया तर आता हॉस्टेल वरुन विजयच्या घरीच शिफ्ट झाली होती. घरात मदत पण आणि आपल्या माणसात रहणाचा आनंद वेगळाच असतो न.
सायली आता पुर्ण घरात व्यवस्थित रुळल्याने, राधीकाच विजयच्या बाबतीत असलेल टेन्शन खुप कमी झाल होत. वरुन विजय जेव्हा बेपत्ता झाला तेव्हा तिचा तो वेडेपणा बघुन ती कधीच त्याला सोडणार नाही याची खात्री देखील राधीकाला झाली होती.
परत खरेदीला उत्साह आला होता. सायली तर तिच्या घरी फक्त झोपायला जायची. तिचे वडील तर विजयला शॉरुमवर असताना गमतीत बोलायचे देखील, “ऐक न, तिला सांग. ते घर आहे हॉस्टेल नाही जे फक्त झोपायला येते घरी. घरी आम्ही पण तिची तितकीच वाट बघत असतो.”
विजयच्या काका काकूंना मुलबाळ नव्हते. खुप प्रयत्न केले. पण सगळेच निष्फळ. शेवटी देवाचा कौल समजुन त्यांनी तो नाद सोडला होता. त्यांनी विजय आणि राधीकालाच पोटच्या लेकराप्रमाणे जीव लावला होता. विजयचे बाबा निवर्तल्यानंतर काका काकुंनी यांना खुप सांभाळले होते.
विजयने नुकतच इंजिनीअर म्हणून जॉब जॉईन केल्याने त्याला घरात जास्त लक्षच देता येत नव्हते. पण बाकी ग्रुप आल्याने त्याच टेन्शन थोड कमी झाल होत. आता तर आत्या आणि जिया पण होत्या मदतीला. बाकी तयारी जरी झाली होती, तरी पंधरा दिवसातच मंडप वाले आणि कॅटरर्सवाल्यांच्या तारखा मिळण जरा मुश्किल होत. कारण लग्नाचा सिझन चालु होता. त्यात अर्जंट काम घेणारे त्यांचे पैसेही वाढवून सांगत होते. खर्चाचा लोड वाढत होता. विजय त्याच टेन्शन मध्ये होता. पण त्याने कोणाला बोलुन दाखवले नाही. पण हे सगळ्यांना माहिती होत. विजय त्याच्या शॉरुमवर असल्याचा फायदा घेत बाकी ग्रुप मेंमबर्सच्या आई वडीलांनी संधीचा फायदा उचलला.
“मी माझ्या मुलीसाठी मंडप सांगितलेला आहे” सोनालीचे वडील.
“मी पण माझ्या मुलीसाठी कॅटरर्सवाले सांगीतले आहेत” आरतीचे वडील.
“आता मी काय वेगळ सांगु कोणताही बॅंड बुक केला ते” संदेशचे वडील.
“आणि भटजींची काम तर तिला माहितीच आहे, ते ओळखीचे आहेत, म्हणून सांगितले बाकी काही नाही.” महेश चे वडील
सगळी काम कस काय वेळच्या वेळी झाली बघुन विजयने राधीकाला विचारल, तस तिने सगळ सांगून दिल होत. मग त्याने सगळ्यांनाच फोन लावून विचारलं. तर त्याला ही अशी उत्तर भेटली होती. तेवढ्यात नंदुकाका कसलातरी गठ्ठे घेऊन आले होते.
“आता हे काय??” विजय
“काय म्हणजे??” नंदुकाका “ताईच्या पत्रिका आहेत.” त्यांनी पत्रीकांचा गठ्ठा राधीकाच्या हातात दिला.
“ही सरासर चीटींग आहे, साखरपुड्याच्या वेळी पण असच केलत तुम्ही.” विजयने सगळ्यांनाच कॉन्फरन्सवर घेतल होत.
“याचे पैसे घेणार आहोत आम्ही, त्याच टेन्शन तु नको घेऊस” मोहीते साहेब.
“मग ठिक आहे. मला प्रत्येकाच बील पाहीजे “ विजय
“बिल न, भेटेल न तुला. वाट बघ?” सोनालीचे वडील.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा