Login

तुझ्याच आयुष्याची वाटेकरी व्हायचे आहे भाग ४९

काका काकुंचा आनंद बघुन सायलीच्या वडीलांनी जरा वाईट वाटले. कारण मुलीच्या कन्या दानाचा आनंद प्रत्येक बापाला हवा असतो. जो त्यांना भेटणार नव्हता. दुसरीकडे राधीकाचही लग्न खुप छान पार पडले होत.

मागील भागात. 

अर्धा दिवस करता करता विजयला यायला संध्याकाळ झाली. दुपारपासून किमान पंधरा ते सोळा फोन झाले असतील सायली चे विजयला. अपघाताची घटना झाल्यापासून विजय जराजरी संपर्काच्या बाहेर गेला, तरी सायली घाबरुन जायची. त्यामुळे तो घरी येईपर्यंत तिचे विजयला फोन चालु होते.

जसा तो घरात आला, तस सायली ने त्यालाही मेहंदी काढायला सांगीतली होती. विजयलाच काय बाकी तिघांनाही मेहंदी काढायला आवडत नव्हतं. पण सगळ्या लेडीज ने ठरवले होत की मुलांना मेहंदी काढायला लावायची.

पण विजय काही ऐकायला तयार नव्हता. शेवटी सायलीने तिची शपथ घालुन त्याला मेहंदी काढायला लावली होती. राहुल, संदेश आणि महेश जसे घरी आले तस आरती, प्रणाली आणि आराध्या पण त्यांच्या मागे लागल्या होत्या की मेहंदी काढा आणि त्यांच नाव त्यांच्या हातावर लिहा म्हणून. राहुलने विजयकडे पाहील, त्याची मेहंदी होत आली होती. आता त्यालाच गप्प केल म्हटल्यावर ते तिघांनीही एकाच हातावर काढण्याची तयारी दाखवली.

विजयला मात्र दोन्ही हातावर काढली गेली होती. बाकी तिघ त्याला हसत होते. रात्री च्या जेवणाच्या वेळी मात्र विजयच्या दोन्ही हातावर मेहंदी असल्याने त्याला जेवायला प्रोब्लेम येत होता. मग तिघ परत सुरू झाले.

“म्हणून आम्ही एकाच हातावर काढली.” राहुल

“आता कसा जेवशील??” महेशच्या खांद्यावर हात ठेवत संदेश विजयला विचारत होता.

आता पुढे. 

बाकी सायलीने दुपारीच काढली असल्याने, तिची मेहंदी रात्रीच्या जेवणा पर्यंत सुकली. मग ति विजय जवळ आली आणि त्याला चारायला सुरवात केली.

“कळलं का आता की मी कसा जेवणार??” विजय जिंकल्याच्या आविर्भावात बोलला. तसे सगळेच त्यांना हसायला लागले.

“तुम्हाला पण चान्स होता, पण नको तिथे हुशा-या केल्या की अस होत.” विजयचे काका हसत बोलले होते.

तिघांचे चेहरे पडले. तोवर गोंधळ घालणारी मंडळी पण येऊन पोहोचली होती. वरिष्ठ मंडळी जशी बाहेर गेली तशा तिघी पटकन राहुल, संदेश आणि महेश जवळ आल्या आणि एक एक घास तिघांनाही पटकन भरवला. त्यांचे पडलेले चेहरे तिघींनाही पहावले गेले नव्हते.

त्यांना वाटले की त्यांना कोणीच पाहील नाही. पण विजयने पटकन त्या तिघांचे चारतानाचे फोटोच काढुन घेतले होते.

“चला आ करा पटकन” सायली सोनाली जवळ जेवणाचा एक घास घेऊन आली. सोनालीने पाहील, तर रुद्र होता व्हिडिओ कॉल वर. ह्या सगळ्यांना बघुन तिला खुप आठवण आली होती रुद्रची. एवढ्या दिवसात त्याने सोनालीच चांगलच मन जिंकलेल होत. मग ती निट जेवलीच नव्हती. विजयच्या जस लक्षात आल, तस त्याने सायलीला सांगून रुद्रला कॉल करायला सांगीतला होता.

“आता तु जेवलीच नाहीस तर मला माझी ड्युटी तरी कशी करता येईल??” रुद्र

“जेवते ओ, नका काळजी करु माझी. मला तुमची ताकत बनायच आहे. कमजोरी नाही.” सोनालीने सायलीच्या हातातून तो घास खात बोलली. त्याचा चेहरा बघुन तिची कळी खुलली होती.

“मी येईल हळदीला.” रुद्र ने डायरेक्ट तिला फ्लाईंग किस दिली. आता मोबाईल आरतीने ने धरलेला होता आणि सायली तिला चारत होती आणि दोघींच्या समोरच किस दिलेली बघुन सोनाली भयंकर लाजली.

“अय्यो, आता उद्या हळदी पर्यंत मॅडमचा कोटा भरला” प्रणाली मागुन येत बोलली. तश तिने प्रणालीला चापट मारली. तसे सगळेच हसले.

सोनाली सायली कडे बघुन थँक्स बोलणार, तेवढ्यात सायलीनेच विजयकडे इशारा केला. तस तिने विजयकडे पाहील. तीचे डोळे परत भरुन आले.

“काय ग?? काय झाल??” सायली

“किती मनकवडा आहे न तो. कधीच कळल नाही मला, की त्याला मनातल सगळच कस कळतं” सोनाली “मलाच काय, आम्हा सगळ्यांना प्रश्न पडतो तो. सोबत असल्यावर मन समजतात. पण तो त्या पुढेही जाऊन वाचतो. कधी कधी स्वत:च हेवा वाटतो, की असा मित्र आमच्या आयुष्यात आला.”

“फक्त काही उपद्व्याप करताना त्यांना आपली आठवण येत नाही.” सायली हसतच बोलली.

तशी सोनाली पण हसली, “आता तु आहेस की, त्याचे उपद्व्याप थांबवायला.”

“चला, खा पटापट. बाहेर वाट बघत आहेत.” सायली ने जेवणाच ताट सोनालीच्या समोर धरत बोलली.

मग सोनालीला निट जेवण चारल. मग सगळे बाहेर आले गोंधळा साठी.
सायली तर पहील्यांदा बघत होती. तिला तर एकदम भारी वाटल होत. जणु त्या गोंधळात प्रत्यक्ष देवांनी येऊन त्यांना आशीर्वाद दिल्याची फिलिंग सायलीला आली होती.

सगळेच उशीरा झोपले असल्याने, दुसऱ्या दिवशी जाग जरा उशीरा आली होती. सगळे तर उठले होते. पण सोनाली नेहमीप्रमाणे पसरलेली होती. सगळया ग्रुपने आवाज देऊन झाले पण मॅडम फक्त हुं करत झोपून जायची. मग शेवटी विजयने त्याचा उपाय बाहेर काढला, शॉक वाला.

“दादा ही बघ आळशी, अजुन झोपलेली आहे.” विजय मुद्दाम मोठ्याने बोलला. “सकाळचा नाश्ता चहा बहुतेक तुलाच करावा लागेल?”

तशी सोनाली खाडकन उठली. विजयच्या हातातून मोबाईल घेत बोलली, “ह्याच नका ऐकु, उठलीये न मी.” हॅलो, हॅलो.”

“तु चप्पलला का हॅलो करतेस??” राधीकाने सोनालीला कानाला चप्पल लावुन बोलताना पाहील. कारण सोनालीने बघीतलच नव्हत की विजयने नक्की काय पकडल होत ते. जस सोनालीने ती चप्पल कानाला लावली, तसा तो तिकडून पसार झाला होता.

सोनालीने कानावरुन काढुन पाहील तर खरचं चप्पल होती. तसा तिला दरवाजातुन हसण्याचा आवाज आला.

“जा न रे” सोनाली जोरात ओरडली. तिच चप्पल दाराकडे फेकुन मारली.

राधीकालाही कळल की, यांचीच काहीतरी उचापती आहे. ती पण हसायला लागली. ती पटकन आवरायला गेली.

आज हळदीचा कार्यक्रम होता. घरात बरीच धावपळ चालु होती. दारात मंडप सजला होता. दुपारी हळदीच्या विधी पार पडल्या. ह्यावेळेस प्राजक्ता आणि संकेत आले होते. उष्टी हळद घेऊन. मग त्यांना पण हळदीची आंघोळ घातली. आता सगळ्या ग्रुपचे आई वडीलही येऊन पोहोचले. आपल्या मुलीच्या पायाला लागलेली भिंगरी बघुन सायलीच्या आई वडीलांना जरा बरं वाटल. नाहीतर तिला मुळातच कामाची आवड नव्हती. त्यामुळे लग्नानंतर कस व्हायच?? हे टेन्शन त्यांना सतत रहायच. फक्त आराध्याची आई मिसेस मोहीते आलेल्या होत्या. मोहीते साहेब त्यांच्या कामासाठी बाहेर होते. आराध्याला पण थोडीफार कामाला हातभार लावताना बघत त्यांनाही जरा समाधान वाटले.

तेवढ्यात एक पिक अप येऊन थांबला. विजयने पाहील की त्या पिक अप मधुन राहुलचे वडील उतरत होते.

“काय ओ?? गाडी विकली की काय?? आज ह्या गाडीत??” विजय

“आता संसार तर काय आपल्या छोट्या गाडीत मावला नसता न, मग पिक अप मध्येच आणला.” राहुलचे वडील बोलुन डायरेक्ट घरात गेले.

“संसार म्हणजे??” विजय विचारे पर्यंत ते आत गेले सुध्दा होते. विजयने गाडीत जाऊन पाहील, तर संसारासाठी लागणारे सर्व साहित्य त्यात होत. कपाट, सोफा, जेवणाच्या ताटांचा सेट, हंडा, कळशी असुन बरचं काही होत.

“तरीच म्हटलं, हे कस काय शांत बसतील??” विजय मनातच विचार करत घरात गेला.

“ते याची काय गरज होती??” विजय जरा चाचरत बोलला, कारण मागच्या वेळेस फक्त त्यांनी नाटक केल होती, पण ह्या वेळेस जरा जरी मन दुखावली तर ते खरचंं हिशोबाला बसतील, याची खात्रीच होती विजयला.

“गरज म्हणजे?? आता मी माझ्या मुलीसाठी काय घ्यायच, ते तु मला सांगणार??” राहुलचे वडील

“तस नाही, पण मग आहेर स्विकारला जाणार नाही, अस होत पत्रिकेत” विजय पण मागे हटणारा नव्हता.

“मी आहेर नाही, संसार देतोय. तो आहेरात बसत नाही. बाकी मी न तुझी ताई बघुन घेऊ. तु जा बर बाकी तयारी बघ” राहुलचे वडील सरळ सरळ टाळल होत.

ह्या वेळेस देखील आरती, सोनाली आणि सायलीला डान्स परफॉर्मन्स करायचा होता. पण राधीकाने त्याला मनाई केलेली होती, प्राजक्ताच्या लग्नात केली न हौस म्हणून. आधीच खुप दगदग झाली होती त्यांची, राधीकाला त्यांना अजुन त्रास द्यायचा नव्हता.

मिहीर आणि टिनाही आले होते. त्यांनीही राधीकाला हळद लावली होती.

“तो तुम कब शादी करनेवाली हो मिहीर से?” विजयने टिनाला विचारल. 

“जा रे, उस उल्लुसे कौन शादी करेगा??” टिना ने तिचा नेहमीचा टोन ठेवला होता मिहीरला त्रास द्यायचा.

“ठिक है, फिर बोलता हु उसे, की छोड दे तेरा खयाल. वैसे वो भी कितना इंतजार करेगा न?” विजय एक उसासा टाकत टिनाला बोलुन वळला.

“व्हॉटएव्हर” टिनाला सगळ मजाक वाटला होता.

विजयने नैनाला आधीच बोलावून ठेवल होत. त्याची एक कलीग होती ती. विजयने मिहीरला इशारा केला.

विजयचा इशारा बघुन मिहीर नैना जवळ गेला. तिच्यासोबत फ्लर्ट करू लागला. टिनाने दोघांना पाहील. ती पहीले तर नॉर्मल रहायचा प्रयत्न करत होती. टिना नॉर्मल रहाते म्हटल्यावर मिहीर जरा जास्तच जवळ गेला नैनाच्या. मग दोघांना एकमेकांच्या एवढ्या जवळ बघुन, टिनाच्या मनातल प्रेम शेवटी तिच्या अॅक्टींगवर भारी पडलच. ती डायरेक्ट त्या दोघां जवळ गेली आणि मिहीरच्या कानाखाली मारली. तिचे डोळे ओलावले होते. सगळे बघतच राहीले होते. लगेच विजयच मागुन बोलला.

“नैना होगया काम तेरा. निकल वहां से. वर्ना तुझे भी पड जायेगी.” विजय

विजयच बोलण ऐकुन नैना दोघांना बाय करत विजयच्या बाजुला जाऊन उभी राहीली. ते सगळ बघुन टिनाने तिच्या कमरेवर हात ठेवत विजय कडे पाहील. तिने तिचे ओलावलेले डोळे पुसले. तिला समजुन गेल होत की विजयच्या शॉकच्या जाळ्यात आज ति पण आली होती. मग तिने मिहीरकडे पाहल. तिच्या मनाला तिने शांत केल. पुढच्या क्षणाला टिनाने मिहीरला घट्ट मिठी मारली. सगळ्या ग्रुपने टाळ्या न शिट्ट्या वाजवल्या.

“तुम्ही नं कधीच सुधरू नका” सायली त्या दोघांनी बघत विजयला बोलली.

“अग त्याने कधीच प्रपोज केला होता टिना ला. पण मॅडम एवढ्या भाव खात होत्या न. मग हे अस कराव लागत.” विजय त्या दोघांजवळ आला. दोघांनाही त्याने हळद लावली.

“अब आप दोनो की शादी की हल्दी में हमे आना है.” विजय

मिहीर ने विजयला थँक्स म्हटल. कारण मिहीर कधीचा प्रयत्न करत होता. पण टिना मुद्दाम त्याला त्रास देत होती. मग त्याने विजयला सांगीतल. मग विजयने नैना सोबत मिळुन हा प्लॅन केला होता.

“तुझ जैसा कमीना दोस्त” टिनाने पॉज घेउन विजयचा कॉलर पकडली. “सबको मिले.” सगळेच हसायला लागले.

जवळपास सगळ्यांनाच हळद लागली होती. पण विजयने त्यांना काही लावून दिली नव्हती. मग आरती आणि सोनालीने सायलीकडे सोपवल होत. विजय जसा किचनमध्ये आला, तस सायलीने त्याला पकडल. विजय बावरला. मग सायलीने त्याच्या डोळ्यात बघत, त्याच्या गालाला तिचा गाल घासला. विजयलाही हळद लागली होती. विजयच्या गालावर गोड स्माईल आली.

तिकडे सोनालीच्या गालाला मागुन हळद लावली होती. तशी सोनालीच्या गालावरच्या खळी जरा जास्तच खुली. रुद्र आला होता. त्याचा तो भारदस्त हात तिने लगेच ओळखला होता. जेवण करुन सगळेच नाचायला भिडले होते. त्या रात्री त्यांच्या चाळीत कोणीच जेवण बनवलेल नव्हतं. सगळेच विजयच्या घरी जमा झाले होते. सगळ्या चाळी साठी तो एक उत्सवच होता. कारण त्या चाळीतल्या लाडक्या ताईच लग्न होत. सगळ्यांना जेवण करायला लावूनच मग विजय जेवायला बसला होता आणी त्याच्यासोबत त्याची सायु. त्यांना राधीकाने जेवण वाढल. दोघांनाही आनंदात बघुन तिचे डोळे भरून आले होते. तिच्या नंतर विजयच काय?? ह्या प्रश्नातुन तिला मुक्तता मिळाली होती. मग राधीकाने दोघांनाही एक एक घास चारला.

“मग आम्ही काय पाप केलीयेत??” सोनाली बाहेरुन आत येत बोलली.

"तरीच म्हटलं, माझ पाळणाघर मागे कस राहील. या बसा." राधिका हसत बोलली. 

तसा सगळा ग्रुपच तिच्यासमोर वासुन राहीला. मग राधीकाने सगळ्यांनाच एक एक घास चारला.

तेवढ्यातच मोहीते साहेब ही येऊन पोहोचले. विजय उठणार तोच तेच बोलले.
“बस रे गप्प, आम्ही काय पाहुणे आहोत का??” मोहीते साहेब “लागला लगेच उठायला.”

मग आराध्याने त्यांना पाणी दिल. यथावकाश सगळ्यांचीच जेवण आटपली. मग बाकी ग्रुपने विजय आणि सायलीलाही डान्स करायला ओढुन घेतले. नंतर राधीका, काका काकुंनाही ओढुन घेतल डान्स मध्ये.

विजयच्या काकांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघुन सायलीचे वडील जरा दुखी: झाले. कारण ति दोघ तर कोर्ट मॅरेज करणार होते न. सायलीच्या आई वडीलांची खुप इच्छा होती, सायलीच लग्न धुमधडाक्यात करण्याची, तशी खुप स्वप्न पण रंगवलेली होती. पण मग सायलीच्या कोर्ट मॅरेजच्या निर्णयाने त्यांना जरा दुख: झाल होत.

“जाऊ दे रे” मोहीते साहेब “आता आपल्या पोरांचा आनंदच त्यात आहे, तर आपण तरी काय करणार??” मोहीते साहेब परत एकदा सायलीच्या वडीलांचे मन वाचुन गेलेले होते. दोघांना एकत्र बघुन विजय त्यांच्याजवळ गेला.

“ते पत्रिकेचे बिल भेटले असतील न??” विजय हळुच बोलला.

“गप रे तु” मोहीते साहेब “इथ आमच काय चालुये आणि तुझ काय भलतच.”

विजयने परत त्याच तोंड बारीक केल. त्या तिघांना बघुन मग राहुलचे वडील, आरतीचे वडील, सोनालीचे वडील, संदेशचे वडील आणि महेशचे वडील त्यांच्या कडे जाऊन पोहोचले.

“हा मग़, काय बोलत होतास तु??” सायलीचे वडील “ते बिल काहीतरी बोलत होतास न??” त्यांना माहीत होत तो सर्वांसमोर तरी विजय काहीच बोलणार नव्हता.

“कुठे काय??” विजयने तो विषयच टाळला. “ते तुमच काही चालु होत न, बाबांच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसल म्हणून आलो.”

मग मोहीते साहेबांनी सायलीच्या वडीलांच्या मनातलं दुख सांगीतल. तसा विजय पण शांत झाला. तेवढ्यात कोणीतरी प्रणालीला आवाज दिला. सगळ्यांनी प्रणालीकडे पाहील. विजयच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली. त्यांनी एकमेकांकडे पाहील. तसा विजय बोलला.

“अजुन वेगळ काही सांगायला नको, त्याने तुमची इच्छा पूर्ण करायला पाठवलय न कोणालातरी” विजय.

सगळ्यांच्याच चेहऱ्यावर आनंदाची लहर पसरली. आता प्रश्न असा होता की प्रणालीला मनवायच कस. कारण अस अचानक काही सांगीतल तर तिला चुकीच वाटल असत. वरून तिच्यावर उपकार केल्याची भावना तिला वाटली असती तर तिने नकार द्यायचे चान्सेस होते. तसे सायलीचे आजोबा पुढे आले. 


“ते माझ्यावर सोडा” सायलीचे आजोबा.

सगळे नाचण्यात बिझी होते. सायली आणि विजय मुद्दाम आजोबांपासुन लांब होते. आजोबा मुद्दाम प्रणालीच्या बाजुने जात दम खात बोलले.

“हरी पांडुरंगा, दमलो रे” आजोबा मुद्दाम मोठ्याने बोलले. प्रणालीने ते ऐकल आणि त्यांच्याजवळ गेली.

“काय झाल आजोबा??” प्रणालीने काळजीने विचारल.

“काय सांगू पोरी तुला” आता आजोबांची नौटंकी सुरू झाली “आमच्या सायुला विजय भेटल्या पासुन तिच लक्षच नाही माझ्याकडे.”

“अस होय” प्रणाली थोडी चिडून बोलली “थांबा बघतेच तिला.”

“राहु दे ग. आता कामाचा लोड आहे. तु बस बरं इथे माझ्यासोबत गप्पा मार”

आजोबांनी तिचा हात पकडुन तिला तिच्या बाजुलाच बसवल. असही सगळी काम आटपली होती, मग प्रणाली ही बसली त्यांच्या बाजुला. मग त्यांनी बाकीच्यांचा डान्स बघता बघता खुप सा-या गप्पा मारल्या. प्रणालीला जणु सख्खे आजोबाच भेटले होते.

जवळपास बारा वाजत आले होते. त्यामुळे मोठ्या मंडळींनी निघायला सुरवात केली. सायलीच्या वडीलांनी आजोबांना हाका मारली. एवढा वेळ गप्पा मारल्यामुळे प्रणालीला खुप जवळचे वाटायला लागले होते. ते निघत असल्याने तिला जरा वाईट वाटलं.

“माझ्या हातात असतं न, तर तुम्हाला मी जाऊच दिल नसतं” प्रणाली बोलता बोलता बोलुन गेली.

“हममममम, जाऊदे न आता उद्या भेटूच” आजोबा “नाहीतर तुच येना आमच्यासोबत रहायला. आमची सायु तर आत्ता पासुनच इथली झालीये”

तशी प्रणाली जरा चपापली. काय उत्तर द्याव तिला कळत नव्हतं.

“मी खर बोलतोय, हे लग्न होईपर्यंत विचार कर आणि सांग मला.” आजोबा डोक्यावर हात ठेवत बोलले. बाकी तर निघुन गेले होते. रुद्र पण सगळ्यांचा निरोप घेऊन गेला होता. त्याला सुट्टी भेटलीच नव्हती. तिथे आता फक्त त्यांचा ग्रुप आणि शेजारचे होते. परत एकदा डान्सचा राऊंड झाला. जवळपास १.३० वाजता ते सगळेच झोपी गेले.

आज लग्नाचा दिवस होता. रात्री उशीरा झोपून सुध्दा सगळेच लवकरच उठले होते. राधीकाची तयारी करायला आरती, सोनाली, आराध्या होती. ह्या वेळेसही आराध्याने त्यांची मेकअप आर्टीस्ट सांगीतली होती. बाकी घरातल आवरायला सायली, प्रणाली आणि जिया होती. सोबतीला विजय आणि बाकी मुल होतीच. सगळ्यांच्याच चेहऱ्यावर आनंदाचे भाव होते.

एवढ सगळ पाहून प्रणाली हरखून गेली होती. मध्येच तिच्या मनातही आलं होत, की जर तिची फॅमिली असती तर तिच्या लग्नही असच धुमधडाक्यात झाल असत. तिचे डोळे काही क्षणासाठी पाणावले.

“जेव्हा तो आपल्या कडुन काही हिरावतो न, नंतर त्यापेक्षा कैकपटीने आपल्याला देतो, ज्याची जाणीवही आपल्याला नसते. नको काळजी करुस” सायली ने प्रणालीचा हात धरुन बोलली. प्रणालीला कळलचं नाही की ती अशी का बोलली ते. तोवर वरात ही येऊन पोहोचली होती दारात.

प्राजक्ता आल्या आल्या पहीले राधीका जवळ गेली. तिच ते रुप पाहुन तिनेही राधीकाच्या कानामागे काजळचा टिका लावला. चाळीच्या बाजुलाच असलेल्या मैदानात मंडप घातलेला होता. बरीच गर्दी झाली होती लग्नासाठी. रुद्र आणि मोहीते साहेबांनी एक धावती भेट घेतली होती राधीका आणि राजेशची. यथावकाश लग्नाच्या विधी देखील आटपले. मामा म्हणून आरतीचे वडील उभे राहीले होते. विजयची आज्जी गेल्यानंतर त्याच्या सख्ख्या मामांनीही त्यांच्याकडे पाठ फिरवली होती. मग आरतीच्या वडीलांनीच त्यांची ती कमी भरुन काढलेली होती. राधीकाचा हात जरा थरथरत होते. मग राजेशनेच ते निट हातात घेऊन तिला आश्वस्त केल.

दुसऱ्या बाजूला सायलीच्या आजी आजोबांनी प्रणाली सोबत चांगलीच गट्टी केली होती. पाहुण्यांची जेवण आटपली. मग कन्यादानाच्या विधीला काका काकु बसले. सगळ विधीवत पार पडल होत. मग शेवटी नव जोडप्यासोबत राहीलेली मंडळी जेवायला बसली. शेवटी तो क्षण आलाच, विदाईचा. राधीकाने त्या पुर्ण घरावर तिचा हात फिरवत नजर टाकली. जिथे ति लहानाची मोठी झाली. मग तिने आई वडीलांच्या फोटोला नमस्कार केला. नमस्कार करतानाही तिला खुप भरुन आले होत.

जवळपास सगळ्यांचेच डोळे भरून आले होते. विजय तर घराच्या मागच्या बाजूला जाऊन बसलेला होता.

“आज आम्ही आमची दुसरी मुलगी नेतोय, नका काळजी करु. ती पण मुलगी म्हणुनच राहील” राजेश ची आई विजयच्या काका काकूंना बोलली.

राधीकाने काका काकूंची, आत्याची, बाकी ग्रुपची गळाभेट घेतली. नंतर ती सायली जवळ आली.

“आजपासुन विजयला तुझ्याकडे सोपवतेय. वेडा आहे तो. निट संभाळ त्याला” राधीकाने डायरेक्ट तिच्यासमोर हात जोडले.

“अगं ताई” सायलीला आॅकवर्ड फिल झाल. तिने तिचा हात पकडला. “अशी काय हात जोडतेस. तुझे हात फक्त कान ओढायला आणि आशिर्वादासाठी ठेव. त्यांची काळजी नको करुस.” सायली ने तिला मिठी मारली.

“विजय कुठे राहीला??” विजयचे काका

“माहितीये मला कुठे असेल तो, आलीच मी” राधीका बोलुन मागच्या बाजूला गेली.

“मला निरोप पण नाही देणार का??” राधीकाचा आवाज आला तसा विजय मागे फिरला. तिचे भरलेले डोळे पाहुन तो तिच्या गळ्यातच पडला.

“हे बघ मी जरी नसली, तर आता तुझ्यावर कोणीतरी विसंबून आहे. त्यामुळे निट वागायच हं.” राधीकाने विजयला प्रेमाने दटावले. दोघ बाहेर आले.

“अरे येईल ती दोन दिवसात परत, बाकीचे अश्रु त्या दिवसासाठी ठेव” सोनालीने विजयचाच डायलॉग त्याला ऐकवला.

“हो, माहीती आहे मला, मी थोडीच रडतोय??” विजय त्याची बत्तीशी दाखवत होता. पण भरलेले डोळे कधी खोट बोलतात का??

राजेश येऊन विजयला भेटला. “चल तिकडे, वरात नाचवायची आहे आपल्याला.” तसा विजय हसला.

मग राधीकाची पाठवणी केली होती. प्राजक्ता तर तिथेच होती. त्यामुळे राधीका सोबत दुसऱ्या कोणाला पाठवायची गरजच पडली नाही. थोड्यावेळाने घरातल थोडफार आवरुन, विजयने त्याची गाडी काढली. बाकी ग्रुपला सोबत घेत राधीकाच्या सासरी पोहोचला. दिड तासावर तर होत, तिच सासर. मग तिथेही उशीरापर्यंत सगळेच नाचले होते. रात्री २ वाजता सगळे परत घरी आले होते. सगळा ग्रुप त्या रात्री पण विजयच्या घरीच मुक्काम थांबला होता.