मागील भागात.
अश्विनीची आई निघतच होती की सायलीने त्यांना अडवल.
“कुठे चालल्या??” सायलीने त्यांच्या हाताला धरुन परत आत आणल. “लेकीच लग्न सोडुन कोण जात का??. सायली च्या अशा वागण्याने त्यांना त्यांची आशु आठवली.
“हव तर तुमची आशुच बोलतेय समजा” सायली त्यांचा चेहरा वाचुन गेली होती.
“आणि मला सगळ्यांचे भांडे आज फोडुनच घ्यायचे आहेत” सायली. मग काय एका बाजुला डिजे वर डान्स आणि एका बाजुला गप्पांचा पुर. नाही नाही महापुर. अश्विनीच्या आईने त्या ग्रुपचे जे भांडे फोडायला घेतले. सगळ्यांची हसुन हसुन वाट लागली होती. तिथे महेश नव्हता म्हणून त्यांनी महेशला व्हिडिओ कॉल वर घेतल होत.
सायलीचे वडील आणि मोहिते साहेबांचे तर हसुन हसुन गाल दुखायला लागले होते. बाकीच्यांना तर त्या ग्रुपच्या करामती माहीती होत्या.
“म्हणजे ह्यांच्यात पण तुमचेच गुण आहेत तर” सायलीची आई सायलीच्या वडिलांकडे बघत बोलली.
“नाहीतर काय?? आम्हाला तर अस वाटतय की ह्यांची कॉलेजची स्टोरी ऐकतोय” मिसेस मोहीते.
“पण मग आम्ही कधीच कॅन्टीनमध्ये बिर्याणी नाचवली नाही.” विजय भावनेच्या भरात बोलुन गेला. राहुल आणि संदेशही जोरात हसत सुटले होते. सगळे ह्या तिघांकडे बघत राहिले होते.
मोहीते साहेब, सायली आणि राहुलच्या वडीलांची तर बोलतीच बंद झाली. ते तिघेही गोंधळून बघायला लागले होते.
आता पुढे.
मग विजयच बोलला.
“ते आरुच्या हळदीत न. नंदुकाकांना जरा जास्तच गेअर लागला होता. मग त्या गेअरमध्येच सगळ बोलुन गेले.”
नंदुकाकांना त्या दिवशी ड्रिंक जरा जास्तच झाली होती. विजय त्यांना सांभाळायला आला तेव्हा त्यांनी सगळ सांगुन दिल होत.
मिसेस मोहीते, राहुलची आई आणि सायलीची आई तिघीही विजय जवळ आल्या. तसे त्यांचे नवरे सावध झाले.
“आता जर तुला तुझ्या सायुसोबत लग्न करायचे असेल तर ह्यांची बिर्याणी तु फोडायचीस.” मिसेस मोहीते.
मग विजय ही शांत बसला. आपण काय बोलुन गेलो. याचा त्याला आता पश्चाताप झाला होता. ते तिघही विजयकडे आशेने बघत होते. बाकीच्या दोघांचा तर एकदाच पराक्रम होता तो पण मोहीते साहेबांचा दोन दोन वेळा होता. एकदा शाळेत असताना राहुलच्या वडिलांसोबत आणि दुसरा कॉलेजच्या हॉस्टेलवर असताना सायली च्या वडिलांसोबत.
विजय दोन्हीकडून फसला गेला होता. त्याने सायली कडे पाहील.
“आता तुमच तुम्ही बघुन घ्या. कारण आता आम्हाला पण ते ऐकायचच आहे.” सायली सोबत आरती, सोनाली, आराध्या, प्रणाली येऊन बसल्या.
“हो, कारण खुप मस्का लावुन झाला दोघा मित्रांना काही बोलतील तर शप्पथ” आराध्या
“ठिक आहे, सॉरी गाईज” विजय तिघा मित्रांकडे बघत बोलला, “माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. पण त्यांनी जे काही केल. ते त्यांच्यासोबतच्या मुलांसाठी केल. त्यामुळे त्याचा वेगळा अर्थ घेऊ नका” विजयने सुरवात अशी केली बघुन बाकी तिघांना जरा हायस वाटल होत.
“त्यावेळी त्यांच्या शाळेत जे जेवण भेटायच न. ते अगदीच द्यायच आहे म्हणून ते देत होते. पण रजिस्टर वर मात्र बिर्याणी, नॉनव्हेज, गुलाबजाम अस लिहीत होते. मग ह्यांना समजल ते. ते डायरेक्ट त्या रजिस्टर लिहीणा-या सरांकडे गेले होते. पण ह्यांच कोणीच ऐकल नाही म्हणून ह्यांच्या डोक्यात प्लॅन शिजायला लागला होता.” विजयने मोहीते साहेबांकडे इशारा केला.
त्या वेळचे ते शिक्षक आणि कॅन्टीन चे मॅनेजर मुलांच्या नावाखाली तेच सगळ खात होते. मग ऐके दिवशी मोहीते साहेबांनी कुठूनतरी दारुची बॉटल मिळवली आणि त्या सरांपर्यंत पोहोचवली. त्यात त्यांनी देशी दारु ही मिक्स केली होती. ते सगळेच प्यायला बसले होते. त्यांना माहीतच नव्हत की त्यात देशी दारु मिक्स आहे ते. मग चढली सगळ्यांनाच. मोहीते साहेबांनी पहीले सगळ्यांचे फोटो काढले. मग किचनमध्ये जाऊन सगळ जेवण मुलांच्या रुममध्ये पोहोचवायचा सुरवात केली होती. नेमकी बिर्याणी ची पाळी आली तसा त्यातल्या एका सरांनी ते पाहील. तस मोहीते साहेबांनी बाजुला पडलेली ओढणी त्यांच्या अंगावर घेतली. ते सर काही बोलायला जाणार तोच राहुलचे वडील बोलले.
“सर बिर्याणी नाचु राहीली. ती तुम्हाला पण नाचायला सांगत आहे” राहुलचे वडील. मोहीते साहेबांनी बिर्याणी डोक्यावर घेऊन नाचायला सुरवात केली होती.
त्या सरांना चांगलीच चढली असल्याने त्यांना ते खर वाटल होत.
“पण मग ती ओढणी??” सरांनी नशेतच विचारल.
“मग नाचण्यासाठी फिलींग नको??” राहुलचे वडील. त्या रात्री या दोघांनी मिळून सगळ्या सर आणि कॅन्टीनच्या मॅनेजरला नाचवल होत, बिर्याणी डोक्यावर घेत.
“नंदुकाकां बोलत होते. लय भारी नाचत होते मोहीते साहेब.” विजय सोबत बाकी पण हसायला लागले होते.
“ह्या नंद्याला तर बघायलाच लागेल” मोहीते साहेबही हसत हसत बोलले होते.
“दुसऱ्या दिवशी तेच फोटो घेऊन हे दोघ गट शिक्षण अधिका-याकडे गेले. त्यांना तो फोटो दाखवुन सांगीतल की, आम्हाला अस ओढणी घेऊन नाचायला सांगतात. ते मस्त मस्त जेवण खातात आणि आम्हाला पातळ दाळ, शिळा भात देतात. पुर्ण जिल्ह्यातच खळबळ उडविली होती या दोघांनी मिळुन.” विजय राहुलचे वडील आणि मोहीते साहेबांकडे बघत बोलला.
“मग ते कॉलेजच काय??” सायली
“कॉलेजमध्ये तर बाबा आणि काकांनी मिळुन त्या कॅन्टीन च्या मॅनेजरला ओढणी घेऊन नाचवल होत. तोही खुपच पैसे खायचा म्हणून.” विजय “आणि आम्ही कधी नाचवली नाही, कारण ते आम्हाला नसतच जमल. एवढी हिम्मत आमच्यात तरी नाही. त्यांनी जे केल फक्त तेच करु शकतात.”
एखादी गोष्ट सांगायची पण पध्दत असते. विजयने त्यांचे ते कारनामे चांगल्या पद्धतीने ते मांडले होते. त्यामुळे त्यातुन कोणीही वेगळा अर्थ घेतला नव्हता. तिघा मित्रांचे डोळे पाणावले होते.
“हो का?? तुझ्या नाही हिम्मत??” अश्विनीची आई “मग त्या दुसऱ्या शाळेच्या ट्रस्टी ला तु मुंबईपर्यंत नाचवल होतस ते काय होत??
“म्हणजे??” सायली. तिकडे आरती पण हसली होती. शेवटी त्याची बालमैत्रीण ना, तिला सगळच माहीती होत.
“अग आमच्या चाळीतले काही मुल दुसऱ्या शाळेत होते. तिथे न शिक्षकच नव्हते. ना जेवण बनवुन द्यायला कोणी. आज येतील उद्या येतील करत तीन महिने तसेच गेले होते. त्या शाळेचा ट्रस्टी जरा गुंड टाईप होता. त्यामुळे त्याला विचारायची हिम्मत कोणी केली नाही. पण जस ह्याला कळल न. तसा तो डायरेक्ट त्यांच्याकडे गेला. कुठुन ते टेपरेकॉर्डर आणल होत काय माहीत. त्यात रेकॉर्डिंग ची सेटींग केली. तिथल बोलण सगळ रेकॉर्ड केल आणि डायरेक्ट शिक्षण विभागात दिल पाठवुन. मग काय झाले त्यांचे खेटे सुरू मुंबईचे.” अश्विनीची आई
“शोभतात हो जोडीदार एकमेकांचे “ मिसेस मोहीते विजयला बोलल्या.
“पण आता आम्हाला तुम्ही कसे नाचले होते ते पण बघायच आहे” राहुलची आई
“काय??” तिघ एकदाच ओरडले.
“हो तुम्हाला तुमच्या आंब्याची शपथ” आराध्या तिच्या बाबांना बोलली. आराध्याच्या आईचा चेहरा आंब्याच्या आकारासारखा गोल होता.
“तुम्हाला तुमच्या संत्रीची शपथ” सायली तिच्या वडीलांना. सायलीची आई संत्री लागते तशी कधी गोड तर कधी आंबट होती.
“तुम्हाला पण तुमच्या चिकूची शपथ” राहुल त्याच्या वडीलांकडे बघत बोलला. राहुलच्या आईचा आवाज गोड होता, अगदी चिकुसारखा. हि नाव त्यांनीच ठेवली होती, त्यांच्या बायकांना.
तिघही लागोपाठ बोलले होते. तस त्यांच्या आयांनी तिघांकडे लाजतच डोळे वटारले.
“इथे तर फळबागाच लावल्या तिघांनी. शोभतात हो तिघ एकमेकांचे मित्र बरोबर शोभतात. आता तर होऊनच जाऊदे” विजयने बाकी तिघींची रि ओढली.
गप्पा मारता मारता बराच उशीर झाला होता. त्यामुळे तिथे आत्ता फक्त तेच होते. बाहेरचे कोणीच नव्हते. मग तिघ ही उठले. एक एक ओढणी घेतली. त्यादिवशी जसा डान्स केला. तसाच करायला लागले. मग विजयने ही बाकीच्यांना परत नाचायला ओढुन घेतल.
तो प्रणालीजवळ गेला. “बघीतल, तुझ्या एका होकाराने सगळेच किती आनंदात आहेत. याला कारण फक्त तु आहेस” प्रणालीचे डोळे ओलावले सगळ्यांना आनंदात बघुन. आजवर जी स्वतः ला पनवती समजत होती. त्यामुळे ती कोणाशीच मैत्री वा ओळख करत नव्हती. तीच प्रणाली आज एवढ्या लोकांच्या आनंदाच कारण झाली हे बघुन तिचे डोळे पाणावले होते.
विजयने तिला डायरेक्ट खांद्यावर उचलुन घेतल आणि नाचायला लागला. तसा सगळ्यांना परत जोश आलेला होता.
थोड्यावेळाने आराध्याचे आई वडील तर घरी निघुन गेले होते. त्यांना लग्नासाठी जमणार नसल्याने ते हळदीचा आलेले होते. उद्या ते नागपूरला जाणार होते. राहुल, संदेश, आरती, सोनालीचे आई वडीलही घरी निघुन गेले. प्राजक्ता आणि राधीका संकेत आणि राजेश सोबत आरतीच्या घरी गेले. विजय, सोनाली, जिया आणि आराध्या तर सायलीच्या घरी थांबले. राहुल, संदेश आणि आरती महेशच्या घरी गेले. पहिल्यांदा अस झाल होत की ग्रुपमध्ये महेश नव्हता. रुद्रने नेहमीची धावती भेट दिली होती. जसा अचानक उगवला होता. तसाच तो अचानक गेला पण होता.
लग्नही मोठ्या थाटामाटात लावुन दिल होत. सायलीच्या आई वडीलांनी कुठलीच कसर सोडली नव्हती. सायली तर प्रणालीच्या सोबतच होती.
एवढ सगळ चांगल चालु असताना काही गंज लागलेले लोक असतातच की नाव ठेवायला. म्हणून सायलीने प्रणालीला एकटीला सोडल नव्हतं आणि सायली समोर काही बोलण्याची हिम्मत तरी नव्हती कोणाची. तिच्या माणसांसाठी ती किती पझेसीव होती, सगळ्यांनाच माहीती होत.
हळदीच्या दिवशी विजयने अश्विनीच्या आईला सायलीची ओळख करुन दिल्यावर, सायलीकडच्या काही नातेवाईकांनी विजय बद्दल खुसुरपुसुर करायला सुरवात केली होती. त्यांचा बाजुलाच राधिका, प्राजक्ता, संकेत आणि राजेश बसले होते. त्यांचे ते गॉसिप ऐकुन राधीकाचे डोळे जरा पाणावले होते. राजेश काही बोलणार तोच राधीकाने त्याला अडवल होत. कारण ते विजयच सासर होत.
सायलीने राधीकाच्या डोळ्यात पाणी पाहील. राजेशला अडवतानाही पाहील. मग ती गपचूप मागुन येऊन उभी राहीली होती. तर तिच्या कानावर हे ऐकायला आल.
“ह्याच्यापेक्षा आमचा दिन्या काय वाईट होता” एक जणी
“नाहीतर काय?? तो बघ कसा जाड काळा आहे. काय आवडल त्याच्यातल काय माहीत.” दुसरा जण
“अजुन काही??” सायली हळुच बोलली
“अजुन काय?? त्यानेच काहीतरी लबाडी करुन पटवली असेल हिला “ एक जणी.
“पण मग हिला पण कळत नाही का?” दुसरा जण
“कोणाला मला का??” सायली
त्यांनी मागे पाहील तर त्यांना सायली दिसली, तसे दोघे जण चपापले.
“तुमचा तो दिन्या त्या दिवशी मला बारमधुन बाहेर पडताना दिसला. धड चालता पण येत नव्हत ओ त्याला” सायली दुसऱ्या जणाकडे बघत बोलली “आणि तुमची मुलगी काय नाव तिच?? हा. प्रियांका. तिच आटपा लवकर लग्न. सध्या ति तिच्या चौथ्या बॉयफ्रेंड सोबत फिरताना दिसते मला.” सायली ने त्यांच्या वर्मावरच घाव घातला.
“आम्ही तर तुझ्यासाठी सांगत होतो. तर वरुन आम्हालाच बोलतात??” एकजणी
“त्यांच्या माणसांसाठी ते काय आहेत न. ते तुम्हांला नाही कळणार. जो पैसा बघुन तुमची मुलगी तिचे बॉयफ्रेंड बदलते न. त्याच पैशावर ह्यांनी सहज पाणी सोडलय. आणि तुमचा तो सो कॉल्ड दिन्या. त्याच्याबद्दल चार वाक्य चांगली बोलणारी माणस मला दाखवा.” सायलीच्या आवाजात जरब होती. “हे सगळ तुम्ही माझ्या समोर बोलत आहात म्हणून तुम्ही फक्त ऐकुन घेत आहात. चुकुन जरी आमच्या ग्रुप समोर बोललात न. तर तुमच काय होईल ते फक्त देवालाच माहीत. खोट वाटत असेल, तर तुमच्या त्या दिन्याला विचारा. तो जेव्हा ह्यांना भर वर्गात जे काही बोलुन गेला होता. त्यानंतर त्याच काय झाल ते. त्यामुळे आलाय तसे एन्जॉय करा. उगाच चांगल्या कार्यक्राची वाट नका लावु.” सायलीने गोड बोलून त्याची बोलती बंद केली होती.
तिच ते बोलण ऐकुन ते दोघेही निघुन गेले.
मग सायली राधीकाजवळ गेली होती.
“कशाला तु तुझी नाती खराब करुन घेतली? बोलणारे बोलतील आणि विसरतील.” राधीका
“जो माझ्या माणसांच्या डोळ्यात पाणी आणेल ते नात माझ नाही.” सायलीने राधीकच्या डोळ्यात पाणी पुसल. तिला जसा आवाज आला तशी सायली परत तिकडे निघुन गेली होती.
“हे काय निवडलय विजयने??” राजेश हसतच बोलला.
“मग तो शांत आहे न, त्याच्या जोडीला बोलणारी नको??” राधीका
सगळ्यांना वाटत होत की सायलीच लग्न होत की काय. पण तिच्या जागी प्रणालीला बघुन काही लोकांना ते रुचल नव्हतं. सायली प्रणालीची ओळख तिची बहीण म्हणूनच सगळीकडे करत होती.
काही दिवसांसाठीच प्रणाली सायलीच्या घरी राहीली होती. पण ती अशी काही रुळली होती घरात की तिथलीच झाली होती. सायलीचे आई वडील समाधानाने बसले होते कन्यादानासाठी. एक समाधान होत त्यांच्या चेह-यावर. प्रत्येक बापाच स्वप्न असत की तिच्या मुलीच ते कन्यादान करतील म्हणून. कन्यादानासारख दुसर पवित्र दान तरी कुठल असत. तिची पाठवणी करतानाही सायलीची आई, आज्जी, अश्विनीची आई खुप रडल्या होत्या. बाबा आणि आजोबांचे ही डोळे पाणावले होते.
महेशच्या घरी गृहप्रवेश करताना आरती, सोनाली, आराध्या, सायली दारात उभ्या राहील्या. महेशला कल्पना होतीच ह्या सगळ्याची. त्याने सरळ सरळ अकरा हजार एकशे अकरा रुपये काढुन दिले होते. मग मस्त एक एक उखाणा घेत दोघांचा गृहप्रवेश झाला होता.
दुसऱ्याच दिवशी सत्यनारायणाची पुजा पण घातली गेली होती. पुजा झाल्यावर अश्विनीची आई दोघांनाही भरभरुन आशिर्वाद घेत निघाल्या होत्या. निघताना त्यांनी सायलीला बाजुला घेतल.
“खुप कोवळ मन आहे त्याच. सगळ्यांनी त्याला खुप कष्टाने कठीण मनस्थितीतुन बाहेर काढले आहे. नीट संभाळ त्याला. तो स्वतःच कधीच बघत नाही. तुला तर समजल असेलच. कधी तुला आशु समजला तर गैरसमज करुन घेऊ नकोस. आता जर तो तुटला न. तर…” अश्विनीच्या आईला पुढे बोलावले गेले नाही.
“नका काळजी करू. तिनेच तर आम्हाला जवळ आणलय.” सायलीने अश्विनीच्या आईला मिठी मारली. “आणि हो, येत जा घरी तुमच्या या आशुला भेटायला.”
“आणि एक, लग्नाच्या एक आठवडा आधीच या. जरा काम आहे मला.” सायली काहीतरी विचार करत बोलली.
“म्हणजे तुझ तुच ठरवले. मी येणार ते?? तिकडच बघाव लागेल न.” अश्विनीची आई.
“मी तुम्हाला विचारत नाहीये, सांगतेय. तुम्ह येत आहात. एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी, ह्यांच्यासाठी आणि आपल्या आशुसाठी.” सायली
अश्विनीची आई सायलीचे डोळे वाचायचा प्रयत्न करत होती. जे ब-याच खोल विचारात दिसत होते.
त्यांनी मानेनेच हो म्हटल. मग विजय त्यांना बसस्टँड वर सोडुन आला होता. सगळे आपआपल्या घरी पोहोचले होते. तर जिया आणि विजय सायलीच्या घरीच थांबले होते. सायलीच्या वडीलांनी आज त्यांना जाऊच दिल नव्हत घरी. पुजा आटोपल्यावर प्राजक्ताला माहेरी सोडुन, संकेत आणि राजेश राधीकासोबत परत घरी निघुन गेले होते.
रात्री महेश आणि प्रणालीला जरा टेन्शनच आल की यावेळी सायली नेमक काय करणार होती ते.
बिचारे रात्री दिड वाजेपर्यंत टेन्शन घेऊन होते. पण काहीच झाल नव्हत. ते गोंधळले होते. बराच वेळ नुसतेच बसुन होते ते. शेवटी वैतागून प्रणालीने सायलीला फोन लावला.
“ऐक न, मेरी प्यारी बेहेना. जे काही करायच असेल ते घे करुन पटकन झोप आलीये.” प्रणाली
“म्हणजे तुम्ही अजुनही तसेच बसले आहात?? आणि आज झोपायच आहे तुला??” सायलीने तिची खेचायला सुरवात केली. “महेश तुला आज झोपु देईल??”
“तुझ काय ते आटपल तर नक्कीच” महेश वैतागून बोलला.
“मग आटपल की ते” सायली हसायला लागली.
“म्हणजे??” प्रणाली आणि महेश
“तुम्हाला नुसतच जागवत ठेवायच होत ते झाल” सायली “दुसर काहीच केल नव्हत आज.”
तसा दोघांनाही डोक्याला हात लावला. फोन ठेवुन जसे ते त्यांच्या उशांवर पडले तस त्यांच्या उशांच्या खालुन बारीक टिकल्या फुटल्याचा आवाज झाला. दोघ घाबरुन उठले.
“सायले” महेश जोरात ओरडला.
विजयचा मेसेज येऊन पोहोचला. “झोपायच आहे का अजुनही?”
मग महेश ने ग्रुपवरच मेसेज केला, “विजा तुझ होऊ दे रे, मग सब हिसाब बराबर होगा.”
“पण आज मी काहीच केल नाहीये” सायली.
मग महेश ची ट्युब पेटली. सायली तर त्यांच्या रुमकडे आलीच नव्हती. मग हा उपद्व्याप कोणाचा. कारण विजय पण बाहेरच होता. नंतर परत विजयचा मेसेज आला ग्रुपवरच.
“कोणालातरी न, आज खुप झोप आली होती. मग त्या कोणतरीच्या बायकोने झोप उडवायच औषध मला विचारल. मला पण तेच पाहीजे होत. मग त्या बायकोलाच थोडी आयडीया दिली मी.” विजय
तसे सगळ्यांनीच हसण्याची स्मायली टाकली ग्रुपवर.
महेश ने प्रणालीकडे पाहील. जी तिच तोंड उशीत लपवुन झोपली होती.
“एवढी घाई हनीमुनची??” महेश
“हनीमुनची नाही रे. खुप सा-या गप्पा मारायच्या होत्या आणि एक तु झोपायच बोलत होता.” प्रणाली तिच्या मनातल बोलली होती. मग दोघही खुप वेळ गप्पा मारत बसले होते.
विजय आज पहील्यांदा सायलीच्या घरी मुक्काम थांबणार होता. सोबत जिया होतीच. सगळ्यांनी त्यांची त्यांची जेवण आटोपली. हॉलमध्ये काहीवेळ गप्पा मारत बसले होते. सायली तर विजयला जाम त्रास देत होती. त्याला हळुच चिमटा काढ, त्याच्या कमरेवरुन हात फिरव, कोणाच लक्ष नाही बघत पटकन विजयच्या गालावर तिचे ओठ टेकव. असे तिचे नखरे चालु होते. तिच हे नवीनच रुप पाहून विजय जाम गोंधळला होता. तिच्या डोळ्यात आज त्याला जरा जास्तच रोमान्स दिसत होता.
“दादु, आज तुझ काही खर नाही दिसत” जिया हळुच विजयच्या कानात बोलली. एक दोन वेळा ज्याच्या नजरेस सायलीच त्रास देण पडल होत.
“गप ग तु, काहीही काय” विजय कडक आवाजात बोलला. पण मनातुन खुपच लाजला होता.
मग झोपायची तयारी सुरू केली. जिया तर सायली सोबत तिच्या रुममध्ये आणि विजय गेस्ट रुममध्ये झोपणार होता.
सायलीचे आई वडील आणि आजी आजोबा त्यांच्या रुममध्ये झोपायला गेले सुध्दा होते. पण विजय अजुनही त्याचा मोबाईल चाळत हॉलमध्येच बसलेला होता. सायली किचनमध्ये पाणी आणायला गेली होती. तिने विजयला पाहील हॉलमध्ये. तिने वरीष्ठ मंडळीचा कानोसा घेतला. तिच्या रुममध्ये पसरलेल्या जियाकडेही नजर टाकल आणि येऊन विजयच्या जवळ बसली. एकदम खेटून.
“काय चालु आहे तुझ सरकार?” विजय जरा लांब सरकला.
“काय चालु आहे म्हणजे?? तुमच्या जवळ बसायचा हक्क आहे माझा” विजय जवळ सरकत बोलली.
“हो, पण मग तेव्हा सगळे होते. तेव्हा कुठल भुत शिरल होत अंगात??” विजय
“नव्हत लक्ष कोणाच” सायलीने त्याच्या खांद्यावर हात ठेवत, दुसरा हाताची बोट त्याच्या गालावरुन फिरवु लागली.
“सायु ऐक न, येईल कोणी पण. काय वाटेल त्यांना??” विजयने तिला सावरायला प्रयत्न केला.
“काही नाही वाटणार, आपला साखरपुडा झालाय” सायलीने त्याला सोफ्यावर ढकलल आणि ति त्याच्यावर गेली.
ति फक्त त्याला हुल देत होती, एव्हाना विजयच्या लक्षात आलेल होत. कारण ति फक्त जवळ येत होती. बाकी काहीच करत नव्हती मग विजयने त्याची बाजु पलटत सायलीला त्याच्या खाली पाडल. तो तिच्या एकदम जवळ गेला.
“हनीमुनची जास्तच घाई झालीये वाटत” विजय
विजयच्या अशा वागण्याने सायली गांगरून गेली. तिची चलाखी तिलाच भारी पडत होती. पण मग मागे हटेल ती सायली कुठली.
“मला चालेल न” सायली विजयच्या ओठांवर गेली. तसा विजय पटकन लांब झाला.
सायली त्याच्याकडे बघतच राहीली. “सगळा मुड घालवला” सायली नाटक करत बोलली.
“हो का?? मला काही कळत नाही. माझीच फिरकी घेत होती ते” विजय हसत बोलला. मग सायली पण खुदकन हसली.
“सॉरी न” सायलीने विजयला मिठी मारली.
“चल जा झोपून घे. गुड नाईट” विजय. मग सायली पटकन विजयच्या ओठावर ओठ टेकवून तिच्या रुममध्ये पळाली. विजयच्या गालावर लाली वाली स्माईल आली. मग तो ही गेस्ट रुममध्ये जाऊन झोपला.
दुसऱ्या दिवशी सायलीचे वडील सकाळी लवकरच उठुन दिल्लीतील हेड ऑफिसला निघुन गेले होते. विजय ही लवकरच उठला होता. सायली आणि जिया अजुनही पसरलेल्या होत्या. सायलीची आई किचनमध्ये होती. विजयला उठलेल बघुन त्यांनी विजयला विचारल.
“झोपले असते अजुन. आत्ताशी तर ६.३० वाजत आहेत” सायली ची आई
“मी रोज ह्याच वेळेला उठतो.” विजय
“बर. गिझर आहे. घ्या आंघोळ करुन मग. मी चहा ठेवते तोवर” सायली ची आई
“बाबा??” विजयला ते दिसले नाही म्हणून तो विचारत होता.
“ते दिल्लीला गेलेत, हेड ऑफिसला. परवा येतील” सायलीची आई.
मग विजय आंघोळला गेला. तोवर सायली आणि जिया उठल्या होत्या. जिया किचनमध्ये गेली होती. तर सायली तिच्याच रुममध्ये आवरत होती.
आंघोळ झाल्यावर विजय जसा हॉलमध्ये परत येत होता. त्याला सायली दिसली, तिच्या रुमच्या दारातून. तिने नाईट ड्रेस घातलेला होता. जरा ट्रान्सपरन्ट होता. त्यातून तिच ते गोरपान शरीर पाहुन विजय तिथेच स्तब्ध झाला. पण मग लगेच भानावर येत हॉलमध्ये आला. सायलीला मात्र विजयची जाणीव आधीच झालेली होती. तो जसा गेला तशी ती गालातच हसली होती.
विजय त्याचे कपडे ठेवायला परत गेस्ट रुममध्ये गेला होता. तिथून परत येताना त्याच मन झाल की बघाव एकदा सायलीला. पण मग मनावर ताबा ठेवता तो तिची रुम क्रॉस करणार तोच त्याला कोणीतरी ओढुन घेतल. विजयने पाहील तर सायलीने त्याला तिच्या रुममध्ये ओढुन घेतल होत.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा