Login

तुझ्याच आयुष्याची वाटेकरी व्हायचे आहे भाग ५३

जयाने सांगितल्यामुळे विजयच्या मनातली सल सायलीला केली होती. तर दुसरीकडे रुद्रला भेटलेला पुरावा त्याने कोनाला सांगितला नव्हता.

मागील भागात. 

दुसऱ्या दिवशी सायलीचे वडील सकाळी लवकरच उठुन दिल्लीतील हेड ऑफिसला निघुन गेले होते. विजय ही लवकरच उठला होता. सायली आणि जिया अजुनही पसरलेल्या होत्या. सायलीची आई किचनमध्ये होती. विजयला उठलेल बघुन त्यांनी विजयला विचारल.

“झोपले असते अजुन. आत्ताशी तर ६.३० वाजत आहेत” सायलीची आई

“मी रोज ह्याच वेळेला उठतो.” विजय

“बर. गिझर आहे. घ्या आंघोळ करुन मग. मी चहा ठेवते तोवर” सायलीची आई

“बाबा??” विजयला ते दिसले नाही म्हणून तो विचारत होता.

“ते दिल्लीला गेलेत, हेड ऑफिसला. परवा येतील” सायलीची आई.

मग विजय आंघोळला गेला. तोवर सायली आणि जिया उठल्या होत्या. जिया किचनमध्ये गेली होती. तर सायली तिच्याच रुममध्ये आवरत होती.

आंघोळ झाल्यावर विजय जसा हॉलमध्ये परत येत होता. त्याला सायली दिसली, तिच्या रुमच्या दारातून. तिने नाईट ड्रेस घातलेला होता, तो जरा ट्रान्सपरन्ट होता. त्यातून तिच ते गोरपान शरीर पाहुन विजय तिथेच स्तब्ध झाला. पण मग लगेच भानावर येत हॉलमध्ये आला. सायलीला मात्र विजयची जाणीव आधीच झालेली होती. तो जसा गेला तशी ती गालातच हसली होती.

विजय त्याचे कपडे ठेवायला परत गेस्ट रुममध्ये गेला होता. तिथून परत येताना त्याच मन झाल की बघाव एकदा सायलीला. पण मग मनावर ताबा ठेवत तो तिची रुम क्रॉस करणार तोच त्याला कोणीतरी ओढुन घेतल. विजयने पाहील तर सायली ने त्याला तिच्या रुममध्ये ओढुन घेतल होत.

आता पुढे. 

“तुमचीच बायको आहे न?? मग स्वतःच्या बायकोला अस लपुन लपुन बघतात का??” सायली.

चोरी पकडली गेली म्हणून विजय घाबरला होता.

“अग घरात आई आहे, जिया आहे. आपल्याला अस बघुन काय वाटेल त्यांना.??” विजय घाबरत बोलला.

“आई तर मॉर्निंग वॉकला गेलीये. तासभर तरी येणार नाही आणि जियाच म्हणशील तर तिच्या दादा वहीनीला डिस्टर्ब नाही करणार.” सायली त्याच्या चेह-यावरुन हात फिरवत बोलली.

“तुला झालय काय कालपासून??” विजय चेहऱ्यावर अजुनही टेन्शन होत. 

सायलीने विजयला बेडवर ढकलल. त्याच्या छातीवर तिचे दोन्ही हात ठेवले. त्याच्या अंगावर झुकली.

“एवढे दिवस झाले आपला साखरपुडा होऊन. एक साधी किस पण तु्म्ही दिली नाही मला.” सायली त्याच्या डोळ्यात बघत बोलली.

या गोंधळात तिचा नाईट ड्रेस तिच्या एका खांद्यावरून थोडा खाली सरकला. तिने आत घातलेले कपडे वर दिसुन येत होते. तिचा तो गोरापान खांदा बघुन विजय विरघळला.

“ही.ही. कुठली पध्दत आहे किस मागायची??” विजय अजुनही त्याच्या मनावर ताबा ठेवुन होता.

मग सायलीनेच त्याच्या ओठावर तिचे ओठ ठेवुन किस घ्यायला सुरवात केली. मग विजयला ही स्वतःवर ताबा ठेवण मुश्कील होऊ लागल होत. त्याचे हात सायलीच्या केसांमधून फिरू लागले. त्याने सायलीला फिरवत तो तिच्यावर आला होता. खुप पॅशनेटली किस करत होते दोघे एकमेकांना. या गडबडीत सायलीचा नाईट ड्रेस दोन्ही खांद्या वरुन खाली सरकला. सायलीच्या ओठांवरुन विजय कधी तिच्या गळ्यावर आणि नंतर खांद्यापर्यंत आला त्यालाच कळल नाही. खांद्यावरून खाली सरकताना ओठांना झालेल्या मऊशार स्पर्शाने विजय अजुन वहावत गेला. भावनेच्या भरात विजय सायलीला तिथेच जरा चावला. सायली फक्त कसमसली होती. तिचा तो आवाज ऐकून विजय लागलीच भानावर आला आणि तिच्यापासून लांब झाला. सायली अजुनही तशीच बेडवर पसरलेली होती. तिच्या श्वासावर नियंत्रण मिळवत होती. तिचा तो उघडा पडलेला गळा विजयला अजुन तिच्याकडे खेचत होता. मग विजयने मान फिरवली.

“सॉरी न, भानच नाही राहील” विजयला गिल्टी वाटु राहील होत. सायलीने एकवार त्याच्याकडे पाहील.

“अस काय बोलताय, तुमची बायकोच आहे न मी. तुमचा तेवढा अधीकार तर आहे. पण तुम्हीच घेत नाही न” सायलीने विजयची खेचायला घेतली होती.

“हो, पण मग काळ वेळ काही असत की नाही. कोण आल असत मग??” विजय.

त्याच ते वाक्य एकुन सायलीने विजयला परत तिच्यावर खेचुन घेतल.

“मग आता वेळ आहेच न थोडा” सायलीने विजयला डोळा मारला.

“अस तर तु मला वेड करशील. बघ ह पुढे काही झाल तर तुलाच जड जाईल.” विजय

“चालेल न मला” सायली खोडकर हसत बोलली. 

सायलीने परत त्याच्या ओठांवर तिचे ओठ टेकवले. मग थोड्यावेळाने त्यांना सायलीच्या रूमचा दरवाजा वाजल्याचा आवाज आला होता. मग विजय पटकन उठला. सायलीने ही तिचे कपडे निट केले आणि पटकन तिचा रुमच दार उघडल.

तिला जिया दिसली. तिला इशारात विचारल.

“खाली लॉन मध्ये” जिया

दोघही रुममधुन बाहेर आले. तोवर सायलीची आई घरात येऊन पोहोचली होती. मग त्यांना काही समजल नाही म्हणून दोघही रिलॅक्स झाले. सायलीने तिच्या आईला पाणी आणुन दिले. पण जियाचे मागुन काहीतरी इशारे चालु होते. जे सायलीला कळतच नव्हते.

“अग काय दमशेराज खेळेयस का?? मोठ्याने बोल न” सायली वैतागून मोठ्याने बोलली. तसा जियाने डोक्याला हात लावला. तिकडे विजयला कळुन गेल होत की जियाला काय म्हणायचे होत ते. पण त्याने काही बोलायच्या आत सायली तिच्या आई समोर जरा वाकली. तिचा तो ड्रेस जरा लुज होता.

“सायु हे लाल रॅशेस कसले आले आहेत तुला??” सायलीच्या आईला त्या लुज ड्रेस मुळ ते लगेच दिसल होत. सायली ने खाली बघतच मनातच स्वतःच्या डोक्याला हात मारुन घेतला. मग वर बघताना तिने जिया कडे पाहील. तिनेही मग तिचे फक्त खांदे उडविले.

सायली गोंधळली आता आईला काय सांगायच म्हणून. मग जियाच बोलली.

“ते काल जरा मच्छर आले होते. ती बेडरुमची खिडकी उघडली होती न म्हणून.” जिया

“चल गं, मच्छर चावल्यावर एवढे लाल रॅशेस नाही येत” सायलीची आई एवढ्या कॉन्फिडन्स ने बोलतेय म्हटल्यावर विजय आणि सायली त्यांच्याकडे बघतच राहीले. शेवटी त्यांचही लव्ह मॅरेज होत न बाबा.

सायलीच्या आईने विजयकडे बघताना त्यांच लक्ष विजयच्या खांद्याजवळ गेल. आता त्या विजय कडे बघत आहेत म्हटल्यावर सायली आणि आणि जिया दोघी विजय कडे बघायला लागल्या. तशी सायली आंघोळीला पळत सुटली. जियानेही आतल्या रुममध्ये कल्टी मारली. सायलीची आई पण हसतच किचनमध्ये गेली. विजय मात्र गोंधळला. मग त्याने मोबाईलमध्ये कॅमेरा ओपन करुन पाहील तर त्याच्या गळ्यावर सायलीची टिकली होती. मग त्याची ट्युब पेटली की सायलीच्या आईला सगळ काही समजले आहे.

पुर्ण नाश्ता होईपर्यंत विजयने त्याची मान काही वर केली नाही. सायली तर तिच्या रुममधुन बाहेरच आलीच नाही. जिया आणि सायलीची आई मात्र विजयकडे बघुन गालातल्या गालात हसत होते. विजय पटकन नाश्ता आटपून शॉरुमवर जायला निघाला.

“ओ जावईबापु” सायलीच्या आईच्या तोंडातुन पहील्यांदा असा शब्द ऐकला तोही खोडकर टोन मध्ये.

विजय थांबला पण मान वर करून बघेल तर शप्पथ. त्याला वाटल का आता त्या ओरडतील म्हणून. त्याने मनाची तयारी करुन घेतली होती. त्या विजय जवळ गेल्या आणि त्यांचा हात पुढे केला. विजय गोंधळला.

“ते माझ्या लेकीची टिकली द्या न. नाहीतर पुर्ण शोरुममध्ये ती मच्छर चावल्याचा गोंगाट घालेल.” सायलीची आई त्यांच्या हसु दाबत बोलत होत्या.

विजय त्याच्या गळ्यावरची टिकली काढायला विसरलेला होता. त्याने ती पटकन काढुन दिली आणि तिथून पळाला.

तो गेल्यावर जिया आणि सायलीची आई जोरात हसायला लागल्या.

थोड्यावेळाने जियानेही तिच आटपून तिच्या जॉबवर निघुन गेली. मग सायलीची आई सायलीच्या रुममध्ये गेली. जी तिच्या लाल झालेल्या रॅशेसवर क्रिम लावत होती. सायलीची आई तिच्या जवळ गेली. तिच्या हातातून ति क्रिम घेतली आणि तिच सायलीला ती क्रिम लावु लागली. सायली गडबडली. पण मग ती काहीच बोलत नव्हती मग सायलीला कसरतीचे व्हायला लागल होत. क्रिम लावुन त्या परत जाणार तोच सायली हळुच बोलली.

“सॉरी न आई” सायलीच सॉरी ऐकुन तिच्या आईला हसु आल होत. पण मग तस त्यांनी दाखवल नाही. त्या सायलीकडे वळल्या. सायली मान खाली घालुन ऊभी होती.

“हे बघ मी अस नाही बोलणार ती तु चुकली आहेस. तुमचा साखरपुडा झालाय. पण मग भावनेच्या आहारी पण नका जाऊ. तुमच नात उमलविण्यासाठी काय करायच ते तुमच तुम्हीच ठरवा. कारण तुमच नात किती मजबुत आहे ते फक्त तुम्हालाच माहीती आहे” सायली ची आई

सायली तिच्या आईकडे बघतच राहीली.

“हा एवढ नक्कीच बोलेन की मला तरी अस वाटत. नात उमलण्याची मजा जी लग्नानंतर आहे न ती आत्ता नाही. बाकी तु समजदार आहेसच.” सायलीच्या आईने सायलीला प्रेमाने समजावून सांगितले.

मग सायली ने ही तिच आवरायला घेतल होत. तिने तिचे नेहमीचा ड्रेस अंगावर चढवला. जेव्हा ती आरशासमोर जाऊन उभी राहीली ती जरा चमकलीच. कारण त्या टॉपचा गळ्यातून तिला पडलेले ते रॅशेस दिसत होते.

‘हे अस जर आरु समोर गेली. तर तिला तर आयतीच संधी भेटेल.’ सायली मनातच विचार करत होती. मग तीने तिचे कपडे बदलले.

ब-याच वर्षातून तीने तिचा ते ड्रेस काढला जो पुर्ण खांदा आणि गळ्याला झाकुन टाकायचा. वरुन तिने तिची ओढणी ही गळ्याला गुंडाळून घेतली होती. मग ती ऑफीसला गेली.

सायलीला अशा ड्रेस मध्ये बघुन आराध्याच तोंडच उघड राहील. ती पटकन सायली जवळ आली तिच्या गालाला हात लावला. पुढे ती गळ्याला हात लावणार तसा सायली ने तिचा हात पकडुन घेतला.

“काय गं बरी आहेस न??” आराध्या

“हो ग” सायली पटकन तिच्या टेबलवर निघुन गेली. आराध्याला तिच वागण आज वेगळच वाटत होत. तिच्या चेहऱ्यावर बराच ग्लो आला होता. ती स्वतःशीच हसत होती. मुख्य म्हणजे तीचा तो ड्रेस. जो तीला कधीच आवडला नव्हता. तोच आज घालुन आली होती.

आराध्या राहुलच्या वडिलांकडे गेली.

“बाबा मला सायलीच काही खर दिसत नाहीये. ती वेगळीच वागत आहे” आराध्या

मग राहुलच्या वडीलांनी पण सायलीच निरीक्षण केल. त्यांना पण ते जाणवल.

इकडे सायली मात्र तिच्याच धुंदीत होती. सकाळचे ते क्षण आठवून स्वतः लाजत होती. हसत होती. एवढंच काय तिच तर आज कामामध्ये पण लक्ष नव्हत. तिला एका मेलची प्रिंट मारायला सांगीतली तर तीने पुर्ण जी मेलच्या इनबॉक्सचीच प्रिंट मारली होती.

आराध्या सायलीच्या वागण्याला वैतागली. तिने डायरेक्ट सायलीच्या आईला फोन लावला.

“मावशी आज काय दिल होत तु नाश्त्याला. किती विअर्ड वागतेय ती” आराध्या

“मी काहीच वेगळ दिल नाहीये. तिने तिच तिचच घेतलय ते.” सायलीची आई पण कोड्यात बोलत होती. आराध्या अजुन चिडली. ‘या दोघी मायलेकींनाच झटका आलाय का" आराध्या मनातच विचार करत होती.

“मग तिने तो ड्रेस का घातलाय. ज्या ड्रेसला बघुन ती नाक मुरडवायची” आराध्या

“मच्छर” सायली ची आई एक उसासा घेत बोलल्या “आमच्या घरात न, सगळ पॅक अजुनही मच्छर आले होते. ते पण दिवसाढवळ्या.”

“मच्छर??” आराध्या

“मी अजुन काहीच सांगु शकत नाही. तिचा चेहरा पण वाचतेस न. मग शोध स्वतःच” एवढ बोलुन त्यांनी फोन कट पण केला. मग आराध्या विचारात पडली. ती आल्यापासून तिने काय केल होत ते. मग तिला आठवल की काल विजय त्यांच्या घरी होता. मग तीने जियाला फोन लावला.

“अरे आज चक्क मला फोन, तो पण तुझा??” जियाला जरा आश्चर्य वाटल.

“आता पुर्ण पॅक घरात पण मच्छर चावु लागले तर बोलावच लागेल न” आराध्या. तशी तिकडे जियाला तिच हसु सुटल होत.

“जियु, बोल.” आराध्या

“”नको, दोघ मला कुटतील धरुन” जिया

“दोघ??” आराध्या

“दादा न वहीनी” जिया अजुनही हसत होती.

“जिये निट सांग, नाहीतर मी येऊन कुटीन तुला” आराध्या चिडून बोलली

“ते वहीनीला न, आपला मोठ्ठा मच्छर चावलाय” जिया हसतच बोलत होती. मग आराध्याची ट्युब पेटली.

‘तरीच तिचा गळा एवढा पॅक करुन आलीये" आराध्या मनातच विचार करत होती. ती हळुच सायलीच्या केबीनकडे आली. दोघींना सेपरेट केबीन दिलेली होती. तीने आत डोकावले तर सायली ने तिची ओढणी काढुन ठेवलेली होती आणि तिला पडलेले ते रॅशेस मोबाईलच्या कॅमेरात बघुन गालातच हसत होती.

आराध्या बघतच राहीली. मग ती कुठलाही आवाज न करता सायली च्या मागे जाऊन उभी राहीली.

“अय्या सायु, हे कसले रॅशेस आहेत ग??” आराध्या एकदमच मोठ्याने बोलली.

सायली गडबडली. मोबाइल ही खाली पडला. 

“त… ते.. मच्छर. मच्छर चावलेत” सायली शांत रहाण्याचा प्रयत्न करत बोलली.

“हो का?? मी आजवर एवढे दिवस होती. मला कधी चावले नाहीत?” आराध्या “अरे हो, काल तर विजय पण होता न घरी??”

“नाही, त्यांनी काही नाही केल.” सायली गडबडीत बोलुन गेली.

“मग मी कुठे काय बोलली?? फक्त विचारत होती” आराध्या “अच्छा म्हणजे तोच मोठ्ठा मच्छर चावला वाटत.”

सायलीच्या गालावर परत लाली चढली. “गप ग, काहीही काय.” सायलीने तिची नजर चोरली.

“अच्छा, मग मी जियालाच विचारते” आराध्या

“हा विचार विचार, ती काहीच नाही सांगणार” सायली तो-यात बोलुन गेली. मग तीने जिभ चावली.

“सांगितलय तिने मला सर्व” आराध्या पण हसायला लागली आता. सायलीने तिचे दोन्ही हातांनी तोंड झाकुन घेतल.

“खुपच घाई झालीये वाटत हनीमूनची” आराध्या

“आरु जाम मार खाशील. आपण ऑफिसमध्ये आहोत.” तोंड झाकुनच सायली बोलत होती.

“ठिक आहे मग आपल्या ग्रुपवर बोलूया” आराध्या ने तिचा मोबाईल बाहेर काढला.

“आरे, ग्रुपवर तर अजीबात नाही” सायली तिचा मोबाईल पकडायला आराध्या जवळ आली. “ही काय गप्पा मारायची गोष्ट आहे का??”

“गप्पा मारायची तर नाही, पण चिडवायची तर नक्कीच आहे.” आराध्या “खुप हौस आहे न, फर्स्ट नाईट ला त्रास द्यायची. त्याचा हिशोब बाकी आहे.” आराध्या

“तुझ्या बेस्ट फ्रेंड सोबत तु अस करणार??” सायली इमोशनल होऊन बोलली.

“ते तुला आत्ता आठवल का?? त्या दिवशी नाही आठवल ड्रामा क्वीन.” आराध्याने तिच नाक ओढल. कारण ती इमोशनल ब्लॅकमेल करतेय हे आराध्या ला कळुन गेल होत.

“नको न आरु” सायली बारीक आवाजात बोलली.

तेवढ्यातच सायलीचा फोन वाजला होता. सायली ने पाहील तर टिनाचा होता. तिने तो स्पिकरवर टाकला.

“अरे यार तुने विजय को आज क्या दिया नाश्ता में?” टिना ही गोंधळून बोलत होती.

“क्यु क्या हुआ??” सायली

“अरे इतना समय हुआ है विजय को काम करते करते या. आज पहली बार उसेसे गलतीयाँ ही गलतीयाँ हो रही है. मुझे तो आज दो बार तेरे नाम से पुकारा है. जीस कागज की झेरॉक्स निकालनी है, उसे छोड बाकी सब की न जाने किती झेरॉक्स मार रहा है. अभी एक फॅमिली गाडी देखने आयी थी उसे बोल रहा था की, आपकी गाडी की सर्व्हीस नहीं हुई. चल क्या रहा है उसका. एक तो आज तेरे पापा भी नहीं है. सब लोग परेशान है.” टिनाच्या आवाजात वैताग होता. तर आराध्या पोट धरुन हसत होती. सायली ची तर बोलतीच बंद झाली होती.

विजयला ही राहुन राहुन सकाळचे क्षण आठवत होते. मध्येच हसत होता. खुप प्रयत्न केले त्याने त्याच मन कामात गुंतवण्यासाठी, पण थोड काम केल की त्याला तेच तेच आठवायच. शेवटी मिहीर ने त्याला बाहेर चहा प्यायला नेले. विजयने चांगले दोन तीन कप चहा पिला. मिहीर त्याला बघतच राहीला. तेव्हा कुठे साहेब शांत झाले होते.

“सुन रही है न??” टिना

“आज तो कुछ मत पुछ. यहा भी यही हाल है” आराध्या हसतच बोलली.

“कौन?? आराध्या?? बट हुआ क्या है दोनो को??” टिनाला पण आता इंटरेस्ट आला.

“उस बडे मच्छरने अपनी कोमल तितली को जो काट लिया है” आराध्या

“आरे नको न” सायलीने आराध्याच तोंड दाबण्याचा प्रयत्न केला.

“मिन्स” टिनाला अजुनही नव्हत कळल.

“अब क्या खुल के बताऊ?” आराध्या

तेव्हा कुठे टिनाच ट्युब पेटली होती. मग ती पण हसायला लागली. तिने हसतच फोन ठेवला. तसा सायलीने आराध्या गळाच पकडला.

“ठिक आहे. पण मग एवढीच घाई आहे तर लग्नासाठी त्या ऑर्डर ची का वाट बघतेय??” आराध्या

“त्यांच्या आयुष्यातील ती सगळ्यात मोठी सल आहे. जी दुर करुनच मला त्यांच्या आयुष्यात प्रवेश करायचा आहे. फक्त काहीच दिवस. आता जास्त वाट पहावी लागणार नाही.” सायलीच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य होत.

“तुझ्या इतकी हिम्मत मला तरी दाखवता नसती आली. इतक प्रेम करतेस त्याच्यावर??” आराध्या

“त्यांनीच तर शिकवल प्रेम म्हणजे काय. त्यापुढे तर हे काहीच नाहीये.” सायली.

आराध्याने सायली ला मिठीत घेतल.

“पण मग मावशी लवकरच आल्या याचा राग आला असेल न तुला??” आराध्याने सायलीला डोळा मारला.

“आरे” सायली ने तिला मारायची अॅक्शन केली. तशी आराध्या पटकन तिच्या कॅबीनमधुन बाहेर पडली.

सायली मग तिच्या खुर्चीवर बसुन विचार करु लागली होती. तिला तो दिवस आठवला जेव्हा विजयने तिला प्रपोज करायला बोलावल होत.

(सायली च्या वाढदिवसाच्या दिवशी)

“तु दादाला सोडुन जाणार तर नाही न आशु दि सारख??” जया

“नाही ग, अशी का बोलतेयस?? ति काय मुद्दाम सोडुन गेली का त्यांना??” सायली

“तस नाही. पण ते परत आले आहेत मी पाहील त्यांना” जयाने एका दिशेला बोट केल. “परत काहीतरी करणार आहेत.” जयाच्या डोळ्यात पाणी आल होत.

“कोण कुठे?? काय करणार आहेत?” सायली जयाने दाखवलेल्या दिशेने जायला सुरवात केली. तसा जयाने तिचा हात पकडला.

“अग फक्त बघुन येते मी पटकन” सायली

“नको न जाऊ. आशु दि पण अशीच बोलली होती. पण ती नंतर कधीच आली नाही.” जयाच्या डोळ्याला पाण्याची धार लागली.

“आता तस काही होणार नाही. मी आहे न” सायली कडक शब्दात बोलली. तिने खिडकीतुन पाहील तर एक गाडी दिसली. जयाने तिच गाडी असल्याच सांगीतल होत. मग सायली ने त्या गाडीचा नंबर नोट करुन घेतला आणि रुद्र ला फोन लावला.

“दादु, एका गाडीचा नंबर पाठवले. सिरीयस मॅटर आहे. ह्यांचा विषय आहे. त्या गाडीची सगळी माहिती काढ. आत्ताच शारदा आश्रमातून बाहेर पडली आहे.” सायली

सायलीच्या आवाजावरुन ती किती सिरीयस होती हे रुद्रला कळल होत. वरुन आजच्या दिवशी बाकीच्यांना त्रास नको म्हणून रुद्र परत त्याच्या ऑफिसवर निघून गेला होता.

“आज तर गेले ते. पण मी येईल नंतर तेव्हा मला सगळ खर खर काय ते सांगायच” सायली जयाला बोलली. मग जयाने हो मध्ये मान हलवली.

तिच्या कॅबीनच्या दरवाजाचा आवाज आला. तशी ती वास्तवात आली होती.

“चल ग लंचचा टाईम झालाय” आराध्या.

“हमममम चल.” सायली आणि आराध्या लंचसाठी निघुन गेल्या.

लंच झाल्यावर दोघी परत तिच्या कॅबीनमध्ये आल्या. आराध्याने पाहील ती सायली कुठल्यातरी विचारात होती.

“कुठल्या विचारात हरवलीस??” आराध्या

“त्या दिवशी जया बोलली नसती, तर ह्यांच्या मनातली सल मला कधीच कळली नसती” सायली

“हो न” आराध्या” दोघी परत त्याच विचारात हरवल्या.

आरती आणि सोनाली च्या साखरपुड्याच्या तयारीत सगळे व्यस्त असताना, एके दिवशी सायली आराध्याला सोबत घेत परत जयाला भेटायला गेली होती.

“हा आता बोल.” सायली ने जयाला आश्रमाच्या एका बाजूला घेतल होत.

“त्यावेळी न, दोन माणसे आणि एक मॅडम आल्या होत्या. आश्रमासाठी काहीतरी नवीन घेऊन आल्या होत्या. सगळ्यांनाच खुप आनंद झाला होता. मग एका दिवशी मी त्या माणसांच बोलण ऐकल होत. ते बोलत होते की, एकदा का प्रोजेक्ट पास झाला की सगळ त्या विजय वर टाकूया आणि येणारे पैसे घेऊन लगेच कल्टी मारुया. ते मी आशु दी दिला सांगीतल मग ती रागा रागात त्यांच्याकडे गेली होती. खुप भांडली त्यांना. पहिल्यांदा आम्ही आशु दी ला एवढ्या रागात बघत होतो. त्या बाईने तर आशुदीचा गळाच पकडला होता. मग आम्ही सर्व मुलांनी गोंधळ घातला. तेव्हा कुठे ते आशु दीला सोडुन पळाले. आशु दी पण त्यांच्या मागे पळाली. मी अडवल होत. पण ती खुप रागात होती नाही थांबली. ती जी गेली आलीच नाही परत.” जयाचे डोळे परत पाणावले.

एवढ सगळ ऐकुन सायली आणि आराध्या दोघी स्तब्ध झाल्या.

“त्या दिवशी प्रणाली ताई नेमकी नव्हती. ती जर असती न तर आशु दी आज आपल्यात असती” जया.

“प्रणाली??” आराध्या

“आशु दी ची बेस्ट फ्रेंड. ती असती तर तीने जाऊच दिल नसत आशु दी ला” जया

सायलीने जयाला मिठीत घेतल.

“मग आश्रमाच्या मॅडम, सर काहीच बोलले नाहीत??” आराध्या

“त्यांनी तर लगेचच त्यांचा प्रोजेक्ट रद्द केला होता. मग विजय दादाने बाकी तिघ दादांना सोबत घेऊन त्या माणसांना शोधुन काढत पोलिसांच्या हवाली केल होत. पण काहीच पुरावे मिळाले नाही. मग ते बाहेर पडले. ते त्या दिवशी आम्हाला परत दिसले होते.”

“प्रणाली त्यांना ओळखेल??” आराध्या

“हो, ति भेटली होती त्यांना” जया.

“ठिक आहे. तु नको काळजी करु. आम्ही आहोत न. काहीच नाही होणार.” सायली ने जयाला आश्वस्त केल.

मग सायली आणि आराध्या त्या आश्रमाच्या सरांकडे गेल्या. तिथुन तिने सगळी माहीती काढली.

पुढच्या काही महिन्यात सायली ने बाकी ग्रुप सोबत मिळुन सगळी माहीती मिळवली. रुद्र ने त्याची स्किल आणि एजंट मित्रांना कामाला लावून पुरावे जमा केलेले होते. रक्षाबंधननंतर प्रणाली सोबतही चांगलीच ओळख झाल्याने तिलाही भेटुन काही माहीती घेतली होती.

आधी काही पुराव्याच्या अभावी ते सुटले होते. तेच आता जास्त पुरावे मिळाले म्हणून अटक झालेले होते. त्यात असाही एक पुरावा होता की ज्याच्यामुळे सगळ्यांना शॉक बसणार होता. रुद्र ने तो बाकीच्यांना दाखवला नव्हता. तो पुरावा कोर्टात तर दाखल केला होता. पण बाकी कोणालाच सांगितला नव्हता. त्याला माहीती होत, जर का तो पुरावा बाकीच्यांना कळला तर विजयच्या ग्रुपने काय केल असत हे फक्त त्या देवालाच माहीती राहील असत.

सायली आणि आराध्या वास्तवात आल्या.

“फक्त काहीच दिवस. दादु बोलला होता अजुन एक पुरावा आहे जो की शेवटच्या दिवशी आपल्याला सांगणार आह़े.” सायली

“ठिक आहे” आराध्या

मग दोघी त्यांच्या त्यांच्या कामाला लागल्या.

कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी त्यांचा तो मच्छर च्या रॅशेसचा किस्सा सगळ्यांनाच समजलेला होता. मग सगळ्यांनी त्यांना चिडवुन हैराण केले होत.

क्रमशः

माझ्या सर्व बंधु आणि भगिनींना गुढीपाडव्याच्या कुप खुप शुभेच्छा

0

🎭 Series Post

View all