मागील भागात.
पुढच्या काही महिन्यात सायली ने बाकी ग्रुप सोबत मिळुन सगळी माहीती मिळवली. रुद्र ने त्याची स्किल आणि एजंट मित्रांना कामाला लावून पुरावे जमा केलेले होते. रक्षाबंधननंतर प्रणाली सोबतही चांगलीच ओळख झाल्याने तिलाही भेटुन काही माहीती घेतली होती.
आधी काही पुराव्याच्या अभावी ते सुटले होते. तेच आता जास्त पुरावे मिळाले म्हणून अटक झालेले होते. त्यात असाही एक पुरावा होता की ज्याच्यामुळे सगळ्यांना शॉक बसणार होता. पण रुद्र ने तो बाकीच्यांना दाखवला नव्हता. तो पुरावा कोर्टात तर दाखल केला होता. पण बाकी कोणालाच सांगितला नव्हता. त्याला माहीती होत, जर का तो पुरावा बाकीच्यांना कळला तर विजयच्या ग्रुपने काय केल असत हे फक्त त्या देवालाच माहीती राहील असत.
सायली आणि आराध्या वास्तवात आल्या.
“फक्त काहीच दिवस. दादु बोलला होता अजुन एक पुरावा आहे जो की शेवटच्या दिवशी आपल्याला सांगणार आह़े.” सायली
“ठिक आहे” आराध्या
मग दोघी त्यांच्या त्यांच्या कामाला लागल्या.
कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी त्यांचा तो मच्छर च्या रॅशेसचा किस्सा सगळ्यांनाच समजलेला होता. मग सगळ्यांनी त्यांना चिडवुन हैराण केले होत.
आता पुढे.
दिवसांनी परत त्यांच्या जाण्याचा वेग पकडला. ग्रुपचे वाढदिवस पण त्यांच्या सारखे युनिक होते. राहुल, आरती आणि सोनाली यांचे एकाच महिन्याच्या सुरवातीला एक दिवसा आड एक असा होते. तर महेश आणि संदेश तर एकमेकांचे गुण घेत त्याच महिन्याच्या शेवटच्या ताकशेला एकतच आले होते. मग चे सगळे त्यांचा वाढदिवस एकत्रित साजरा करायचे. त्याच्या पुढच्या महिन्यात प्रणाली आणि आराध्याचा रहायचा.
पण पुढचा महीना हा खुप काही बदल घेउन येणारा ठरणार होता. आता सायली आणि विजयच्या लग्नाचा विषय सुरू झाला होता. दोघांनी तर आधीच सांगीतलेले होत की त्याना कोर्ट मॅरेज करायच होत. पण मग बाकींच्यानी किमान हळदीचा कार्यक्रम तरी करुया म्हणून दोघांना मनवल होत.
जस त्या केसच्या फायनल ऑर्डरची तारीख ठरली तशी सायलीने ही विजय सोबत मॅरेज रजीट्रार ऑफीसला जाऊन एक महिन्याची नोटीस दिली. म्हणजे त्या केसच्या ऑर्डर च्या पुढच्या आठवड्यातच दोघांच रजिस्टर मॅरेजची तारीख भेटली होती.
ती केस चांगलीच गाजली होती. कारण फक्त एकच संस्था नाही तर देशातल्या तब्बल पन्नासहून अधीक संस्थांना त्यांनी गंडा घातलेला होता. नाव बदलून करत असल्यामुळे ते कोणाला कळुन आलेल नव्हत. पण जेव्हा रुद्र ने ह्यात हात घातला, त्याने त्याच्या एजंट मित्रांच्या मदतीने सगळीच पाळमुळ खणून काढली होती. ही अशी माणस कोणत्याही आतंकवाद्यापेक्षा कमी नसतात जे लपुन राहुन आपल्याच माणसांना हानी पोहोचवतात.
तो दिवस उजाडला. सायलीने अश्विनी च्या आईला आधीच बोलावून घेतले. ति विजयच्या घरीच थांबली होती. मग सायली सकाळी विजयच्या घरी पोहोचली होती.
“काय ग?? आज सकाळीच??” विजय
“बोलली होती न तुम्हाला की आज बाहेर जायच आहे ते. चला आराध्या गाडी घेऊन आली आहे” सायली.
“ती का आलीये गाडी घेऊन??” विजय “आणि जायच कुठे आहे??”
“तुम्हाला काय करायच आहे, सोबत चालायचे काम करा” सायली.
मग सायली, आराध्या, विजय आणि अश्विनीची आई सगळे निघाले होते.
थोड्याच वेळात ते कोर्टात पोहोचले. अश्विनीची आई गोंधळली. विजयचा चेहरा मात्र निर्विकार होता. त्याचा ग्रुप तिथे आधीच येऊन पोहोचला होता.
सायली त्या सगळ्यांना ती केस चालु असलेल्या कोर्ट रुममध्ये घेऊन गेली.
सायली ने विजयचा आणि अश्विनीच्या आईचा हात धरला.
“तुमच्या मनातली आजवरची सगळ्यात मोठी सल आज दुर होतेय.” सायली ऑर्डर करण्या-या न्यायाधीशांकडे बोट करत बोलली.
ते चौघ माणस आरोपीच्या पिंजऱ्यात उभे होते. त्यांना शिक्षा सुनावायच काम चालु होत.
अश्विनीच्या आईला अश्रु रोखण कठिण होऊ लागल. त्यांचे डोळे वाहु लागले. विजय अजुनही निर्विकार होता. त्याने फक्त त्याचे डोळे समाधानाने मिटले. त्याच्या मनाचा ठाव आज कोणालाही येत नव्हता.
सगळे बाहेर आले. विजयच्या चेहऱ्यावर कुठलीच काहीच प्रतिक्रिया नव्हती.
“दादा बोलला होता, एक पुरावा तो नंतर दाखवणार आहे म्हणून” प्रणाली.
“त्याची काही गरज नाही.” विजय
“म्हणजे??” सायली
“त्याला सगळ माहितीये” रुद्र मागुन येत बोलला.
सगळे गोंधळले.
“विजय आहे तो. जस त्याला कळल केस कि ओपन झालीये, त्याने सरकारी वकिलांची ओळख काढुन सगळीच माहीती ठेवली होती.” रुद्र
“चला, घरी जाऊन बोलुया.” विजय निघणार तोच प्रणाली बोलली.
“मला शेवटचा पुरावा ऐकायचा आहे. कारण जन्मठेपेची शिक्षा कोणालाही भेटत नाही. अशा केसमध्ये तर नाही.” प्रणालीच्या आवाजात करारीपणा होता.
विजयने तिचे हात पकडले, “प्लिज, घरी जाऊन बोलुया.”
“एकदा सांगीतल न तुला. मला आत्ताच ऐकायचा आहे.” प्रणालीचा आवाज चढला.
विजयला जाणवल तिला काही कुणकुण लागली आहे त्या पुराव्याची. कारण कोर्ट रुममध्ये असताना, काही माणसांच्या तोंडुन प्रणाली ने ऐकल होती की त्या माणसाने एका मुलीच्या अंगावर गाडी घातली होती म्हणून. तेव्हा प्रणालीला जरा डाऊट आला होता.
आता तर सोनाली आणि आरतीही प्रणालीच्या बाजुला येऊन उभ्या राहिल्या.
“विजय, प्रणाली विनाकारण आवाज नाही चढवणार. बोल लवकर” सोनाली
विजयने एक दीर्घ श्वास घेतला. “अश्विनीचा झालेला अपघात, हा अपघात नव्हता. रागारागात झालेला घात होता.” विजय
“काय??” सगळे एकदाच ओरडले.
“त्या मॅडमला जस कळल की आशुला सर्व समजल आहे, तेव्हा त्यांनी त्यांच्या चौथ्या साथीदाराला सांगीतल होत. जो त्याच्या गाडीने आश्रमाकडेच येत होता. मग रस्ता ओलांडताना त्याला आशु दिसली जी माझ्याकडे येत होती. त्याला काहीच सुचल नाही. मग रागारागाने त्याने डायरेक्ट गाडी तिच्या….” विजयला पुढच बोलावल गेल नाही.
“म्हणजे त्यांनी आशुचा जीव घेतला?” प्रणालीच्या चेहऱ्यावर खुप राग दिसत होता. सोबत डोळ्यात अश्रू.
अश्विनीची आई तर शॉक मध्येच गेली. बाकी ग्रुपच डोक लागलीच गरम झाल. सायली पण शॉक मध्येच होती की तिने नक्की काय ऐकल.
तेवढ्यातच त्या चौघा आरोपींना कोर्टातुन बाहेर आणल होत. तशी प्रणालीची धडपड सुरू झाली होती, त्या आरोपींना मारण्यासाठी जाण्याची. विजयने तिला घट्ट पकडून ठेवल होत.
“विजय सोड मला. त्यांनी आशुचा जीव घेतलाय मी नाही सोडणार त्यांना.” प्रणाली जोर जोरात ओरडुन बोलत होती.
बरीच गर्दी होती बाहेर. प्रणालीचा तो आवेश पाहुन ब-याचश्या लोकांच्या डोळ्यात पाणी आल होत.
सोनालीला रुद्रने तर आरतीला आराध्याने पकडुन ठेवल होत. दोघीही सुटायचा प्रयत्न करत होत्या. बाकी तिघ जाणार तोच विजय गरजला.
“खबरदार पुढे पाऊल टाकाल तर. मला शेवटच इथे बघाल.” विजय
तसे तिघ जागीच थांबले. राहुल विजय कडे आला.
“अरे त्यांनी जीव घेतलाय आशुचा आणि तु असा शांत कसा??” राहुल रागातच विजयची कॉलर पकडत बोलला.
“तुम्हाला तो शांत आहे हे दिसला, पण ते चौथा आरोपी जो अटक होताना चालत गेला होता, तो आता कुबड्या घेऊन आलाय हे नाही दिसल का??” रुद्र
सगळ्यांनी त्या चौथ्या माणसाकडे पाहीले. तो कुबड्या घेऊन चालत होता. मग त्यांनी रुद्र आणि विजय कडे पाहीले. मग रुद्र ने बोलायला सुरवात केली.
“जस ह्याने सरकारी वकीलांकडुन माहीती काढली तस मला फोन केला. मग चौकशीच्या नावाखाली मी त्याला बाहेर आणले. एका ठिकाणी नेऊन विजयने पण त्याच्या त्याच पायावरच गाडी चढवली होती. ज्या पायाने त्याने गाडीचा रेस पॅडल प्रेस केल होत.” रुद्र
“त्यांचा जीव घ्यायला दादाला वेळ नसता लागला, तुम्हाला चांगलच माहितीये. त्याला काहीच कठीण नव्हत ते. पण मग तुम्ही आशु चे शब्द विसरले का?? जन्म आणि मृत्युचा अधिकार फक्त त्या परमेश्वराचा आहे. तोच मोडणार होते का तुम्ही??” विजय
सगळे शांत होतात. पण डोळ्यातले अश्रू थांबायचे नाव घेत नव्हते. प्रणालीने अश्विनीच्या आईला जाऊन मिठी मारली. मग सोनाली आणि आरतीही बिलगल्या. सगळयांना अश्रु रोखण कठिण जात होत.
विजय सायली जवळ गेला. तिचा हात हातात घेतला.
“सॉरी ग, तुला माझ्यामुळे खूप त्रास झाला. सगळ माहीत असूनही तुला काहीच सांगता नाही आल. ह्यांना जर कळल असत तर ह्यांनी काय केल असत ते तु आत्ता बघीतलसच.” विजय
सायलीला तर काय बोलाव तेच सुचत नव्हत. तिने विजयला हलकच मिठीत घेतल. विजयच्या आजच्या मिठीत तो ऑकवर्डनेस नव्हता. त्याच सायलीला समाधान वाटल.
“मला आजचा दिवस देशील??” विजय. सायलीने होकारार्थी मान हलवली. सगळे घरी आले. सगळेच शांत होते.
“खुप खुप धन्यवाद पोरी. आज तुझ्यामुळे ते आत गेले.” अश्विनीच्या आईने सायलीचा हात हातात घेतला.
“मी एकटीच नव्हती. हे काय सगळे होते. दादा होता आणि आमच्यापाठी आमचे सरकार” सायली सगळ्यांकडे हात करत बोलली.
“आम्ही त्याला सरप्राईज देणार होतो, तर त्याने आम्हालाच दिल” राहुल.
“चला, झाल गेल ते सोडुन द्या. चला चहा टाका पटकन. आजचा एवढा चांगला दिवस आहे. चला पावभाजी करुया” विजयने सगळ्यांना कामाला लावले. सोनालीने चहा टाकला. तोवर संदेश आणि महेश भाज्या घेऊन आले. तर राहुल पाव घेऊन आला. बाकी मुलींनी पावभाजीची तयारी केली.
चहा घेऊन सगळेच कामाला लागले. आजच्या मिळालेल्या शॉकमधुन सगळ्यांना बाहेर पडायला वेळ लागणार होता. म्हणून विजयने त्यांना कामात बिझी करत होता. त्याच्या मनातही खुप वादळ उठल होत. जेव्हा त्याला त्या सरकारी वकीलांकडुन ही घातपाताची माहीती भेटली होती. तो ही रागारागाने त्या माणसाचा जीव घ्यायला निघाला होता. पण अश्विनीच्या विचारांनी त्याला तस करण्यापासून परावृत्त केल होत. म्हणून त्याने फक्त त्या माणसाच्या पायावर गाडीच चाक घातलेल होत. त्यात त्या माणसाचा पाय मोडला होता. विजयचा त्याच्या मनावर असलेला कंट्रोल बघुन रुद्र ही भारावून गेलेला होता. पण तस बाकीच्या ग्रुपच नव्हत. त्यासाठीच विजयने रुद्रला मनाई केलेली होती, त्यांना तो शेवटचा पुरावा सांगायला.
संध्याकाळ होत आली होती. पावभाजी खाऊन सर्वजण ब-यापैकी सावरले होते. सगळ्या ग्रुपने रुद्रचे आभार मानले होते. भले त्याला आवडत नव्हत तरी. खासकरुन अश्विनीची आईने रुद्र समोर हात जोडले होते.
“तुमच्यामुळे आज माझ्या मुलीच्या गुन्हेगाराला शिक्षा मिळाली. तुमचे कितीही आभार मानले तितके कमीच” अश्विनीची आई.
“असे होत नका जोडु, बर नाही दिसत ते. आमच्या कामाचा भाग आहे तो.” रुद्र बोलुन निघुन गेला. बाकी ग्रुपही निघाला होता. सगळ्यांना विजयच टेन्शन आल होत. कारण त्याच्या दुखा:ची खपली पुन्हा ताजी झाली होती.
“तुम्ही माझ टेन्शन नका घेऊ, मला फक्त आजचा दिवस द्या” विजय सगळ्यांना टेन्शन मध्ये बघुन तो बोलला होता.
सगळ्या ग्रुपने त्याला मिठी मारली.
“माझ काही चुकल असले तर सॉरी” सायली विजय जवळ जात बोलली.
“वेडाबाई” विजयने सायली ला मिठीत घेतल. सायलीला तो खुप मोकळ झाल्यासारखा भासला होता.
सगळे निघुन गेले. विजयने आज जियाला आणि अश्विनीच्या आईला सायलीच्या घरी जायला सांगितले होते.
विजय आज अश्विनीच्या घराकडे गेला होता. ब-याच महिन्यांनी तो तिकडे गेला होता. तिच्या रुममध्ये जाऊन त्याने स्वतः ला बंद करुन घेतल होत.
शेजारच्या मावशींना टेन्शन आल होत. कारण मागच्या वेळेस तो जेव्हा गेला होता तेव्हा तब्बल पंधरा वीस दिवसांनीच त्याला बाहेर काढण्यात यश आल होत. त्या राधीकाला फोन लावणार तोच त्यांना राधीकाचे शब्द आठवले. मग त्यांनी सायलीला फोन लावला होता. मग सायली ने आज जे झाल ते थोडक्यात त्यांना सांगीतल.
“मावशी नका काळजी करु, त्यांनीच फक्त आजच्या दिवसाचा शब्द दिलाय आम्हाला” सायली
तेव्हा कुठे त्या मावशीची समाधानाने फोन ठेवला होता. सायलीच फोन वरच बोलण तिच्या आई वडीलांनी ऐकल होत. वरुन जिया आणि अश्विनीची आई अशा अचानक घरी आल्या होत्या. नाही म्हटले तरी त्यांचा चेहरा जरा निस्तेज झालेला होता.
“काय झालय नक्की??” सायलीच्या आईने काळजीने विचारल होत. मग सायली ने त्यांना सगळच सांगीतल. ते ऐकून दोघही स्तब्ध झाले होते.
“काही पैशांसाठी त्यांनी एका मुलीचा बळी दिला??” का तर त्यांची चुक बाहेर पडली असती म्हणून??” सायलीचे वडील रागात बोलले. “पण मग तु मोहीत्याला सांगीतल असत न?? तुम्ही तुमचा जीव का धोक्यात घातला??”
“त्यांची पण खुप मदत झाली. कारण पॉलीटीकल प्रेशर पण टाकुन पाहीला होता दादावर. त्याची परत बदली करणार होते. ती काकांनी त्यांच वजन दाखवुन थांबवली.” सायली
सायलीच्या आईने अश्विनीच्या आईला मिठीत घेतल.
“शेवटी त्यांना शिक्षा भेटली न, आता नका रडु” अश्विनी च्या आईचे डोळे पुसले. “अश्विनी वरुन बघत असेल तर तिला किती वाईट वाटेल.”
अश्विनीच्या आई जाऊन फ्रेश होऊन आल्या. तोवर आज जियाने चहा बनवुन आणलेला होता. चहा घेऊन सगळेच फ्रेश झाले होते.
जसजस सगळ्यांच्या घरी कळत होत, तसतस सगळ्यांनाच शॉक बसत होते. सोनाली च्या वडीलांनी सगळ्यांनाच त्यांच्या घरी बोलावून घेतले होत. कारण विजय परत त्याच खोलीत गेला हे त्यांना कळल होत.
“काय गरज होती हे असे उपद्व्याप करायची?? आता विजय परत त्याच खोलीत गेलाय. आता काय करणार तुम्ही?? काय मिळवल तुम्ही विजयची जखम ताजी करुन??” सोनालीचे वडील चिडुन ग्रुपलाच भांडत होते.
“बाबा त्याने, फक्त आजचाच दिवस मागितला आहे आमच्याकडे. उद्या येईल तो बाहेर” सोनासी
“आणि नाही आला तर??” सोनालीचे वडील “आणि तु ग?? सगळ मागे सारुन त्याने तुला स्विकारले होत न. मग पुन्हा कशाला त्या आठवणी जाग्या केल्या त्याच्या?? सायलीकडे बघुन बोलले.
“तिच तर सल होती त्यांच्या मनात, जी त्यांना त्यांच्या आयुष्यात पुढे जायला देत नव्हती. त्या दिवशी त्यांच्याकडून ते भावनेच्या भरात घडलेल होत. भले त्यांनी मला पुर्ण स्विकारले आहे. पण तीच एक सल काही वेळेला त्यांना माझ्याकडे येण्यापासून रोखत होती. की सगळ माहीती असुनही अश्विनीला न्याय मिळवून देऊ शकलो नाही. आज त्यांच मन पुर्ण पणे मोकळ झालेल मला जाणवल. उद्या येतील ते बाहेर.” सायली निश्चयाने बोलत होती.
“आला तरच चांगले होईल” सोनालीचे वडील.
“येणार, नक्की बाहेर येणार. मला माझ्या प्रेमावर पुर्ण विश्वास आहे” सायली बोलुन निघुन गेली.
सगळ्यांनीच मनोमन तो बाहेर यावा म्हणून प्रार्थना केली आणि आपआपल्या घरी निघुन गेले.
दुसऱ्या दिवशी सकाळी राधीकाचा फोन वाजला.
“खर बोलताय तुम्ही मावशी??” राधीकाच्या डोळ्यात पाणी साचले.
“हो, खर बोलतेय मी. आज ब-याच दिवसांनी विजयने मला त्या नावाने हाक मारली. आज मला तो आधी सारखा मधुबाला बोलला. आपला आधीचा विजय आपल्याला परत भेटलाय.” मावशी
राधीकाने दिर्घ श्वास घेतला. इतक भरुन आल होत तीला. तिने मनोमनच सायलीचे आभार मानले.
इकडे सायलीच्या मोबाईलवरही मेसेज आला.
“गुड मॉर्निंग सरकार” विजय. तो मेसेज पाहुन सायलीच्या चेह-यावर स्माईल आली. ती काही रिप्लाय करणात तोच त्याचा दुसर मेसेज येऊन धडकला. तो मेसेज वाचुन सायली गोंधळली.
“लव्ह यु ब्युटिफुल, वान्ना सम लॉंग ड्राईव्ह??” विजय. पुढे खुप सारे किसवाल्या स्मायली होत्या.
सायलीला टेन्शन आल की मेसेज कोणी केला. कारण विजयने असे मेसेज कधीच केलेल नव्हते. मग तीने सोनालीला फोन करुन विजयच्या मेसेज बद्दल सांगीतल.
“व्हॉट, विजयने असा मेसेज केलाय??” सोनाली
त्या दिवसी नेमकी आरती आणि सोनाली त्यांच्या काही कागदपत्रांच्या कामासाठी राहुलच्या वडीलांच्या ऑफिसला आल्या होत्या. त्यामुळे आराध्या ही सोबत होती.
सायलीच बोलण ऐकुन आरती आणि सोनाली चे डोळे पण पाणावले.
“आपला विजय आपल्याला परत मिळाला” आरतीने सोनालीला मिठी मारली
“म्हणजे??” सायली
“तु तर फक्त आता त्याला छेडूनच दाखव ग. आजपासून तुला वेगळा विजय दिसेल बघ. तुला तुझा विजय आज १००% भेटलाय. जा सिमरन जा, जीले तेरी जिंदगी” सोनाली हसतच तिचे डोळे पुसत बोलली. कितीही भावनीक होऊ द्या नौटंकी सोडेल ती सोनाली कुठली.
सायलीने हसतच फोन ठेवला.
“आता सांगाल निट काय आहे ते” आराध्या
“अग जाम कार्टुन होता तो. एवढा रोमांटिक होता न, बास रे बास. अश्विनी गेल्यापासून त्याने त्याच ते जगणच सोडल होत. जे काही तो हसत बोलत होता, ते वरवरच होत. फक्त आम्हाला दाखवण्यापुरती. त्याला वाटले आम्हाला काही कळत नाही. पण सगळ कळत होत. ते आजपासुन परत सुरू झालय. त्याने शेजारच्या मावशींना पण आज मधुबाला नावानेच हाक मारली असेल.” आरती
तेवढ्यात आरतीला राधीकाचा फोन आला.
“आरती, आपला विजु आपल्याला परत भेटला ग. मावशींनी फोन केलेला. सकाळीच म्हणे मधुबालाच्या हातचा चहा प्यायचा आहे.” राधीका
“म्हणजे त्या दिवशी आशुच्या आईने तुमच्या सांगीतलेल्या करामतींचा मास्टरमाईंड विजयच रहायचा न?” आराध्या
“हो” सोनाली हसत बोलली “आमच्या खांद्यावर बंदूक ठेवुन करायचा तो सगळ.”
तेव्हा कुठे आराध्याला खर वाटल होत.
विजय रात्रभर तिच्या रुममध्ये बसुन होता.
“तुला दिलेल वचन आज पुर्ण केल. तुझ्या गुन्हेगारांना आज शिक्षा झालीये.” विजय अश्विनीच्या फोटो समोर उभा राहून बोलत होता.
नंतर तो, तिथेच खुर्चीवर बसला. बसल्या बसल्या तिच्या आठवणीत झोपून गेला होता. सकाळी त्याला एकदम फ्रेश वाटत होत. एकदम मोकळा झाला होता तो.
“अरे ओ मधुबाला जी. जरा चहा भेटेल का??” विजय त्या मावशींच्या दारात उभा राहून बोलला. मावशी तर दोन क्षण गोंधळल्याच. पण मग त्याच ते जुन रुप पाहुन त्यांना खुप बर वाटल होत.
तिथुन चहा घेऊन तो तडक सायलीच्या घरी निघाला.
सायलीच्या घरी सायलीची आई आणि अश्विनीची आई किचनमध्ये होत्या.
नेहमीप्रमाणे सायली ने विजयने बेल वाचवायच्या आत दार उघडल होत. तसा तो तिच्या जवळ गेला. तिला आतल्या भिंतीला टेकवत तिला अजुन जवळ घेतल. सायली बावरली.
“दिवसाची सुरवात इतकी गोड व्हावी
तु दिसताच, त्या दुखा:नीही पाठ फिरवावी..
विजयने तिच्या गालावरुन हात फिरवला. सायलीला आत्ताचा विजय खुप वेगळा भासला. विजयने तिला तिच बोट वर धरत गोल फिरवली. तिला परत जवळ ओढल तशी सायली विजयच्या छातीवर आपटली.
“सगळ काय दारातच करायच आहे का?? जियाने दोघांना पाहील.
सायली त्याच्यापासुन दुर व्हायला बघत होती. पण विजय आज सोडतच नव्हता.
“अहो, सोडा. दारात आहोत आपण.” सायली बारीक तोंड करत बोलली.
मग विजयने तिला सोडल आणि डायरेक्ट किचनमध्ये गेला.
“हाय ब्युटीफुल्स” विजय दोघ्या आईंना बघुन बोलला. अश्विनीच्या आईला तर सवय होती. पण सायलीच्या आईला जरा वेगळ वाटल होत.
“आता खरे रंग बघा तुमच्या जावयाचे.” अश्विनी च्या आईने सायलीच्या आईच्या कानात सांगितले.
“चला एक एक चहा होऊन जाऊ द्या” विजय
“आत्ता तुझ्या मधुबालाच्या हातचा घऊन आला असशील न?? मग परत परत काय आहे??” अश्विनीची आई त्याला दटावत बोलली. “एवढा चहा चांगला नाही.”
“मधुबाला??” सायलीची आई
“ते बाजुच्या मावशींना प्रेमाने बोलतो तो.” अश्विनी ची आई
“पण मला माझ्या सासुबाईंच्या हातचा प्यायचा आहे.” विजय सायलीच्या आईजवळ गेला. फुल अॅक्टिंग करत बोलला.
“मग पाजाल न तुमच्या हातचा चहा, या पामराला” विजय
तशा दोघी हसल्या.
“जा बसा, येते मी घेऊन” सायलीची आई हसत बोलल्या.
विजय बाहेर जाऊन बसला. मग सायलीकडे प्यायला पाणी मागीतल. सायली विजयला पाणी देत असताना, विजयने तिला हाताला पकडुन त्याच्या मांडीवर बसवल. सायली गडबडली.
“अहो काय चाललय तुमच??” सायली त्याच्या मांडीवरून उठवण्यासाठी धडपडत होती.
“तुच बोलली होतीस न, माझा हक्क आहे म्हणून “ विजयने सायलीला सोडल आणि हसायला लागला. सायली अजुनही बावरुन बघत होती विजयला.
“चल, आज सुट्टी टाकलीये, मस्त फिरुन येऊ” विजय “आई चालेल न, तुमच्या मुलीला डेटवर नेल तर??” विजयने सायलीच्या आईला चहा घेऊन येताना पाहिले होते. मग त्यांच्याकडे बघुन तो बोलला होता.
सायलीने तर डोळे वटारले विजय कडे बघुन. “अहो, काहीही काय बोलताय आई समोर” सायली ला खुप लाजायला झाल होत.
“आता तुमची होणारी बायको आहे, मग न्या कि. विचारताय काय??” सायली ची आई ही मस्करी च्या मूडमध्ये आल्या.
“तेच न, झाली नाही न अजुन. सध्या तरी पहीला अधिकार तुमचा आहे. मग तुम्हाला विचारल्याशिवाय कस नेऊ?” विजय चहा घेत बोलला. “काय ओ बाबा, बरोबर न??” सायलीचे वडीलही आवरुन बाहेर आलेले होते.
“हो रे बाबा, तु कधीच चुकीच बोलत नाहीस.” सायली चे वडील. “तुझ्या समोर कोणी बोलण्यात जिंकलय??”
“बर बाबा, न्या तिला. आमची पुर्ण परमिशन आहे. फक्त मच्छर नका होऊ.” सायलीची आई सायलीकडे बघत बोलली.
तशी सायली लाजतच तिच्या रुममध्ये आवरायला गेली.
“मच्छरच काय आहे ते??” सायली चे वडील सायलीच्या आईला विचारत होते.
इकडे विजयला ठसका गेला.
“अरे हळु न, दिलीये परमिशन तुला. आरामात चहा पी मग जा” सायलीचे वडील.
विजय आणि सायली दोघही बाहेर पडले. विजय तिला माळशेज घाटात घेऊन गेला. थंडीचे दिवस असल्याने वातावरणात बराच गारवा होता. म्हणून त्याने आज त्याची मोठी गाडी काढलेली होती. तिथे पोहोचल्यावर नेहमी बसतो त्या ठिकाणी दोघे जाऊन बसले.
एकदम शांत वातावरण होत. समोरच्या दरीत खुप सारे धुके दाटले होते. निसर्गाच्या त्या रुपात मन एकदम प्रसन्न झाल होत दोघांच.
“मला कधी एकांत हवा असला न की मी इथे येतो.” विजय
सायली ने त्याचा हात पकडला. सायली विजयच मन वाचुन गेली होती. तीने होकारार्थी मान हलवली मग विजय पुढे बोलु लागला.
“माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी हतबलता तु दुर केलीस. ती माणस सुटली होती म्हणुन पंधरा दिवस मी स्वतःला कोंडुन घेतल होत. माझ्यामुळे सगळ्यांनाच खुप त्रास होतो. तुलाही झाला. त्यासासाठी खरच सॉरी. दादाला पण थँक्यू बोललेल आवडत नाही. मग त्याला काहीच बोललो नाही मी. त्याला केला होता मेसेज मी तसा, पण त्याने मलाच झापल.” विजय जरा हसला. सायली फक्त ऐकत होती.
“म्हणाला परत थँक्स म्हणालास तर काचेच सांगुन देईल मी” विजय भावनेच्या भरात बोलुन गेला.
“काचेच??” सायली
“त्याला वाटतय की हातात काच घुसलेला तुला माहीती नाहीये ते” विजयने त्याची बाजु सावरली.
“कशी आणि किती घुसली होती, हे पण माहितीये मला” सायली लटक्या रागात बोलली. तशी विजयची बोबडीच वळली.
“तुम्हाला समाजसेवा करायची आहे खुशाल करा. पण तुमचा जीव फक्त माझा आहे कळल.” सायली ने विजयची कॉलर पकडली. “ती पत्रकार जेव्हा आरुच्या घरी गेलेली न तेव्हा मी तिथे ते ऐकल होत.”
मग तिथे दोघांनाही मस्त चहा पिला. खुप सा-या गप्पा मारत होते. विजयने त्याच सगळ मन मोकळ केल होत.
“एक विचारु??” सायली
“हमममम, विचार न. अशी परमिशन काय मागतेयस??” विजय.
“आरती जर तुमच्या भातुकलीच्या खेळातली बायको होती, मग आशु कधी भेटली?? त्या दिवशी प्राजुताईने तिच्याबद्दल काहीच सांगीतल नाही?” सायली
“कारण त्यांना माहीत नव्हत की तु कशी रिअॅक्ट करशील?? होणाऱ्या नव-याच मागच अफेअर त्याच्या होणाऱ्या नवरीला कस सांगणार नाही का??” विजय हसत बोलला.
“कधी भेटली तुम्हाला ती??” सायली
“एवढा इंटरेस्ट??” विजय
“माझा हक्क आहे” सायली “म्हणजे तुम्हाला त्रास होणार नसणार तर.”
“तुच तर मला त्या त्रासातून मोकळ केलस न.” विजय “बर ऐक.”
“आमचा भातुकलीचा खेळ तर दुसरी पर्यंतच चालला होता. मी चौथीत असताना ते रहायला आले होते. आरतीच्या बाजूच्या रुममध्ये. जसजसे मोठे होत गेलो तसतस एकमेकांत गुंतत गेलो होतो. पहीले आरती आशु वर चिडचिड करायची. पण मग नंतर तिने पण अॅकसेप्ट केल. जेव्हा आरतीने त्या मुलीचा गळा पकडला होता न, तेव्हा आशुनेच मध्यस्थी केली होती. तोवर दोघींची चांगलीच गट्टी झाली होती न. मग आरतीने आशुच ऐकुन तिला सोडल होत. नाहीतर तिने चुक स्विकारुन पण आरती काय तिचा गळा सोडायला मागत नव्हती. माझ्या अगोदर तर तिने आईला सांगीतल होत. नंतर मग मला बोलली की मी आवडतो तिला. आईची आणि तिची खुप गट्टी जमली होती. आई गेल्यावर ती पण चार पाच दिवस जेवली नव्हती. ते तिची आई, राधीका ताई आणि प्राजु ताईने तिला सावरल होत. तिचे बाबा पण ती दहावीला असतानाच गेले होते. त्यावेळीही खुप जड गेल होत आशुला त्यातून बाहेर काढायला. खुप हळवी होती ती. तिचे बाबा खुप लाड करायचे माझे.”
बोलता बोलता विजयचे डोळे पाणावले. खुप सा-या आठवणींना उजाळा दिला होता विजयने. बराच वेळ झाला. सायलीने विजयचा हात पकडला. विजयने डोळे पुसले.
“मी माझ सांगीतल, पण मग तुझ काय?? तु एवढी सुंदर आहेस. तुला तर खुप सारे प्रपोज आले असतील न??” विजय
“येणार होते. दहावीला असताना एकाने हिम्मत करुन मला प्रपोज पण केल होत. त्यानंतर दुसऱ्या कोणाची हिम्मतच झाली नाही कोणाची.” सायली हसत बोलली.
“म्हणजे, काय केल होत तु??” विजय
“दात पाडले होते. दादुने मला सेल्फ डिफेन्स शिकवायला घेतला होता न. तो मुलगा ऐकतच नव्हता. खुप समजावल. वरुन त्याचे ते टुक्कार मित्र. शेवटी वैतागून रागाच्या भरात दिली एक ठेवुन. दात पडले होते त्याचे. माझा नव्हता विश्वास प्रेमावर. आई बाबा सांगतील तिथे सुखाने जायच, अस ठरवल होत. पण मग तुमच्याकडे अशी काही ओढली गेली न, की मलाच कळत नव्हत की काय झालय मला. प्राजुताईच्या साखरपुड्याच्या वेळी आरु ने मला चांगलच झापून समजावल. तेव्हा कुठे माझी टुब पेटली होती. तुमच्याकडेच बघुन तर प्रेम करायला शिकली मी.” सायली
“बहीणाबाईंचे आभार मानले पाहीजेत मला. पण तुझ्यासारखी एवढी सुंदर मुलगी, आजवर सिंगल होती??” विजय तिची खेचायला लागला होता. “पटत नाही. पहीले तर मला वाटल भास आहे माझा, म्हणून तर मी लांब रहात होतो तुझ्यापासुन. त्यात मी असा. रंगाने सावळा. रुपाने जाडा.”
आता सायलीला राग आला, “काय चालु आहे तुमच मगासपासुन, प्रेम काय रंग रुप बघुन होत का??” सायली थोडी चिडून बोलली, “अस असत तर मग सोनाली, प्रणाली, आरती उगाच तुमच्यावर जीव ओवाळून टाकतात का?? तुमच्या माहीतीसाठी सांगते, आपल्या वर्गातल्या ९०% मुली तुम्ही नाही तर किमान तुमच्यासारखा जोडीदार भेटावा अस बोलायच्या. मी माझ्या कानाने ऐकलय.”
सायलीच्या आवाजाचा रोष बघुन विजय गप्प बसला होता.
“सॉरी न” विजयने सायलीचे हात हातात घेतला. पण ती रुसून बसली होती त्याच्यावर.
मग विजयनेच सुरवात केली.
जनम जनम जनम साथ चलना यूँही
क़सम तुम्हें क़सम आके मिलना यहीं
(विजयने सायलीच्या गालावर हात ठेवला)
एक जाँ है भले दो बदन हो जुदा
मेरी होके हमेशा ही रहना
कभी ना कहना अलविदा
मेरी सुबहा हो तुम्हीं और तुम्हीं शाम हो
तुम दर्द हो तुम ही आराम हो
तेरी दुआओं से आती है बस ये सदा
मेरी होके हमेशा ही रहना
कभी ना कहना अलविदा.. हा ..हा..हा..
मेरी होके हमेशा ही रहना
कभी ना कहना अलविदा..
तेरी बाहों में है मेरे दोनों जहाँ
तू रहे जिधर मेरी जन्नत वहीं
जल रही अगन है जो ये दो तरफ़ा
ना बुझे कभी मेरी मन्नत यूँही
तू मेरी आरज़ू मैं तेरी आशिक़ी
तू मेरी शायरी मैं तेरी मौशिकी
तलव तलव तलव बस तेरी है मुझे
नशों में तू नशा बन के घुमा यहीं
मेरी मोहब्बत का करना तू हक़ ये अदा
मेरी होके हमेशा ही रहना
कभी ना कहना अलविदा..
मेरी सुबहा हो तुम्हीं और तुम्हीं शाम हो
तुम दर्द हो तुम ही आराम हो
तेरी दुआओं से आती है बस ये सदा
मेरी होके हमेशा ही रहना
कभी ना कहना अलविदा..
अलविदा..
“खुप वाईट आहात तुम्ही, मला रागावू पण देत नाही.” विजयच्या हातात तिचा हात गुंफवत सायली बोलली.
थोड्यावेळाने दोघ तिथुन निघाले. परत येता येता दुपार झाली. मग दोघांनाही कल्याणमध्ये लंच केल. सायलीला तिच्या ऑफीस मध्ये सोडुन तो शॉरुमवर निघुन गेला.
थोड्यावेळाने टिनाने सायली ला फोन केला.
“आज फिर से काट लिया क्या तुझे??” टिना
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा