Login

तुझ्याच आयुष्याची वाटेकरी व्हायचे आहे भाग ५१

जियाला रडताना पाहुन सायली आणि आराध्या तिच्याजवळ गेल्या होत्या. दुसरीकडे महेश आणि प्रणालीच्या लग्नाची तयारी जोरात चालू होती.

मागील भागात. 

सायलीला तिच्या साखरपुड्याचा हिशेब क्लिअर करायचा होता तो तिने सगळ्यांची पहील्या रात्रीची वाट लावुन केला होता.

त्यांनी मग विजयला मेसेज केले होते की, “वहीनीसाहेबांनी आमच्या पाहील्या नाईटची वाट लावली म्हणून.”

त्या दिवशी नेमकी सायली आणि विजय एकत्र होते. तो मेसेज सायलीने वाचला. मग तीने ग्रुपमध्ये मेसेज टाकला.

“ह्यांना का मेसेज करतायेत?? असे उपद्व्याप त्यांच्याशिवाय कोणी करेल का??”
मग सगळ्यांना कळल याचा मास्टरमाईंड तर विजयच होता. विजयने फक्त हसण्याची स्मायली टाकली.

“आयेगा बेटा, तेरा भी टाईम आयेगा” राहुल. 

“लग्न होऊ दे तुमच मग बघतो” संदेश

“बर झाल, माझ नाही झाल ते” महेश

“तुझ्यासाठी तर स्पेशल ट्रिटमेंट रहाणार आहे” सायली.

तसे सगळ्यांनी हसण्याची स्मायली टाकली. पण महेश पुढे काही बोलला नव्हता.

“आमच लग्न झाल की आपण सर्व जाऊ रे फिरायला मस्त “ विजय. तस सगळ्यांनीच ओके म्हटल.

आता पुढे. 

काही दिवसांनी आराध्या तिच्या घरी आली होती. मग सायली न आराध्या किती दिवसांनी भेटल्याची अॅक्टिंग करत फिरायला गेल्या होत्या. कारण ऑफिसमध्ये तर रोजच भेटत होत्या पण ब-याच महिन्यांनंतर त्या अशा दोघीच बाहेर पडल्या होत्या.

मस्त शॉपिंग वैगरे करुन, त्या दोघी पार्कमध्ये फिरत होत्या. त्या पार्कच्या एका कोपऱ्यात आराध्याला जिया सारखी मुलगी दिसली. भास असावा म्हणून तिने लक्ष दिले नाही. पण जरा जवळ गेल्यावर तिला कळल कि तिच आहे म्हणून. मग तिने सायलीला पण दाखवल. जिया कोणा मुलासोबत बोलत होती. पहीले तर भांडत होती. मग नंतरहुन तिच्या डोळ्यात पाणी यायला लागल. इकडे दोघी टेन्शन मध्ये आल्या.

काही वेळानंतर जियाने त्या मुलांसमोर हातच जोडले होते. एकदम हतबल दिसुन आली होती. मग दोघी हळुच त्या दोघां जवळ गेल्या. जेणेकरुन त्यांच बोलण ऐकायला याव म्हणून.

“हे बघ जयेश” जिया जवळपास रडत होती. “जे झाल चुकुन झाल. पण तु माझ्यावर अशी जबरदस्ती नाही करु शकत प्रत्येक वेळेस.”

“तुला माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये रहावच लागेल.” जयेश कुत्सितपणे हसत बोलला.

“कोणत रिलेशनशिप?? माझा फक्त फायदा करुन घेतलास तु आणि आता दुसऱ्या मुलीसोबत फिरतोय. मला काय माहीत नाही” जिया पण चिडून बोलली.

“तो माझा प्रश्न आहे. पण तु जर माझ ऐकल नाहीस. तर मी काय करु शकतो……” जयेशच वाक्य पूर्ण होण्याआधीच सायली बोलली.

“काय करशील सांग जरा” सायली चिडून बोलली.

इकडे आराध्याने नंदुकाकांना आधीच फोन करुन बोलावून पण घेतल होत. कारण जयेश सोबत अजुन चार मुल होती. सायलीला तिथे पाहुन जिया पहीले घाबरली, पण मग तिला धीरही खुप आला. ति पटकन सायलीच्या मागे गेली.

“तुझा काय संबंध. चल निघ” जयेश तुसड्यात बोलला. “आणि तु तिच्या पाठी काय करते?? ति पण तुला वाचवु नाही शकणार.”

“हो का??” सायलीने त्याच्या एक सनसणीत कानाखाली ठेवुन दिली. दुसरा मुलगा आला तसा त्याच्या मांड्यांच्या मध्यभागी किक मारली. तिसरा जसा आला तसा त्याच्या गळ्याच्या मध्यभागी जोरात बुक्कीच टाकली. चौथ्या मुलाचा असा हात ट्विस्ट केला की तो फक्त तुटायचा बाकी राहीला होता. सगळे विव्हळत खाली पडले. पाचवा मुलगा येणार तोच नंदुकाकांनी त्याची मागुन मानगुट पकडली होती.

रुद्रने सायलीला सेल्फ डिफेन्स शिकवुन ठेवलेल होत. कुठल्या भागावर वार झाला की समोरचा गार होतो तिला चांगलच माहीत होत. जयेश तर बघतच राहीला.

“पुन्हा जर हिच्या आजुबाजुला जरी दिसला न, तर याद राख.” सायलीने रागात त्याच्यासमोर चुटकी वाजवत बोलली.

“सगळ तुम्हालाच करायच होत, मग मला कशाला बोलावल” नंदुकाका खाली पडलेल्या मुलांकडे बघत बोलले.

“एवढच नाहीये, अजुन काही मुलींना याने नादाला लावल आहे. जरा आपल्या ऑफिसला घेऊन जा. त्या बाकीच्या मुलींना पण संधी द्या याचा सत्कार करण्याची.” आराध्या

मग नंदुकाका त्या सगळ्यांना घेऊन त्यांच्या स्पेशल ऑफिसला गेले. सायलीने रागात जिया कडे पाहीले. ती मान खाली घालुन ऊभी होती.

“तुला तोंड नाही का बोलायला??” सायली “किमान ह्यांच्या कानावर तरी घालायच न.”

“तो अजुन चिडला असता” जिया बारीक आवाजात बोलली.

“म्हणजे??” आराध्या

“त्याने मागेच मला याच्याबद्दल वॉर्निंग दिली होती. तेव्हा मी माझ्याच धुंदीत होती. पण मग जेव्हा तुम्हा दोघांना पाहील न, तेव्हा मला प्रेम म्हणजे नक्की काय असत ते समजल. मग कळल की जयेश तर फक्त त्याच्या मनाप्रमाणे मला वागवतोय. फक्त फायदा करुन घेतोय. मग मी याच्यापासून लांब रहायला लागली. तर तो मला दम देऊन जबरदस्तीने रिलेशनशिप मध्ये रहायला सांगत होता.” जियाने हुंदके देत देत सगळ सांगितले होत. सायलीने तिला मिठीत घेतल.

“तुला माहीतीयेना ते कितीही रागात असले तरी आपल्या माणसांना संकटात एकट सोडतच नाही ते” सायली

“सॉरी न, तु येना लवकर रहायला इकडे” जिया लहान मुलीसारख तोंड करत बोलली. “आता मला एकटीला रहायला भिती वाटते.”

तशा दोघी हसायला लागल्या.

“का?? तु एकटी गेली तर तो खाईल का तुला??” आराध्या “वेडाबाई, उलट त्याला आनंदच होईल. त्याला पण सोबत होईल न. काही दिवसांचा तर प्रश्न आहे. की सायली येईलच न तिथे.”

“तु नको टेन्शन घेऊन मी बोलते ह्यांच्याशी” सायलीने जियाचा हात हातात घेत बोलली.

 मग जिया विजयच्या घरी शिफ्ट झाली. पहीले तर विजयने चांगलेच कान पिळले जियाचे. कारण त्याने आधीच तिला सावध केले होत. तरी तिने तिच चुक केली होती. मग तीने परत त्याची माफी मागीतली. आता सगळ सुरळीत चालु होत.

पण एक गोष्ट विजयला सतत खटकत होती. ती म्हणजे आश्रमाच्या प्रोजेक्टच्या घोटाळ्याला कारणीभुत असणारी माणसे सुटून परत जेलमध्ये गेलेली होती. त्या इन्स्पेक्टरनेच विजयला ति माहीती पुरवली होती. ती कस काय आत गेली तेच विजयला कळत नव्हतं.

घोटाळ्याला कारणीभुत असल्याचा पुरावा नसल्याने ते सुटले होते. ती केस पण बंद झाली होती. आता परत ती केस रिओपन झालेली होती, काही पुरावे भेटले होते म्हणून.

तो दिवस विजयला परत आठवला. जेव्हा अश्विनी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने विजयला आवाज देत होती. त्याला ती घाबरलेली दिसत होती. तिने आजुबाजुला न बघता डायरेक्ट रस्ता क्रॉस करायला सुरवात केली होती. विजय तिला अडवत होता. पण ती खुपच घाईत होती. ती विजय जवळ जाण्याआधीच ती एका गाडी समोर आली होती. दुसऱ्या क्षणाला होत्याच नव्हत झाल होत. विजय तिच डोक त्याच्या मांडीवर घेऊन बसला होता. ती फक्त एकच वाक्य बोलली होती.

“आश्रमाच्या नवीन प्रोजेक्ट मध्ये नको पडूस” आणि तिने तिचा जीव त्याच्या मांडीवरच सोडला होता. तस विजयने खाडकन त्याचे डोळे उघडले, डोळ्यात पाणी साचलं होत. आत्ताही त्याच्या अंगावर काटा आला होता. त्या दिवसाची घटना आठवली म्हणून.

तिच्या अपघाताला तिच माणस विजयने जबाबदार धरली होती. सगळ माहीती असुनही त्याला काहीच करता आल नव्हत, हीच एक सल त्याच्या मनात टोचत होती.
विजय बरेच दिवस त्याच विचारात होता.

काही दिवसांनी प्रणाली आणि महेशच्या लग्नाचा बार उडविण्याचा ठरविण्यात आला होता. त्यात तो विचार परत मागे पडला होता. सायलीच्या आई वडीलांचा आणि प्रणालीचा उत्साह ओलांडून वहात होता. प्रणालीने आजवर जे स्वप्नातच पाहील होत. ते आज ती अनुभवत होती.

पहीले तर खरेदीसाठी जाताना प्रणालीला ऑकवर्ड फिल होत होत. ती तयारच होत नव्हती. मग सायलीने तिला समजावल होत.

“काय ग भाव खातेस?? एवढे दिवस सगळ्यांनी तुला प्रेम दिल न. मग आता त्यांना काही हव आहे तर तु का आडकाठी करतेयस?? म्हणजे तु मनापासुन आम्हाला आपल मानले नाहीस न” सायलीने आराध्यासाठीची ट्रिक इथे वापरली होती.

“अस नको बोलुस न. तुमच्या शिवाय तरी कोण आहे मला.” प्रणालीने पण सायलीच्याच सुरात अॅक्टिंग केली, कारण ती तर सायलीच्या ही पुढची होती न. मग दोघी एकदमच हसायला लागल्या.

“तयार आहे मी, कधी जायच??” प्रणाली

“जाऊ उद्या” सायली.

मग सायलीच्या आई वडीलांनी त्यांनी पाहीलेल्या स्वप्नाप्रमाणे सगळी खरेदी करायला सुरवात केली. खरेदीसाठी गेल्यावर कोणी सांगुच शकत नव्हत की प्रणाली त्यांची मुलगी नाहीये म्हणुन. प्रणाली तर आजी-आजोबांना पण व्हिडिओ कॉल करुन सगळ दाखवत होती. प्रणालीच्या आणि आई वडीलांच्या चेह-यावर आनंद पाहुन सायलीला खुप भारी वाटत होत. तिने त्यांचे व्हिडीओ काढुन विजयला पाठविले.

ते व्हिडिओ बघुन विजयला पण खुप भारी वाटल होत. विजयने ते व्हिडिओ ग्रुपवर टाकले आणि कॅप्शन दिल, “नव्या नवरीची लग्नाची घाई.” थोड्याच वेळात ग्रुपवर परत एक व्हिडिओ आला.

“आणि नवरीला बघण्यात गुंग असलेला तिचा नवरा.” राहुलने टाकल होता व्हिडिओ. त्या व्हिडिओ मध्ये महेश मोबाईलमध्येच डोक घालून त्याचा तो मोबाईल चार्जींगला लावत होता. त्याची नजर प्रणाली वरुन हटतच नव्हती. चार्जर सॉकेट मध्ये लावायच सोडुन त्याच्या बाजुला उभ्या असणाऱ्या संदेशाच्या चेह-यावर फिरवत होता. सगळेच हसायला लागले होते. प्रणालीने पण ते पाहील होत. ती ते सगळच एन्जॉय करत होती.

महेशला त्याचा व्हिडिओ पण दिसला. त्याने राहुल कडे रागात पाहीले. तिथेच त्यांची मस्ती सुरू झाली.

“त्याला का मारतोय, ये चार्जींगला लाव न मोबाईल माझ्या चेह-यावर ये” संदेशने ही चान्स मारला. एवढ्या मोठ्या कंपनीच्या ब्रांचचे ते पार्टनर, अगदी लहान मुलांसारखे मस्ती करत होते. सगळा स्टाफ त्यांनाच बघुन हसत होता.

त्यातल्या एका जुन्या स्टाफ ने त्या तिघांचा व्हिडीओ काढुन राहुलच्या वडीलांना पाठवला. खाली कॅप्शन दिल, “सर तुम्हाला अजुनही वाटतय की हे तिघे संभाळु शकतील पुर्ण ब्रांच??” त्यापुढे चार पाच स्मायली टाकल्या हसण्याच्या.

“तुम्ही असताना तरी मला टेन्शन नाही. करतील ते” राहुलच्या वडीलांनीही हसतच रिप्लाय केला. त्या तिघांचा मस्ती करतानाचा व्हिडिओ त्यांच्या सगळ्या फॅमीलीग्रुपवर चांगलाच फिरला होता.

“आरु नातवाचा प्रोग्राम सध्या बारगळावा लागेल वाटतं. आधी यालाच मोठ्या कराव लागेल” राहुलच्या वडीलांनी आराध्या ची मस्करी केली.

“तुम्ही पण न बाबा” आराध्या लाजुन त्यांच्या कॅबीनमधुन बाहेर पडली.

सगळा ग्रुप एकमेकांपासून जरी लांब असला तरी ते जवळच असल्यासारखे भासत होते.

मेहंदीच्या दिवशी सगळा ग्रुप परत एकत्र आला. ब-याच दिवसांनी ते एकत्र आले होते. एकमेकांना भेटुन त्यांचे डोळे पाणावले होते. जिया पण त्यांच्या ग्रुपमध्ये शामील झाली होती. महेशची आणि सायलीची बिल्डिंग जवळच होती. अगदी हाकेच्या अंतरावर, म्हणून महेशची तिथे आलेला होता. परत सगळ्या जोड्यांनी एकमेकांची नाव हातावर काढलेली होती. एका हातावर सायलीच्या घरी तर दुसऱ्या हातावर महेश च्या घरी अशी मेहंदी काढण पण वाटल गेल होत.

हळद ही जोरात झाली होती. दोन्ही ठिकाणी विजय आणि ग्रुपची चांगलीच धावपळ झाली होती. हळदी साठी प्राजक्ता, राधीका, राजेश आणि संकेत देखील आले होते. प्राजक्ताला आता पाचवा महिना लागला होता. ते तिला तिच्या माहेरी सोडायला आलेले होते. मग लग्न आणि प्राजक्ताला माहेरी सोडण दोन्ही गोष्टी एकदम जमुन आल्या होत्या.

सगळे नाचायला भिडले होते. पण संकेतने प्राजक्ताला बाजुला खुर्ची वर बसवुन ठेवल होत. मग ती संकेत वर चिडली होती. विजयने ते पाहील. मग तो तिच्या जवळ आला. तिला हात देत हळुच उठवल आणि तिचा हात धरत त्याने हळुहळु नाचायला सुरवात केली. तिनेही थोडी अॅक्शन केली नाचायची. तेव्हा कुठे मॅडमच्या चेहऱ्यावर हसू आल होत. मग विजयने तिला परत खुर्ची वर बसवल होत. संकेत आणि राजेश त्यांची गम्मत लांबुन बघत होते.

“राजा, तुमच्या लॅबमध्ये या विजयच्या रक्ताची तपासणी कर रे. कस काय वाचुन जातो सगळ्यांना काय माहीत.” संकेत राजेशला बोलत होता. “आता मी फक्त बसवुन ठेवल आणि त्याने थोडतरी नाचवल म्हणून आता ती माझ्यावर चिडेल.” संकेत.

संकेत बोलण ऐकुन राजेश ला हसायला आल होत. तेवढ्यात विजय संकेत जवळ गेला. त्याच्या हातात चिंचेच्या गोळ्या दिल्या.

“हे काय??” संकेत

“ताईच्या रागावरच औषध” विजय हसत बोलला.

“हे तिला अजुन आवडत??” राजेश

“तिला देऊन तर बघा” विजय

मग संकेत प्राजक्ता जवळ गेला. त्याला जवळ येताना बघुन प्राजक्ता ने परत नाराजीचा मुखवटा चढवला.

“शेवटी माझ्या लाडक्या भावालाच माझी काळजी” प्राजक्ताने संकेतला टोमणा मारला.

“हो का??” संकेत ने त्या चिंचेच्या गोळ्या तिच्या समोर धरल्या “मग हे नको असेल न तुला??”

त्या गोळ्या बघुन प्राजक्ता उडीच मारायची बाकी होती. भावनेच्या भरात तिने तिथेच संकेत ला मिठी मारली.

राजेश तर विजयलाच बघत राहीला होता. महेश कडुन मग ते सायलीच्या घरी गेले होते. पण विजय त्या आधीच गायब झाला होता. सायलीला तो ग्रुप सोबत दिसला नाही म्हणून तिला लगेच टेन्शन आल होत. तिने लगेच त्याला फोन लावायला सुरवात केलेली होती.

“अग बाई, येणार आहे तो, थोड काम होत म्हणून जरा बाहेर गेलाय.” राधीका. पण तोवर सायाली फोन लावुन मोकळी झाली होती.

“कुठे आहात तुम्ही?? सांगुन जाता येत नाही का तुम्हाला??” सायली जरा चिडून बोलली होती.

सगळ्यांना जाणवल की सायलीने त्या अपघाताचा जरा जास्तच धसका घेतलेला होता तो.

“सरकार, प्रणासाठी जरा सरप्राईज आहे. हा काय पोहोचलो” विजय येऊन पोहोचलेला होता.

विजय सोबत असुन एक व्यक्ती आलेली होती. त्यांना बघुन सगळ्या ग्रुपचे डोळे पाणावले होते. राधीकाने जाऊन त्यांना मिठीच मारली.

“चला नव्या नवरीला सरप्राईज देऊ” विजय बोलला तसे सगळे प्रणालीजवळ गेले. प्रणाली आजी आजोबांसोबत मस्त गप्पा मारत बसली होती.

सगळा ग्रुप एकत्र चिकटुन उभा राहीला होता. प्रणालीला ते जरा वेगळच वाटल.
“काय फेविकॉल लावला आहे काय?? सगळे असे चिपकुन ऊभे राहिलेत ते” प्रणाली

“तुझ्यासाठी स्पेशल माणुस आलाय तुला भेटायला” विजय

जसा विजय बोलला तसे सगळे बाजुला झाले. त्या व्यक्तीला बघताच प्रणाली त्यांच्या मिठीत शिरली होती.

“कुठे होतीस तु?? किती वाट पाहिली मी तुझी” प्रणालीच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. “मला पण तुझीच मुलगीच बोलतेस न?? मग मला न भेटता कस काय गेलीस गावाला?? आशु नाही म्हणून मग मला पण विसरली न?” प्रणालीचे हुंदके चालुच होते.

अश्विनीची आई आली होती प्रणालीच्या लग्नासाठी. विजयने खास बोलावून घेतल होत त्यांना. महेशकडुन सायलीकडे येताना त्या बसस्टँड वर पोहोचल्या होत्या. मग विजय त्यांना घ्यायला गेला होता.

“नाही ग वेडाबाई. तुला कशी विसरेन मी” अश्विनीची आई “तु तुझ्या कॉलेजच्या ट्रिप ला गेली होतीस. दुसऱ्याच दिवशी माझा भाऊ आला मला घ्यायला. असही इथे आता काहीच राहील नव्हतं. तिकडे मग घराकडे, शेताकडेही लक्ष देता येईल आणि सोबतही ही होईल मला.”

“मला तुमचा नंबर देऊन ठेवा. या माकड्याकडे मागितला होता. तर अजुन देऊ राहीलाय. मग काय नंबर चालत पाठवला का काय?? काय माहीत??” प्रणालीने विजयला टोमणा मारला. तसे सगळेच हसले.

“बर या फिल्मीला सांभाळणार तरी कोण आहे. ते तरी कळेल??” अश्विनीची आई.

“अजुन कोण?? तीच ती, आपली येडी शिडी.” विजय.

महेश उंच होता न. मग अश्विनीची आई त्याला शिडी बोलायची.

“कोण?? महेश??” अश्विनीची आईला शॉकच बसला. “अरे देवा, म्हणजे ही अर्धी वेडी, तो अर्धा वेडा. म्हणजे मुल…” अश्विनीची आई पुढे काही बोलणार तोच विजय बोलला.

“मुल शहाणीच होतील. यांच्या भरवशावर कुठ सोडायची ती” विजय.

तसा हास्याचा स्फोटच झाला.

“काय ग, मावशी तु पण न” प्रणाली लाजली होती.

“चल तुझ्या सरकारची ओळख करुन दे” अश्विनीची आई विजयला बोलली. विजय फोनवर बोलत असताना त्यांनी ते ऐकल होत. विजयने सायली कडे हात केला. तिला बघुन अश्विनीची आई पण दोन मिनीट स्तब्ध झाली. सायली पुढे आली आणि त्यांच्या पाया पडली. त्यांनी मग सायली ला आपसुकच मिठीत घेतल होत. मग सायलीनेच घरातल्या बाकीच्यांशी त्यांची ओळख करुन दिली.

“विजय उद्या फायर ब्रिगेड पण बोलावून ठेव रे बाबा” सायली चे आजोबा. विजयने त्यांच्याकडे प्रश्नार्थक चेह-याने पाहीले.

“आता दोन दोन आई एकत्र आल्या म्हणजे उद्या पाठवणी करताना पुरच यायचा इथे” आजोबा. परत हास्याची लहर उसळली.

“आणि ती तिसरी आई विसरलात. कधी च्या वाट पाहू राहील्यात. त्यांच्या हातात असत तर हिला कधीच घेऊन गेल्या असत्या” विजय

मग प्रणालीला सायलीच वाक्य आठवल, जे राधीकाच्या लग्नात ती प्रणालीला बोलली होती. काळाने तिची एक आई हिरावून घेतली होती आणि आता तिच्या आयुष्यात तिला तिन तिन आईंच प्रेम तिला भेटल होत.

अश्विनी च्या आईची नजर राधीका, प्राजक्ता आणि राजेश, संकेत वर गेली.
राधीका आणि प्राजक्ता अश्विनी च्या आईजवळ आल्या.

“जावईबापु, थोड्या रागीट आहेत पोरी माझ्या. काही चुकल्या तर घ्या संभाळून” राजेश आणि संकेतकडे बघत त्या बोलल्या.

“थोड्या??” संकेतने शॉक ची अॅक्शन केली. तसे सगळेच हसले. “त्यांच्या पायी घरात आम्हाला ओरडा भेटतो.” फुल अॅक्शन करत तो बोलला होता.

“यांच्याकडून मी माफी मागते” अश्विनीची आई

“अहो, गम्मत करतोय मी” संकेत. अश्विनीच्या आईला जरा समाधान वाटले.

“चला आता तुमच्या साहेबांची ओळख??” अश्विनीची आई आरती आणि सोनालीकडे बघत बोलल्या. तसा संदेश पटकन आरतीच्या बाजुला जाऊन उभा राहीला. अश्विनीची आई गोंधळली. मग आरती आणि संदेश दोघांनीही होणारा माना हलवल्या. मग त्यांनी विजय कडे पाहील. विजय ही हो बसल्यावर त्या आरतीला बोलल्या.

“मागे एकदा मी गमतीत बोलली होती की लग्न करशील का संदेशसोबत. तर तेव्हा तु तर संदेशला बुटक वांग बोलली होतीस??” अश्विनीची आई कमरेवर हात ठेवत बोलल्या.

तसा संदेश आरतीकडे रोखुन बघायला लागला. तर बाकीचे हसत सुटले होते.

“आता आवडला तिला बुटक वांग त्याला आपण तरी काय करणार न??” विजय हसत बोलला होता.

“बुटक वांग काय??” संदेश हळुच आरतीच्या कानात बोलला. “आता घरी चल तुला बुटक्या वांग्याचे पराक्रम दाखवतो.” आरतीला तर डायरेक्ट त्यांची पहिली रात्रच आठवली. तशी तिच्या गालावर लाली चढली.

“आणि तुझ काय??” सोनालीकडे बघुन अश्विनीची आई बोलली.

“ते आमच्या गळ्यात पडलय” रुद्र मागुन येत बोलला.

“म्हणजे तुमची झोपेत लाथ खाऊन झालीये वाटत??” अश्विनीची आई.

जसा रुद्र हो बोलला तसे सगळे परत हसत सुटले. सोनालीला तर चेहरा कुठे लपवु अस झाल होत. सोनालीला झोपेत लाथ मारायची, चालायची सवय होती. त्याची ट्रिटमेंट पण रुद्र ने चालु केलेली होती. तस लग्नाआधीच सोनालीने सगळ खर खर सांगीतलेल होत त्याला. तिला फक्त टेन्शन आल की अस व्हायच.

“एकदाच झालय तस, आता जरा फरक पडलाय” सोनालीला बाजुने मिठीत घेत रुद्र बोलला.

“बर, तुझ गुलाबाच फुल कुठेय??” अश्विनीची आई राहुल कडे बघत बोलली. तस राहुल विजय कडे बघायला लागला होता. ‘याने एवढ सगळ त्यांना सांगितले कधी?’ राहुल मनातच विचार करत होता.

मग आराध्या पटकन पुढे आली.

“हे ते राहुलच फुल” विजय. मग त्यांनी आराध्या च्या चेह-यावरुन हात फिरवला. “कस सांभाळले ग ह्या वेंधळाल्या??” आणि त्या हसायला लागल्या.

“बहुतेक आज सगळ्यांचेच भांडे फोडणार वाटत.” विजय

“आणि तु का एवढी लांब उभी आहेस??” अश्विनीची आई जियाकडे बघत बोलली.
त्यांना पाहुन जिया जरा लांबच उभी होती. अश्विनीला ब-याच वेळा काहीही बोलुन गेली होती न ती, मग आता त्यांच्या समोर यायला जरा चाचरत होती.

त्यांनी बोलावल तस जिया त्यांच्या जवळ आली. “सॉरी न” दोनच शब्द तिच्याकडून बोलले गेले. तिचा गळा दाटुन आला होता.

“सांगितलय मला विजयने सर्व. झाल गेल ते गंगेला मिळाल.” अश्विनीच्या आईने तिला जवळ घेतल.

तिथेही थोडीफार सगळे नाचले होते. अश्विनीची आई निघतच होती की सायलीने त्यांना अडवल.

“कुठे चालल्या??” सायलीने त्यांच्या हाताला धरुन परत आत आणल. “लेकीच लग्न सोडुन कोण जात का??. सायली च्या अशा वागण्याने त्यांना त्यांची आशु आठवली.

“हव तर तुमची आशुच बोलतेय समजा” सायली त्यांचा चेहरा वाचुन गेली होती.
“आणि मला सगळ्यांचे भांडे आज फोडुनच घ्यायचे आहेत” सायली. मग काय एका बाजुला डिजे वर डान्स आणि एका बाजुला गप्पांचा पुर. नाही नाही महापुर.

अश्विनीच्या आईने त्या ग्रुपचे जे भांडे फोडायला घेतले. सगळ्यांची हसुन हसुन वाट लागली होती. तिथे महेश नव्हता म्हणून त्यांनी महेशला व्हिडिओ कॉल वर घेतल होत.

सायलीचे वडील आणि मोहिते साहेबांचे तर हसुन हसुन गाल दुखायला लागले होते. बाकीच्यांना तर त्या ग्रुपच्या करामती माहीती होत्या.

“म्हणजे ह्यांच्यात पण तुमचेच गुण आहेत तर” सायलीची आई सायलीच्या वडिलांकडे बघत बोलली.

“नाहीतर काय?? आम्हाला तर अस वाटतय की ह्यांची कॉलेजची स्टोरी ऐकतोय” मिसेस मोहीते.

“पण मग आम्ही कधीच कॅन्टीनमध्ये बिर्याणी नाचवली नाही.” विजय भावनेच्या भरात बोलुन गेला.

राहुल आणि संदेशही जोरात हसत सुटले होते. सगळे ह्या तिघांकडे बघत राहिले होते.

मोहीते साहेब, सायली आणि राहुलच्या वडीलांची तर बोलतीच बंद झाली. ते तिघेही गोंधळून बघायला लागले होते.