मागील भागात.
राधीकाने काका काकूंची, आत्याची, बाकी ग्रुपची गळाभेट घेतली. नंतर ती सायली जवळ आली.
“आजपासुन विजयला तुझ्याकडे सोपवतेय. वेडा आहे तो. निट संभाळ त्याला” राधीकाने डायरेक्ट तिच्यासमोर हात जोडले.
“अगं ताई” सायलीला आॅकवर्ड फिल झाल. तिने तिचा हात पकडला. “अशी काय हात जोडतेस. तुझे हात फक्त कान ओढायला आणि आशिर्वादासाठी ठेव. त्यांची काळजी नको करुस.” सायली ने तिला मिठी मारली.
“विजय कुठे राहीला??” विजयचे काका
“माहितीये मला कुठे असेल तो, आलीच मी” राधीका बोलुन मागच्या बाजूला गेली.
“मला निरोप पण नाही देणार का??” राधीकाचा आवाज आला तसा विजय मागे फिरला. तिचे भरलेले डोळे पाहुन तो तिच्या गळ्यातच पडला.
“हे बघ मी जरी नसली, तर आता तुझ्यावर कोणीतरी विसंबून आहे. त्यामुळे निट वागायच हं.” राधीकाने विजयला प्रेमाने दटावले. दोघ बाहेर आले.
“अरे येईल ती दोन दिवसात परत, बाकीचे अश्रु त्या दिवसासाठी ठेव” सोनालीने विजयचाच डायलॉग त्याला ऐकवला.
“हो, माहीती आहे मला, मी थोडीच रडतोय??” विजय त्याची बत्तीशी दाखवत होता. पण भरलेले डोळे कधी खोट बोलतात का??
राजेश येऊन विजयला भेटला. “चल तिकडे, वरात नाचवायची आहे आपल्याला.” तसा विजय हसला.मग राधीकाची पाठवणी केली होती. प्राजक्ता तर तिथेच होती. त्यामुळे राधीका सोबत दुसऱ्या कोणाला पाठवायची गरजच पडली नाही.
थोड्यावेळाने घरातल थोडफार आवरुन, विजयने त्याची गाडी काढली. बाकी ग्रुपला सोबत घेत राधीका च्या सासरी पोहोचला. दिड तासावर तर होत, तिच सासर. मग तिथेही उशीरापर्यंत सगळेच नाचले होते. रात्री २ वाजता सगळे परत घरी आले होते. सगळा ग्रुप त्या रात्री पण विजयच्या घरीच मुक्काम थांबला होता.
आता पुढे.
दुसऱ्या दिवशी बाकी ग्रुप तर घरी गेला. तिथे फक्त विजय, त्याचे काका काकु, आत्या आणि जिया होती. सायलीच तर मनच नव्हत निघायच, पण मग जायला तर लागतच होत न. तिकडे तिच्या घरी पण सगळेच वाट बघत होते. मग विजयने तिला समजावून तिच्या घरी पाठवल.
प्रणालीच्या मनातही हुरहुर लागुन राहीली होती. चार पाच दिवसच का असेना, इतक भरभरुन ती आयुष्य जगली होती. ती अनाथ असल्याची पुसटशी जाणीवही तिला झाली नव्हती. आता हॉस्टेलवर तिला एकटीला रहायला जीवावर आल होत. तस तिला सायलीच्या आजोबांचा विचार आठवला, पण मग अस अचानक कोणाकडे कस जायच रहायला म्हणून तिने तो टाळला होता.
“आपल्या आयुष्यात जे काही होत, ते त्याच्या मर्जीने होत आणि काहीतरी कारण असल्याशिवाय होत नाही.” विजयने प्रणालीचा खांदा पकडुन बोलला. “तुला ऑप्शन भेटलाय. त्याचा विचार करायला हरकत नाही तुला.”
प्रणालीने विजयकडे पाहील. “कस कळत रे तुला, आमच्या मनातल?? इतक खोलवर कस काय कोणी कोणाला वाचु शकतो??”
“रिश्ते बनाता हु
खयाली पुलाव नहीं,
थाम लु जिसका भी हाथ
मुझसे छुटकारा उसका मुमकीन नही…” विजय हसत बोलला.
“लग्न होईपर्यंत तरी तु तिकडे रहावस, अस मला वाटत.” विजयने प्रणालीच्या गालावर हात ठेवले. “तुला आई वडीलांच प्रेम मिळेल आणि त्यांना त्यांच स्वप्न पूर्ण करता येईल.”
“पण त्यांना आवडेल का मी अस त्यांच्या घरी जाऊन राहीलेल??” प्रणाली.
“ते तर कधीचे तयार आहेत, फक्त तुझ्या होकाराची वाट बघत आहेत.” विजय
“म्हणजे आतापण सगळ तुच जुळवून आणले न?” प्रणाली
“मी नाही, सगळी त्याची कृपा” विजचने हात वर करत बोलला.
“हो, हो” प्रणाली “तु तर काहीच करत नाहीस न.”
विजय फक्त हसला. मग प्रणालीही हॉस्टेल वर निघुन गेली.
“झाली ग रेडी ती” विजयने सायलीला मेसेज केला. तिने ओके चा रिप्लाय केला. पण नंतर लगेचच एक सॅड वाली स्मायली पाठवली. विजयने लगेच फोन केला होता सायलीला.
“काय झाल सरकार??” विजय
“आमच्या मातोश्री नाराज झाल्यात आमच्यावर” सायली
“मग आता??” विजय
“आता काय, काढते लहानपणाचा उपाय.” सायली
“किप इट अप” विजय
सायली सकाळी घरी आली होती. पण तिची आई तिच्याशी बोललीच नाही. जेव्हापासून ती विजयच्या घरी गेली होती रहायला, तेव्हापासून फक्त त्यांनीच फोन केले होते तिला. सायली ने स्वतःहुन असा फोन केलाच नव्हता. जस काय ती विसरलीच होती, अस त्यांना वाटू लागल होत. पण मग सायलीला ही तिच्या आईला कस मनवायच माहीती होत. मग किचनमधुन तो वास पुर्ण घरात पसरला. तसा सायलीच्या आईचा राग विरघळला होता. फक्त त्या दाखवत नव्हत्या.
“काहीही केल तरी आता काहीच फायदा नाही” सायलीची आई मुद्दाम मोठ्याने बोलली. “माझी दुसरी लेक आली न, तिच्याकडून मी माझे सगळे स्वप्न पूर्ण करुन घेईल. तु जा आत्ता पासुनच तुझ्या सासरी.” सायलीची आई मस्करी करत बोलली.
दुसऱ्या क्षणाला सायलीला जाणीव झाली की, ती पण थोड्या दिवसांनी ते घर सोडुन जाणार होती ते. तिला राधीका आठवली, जी घरातुन निघताना घरातल्या प्रत्येक वस्तुंवरुन हात फिरवत होती. सायलीचे डोळे लागलीच भरुन आले. तीने तिथेच बाजुला बसुन घेतल होत. सायलीच्या आजोबांच सायली कडे लक्ष गेल. तस त्यांनी सायलीच्या आईला इशारा केला. त्यांनी सायलीच्या डोळ्यात पाणी पाहील. तशा त्या पटकन सायली जवळ गेल्या.
“अग, गम्मत करत होती मी” सायलीच्या आईने सायलीला जवळ घेतल.
“सॉरी ग, मीच विसरुन गेली होती. आता नाही वागणार तस” सायलीने तिच्या आईला घट्ट मिठी मारली.
सायलीने तिच्या हाताने बनवलेली साखरचपाती तिच्या आईला चारली. ती लहान असताना तिच्या हाताने बनवुन तिच्या आई बाबांना चारायची.
तिकडे राधीका ही तिच्या माहेरी आली होती. ती पण दोन दिवस थांबून परत तिच्या सासरी निघुन गेली. नंतर काका काकु, आत्याही गावी निघुन गेले. जिया पण हॉस्टेल वर परत गेली. आता विजय एकटाच रहात होता घरी. सुरवातीला विजयला त्याच्या ताई ची खुप आठवण यायची.
परत सगळ रुटीनवर आल. विजय पुर्ण दिवस सर्व्हिस सेंटर वर रहात होता. सायली तिच ऑफीस सुटल्यावर विजयच्या घरी जाऊन त्याच्या वाटच जेवण बनवुन तिच्या घरी जात होती आणि सकाळी तिच्या ऑफिसवर जाताना, त्याला टिफिन देऊन मग पुढे जायची.
दुसरीकडे प्राजाक्तानेही गुड न्यूज दिलेली होती. तिसरा महिन्यानंतर त्यांनी ऑफिशियल डिक्लेअर केल होत. राधीकानेही तिला मिळणाऱ्या पॅकेजच्या फायदा घेत, तिच्या सासरच्या सर्व वरिष्ठ मंडळींना घेऊन देवदर्शनाचा धडाकाच लावला होता.
एवढे दिवस त्यांच्या घरातले संकेत आणि राजेशला सांगुन कंटाळलेले होते. पण राधीकाने आल्या आल्या त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण केल्या मुळे घरात आता त्यांच्यापेक्षा राधीका आणि प्राजक्ताचे लाड जास्त व्हायला लागले होते. प्राजक्ता ने गुड न्यूज जी दिली होती.
राधीका त्यांच्या कंपनीमधील सर्वात जुनी आणि फेवरेट कलीग होती. आता लग्न झाल्यामुळे तिला सारख टुरवर पाठवण कंपनीला बरोबर वाटत नव्हत. वरुन तिला बरीच वर्ष झाली असल्याने आणि तिची कामा प्रती असलेली निष्ठा बघुन कंपनीने राधीकाच प्रमोशन करायचे ठरवले होत. त्यामुळे ती आता टुर मॅनेजर होणार होती. तीचा जॉब आता स्थिरावणार होता. ते होण्याआधीच राधीकाने सगळ्यांच देवदर्शन, पीकनीक आटपून घेतलेल्या होत्या.
काही दिवसांनी सायलीच्या आई वडीलांनी प्रणालीला त्यांच्या घरी आणल होत. पहीले तिला थोड ऑकवर्ड वाटत होत, मग विजयने तिला आश्वस्त केल. मग ती शांत मनाने सायलीच्या घरी आली होती.
काहीच दिवसातच राहुल आणि आराध्यच लग्न ठरविण्यात आले होते. दोन्ही घरात हळद चांगलीच गाजवली होती. खासदारांच्या मुलीच लग्न असल्याने शहरातला मोठ्ठा हॉल बुक करण्यात आला होता. त्या दोघांतही लग्न धुमधडाक्यात लावुन देण्यात आल होत. मोठ मोठे बिझनेस मॅन, राजकारणातील नामांकीत व्यक्तींनी लग्नासाठी हजेरी लावलेली होती. कन्यादानाच्या वेळेस राहुलचा कान विजयने चांगलाच पिळला होता. मोहिते साहेबांनी विजयला त्यांचा मुलगा असल्याचा पुर्ण मान दिला होता आराध्याच्या लग्नात. राहुलच्या घरी गृहप्रवेश करताना आरती आणि सोनालीने दोघांची वाट अडवली.
“उखाणा घेतल्याशिवाय घरात एन्ट्री नाही” सोनाली
“हो आणि सोबत टोल पण” आरती
राहुलने त्याच्या वडिलांकडे पाहील.
“आता ते तुझ तु बघ” राहुलचे वडील “घरात यायच आहे की बाहेरच थांबायच आहे” ते पण आरती आणि सोनाली च्या नौटंकी मध्ये शामील झाले.
“तुला काय वाटलं? तुला बहीण नाही, म्हणून तु यातुन सुटशील??” सायली “मग आम्ही कशाला आहोत??.” सायली त्या दोघींच्या बाजुला जाऊन उभी राहीली.
मग दोघांनीही एक एक उखाणा घेतला. ते आत घुसणार तोच परत सोनालीने हात आडवा केला.
“टोल??” सोनाली
ह्यांच चालु होत तोवर बाकीचे मस्तपैकी घरात जाउन बसले होते.
“किती आहे तुमचा टोल??” राहुल
“अकरा हजार एकशे अकरा” आरती आणि सोनाली एकदम बोलल्या.
“काय?” राहुलला शॉक बसला “काय डोक्यावर पडल्यात काय??” राहुल “जमणार नाही, पाहीजे तर अकराशे अकरा रुपये देतो.”
“बस मग बाहेर तसाच” सायली “”फक्त आरुला त्रास झाला न मग मी तुला बघते.”
“ह्याला काय अर्थ आहे.” राहुल “विजय अरे तु तरी बोल.” शेवटचा प्रयत्न म्हणून त्याने विजय कडे पाहील.
“त्याला काय बोलतो, त्याचीच तर आयडीया आहे ही.” सोनाली
राहुल तोंड परत पडत. सगळे त्याला हसत असतात.
“अरे काय चाललय तुमच, आवरा लवकर” राहुल ची आई बाहेर येत बोलली. तसा राहुल ला धीर आला.
“ह्याने टोल दिला नाही अजुन.” आरती.
“बघ न आई, डायरेक्ट अकरा हजार मागत आहेत” राहुल बारीक आवाजात बोलला.
“किती? अकरा हजार??” राहुलच्या आईने पॉज घेतला मग बोलल्या, “बस्स? अकरा हजार??”
राहुल तर त्याच्या आईकडे बघतच राहीला.
“अरे तुझ्या ब्रांच ने पहील्या महीन्यातच दहा लाखाचा प्रॉफीट केला न. मला वाटल किमान लाखभर तरी मागतील.” राहुलची आई पण त्या दोघींच्या बाजुने झाली. “चल रे, पटकन देऊन टाक पन्नास एक हजार. उशीर होतोय.”
“काय चॉकलेट आहे पटकन द्यायला.” राहुल वैतागला “त्यापेक्षा अकरा हजार काय वाईट आहेत.”
राहुलने विजय कडे पाहील. त्याला माहीती होत सगळा त्याचाच उपद्व्याप होता ते. तो मस्त चहा पीत बसला होता.
“माझी पण पाळी येईल तेव्हा तुला बघतो मी” राहुल विजय कडे बघत बोलला. त्याने दोघींना अकरा हजार दिले तेव्हा कुठे त्यांना घरात एन्ट्री भेटली होती.
लागलीच सत्यनारायणाची पुजा देखील करुन घेतली होती राहुलच्या आई वडीलांनी. राहुल आणि आराध्याची पहीली रात्र होती.
दोघ एकमेकांच्या जवळ जसे आले तसा पानांच्या सळसळण्याचा आवाज आला. दोघ दचकले. भास झाला म्हणून त्यांनी दुर्लक्ष केल. ते परत एकमेकांच्या जवळ आले. थोड्या वेळाने कुकडुच कु SSSSSS असा जोरात आवाज आला. दोघ घाबरूनच उठले. मग वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज त्यांच्या रुममध्ये येऊ लागले होते. दोघ खुप गोंधळले. नंतर आराध्याला आठवल सगळ्यात शेवटी सायली त्या रुममधुन बाहेर पडली होती. तिने डायरेक्ट सायलीला फोन लावला.
“मग कस चालु आहे हनीमुन?? जंगलातला फिलिंग आला न??” सायली हसुन बोलत होती.
“काय हे सायु??” आराध्या वैतागून बोलली.
“बापरे इतकी घाई हनीमुनची??” सायलीने तिची खेचायला सुरवात केली.
“सायले जाम मार खाशील, बंद कर ते” आराध्या लाजून चिडली होती.
“काय राव, तुझ्या बेस्ट फ्रेंडला अशी त्रास देणार तु??” राहुल बारीक आवाजात बोलला.
“बोलली होती न, सगळा हिशोब क्लिअर करणार मी” सायली तिची कॉलर ताठ करत बोलली.
“सॉरी न बाबा, हव तर पाया पडते. पण ते बंद कर न??” आराध्या काकुळतीला येऊन बोलली.
“तुझ झाल आता तुझ्या साहेबांच काय??” सायली
“वहीनीसाहेब, आम्हा गरीबांवर कृपा करावी. आमची चुक झाली ती पदरात घ्यावी. पण ह्या ध्वनी पासुन आमची मुक्तता करा” राहुल फुल वैतागून बोलला होता.
आवाजच तसे चालु केले होते सायलीने. तशी सायली जोरजोरात हसायला लागली.
“मग कर की बंद, तुझाच मोबाईल तिथल्या स्पिकरला कनेक्ट आहे.” सायली परत जोरजोरात हसायला लागली.
तस आराध्याने तिचा मोबाईल पाहीला, तर तिच्याच मोबाईलमध्ये ते आवाज चालु होते. तेव्हा कुठे ते निट झोपले.
काही दिवसांनी विजयचे मामा मामी विजयच्या घरी उगवले. त्यांना बघुन विजयलाही जरा आश्चर्य वाटल होत.
विजयचा पगार चांगला वाढल्याच त्यांना समजले होत आणि आता तर राधीका पण घरात नव्हती. विजयकडे ते पैसे मागायला आले होते. आजवर कधी त्यांनी विजयची वा राधीकाची कधी विचारपुस केली नव्हती. आता त्याच्याकडे पैसे आले तर लगेच आले होते. त्यांना माहीत होत विजय कधीच नाही म्हणत नाही म्हणून. विजयने त्यांच चहा पाणी केल.
गप्पा मारता मारता मामांनी हळुहळु खर्चा कडे मोर्चा वळवला. पोरगी लग्नाला आलीये, घर पण सुधरवायचं आहे. वैगरे वैगरे. विजयला आता अंदाज आला होता की ते कशासाठी आले होते ते. खरतर विजयच्या पण खुप जीवावर आल होत. कारण राधीका च्या लग्नात ही बराच खर्च झाला होता. पण त्याच्या स्वभाव त्याला तस करू द्यायला मागत नव्हता. बाकीच्यांनी जरी मदत केलेली असली तरी त्यांचे पैसे विजयला त्यांना परत करायचे होते.
“जाम खर्च वाढला रे, आता आपली परीस्थिती तर तुला माहितीचा आहे” मामा “बरं पण तुझ निट चालु आहे बघुन खुप बरं वाटलं मला.”
“मग ताईच्या लग्नाला पण नाही आले तुम्ही??” विजय
“अरे, तुझ्या मामीच्या घरी कार्यक्रम होता न, तर तिकडे गेलेलो.” मामा
त्याचे मामा पैशांचा विषय काढणार तोच सायली येऊन पोहोचली तिथे.
शेजारच्या मावशींनी जस मामांना पाहील तस त्यांनी राधीकाला फोन लावला होता. मग राधीकाने सायलीला फोन लावून सगळी कल्पना देत घरी जायला सांगितलं होत. सायलीला पाहुन त्याला खुप हायस वाटल होत.
“मामा, ही सायली” विजयने सायली ची ओळख करुन दिली.