मागील भागात.
“मी माझ्या मुलीसाठी मंडप सांगितलेला आहे” सोनालीचे वडील.
“मी पण माझ्या मुलीसाठी कॅटरर्सवाले सांगीतले आहेत” आरतीचे वडील.
“आता मी काय वेगळ सांगु कोणताही बॅंड बुक केला ते” संदेशचे वडील.
“आणि भटजींची काम तर तिला माहितीच आहे, ते ओळखीचे आहेत, म्हणून सांगितले बाकी काही नाही.” महेश चे वडील
सगळी काम कस काय वेळच्या वेळी झाली बघुन विजयने राधीकाला विचारल, तस तिने सगळ सांगून दिल होत. मग त्याने सगळ्यांनाच फोन लावून विचारलं. तर त्याला ही अशी उत्तर भेटली होती. तेवढ्यात नंदुकाका कसलातरी गठ्ठे घेऊन आले होते.
“आता हे काय??” विजय
“काय म्हणजे??” नंदुकाका “ताईच्या पत्रिका आहेत.” त्यांनी पत्रीकांचा गठ्ठा राधीकाच्या हातात दिला.
“ही सरासर चीटींग आहे, साखरपुड्याच्या वेळी पण असच केलत तुम्ही.” विजयने सगळ्यांनाच कॉन्फरन्सवर घेतल होत.
“याचे पैसे घेणार आहोत आम्ही, त्याच टेन्शन तु नको घेऊस” मोहीते साहेब.
“मग ठिक आहे. मला प्रत्येकाच बील पाहीजे “ विजय
“बिल न, भेटेल न तुला. वाट बघ?” सोनालीचे वडील.
आता पुढे.
“वाट बघ म्हणजे?” विजय
“अरे देऊ की तुला बिल.” आरतीचे वडील.
“एक मिनीट, राहुलचे बाबा कुठे आहेत??” विजय.
तस सगळ्यांनी काय माहीत म्हणून सांगितले.
“नशीब, किमान त्यांनी तरी काही केल नाहीये अजुन” विजयला तेवढच हायस वाटल.
विजयवर फक्त कपड्यांच्या खरेदीच ठेवल होत. बाकी थोडीफार सोन देखील खरेदी करुन ठेवलेल होत.
तिकडे मिसेस मोहीतेंनी देखील सगळ्या लेडीजला एकत्र करत, त्यांच्या साड्यांवरचे ब्लाऊज प्रणालीच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या महिला गटांमार्फत शिवायला घेतले होते. प्रणालीने तिचे सगळे फॅशन डिझाईन मधले स्किल्स वापरत त्या महिलागटांकडुन निट शिवून घेतले होते. जे ड्रेस घालणार होते त्यांची फिटींगसुध्दा प्रणालीने जातीने लक्ष घालून करुन घेतलेली होती.
बघता बघता लग्न तीन दिवसांवर येऊन ठेपल होत. सायली तर पाच दिवस आधीच येऊन पोहोचली होती. आत्यांचे मिस्टरही येऊन पोहोचले होते. त्यांच्यासोबत गावातले शेजारचे पण आलेले होते. सायली आलीये म्हटल्यावर दुसऱ्या दिवशी लगेचच आरती आणि सोनाली ही आल्या होत्या. मग त्यांनी प्रणालीलाही बोलावून घेतले. असा बराच गोतावळा जमा झालेला होता. या सगळ्या गोंधळात सायलीला विजय सोबत बोलायला वेळच भेटत नव्हता. जो कामावरुन ७ वाजता आलेला होता. तस ते एकमेकांशी फक्त डोळ्यांनीच बोलत होते.
“भेटेल, बोलायलाही भेटेल. जरा सब्र रोख मेरी जान” सोनाली सायलीचा चेहरा पकडत बोलली.
“झाली का तुझी सुरवात” सायली लाजतच बोलली.
“अभी कहां, अब तो पुरी रात बाकी है.” प्रणालीही तिकडून सुरू झाली.
“तुमच्याशी बोलण म्हणजे न” सायली पटकन किचनमध्ये निघुन गेली. तशा दोघी हसल्या.
जेवण आटोपल्यावर विजय, सायली, प्रणाली आणि जिया झोपण्यासाठी आरतीच्या घरी गेले. कारण घरात पाहुण्यांच्या झोपण्याची व्यवस्था केलेली होती. घरात आता सायली, आरती, सोनाली, प्रणाली आणि जिया असल्याने, काका काकुंवर, आत्यावर कामाचा लोड आला नव्हता. राधीकाला तर त्यांनी कोणत्याही कामाला हातच लावु दिला नव्हता.
जेवण झालेली असल्याने ते सगळेच टेरेसवर जाऊन बसलेले होते. तिथे फक्त आराध्या आणि बाकी तिघ नव्हते. थोड्या वेळाने प्राजक्ता ही येऊन पोहोचली होती. जेवण करुन ती पण टेरेस वर आली होती. ती आलीये हेच वर कोणाला माहीत नव्हते.
“आमची लहानपणापासुनची मैत्री आहे, त्याच्या बाजुलाच तर रहायचो आधी. तीन घर सोडून” आरतीने लहानपणीच्या गोष्टी लावल्या होत्या.
“बस एवढचं का??” प्राजक्ता हळुच मागुन येत बोलली. तशी आरती चपापली.
“एवढंच म्हणजे??” सायली.
“ताई नको न” आरती प्राजक्ताकडे बघत बोलली.
“तु सांग ग ताई” सायली. तशी प्राजक्ता येथून बसली.
“लहान असताना, विजयला जर कोणी काही बोलल न, तर मॅडम जाऊन तिच्या झिंग्याच उपटायची. मुलगा असेल तर मग पुर्ण चेहरा तिच्या नखांनी ओरबाडून टाकायची” प्राजक्ता हसत बोलत होती. “लहानपणीच्या भातुकलीच्या खेळात नवरा बायको तेच रहायचे.” आता आरती मात्र लाजली होती.
“लहान होती मी, मला तेव्हा काही कळत नव्हत.” आरती तिची बाजु सावरत बोलली.
“हो का?? मग दहावीला असताना त्या मुलीचा गळा ति बेशुध्द पडेपर्यंत का आवळला होतास??” प्राजक्ता
मग आरती गप्प राहीली.
“म्हणजे??” प्रणाली
“अगं, त्या मुलीने विजयचा राग मनात धरला होता, का तर तिने कॉपी केलेल सरांना सांगीतल होत.” प्राजक्ता “मग त्या मुलीने विजयवर सरळ सरळ आरोप केले की त्याने तिला नको तिथे हात लावला.”
सगळ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव आले, फक्त विजय सोडुन.
“मग??” सोनाली. ही झालेली गोष्ट तिला पण माहीती नव्हती.
“मग काय, जस हिला कळलं, तशी ती त्या मुलीवर आवरुनच गेली. ती ऐकतच नाही म्हटल्यावर तिचा गळाच धरला होता. कुठुन एवढ बळ आल होत तिला काय माहीत? कोणालाच ऐकत नव्हती. एवढा मोठा तमाशा झाला होता म्हणून सांगु. त्या मुलीने तिची चुक स्विकारल्यावरच हिने तिचा गळा सोडला. जसा गळा सोडला, तशी ती बेशुध्द पडली.”
“हिने तरी गळा आवळला असेल, मी तर जीवच घेतला असता तिचा” प्रणाली बोलून गेली.
“मग काय तर, दुसरा एखादा मारल्याचा आरोप केला असता सहन, पण इतका घाणेरडा आरोप, मग टाळकच सटकल होत माझ.” आरती अजुनही चिडून बोलली होती.
सायली आणि विजय फक्त ऐकायच काम करत होते. कारण विजय तर काही स्वतः ची स्तुती करणार नव्हता आणि सायली ला सगळच ऐकायच होत.
“मग तु कधी भेटली यांना??” सायली ने सोनालीला विचारल.
“माझी भेट तर कॉलेजला झाली होती. ११वी ला असताना.” सोनाली “ते वर्ष तर मी माझ्याच नादात घालवल होत. मग १२ वी ला असताना, बाबांना अटॅक आलेला, त्यानंतर मग मी ह्यांच्या क्लॉज झाले. बाकी तर तुला माहितीच आहे”
“मग बाकी तिघ??” सायली
“राहुल पण ११वीलाच भेटला यांना, बेंचवर एकत्र बसायचे” प्राजक्ता “आणि संदेश आणि महेश त्यांची तर फिल्मी स्टोरी आहे.” प्राजक्ता हसायला लागली. तसे विजय, आरती आणि सोनाली ही हसायला लागले होते.
“दोघांनाही मारामारी करायची खुप सवय होती.” आरती “एकदा तर भावनेच्या भरात कोणत्यातरी मोठ्या गुंडा सोबत मारामारी करुन बसले. तेव्हा तर डायरेक्ट दोघांवर चाकुचे, तलवारीचे वार झाले होते.”
तस सगळ्यांच्या अंगावर सरकन काटे आले.
“तेव्हा पण विजयने पटकन पोलीसांना फोन करुन बोलावले होते. विजयने पहीले त्या गुंडांना समजावुन पाहीले. ते ऐकतच नाही म्हटल्यावर, त्याच्या तो दुसऱ्या रुपात अवतरला. त्यानेही तलवार हातात घेत त्यांच्यावर हल्ला चढवला.” प्राजक्ता
सायली, प्रणाली आणि जियाला तर झटका बसला.
“यांनी” सायली “आणि हल्ला चढवला??”
“हो, पण कोणाचा जीव जाणार नाही, हे बघूनच. पोलीस येईपर्यंत त्याने त्या गुंडांना पकडुन ठेवल होत. पण त्याचा तो आवेश पाहीला असतास न. ते गुंड असुन ह्याला घाबरले होते.” प्राजक्ता
“मग ह्याने त्या दोघांना हॉस्पीटलमध्ये अॅडमिट केल होत. त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव करुन दिली. आई बाबांना किती भारी वाटेल न, तुमची अशी बॉडी बघुन. अस तो त्यावेळी त्या दोघांना बोलला होता. मरता मरता वाचलेत दोघ. तेव्हा पासुन मग ते आमच्यासोबत आले.” आरती
“अच्छा, ते गुंड असुन घाबरले, म्हणून तुम्हाला हसायला आल होत??” सायली
“अगं, लहान मुल ओरडतात न, तसे ते ओरडत होते.” सोनाली मग सगळेच हसायला लागले.
अशा ब-याच जुन्या गोष्टींना उजाळा भेटला होता. बराच वेळ गप्पा मारल्यानंतर ते खाली यायला निघाले.
“थांब तु” सोनालीने सायलीचा हात पकडत विजयकडे इशारा केला.
तो अजूनही त्या कठड्याकडेच उभा होता. सायलीला आता सोनाली वाक्य आठवल जे ति विजयच्या घरात असताना बोलली होती. आता ते दोघच टेरेसवर होते. सायली विजय जवळ गेली.
“सॉरी गं” विजय. सायली गोंधळली की तो सॉरी का बोलतोय म्हणून.
“सॉरी कशासाठी??” सायली
“ते माझ्यामुळे तुलाही घरात कामाचा लोड आला” विजय “अशीच आमची मिडल क्लास लोकांची लाईफ असते. तुला कधी तुझ्या घरच्या सारखी लाइफ देईल, मलाच माहित नाही.” त्याचे डोळे किंचीत ओलावले. सायली ने विजयचा हात हातात घेतला.
“तुम्हाला काय वाटत??” सायली “मी काय सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आली?? आम्ही पण तर त्यातुनच बाहेर आलोय. आजोबा बोलायचे मला. माझा जन्म झाला न, तेव्हाच माझ्या बाबांना नोकरी लागली होती. मला त्यांनी त्यांची धनाची पेटी सांगीतली होती. आत्ताच आयुष्य जरी सोप दिसत असल, तरी सुरवात खुप कठीणच होती. नका टेन्शन घेऊ. आपली पण सुरवात आहे. होईल की सगळ निट नंतर. माझा पुर्ण विश्वास आहे तुमच्यावर.”
“काय पाहिलस गं माझ्यात?? कारण तेव्हा तर मी जॉब ला पण नव्हतो. गाडीवर जायचो. वेळेचा ठिकाणा नव्हता. ना रंग ना रुप, म्हणजे काहीच नव्हतं न माझ्याकडे.” विजयचा आवाज अजुनही भारावलेला होता.
“कुठल्याही मुलीला न तिचे वडील तिच्या आयुष्याचे हिरो वाटतात. त्यांच्या होणा-या नव-यामध्ये पण त्या त्यांच्या वडीलांना बघायचा प्रयत्न करत असतात आणि मला ते दिसले. मग मला दुसर काही बघायची गरज भासली नाही.” सायली
विजयने तिला खांद्याला पकडुन, साईडने हलकेच मिठीत घेतल.
“तुम्ही काय पाहीलत माझ्यात??” सायली.
मग विजयने खुप विचार केल्यास नाटक केल मग म्हणाला, “कोणालातरी डोक्यावर बसवायची आहे, तर म्हटलं तु का नको. नाही का??” विजय फुल मस्करीच्या मूडमध्ये आला.
तसे सायलीने डोळे विस्फारले, तिच्या नाकाचा शेंडा लाल झाला. “जा, मला बोलायचचं नाही तुमच्याशी.” सायली त्याच्यावर रुसून जाऊ लागली.
आए हो मेरी ज़िंदगी में तुम बहार बन के
(सायलीची पावली थांबली. विजयला माहीत होत. गाण म्हटल की मॅडम खुश.)
आए हो मेरी ज़िंदगी में तुम बहार बन के
आए हो मेरी ज़िंदगी में तुम बहार बन के
मेरे दिल में यूँ ही रहना, हाय
मेरे दिल में यूँ ही रहना तुम प्यार-प्यार बन के
आए हो मेरी ज़िंदगी में तुम बहार बन के
आँखों में तुम बसे हो सपने हजार बन के
आँखों में तुम बसे हो सपने हजार बन के
मेरे दिल में यूँ ही रहना, हाय
मेरे दिल में यूँ ही रहना तुम प्यार-प्यार बन के
आए हो मेरी ज़िंदगी में तुम बहार बन के
घूँघट में हर कली थी, रंगों में ना ढली थी
घूँघट में हर कली थी, रंगों में ना ढली थी
ना शोख़ थी हवाएँ, ना खुशबू मनचली थी
आया है अब के मौसम कैसा ख़ुमार बन के
आया है अब के मौसम कैसा ख़ुमार बन के
मेरे दिल में यूँ ही रहना, हाय
मेरे दिल में यूँ ही रहना तुम प्यार-प्यार बन के
आए हो मेरी ज़िंदगी में तुम बहार बन के
मन का नगर था ख़ाली, सूखी पड़ी थी डाली
(सायली पटकन विजय जवळ आली.)
मन का नगर था ख़ाली, सूखी पड़ी थी डाली
होली के रंग फीके, बेनूर थी दीवाली
रिमझिम बरस पड़े हो तुम तो फुहार बन के
(विजयने सायलीच्या गालावरुन हात फिरवला.)
रिमझिम बरस पड़े हो तुम तो फुहार बन के
मेरे दिल में यूँ ही रहना, हाय
मेरे दिल में यूँ ही रहना तुम प्यार-प्यार बन के
आए हो मेरी ज़िंदगी में तुम बहार बन के
आँखों में तुम बसे हो सपने हजार बन के
मेरे दिल में यूँ ही रहना, हाय
मेरे दिल में यूँ ही रहना तुम प्यार-प्यार बन के
आए हो मेरी ज़िंदगी में तुम बहार बन के
आए हो मेरी ज़िंदगी में तुम बहार बन के
आए हो मेरी ज़िंदगी में तुम बहार बन के
आए हो मेरी ज़िंदगी में तुम बहार बन के
सायली विजयच्या मिठीत विसावली होती.
“अजुन एक” सायली. विजयने तिला प्रश्नार्थक पाहील.
“एकानेच मन नाही भरणार माझ” सायली “अजुन एक म्हणा, तरच माफ करेल.”
तस विजयने परत सुरवात केली.
साज ह्यो तुझा जीव माझा गुंतला गं
(विजयने सायलीच्या गालावर दोन्ही हात ठेवले.)
उशाखाली photo तुझा चांदरातीला
तुझ्या वेणीतलं फुलं माळून विसावलं मन
त्या विसावल्या मनाला ही घेना साथीला गं
मृगनयनीया, हाक दे मला
मृगनयनीया, हाक दे मला
रोज मी उभा त्या वाटला
फुल झालो मी, गंध हो ना तू
सांज येळचं माझं गाणं हो ना तू
तुझ्या सावलीत आज गं, निजलोय गार गं
झेलतोया रोजचा त्या उन्हाला गं
आभाळ फिरून येईल, ढग दाटून येतील गं
मनातल्या हुंदक्याचा, डोळ भरल पाण्याचा
रंग कोणता ह्यो सांद्य मातीला गं
साज ह्यो तुझा जीव माझा गुंतला गं
उशाखाली photo तुझा चांदरातीला
तुझ्या वेणीतलं फुलं माळून विसावलं मन
त्या विसावल्या मनाला ही घेना साथीला गं
दुसर पुर्ण गाण होईपर्यंत सायली विजयच्या मिठीत होती. एकमेकांच्या डोळ्यात बघत, कितीतरी वेळ हरवलेले होते दोघ.
“तुझ्यावर ग आल ग.” सोनालीचा आवाज आला. तस त्यांनी पटकन एकमेकांना सोडल.
“गोमु संगतीन माझ्या तु येशील का??
माझ्या पिरतीची रानी तु होशील का??” प्रणाली सोनालीची जोडी धरत डान्सच्या स्टेप्स् करत होती.
दोघांच लक्ष तिकडे गेल तर, प्राजक्ता त्या दोघांना हाताची घडी घालून कधीची बघत होती. तर दुसऱ्या बाजूला सोनाली आणि प्रणालीची नौटंकी चालु होती. तर आरती तोंड दाबुन हसत होती.
“तुमची अंताक्षरी झाली असेल खेळून तर, झोपायच??” प्राजक्ता थोड्या कडक आवाजात बोलली.
“हा येतच होतो झोपायला, ते असच जरा हवा खात होतो.” विजयने सारवासारव केली.
“हो कळलं मला ते, माहितीये तुम्हाला बोलायला वेळ भेटत नाहीये, म्हणून दिला न अजुन अर्धा तास. आता किती वाजलेत बघा. दोन तास झालेत. बारा वाजायला येतील आता. काही वेळ काळ बघा जरा.” प्राजक्ता दोघांना दटावत होती.
विजयने पटकन घड्याळ पाहील. तर खरचं बाराला पाच मिनीटे बाकी होती.
तेव्हा कुठे सगळे झोपायला गेले. जाता जाता सायली, सोनाली आणि प्रणालीला धपाटे मारायला विसरली नाही.
“प्रत्येक गोष्टीचा हिशोब मी घेणार आहे” सायली त्या दोघींकडे नजर रोखत बोलली.
बाकी तिघी तर आरतीच्या रुममध्ये गेल्या झोपायला गेले. विजयने टेरेसवर तीच त्याच अंथरुण पसरलं. त्याला तिथे झोपायला खुप आवडायचं.
दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे परत त्यांच्या त्यांच्या कामाला लागले. आजच्या दिवशी सगळ्यांनी मेहंदी काढुन घेतली होती. आता तर प्रत्येकीने हक्काने त्यांच्या त्यांच्या नव-यांची नाव हातावर काढलेली होती. मेहंदी काढायला प्रणालीने तिच्या मैत्रीणीला बोलावल होत.
अर्ध्या दिवसासाठी विजय शॉरुमवर गेलेला होता. बाकी तिघांनीही आजपासून चार दिवस सुट्टी घेतलेली होती, संध्याकाळी सगळा ग्रुपच जमणार होता. आज गोंधळाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. जागरण होत.
अर्धा दिवस करता करता विजयला यायला संध्याकाळ झाली. दुपारपासून किमान पंधरा ते सोळा फोन झाले असतील सायलीचे विजयला. अपघाताची घटना झाल्यापासून विजय जराजरी संपर्काच्या बाहेर गेला, तरी सायली घाबरुन जायची. त्यामुळे तो घरी येईपर्यंत तिचे विजयला फोन चालु होते.
जसा तो घरात आला, तस सायली ने त्यालाही मेहंदी काढायला सांगीतली होती. विजयलाच काय बाकी तिघांनाही मेहंदी काढायला आवडत नव्हतं. पण सगळ्या लेडीज ने ठरवले होत की मुलांना मेहंदी काढायला लावायची.
पण विजय काही ऐकायला तयार नव्हता. शेवटी सायलीने तिची शपथ घालुन त्याला मेहंदी काढायला लावली होती. राहुल, संदेश आणि महेश जसे घरी आले तस आरती, प्रणाली आणि आराध्या पण त्यांच्या मागे लागल्या होत्या की मेहंदी काढा आणि त्यांच नाव त्यांच्या हातावर लिहा म्हणून. राहुलने विजयकडे पाहील, त्याची मेहंदी होत आली होती. आता त्यालाच गप्प केल म्हटल्यावर ते तिघांनीही एकाच हातावर काढण्याची तयारी दाखवली.
विजयला मात्र दोन्ही हातावर काढली गेली होती. बाकी तिघ त्याला हसत होते. रात्री च्या जेवणाच्या वेळी मात्र विजयच्या दोन्ही हातावर मेहंदी असल्याने त्याला जेवायला प्रोब्लेम येत होता. मग तिघ परत सुरू झाले.
“म्हणून आम्ही एकाच हातावर काढली.” राहुल
“आता कसा जेवशील??” महेशच्या खांद्यावर हात ठेवत संदेश विजयला विचारत होता.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा