Login

तुझ्याच आयुष्याची वाटेकरी व्हायचे आहे भाग ५६

विजय आणि सायलीच लग्न तर झाल होत. पण पूजेच्या संध्याकाळीच तिचे आई वडील तिला माहेरी घेऊन गेले होते. तिला विजय सोबत वेळच घालवता आला नव्हता.

मागील भागात. 

घरी पोहोचल्यावर पण तिथे दोघांना शॉक बसला. कारण चाळीच्या दोन्ही बाजूच्या घरांच्या मधला पॅसेज हा, डिझायनर मंडपाने सजवलेला होता. एन्ट्री पासुन घरापर्यंत लाल कार्पेट अंथरलेला होता. त्यावर परत गुलाबाच्या पाकळ्या होत्या. सगळा ग्रुप परत दोघांच्या समोर आला.

“अजुन काही बाकी आहे??” विजय. 

आता पुढे. 

सगळ्यांनी होकारार्थी मान हलवली. तिथल्या स्पिकरवर गाणे सुरू झाले. ज्यावर त्यांनी डान्स सुरू केला. सोबतीला तो म्युजिकल ग्रुप होताच. त्यांनीच ते डान्स बसवले होते. दोघांकडे बघतच त्यांनी डान्स सुरू केला होता. एकदम महालात प्रवेश करणारे राजा आणी राणी असा माहोल त्यांनी तयार केलेला होता.

तेरे माथे की बिंदिया चमकती रहे

तेरे हाथों की मेहँदी महकती रहे

तेरे जोड़े की रौनक सलामत रहे

तेरी चूड़ी हमेशा खनकती रहे

मुबारक मुबारक मुबारक मुबारक

मुबारक हो तुमको ये शादी तुम्हारी

सदा खुश रहो तुम दुआ है हमारी

तुम्हारे कदम चूमे ये दुनिया सारी

सदा खुश रहो तुम दुआ है हमारी

मुबारक हो तुमको...

तुम्हारे लिए हैं बहारों के मौसम

ना आये कभी ज़िन्दगी में कोई ग़म

हमारा है क्या यार हम हैं दीवाने

हमारी तड़प तो कोई भी न जाने

मिले ना तुम्हें इश्क़ में बेक़रारी

सदा खुश रहो तुम...

के जन्मों के रिश्ते नहीं तोड़े जाते

सफ़र में नहीं हमसफ़र छोड़े जाते

ना रस्म-ओ-रिवाजों को तुम भूल जाना

जो ली है कसम तो इसे तुम निभाना

के हमने तो तन्हा उमर है गुज़ारी

सदा खुश रहो तुम...

दोघांना मध्ये घेत ते नाचत होते. मग मुलींनी सायलीला त्यांच्या सोबत घेत दुसर गाण सुरू केल.

नवराई माझी लाडाची-लाडाची ग

आवड़ हिला चंद्राची चंद्राची ग

नवराई माझी नवसाची-नवसाची ग

अप्सरा ज(स)शी इंद्राची-इंद्राची ग

नवराई माझी...

बौराई चली शरमाती, घबराती वो

पिया के घर इठलाती, बलखाती वो

सुरमई नैना छलकाती-छलकाती वो

पिया के घर भरमाती, सकुचाती वो

चुनर में इसकी, सितारे

सारे चमकीले, चमकीले, चमकीले

कंगन में इसके, बहारें

पाजेब हरियाले, हरियाले, हरियाले

नवराई माझी...

सुनियो जी इसको रखियो जतन से

(विजय भोवती आले.)

ओ बड़ी नाज़ुक है, नाज़ुक है, नाज़ुक

कली ये अनमोल, कली ये अनमोल

आओ जी आओ, ठुमका लगाओ

ज़रा बहको जी, बहको जी, बहको

खुशियों के बाजे ढोल, खुशियों के बाजे ढोल

आँखों में इसके इशारे

बड़े नखरीले, नखरीले, नखरीले

सपनों के लाखों नज़ारें

सारे रंगीले, रंगीले, रंगीले

बौराई चली शरमाती, घबराती वो

पिया के घर इठलाती, बलखाती वो.

विजय आणि सायलीला परत एकत्र उभे केल. त्यांना चालायचा इशारा केला. बाजुने  चाळीतल्या सगळ्या मुलांनी दोघांवर फुलांचा वर्षाव करायला सुरवात केली. सायली तर मोहरुन गेलेली होती, सगळ्यांची ती तयारी बघुन. विजय मात्र फक्त बघायच काम करत होता. खर तर त्याला पण सगळ आवडल होत. पण उगाच खर्च कशाला केला म्हणून तो गप्प होता.

दोघ घराच्या दारात पोहोचले. सगळा ग्रुप दारात आडवा उभा राहीला.

“उखाणा” सोनाली.

मग सायली ने उखाणा घेतला.

आई बाबा सांगतील तिथे

जाणार होते सुखाने,

विजयरावांच्या दारी आले

त्यांच्या प्रेमाच्या ओढीने… सायली

सगळ्यांनीच टाळया न शिट्ट्या वाजवल्या. विजय आत घुसणार तोच जिया बोलली.

“कुठे??” विजयला अडवत “तुझा टर्न आहे आता. घे पटकन नाव वहिनीच.”

“मला नाही येत” विजय

“हो का?? फक्त आम्हाला त्रास द्यायचा ते बर जमत??” आरती. “सोडणारच नाही तुला. घे पटकन.”

विजयने त्याच डोक खाजवल.

“अवघड आयुष्याची वाट

सोपी करुन ती आली,

आजपासून सायली फक्त आणि फक्त

माझीच झाली…. विजय

विजयने सायलीच्या हातावर किस घेतली. सायलीने तिच तोंड लाजेने झाकुन घेतल. परत टाळ्या आणि शिट्ट्यांचा गजर झाला. दोघ आत घुसणार तोच परत सगळे आडवे आले.

“अरे हो” विजयला कल्पना होतीच न, त्याने जे केल ते त्याच्यासोबत पण होणारच म्हणून. तो खिशात हात घालणार तोच राहुलने त्याला थांबवल. त्याने विजयच्या हातात काही फोटो दिले. ज्यात एका छोट्याश्या गावात बोरींग खोदुन त्यांची पाण्याची समस्या सोडवली होती. विजयने प्रश्नार्थक पाहीले.

“आमच्या सर्वांच्या गृहप्रवेशाच्या वेळेचे सर्व पैसे जमा करुन ठेवले होते. त्यात ताईने आणि सायलीच्या बाबांनी काही पैसे अॅड करुन तिथे बोरींग बांधली आहे.” राहुलने खुलासा केला.

हे ऐकून विजयचा आत्तापर्यंतचा राग पळुन गेला होता. विजयच्या चेहऱ्यावर स्माईल आली.

पण आता राधीका ताई येऊन उभी राहीली.

“आता तुला काय पाहीजे, माझ सगळच तर तु आहेस.” विजयने तिचे हात हातात घेतले. राधीका भारावून गेली. मग ती सायलीकडे वळली.

“तुझी लेक मला देणार असशील तर घरात येऊ देते.” राधीका ठसक्यात बोलली.

“काय ग ताई, तु पण न.” सायली लाजली.

“अय तुझ काय मध्येच. तुझ्या आधी मी नंबर लावलाय” प्राजक्ता तिच्या पोटाकडे हात करत राधीकाच्या बाजुला येऊन बोलली. “ते कुठे पळुन नाही जाणार. तुझ्यासाठी दुसरी पण परी आणतील ते.”

विजय आणि सायलीने डोक्यालाच हात लावला. तर बाकीचे हसत होते. 

“अग त्यांना आत तर येऊदे. अजुन पुजा नाही घातली आणि तुमच घोडच दामटत आहात.” काकुंनी मध्यस्ती केली तेव्हा दोघी थांबल्या.

“ताई तु जीव मागितलास न, तर तो पण देईल.” विजय

“गप रे तु” विजयच्या हातावर चापट्या मारल्या. “आमच्यात तु नाही बोलायच. अस आनंदाच्या क्षणात काहीही काय बरळतोय.” राधीका थोडी चिडली. विजयने त्याच तोंड बारीक केल. त्याला तस बघुन बाकीचे हसायला लागले.

“बोल गं तु, काय म्हणण आहे तुझ??” राधीका सायली कडे बघत बोलली.

“तुझा शब्द कमी मोडलाय आजवर.” सायली हसतच बोलली.

“पण पहीला नंबर माझाच. नाहीतर मी पळवुनच आणेल तिला.” प्राजक्ताने डायरेक्ट धमकी दिली.

काकूंनी दोघांच औक्षण करुन त्यांचा गृहप्रवेश करुन घेतला होता. दोघांनी आई वडिलांच्या फोटोला नमस्कार केला. नंतर राधीकाच्या पाया पडले. मग एक एक करत सर्वांचे आशिर्वाद घेतले.

सगळे दमुन बसले एकदाचे. पण सायली ने विजयचा हात काही सोडला नव्हता. सायलीला ती पैठणीला घेऊन बसणे आता जड होत होत. पण तिला विजयला सोडायच पण नव्हत. न जाणो की ती झटक्यात स्वप्नातुन जागी होईल आणि हे सगळ खोट ठरेल. अस तिला वाटत होत.

“सायली, तो झाला आता तुझाच. नको टेन्शन घेऊन. आत जाऊन कपडे बदलुन घे” प्राजक्ता ने सायलीच्या मनातली चलबिचल ओळखली होती.

“जावा ग पोरींनो, तिला मदत करा.” प्राजक्ता ने सगळ्या मुलींना ऑर्डर सोडली.

आराध्या आणि प्रणाली सायली सोबत गेल्या तर आरती आणि सोनाली किचनमध्ये राधीकाला मदत करायला. तस शेजारच्या मावशीने आणि बाकीच्यांनी मिळुन स्वयंपाक केलेला होता.

मग सगळ्या ग्रुपच्या आई वडीलांना, मावशीला, त्यांच्या मुलाला, संकेत, राजेश त्यांचे आईवडीलांना, काका काकु, मामा मामी, आत्या, बाकी चाळीतल्या सगळ्यांना जेवायला बसवले आणि विजयने सायली सोबत सगळ्यांना जेवण वाढु लागला. बाकी मदतीला त्यांचा ग्रुप होताच.

त्या सगळ्यांची जेवण झाल्यावर विजय आणि सायली, जिया, राधीका आणि ग्रुप सोबत जेवायला बसले. यथावकाश जेवण पण आटपली. सर्व मंडळींनी नव्या जोडप्याला भरभरुन आशिर्वाद दिला आणि आपआपल्या घरी निघुन गेले.

दुसऱ्या दिवशी लगेचच सत्यनारायणची पुजा घातली गेली. पुजा आटोपल्यावर सायलीच्या आई वडीलांनी सायलीला घरी घेऊन जाण्यासाठी सांगीतले.

“आज लगेचच??” सायली भावनेच्या भरात बोलुन गेली. तसे सगळेच हसले.

“करमतच नाही वाटत त्याच्याशिवाय. हाय रे ये जालीम दुनिया. कल मिले नही के आज दुर ले जा रहे है.” सोनालीची नौटंकी.

“अग रीत आहे तशी. पाहीजे तर परवा लगेच ये. आता काय माहेरी थोडीच तुला करमणार आहे??” सायलीची आई पण नाराजीच नाटक करत सोनालीला मिक्स झाल्या.

“तस नाही ग आई. तु पण न” सायली लगेच भावुक झाली. “ह्यांना विचारल पण नाही न मी म्हणुन बोलली.”

“घेतली ग परमीशन त्यांची.” सायलीची आई.

खर तर सायलीला विजय सोबत वेळ घालवायचा होता. एकतर एवढ्या अडचणी पार केल्यानंतर दोघ एक झाले होते. आता त्याच्यापासून दुरावा तिला नको होता.

मग संध्याकाळी सायलीच मन नसतानाही ती तिच्या माहेरी गेली. बाकी ग्रुप ही आपापली जोडी धरुन घरी गेला. सोनाली मात्र तिच्या आई वडिलांकडे गेली. विजय काका काकु, मामा मामींना बसस्थानकावर सोडुन आला. आता घरात फक्त तो, प्राजक्ता, राधीका आणि जिया होती.

“काय बोलली आत्या??” विजय जियाकडे बघुन बोलला. जिया गोंधळली.

“हेमंतचा विषय आहे न??” विजय

“हो, तो मागेच लागलाय. लग्न कर म्हणून.” जिया “त्या दिवशी त्याला एवढ समजावुन ही तो डायरेक्ट आईकडे गेला. मला नाही करायचय लग्न सध्यातरी. तरी ऐकत नाहीये.” जिया भावुक झाली.

“पण मग तो, बँकेमध्ये आहे न जॉब ला. सेटल आहे. मग काय प्रोब्लेम आहे??” राधीका

“त्याच आत्ताच ब्रेकअप झालय. तर त्याच्या त्या एक्स गर्लफ्रेंडला जळवायला माझ्यासोबत लग्न करायचे आहे त्याला. त्याला वाटल की मला काहीच माहीत नाहीये म्हणून. आईबाबांना पण काय काय सांगुन ठेवलय काय माहीत. ते पण खुप गुणगान करत आहेत त्याच. काय तर म्हणे प्रेम आहे. प्रेम काय आहे हे तर मला दादा कडुन, त्याच्या ग्रुप कडुन समजल. म्हणून मी पण मग स्पष्ट सांगीतल दादा सांगेल तेच करेल मी.” जिया बोलत राहीली होती. मग ती विजय जवळ गेली.

“दादा तु बोल न आईशी. तुझ ऐकेल ती.” जिया विजयला विनंती करत होती.

“ठिक आहे बोलतो मी. पण मग हेमंत बद्दल जे सांगीतल ते खर आहे न??” विजय

जियाने होकारार्थी मान हलवली. मग विजयने फोन फिरवले. त्याच्या लेव्हल वर माहीती काढायला सुरवात केली. तोवर सायलीचा फोन वेटींगवर दिसला त्याला. विजयची कळी खुलली.

“बोला सरकार, पोहोचल्या का??” विजय

“जा बोलूच नका तुम्ही” सायली नाराजीत बोलली.

“का?? काय झाल? लग्न झाल की मुलींना माहेरी पाठवायच असत तशी रितच आहे न.” विजय तिला समजावत होता.

“पण मग अस पुजा झाल्या झाल्या कोण लगेच पाठवुन देत. मला तुमच्यासोबत वेळ घालवायचा होता न. एक दिवस थांबवुन नाही शकले तुम्ही माझ्या आई बाबांना” सायली तिच्या रुममध्ये येऊन विजयला फोन लावून भांडत होती.

“सरकार, एक दिवस काय घेऊन बसली आहेस. पुर्ण आयुष्य आपल्याला सोबत घालवायच आहे. तुला हव तर येऊ का मी आत्ता. त्या दिवशी सारखा मच्छर होऊन.” विजय गालातच हसत बोलला.

मच्छरच ऐकुन सायलीच्या गालावर लाली चढली. “तुमच न काहीतरीच.”

“दोन दिवस थांब आईबाबांसोबत. तिसऱ्या दिवशी मी येतो तुला घ्यायला.” विजय

“दोन दिवस??” सायली “नका न, मला नाही राहील जाणार.” सायली बारीक आवाजात बोलली.

“ठिक आहे, परवा येतो. मग तर झाल??” विजय.

सायली शांतच होती.

“आई बाबांचा विचार कर. त्यांना काय वाटेल, की आता कुठे लग्न झालय तर विसरली त्यांना.” विजय

“ठिक आहे.” सायली भानावर आली. ति विसरूनच गेलेली होती की, आता ति रहाणार नाहीये ते. मग ती उठुन किचनमध्ये गेली. तिची आई स्वयंपाक बनवत होती. तिने तिच्या आईला मागुन मिठी मारली.

“हमममममम झाल बोलुन का??” आई “मला वाटल की आता काय फोन ठेवतच नाहीस तु.” एवढ बोलुन त्या हसायला लागल्या.

“अशी काय बोलतेयस ग आई??” सायली

“चार वेळा आवाज दिला तुला. पण मॅडमच लक्षच नाही आमच्याकडे” आई

“चल, काहीही बोलुन नकोस. फोनवर बोलताना आवाज ऐकू न येणे हे सगळ मुव्ही मध्ये असत. उगाच चिडवु नकोस मला.” सायलीपण तिच्या आईला मदत करु लागली.

“हो का?? मग तुझे ते यायच्या आधी तुला जे कळत न, ते पण मुव्हीमध्ये असत. तरी तुला कळतच न??” आईने सायलीची खेचायला घेतली.

“सुनबाई, का छळताय माझ्या लेकीला??” आजोबा जसे आले तसा सायलीला धीर मिळाला. “आता नाही ऐकु येत कोणाकोणाला प्रेमात पडल की, त्याला आपण तरी काय करणार नाही का??”

आजोबा पण आईच्या मस्करीत मिक्स झाले बघुन ती आजोबांना बघतच राहीली. दोघही हसत होते.

“शि बाबा, मी रुममध्येच जाते” सायली लाजतच तिच्या रुमकडे गेली.

तिच्या रुमकडे जाताना तिला तिचे बाबा दिसले. जे त्यांच्या रुममध्ये बसुन फोटो बघत होते. जोडीला डोळ्यात पाणी.

“बाबा, तुम्ही अस कराल, तर माझ मन कस लागेल तिकडे?” सायली ने बाबांच्या खांद्यावर हात ठेवले.

“वेळ कसा, भरकन गेला न. कालपर्यंत तर लहान होती आणि आता तुझ लग्न पण झाल.” बाबांनी सायलीला मिठीत घेतल.

“अग मी खुप खुश आहे. आनंदाश्रू आहेत हे. विजय सारखा जोडीदार भेटला म्हणून. आता मला कसलीच काळजी नाही. उद्या मी जरी नसलो…” बाबा पुढे बोलणार तेच सायली ने त्यांच्या तोंडावर हात ठेवला.

“अस काही बोलला न, तर मी बोलणारच नाही तुमच्याशी” सायलीचे डोळे पण पाणावले.

“ठिक आहे. नाही बोलत. पण मग बिचा-याला दोन दिवस शांतीने जगु दे.” बाबा

“म्हणजे??” सायली

“लगेच काय त्याला घ्यायला बोलावतेस?? नंतर तुझ्याच तालावर नाचणार आहे. आता तर दोन दिवस जगु दे.” बाबा हसायला लागले.

“तुम्हाला सगळ्यांना झालय काय?? सगळे मलाच चिडवतायेत” सायली लाजतच तिच्या रुममकडे पळाली.

दुसऱ्या दिवशी सकाळी सायली नाश्त्याच्या टेबलावर बसली होती. आई आणि बाबा तिला घेरून उभे होते.

“सायले, काय विचारतोय मी?? कोणाच्या बाईकवर गेली होतील काल?? तेही इतक्या रात्री??” आईने चिडून विचारल होत.

“कुठे, मी नाही गेली कोणाच्या बाईकवर.” सायली बोलताना बेफिक्रपणे बोलत होती. तिच ते बोलण पाहून तिची आई अजुन चिडत होती.

“परवा लग्न झालय तुझ आणि काल अस दुसऱ्या कोणासोबत तरी गेली होतीस” आई “शोभत का तुला हे??”

झालं अस की रात्री ११.३० च्या सुमारास, बिल्डींगच्या वॉचमनने सायलीला कोणाच्या तरी बाईकवर एकदम चिपकुन बसताना पाहील होत. सायलीच लग्न झालय तेही त्याला माहीत होत. म्हणून त्याने कोणाकडे काहीही न बोलता, डायरेक्ट सायलीच्या आईच्या कानावर घातलेल होत.

“आई, चिल न. फक्त आईसक्रीम खायला गेली होती.” सायली

“बघीतल कशी तोंड वर करुन उत्तर देत आहे. कोणासोबत गेली होतीस??” आई रागाने बोलली.

“तु चिडणार नसशील तर सांगते.” सायली सिरीअस झाली.

“हे न. सगळे तुमच्या लाडाचे परीणाम आहेत. आता कोणी पाहील असेल तर, तिकडे काय उत्तर द्यायच??” आई बाबांकडे बघुन चिडून बोलत होती.

बाबा तर फक्त बघत बसले होते.

“ते मी न.” सायली एकदम सिरीअस होऊन बोलली. “ह्यांच्यासोबतच गेली होती.”

“ऐकल का तुमच्या लेकीचे…” आई चिडुन बोलणार तेवढ्यात थांबल्या. “काय बोलली तु??”

“अग, रात्री हे आले होते. तुम्हाला त्रास नको म्हणून मग मीच हळुच खाली गेली होती.” सायली हसायला लागली होती.

आई बाबांनी दोन ग्लास पाणी पिल.

“गदढे, आमची जीव गळ्यात आला होता” बाबांनी सायलीचा कान पिळला.

“का?? तुम्ही केलेल्या संस्कारांवर विश्वास नव्हता का??” सायली अजुनही हसत होती.

“सांगुन तर जायच न. आम्हाला माहीत असत तर अशा येणाऱ्या बातम्यांना आम्हाला उत्तर देता येतात. आता तो वॉचमन चांगला आहे, म्हणून त्याने डायरेक्ट आम्हाला सांगीतल. पण सगळे चांगले नसतात न.” आईंनी कपाळावरचा घाम पुसला.

सायलीचा नाराज झालेला आवाज ऐकून, विजयला रहावल गेल नव्हत. मग तो रात्री त्याची बाईक देऊन सायलीच्या घरी आला. बाकीच्यांना त्रास नको म्हणून त्याने सायलीलाच खाली बोलावल होत. विजयने दिलेल सरप्राईज बघुन सायलीची कळी खुलली होती. तिने बिल्डिंगच्या आवारताच विजयला मिठी मारली होती. तिला घेऊन विजय आईस्क्रीम पार्लरला गेला. दोघांनी मस्त आईस्क्रीम खाल्ली. चांगले तासभर फिरले. मग तिला परत तिच्या घरी सोडुन विजय त्याच्या घरी निघुन गेला होता.

विजय घरी पोहोचला तर त्याने जियाला जाग असलेल पाहील.

“काय ग, झोपली नाहीस तु??” विजय

“आईचा फोन होता. ती ऐकतच नाहीये. तुझ्याशी बोलायचे होत. म्हटलं आत्ताच झोपलात उद्या बोल म्हणून.” जियाचे डोळे पाणावले.

विजयने तिला मिठीत घेतल. “दोन दिवस थांब. सगळ निट होईल.”

“मग आम्हाला आईस्क्रीम?” जिया

“आणली आहे. तुम्हाला सोडुन बर खाईल??” विजयने तिला आईस्क्रीम दिली. बाकी फ्रिजमध्ये ठेवली. जियाने तिच्यातली थोडी आईस्क्रीम विजयला चारली. नंतर ते झोपुन गेले होते.

“काय मग, कशी झाली आईस्क्रीम पार्टी??” आजेबा मॉर्निंग वॉकवरुन परत आले होते. सायलीला बघुन त्यांनी तिला विचारले.

“एकदम मस्त. तुमच्यासाठी पण यांनी पाठवली आहे. फ्रीझ मध्ये आहे. दुपारी खाऊया.” सायली

“म्हणजे तुम्हाला माहीती होत??” बाबांनी आजोबांना विचारले.

“हो, मला ती सांगुन गेली होती. ती तुमच्याकडेच येत होती. पण मी पाणी प्यायला उठलो होतो. मग मीच म्हटल आधीच खुप दगदग झालीये. तुम्हाला नको उठवु म्हणून.” आजोबांनी खुलासा केला.

आईने सायलीला मिठीत घेतल. “सॉरी न, बच्चा.” सायली ने डोळे मिचकावले.

“म्हणजे तुला पण विजयचीच सवय लागली का?? सरळ सांगायच सोडुन शॉक द्यायची??” बाबा हसत बोलले.

“मग शोभायला नको त्यांची बायको म्हणून??” आई.

सगळेच हसायला लागले. सायली मात्र लाजून गोरी मोरी झाली.

“चला आवरा. कामावर जायच नाही का??” बाबा

मग सायली आणि बाबा दोघही आवरायला गेले.

इकडे ग्रुपवर एक मेसेज धडकला.

“लग्न झाल की माणस बदलतात का रे??” महेश

“हो न, खुप बदलतात.” संदेश

“कसे रे कसे??” राहुल

“रात्री गुपचुपच एकमेकांच्या घरी जातात आणि एकटे एकटेच आईस्क्रीम खातात.” आराध्या

“आम्हाला तर कोणी विचारुन पण बघत नाही.” आरतीने पुढे डोळ्यात पाणी असलेल्या स्मायली टाकल्या. 

“हाय रे ये, जालीम दुनिया.” प्रणाली "दोस्त दोस्त न रहा.."

“अरे नौटंकीच्या दुकानांनो. सरळ सांगा न आईस्क्रीम खायची आहे. भेटुया आज. नेहमीच्या ठिकाणी.” विजयने हसतच मेसेज केला.

इकडे सायलीने तिच्या आईकडे रोखुन पहायला सुरवात केली.

“शॉक द्यायची हौस आहे न. मग मी पण तुझी आई आह़े.” आई तो-यात बोलली.

“अरे मुलीपासुन कसली आलीये जेलसी.” सायली.

“पण आज मी मुंबईला आली निघुन.” सोनालीने सॅडवाली स्मायली टाकली.

सायलीने तो मेसेज पाहीला. मग तीने सगळ्या़ंना प्रायव्हेट मेसेज केला. आज सगळेच सोनाली कडे जाणार होते. तीला सरप्राईज द्यायला.

“ठिक आहे. तु नंतर भेट मग. आज आम्ही भेटुन घेतो.” सायली ने मुद्दाम ग्रुपवर मेसेज केला.

सोनालीने तो मेसेज वाचला. पहिल्यांदा अस झाल होत की, ग्रुप सोबत ती नव्हती. तिला खुप भरुन आले होत. ति त्यांचा बेडरुममध्ये जाऊन पडुन राहीली आणि तशीच झोपून गेली.

सायली ने आजचा दिवस कसातरी लोटला होता. आराध्या सायलीसोबतच सायलीच्या घरी आलेली होती. आरती पण सायलीच्या घरी येऊन पोहोचली होती. विजयने त्या तिघांना त्यांच्या ऑफिसवरुन पिक अप केल. मग ते सायलीच्या घरी आले. प्रणाली तर मुंबई मध्येच होती. ती सर्वांना तिकडेच भेटणार होती.

सगळे सायलीच्या घरी पोहोचले. त्यांचा चहा नाश्ता सायली ने केला.

“मग आज कुठे दौरा??” सायली ची आई

“सोनाली कडे चाललोय. दादा पण कधीचा बोलवत आहे.” विजय.

“म्हणजे आजच जेवण तिकडेच न??” आई

“हो” सायली पटकन आवरुन आली. विजय सोबत जायला जे भेटत होत.

सगळी पलटण निघाली. सोनालीच्या घरी पोहोचायच्या आधी त्यांनी प्रणालीला घेतल. तस त्यांनी आधीच रुद्रला सांगुन ठेवलेल होत की ते सोनालीला सरप्राईज द्यायला येणार आहेत म्हणून. मग तो ही सोनाली सोबत जास्त बोलला नव्हता.

आज रुद्र घरीच होता. त्याने हळुच दार उघडल. सगळी जत्रा हळुच घरात घुसली. सोनाली अजुनही झोपूनच होती. पहीले तर सगळे रुद्रच्या वडीलांना भेटले. सायलीने तिच्या काकांना मिठी मारली.

“काकु कुठे??” सायली

“अग ति तिच्या माहेरी गेलीये. परवा येईल.” काका

“आलोच तुमच्या सुनेला भेटुन.” सायली

मग सोनाली कडे गेले.

“इसससससससस” सोनाली झोपेतच बोलली “नका न ओ, एकतर काल रात्री तुम्ही मला झोपु पण नाही दिल.”

रुद्रने लाजतच डोक्याला हात लावत लगेच कल्टी मारली तिथुन. सोनालीच्या गालाला आईसक्रीमचा बॉक्स लावला होता. तिला वाटल रुद्रच त्रास देतोय. बाकीचे मात्र त्यांच हसु कंट्रोल करण्यासाठी प्रयत्न करत होते. मग आरतीने परत तिच्या गालाला ते आईसक्रीम लावली.

“नाही सांगीतल न एकदा. मी बोचकाडेल ह.” सोनाली वैतागून बोलली.

“तरीच म्हटल, दादाच्या गळ्यापर्यंत पोहोचायची हिम्मत कशी झाली कोणाची. आत्ता पाहील तर घरातलीच मांजर आहे.” सायली मोठ्याने बोलली.

सोनालीने एक डोळा उघडुन पाहील. तर तिला तिचा ग्रुप दिसला. तिला वाटल भास असेल. मग तीने परत तो लावून घेतला. दुसऱ्या क्षणाला तिने तिचे दोन्ही डोळे खाडकन उघडले आणि उठुन बसली.

“तुम्ही कधी आले??” सोनालीला शॉक बसला.

“जेव्हा तु दादाला कालच्या रात्रीसाठी भांडत होतीस.” सायली सगळेच हसायला लागले.

“ओ, शिट.” सोनालीने तिच तोंड लाजेने झाकुन घेतल.

“बिचारा दादा, काय काय सहन केल असेल त्याने” प्रणाली तिचा कपाळाला हात लावत बोलली.

सोनालीने प्रणालीला उशी फेकुन मारली. “असे कसे अचानक उगवले??” सोनाली

“तुला सोडुन कधी आईस्क्रीम खाल्लीये??” आरती

सोनालीला लागलीच भरुन आले.

“वेडाबाई” आरती, प्रणाली, सायली, आराध्या सोनालीला बिलगल्या.

“चल उठ आळशी. अशा संध्याकाळच्या वेळी कोणी झोपत का??” विजय चिडून बोलला.

ति ह्या वेळेला झोपलीये बघुन विजयला थोडा राग आला होता तिचा. उगाच तिला घरात बोलणी बसतील म्हणून.

“सॉरी न. पण बाबाच बोलले होते.” सोनाली बारीक तोंड करत बोलली. “डोक दुखते तर झोप थोडावेळ.”

“मग तुझा थोडावेळ दुपारपासून कधीपर्यंत असते. थांब आता न मी मावशीनांच सांगतो तुझ नाव.” विजयने सरळ सरळ तिला धमकीच दिली.

“नको न, विजय.” सोनाली “ती परत लेक्चर झाडत बसेल.”

“ये लवकर आवरुन” विजय बाकीच्यांना घेऊन बाहेर आला.

विजय जसा वळला होता, तस सोनालीने त्याच्याकडे बघुन वाकुल्या केल्या होत्या. ते बघुन बाकीच्यांना हसायला आल होत.

“मला मागुन पण दिसतय. ये बाहेर तु मग बघतो तुला.” विजय मागे न बघताच बोलुन गेला.

बाकी बाहेर आले. सोनाली फ्रेश होऊन बाहेर आली. तर रुद्रच्या वडिलांसोबत गप्पा चालु होत्या ग्रुपच्या.

“काका, हिला एवढी सुट नका देऊ. डोक्यावर चढुन बसेल ती” विजय त्याच्या मुळ रुपात आला. सोनाली विजयकडे रोखुन बघायला लागली.

“उशीर केलास रे तु सांगायला. झाल तिच बसुन डोक्यावर. १० ने शुगर काय वाढली. सगळच बंद केल पोरीने” रुद्रचे वडील.

“मग किती गोड खाता तुम्ही” सोनाली बोलुन किचनमध्ये गेली.

“काय?? शुगर वाढली??” सायलीला पण शॉक बसला. “मग रिसेप्शनला तीन तीन प्लेट आईसक्रिम का खाल्ली??” सायली जशी बोलली तसे रुद्रचे वडील चपापले.

“तरीच म्हटल. सोनाली किंवा काकु समोर आल्या की काका का त्यांच्यापासून लांब पळत होते.” विजयने अजुन आगीत तेल ओतल.

“तुमचा सकाळचा चहा पण बंद.” सोनाली बाहेर येत बोलली. आता त्यांना त्यांच वाक्य बोलल्याचा पश्चाताप आला होता. ते लहान मुलासारखे तोंड करुन बसले होते.

“अरे किमान हिच तरी ऐकतात रे. नाहीतर मला वेळच नसतो घरी बघायला.” रुद्र

“ते तिच बरोबर आहे, पण म्हणून मग इतक झोपु द्यायच?? ऐकत नसेल तर सांगा मला.” विजय

“आता तर मीच सांगणार आहे आईंना, मला झोपायला का लावतात ते” सोनाली कमरेवर हात ठेवून बोलली. चेहऱ्यावर थोडा राग होता.

“का ग?? काय झाल??” रुद्र

“मला झोपायला लावुन, सगळे गुलाबजाम खाल्ले. तुम्हाला न आमची काळजीच नाहीये मुळी.” सोनाली चिडून बोलली.

“अग एकच खाणार होतो. पण मग ते गोड लागतच नव्हते. मग दुसरा खाऊन बघीतला. तोही तसाच. मग सगळे चेक करायच्या नादात खाल्ले गेले.” रुद्राचे बाबा लहान मुलासारखे कारण देत होते. त्यांना शुगर डिटेक्ट झाली होती. म्हणून त्यांच्या गोड खाण्यावर बंदी घातली होती.

“कसे लागतील गोड. विदाउट शुगर चे बनवले होते. तुमची नाटक काय माहीत नाही मला.” सोनाली “आई येत आहेत न परवा. त्यांनाच सांगते” सोनाली परत किचनमध्ये गेली.

सोनालीच ते समझदारीच वागण बघुन विजयचा राग निवळला होता. बाकीच्यांना पण खुप भारी वाटल होत.

“बघितले, कशा धमक्या भेटतात मला, माझ्याच घरात??” रुद्रच्या वडीलांना पण सोनालीची हवा लागली होती.

“हे अस चालु असत घरात” रुद्र सगळ्यांकडे बघत बोलला.

बाकी चौघी सोनालीला मदत करायला गेल्या.

“मजा हा बाबा तुझी, काय धाकात ठेवल आहे सास-यांना??” आरती

“कसली मज्जा. आई नसल्या की आज्जीबात ऐकत नाहीत ते. मग थोड बोलाव लागत. दुपारी पण तसच केल. चहा मागत होते. नाही दिला मी. तर थोड्या वेळाने माझ्याकडे आले, मस्त गप्पा मारल्या. मला झोपायला लावल. म्हणे डोक दुखतय तर झोप. आम्ही काहीच बोलणार नाही.” सोनाली पहीले चिडुन बोलली. मग थोड थांबून परत सुरू झाली. “बाकी काही त्रास नाही ग त्यांचा. त्यांच्या लेकी प्रमाणे जीव लावतात मला. मग लेकीचा धाक नको बाबांना??”

तशा सगळ्याच हसतात. इकडे बाहेर पण गप्पांना ऊत आला होता.

“पण तु उगाच बोलला हं, सोनालीला” राहुल बोलुन गेला.

“म्हणजे??” रुद्रचे बाबा. मग राहुल ने थोडक्यात सांगीतल जे विजय तिला बोलला होता ते.

“काय रे, माझ्या लेकीला भांडतो का तु??” रुद्रचे वडील राहुलच ऐकुन विजयलाच बोलले.

“संध्याकाळची वेळ लक्ष्मीची येण्याची असते न. अशा वेळी घरच्या लक्ष्मीने झोपलेल चांगल नसत आणि सासरी एवढ्या वेळ झोपण चांगल वाटत का??” विजयने त्याच्या बुध्दी प्रमाणे खुलासा केला.

“हो, पण लक्ष्मी सोबत ती माझी लेक पण आहे कळलं. ति तिच्या मनाप्रमाणे वागेल. तिला परत काही बोललास न तर बघ ह.” रुद्रचे वडील लटक्या रागात विजयला बोलले.

“नशीब कोणीतरी माझ्या बाजुने आहे.” सोनालीने किचनच्या दारातून त्यांच बोलण ऐकल होत. मग तिच पुढे आली. "नाहीतर तिकडे आई बाबापण ह्याचच ऐकतात.”

“तुला काही हा बोलला तर सांग मला. मी बघतो याच्याकडे” रुद्रचे वडील

विजयने डोक्याला हात लावला. “बघा ह, नंतर तुम्हालाच जड जाईल.”

“ते आमच आम्ही बघुन घेऊ.” रुद्रचे वडील.

“चला, जेवण झालय.” सोनाली.

मग सगळ्यांनी हसत खेळत जेवण केली. सगळ घरी जायला निघाले. सोनाली आणि रुद्र त्यांना सोडायला बाहेर आले.

“आता तर मला तु भांडुन दाखवच.” सोनाली तिची नसलेली कॉलर ताठ करत बोलली.

“हममममम. थोड्या वेळाने न मावशीचा कॉल येईल. मग बोलु आपण हं” विजय गुढ हसला.

त्याच ते हसणं बघुन सोनालीला टेन्शन आल. कारण विजय सहज कोणालाही बांधणारा नव्हता.

तोवर सोनालीचे फोन वाजला पण.

“आई मी काही नाही केलय. विजयचच काम आहे. पाहीजे तर बाबांना विचार.” सोनाली फोन उचलुन काही ऐकुन न घेता सुरू झाली होती.

“म्हणजे विजय खोट बोलला, तु समझदार झालीये ते” सोनालीची आई

तशी सोनाली गोंधळली.

“अग त्याने फोन केला होता. आपली सोनुडी आता मोठी झालीये म्हणे. खुप कौतुक करत होता तुझ.” सोनालीची आई बोलत राहीली. सोनाली विजय कडे भरल्या डोळ्यांनी बघत राहीली होती. तिला त्याच क्षणी विजयला मिठी मारावीशी वाटत होती. पण तिने तिच्या मनाला आवर घातला.

“पण एक तक्रार केली त्याने” सोनालीची आई “तु झोपल्याने म्हणे तुझ्या सास-यांनी गुलाबजाम खावुन घेतले. एवढ सगळ निट संभाळतेस तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष नको करु बेटा.”

“अग माहीती होत, म्हणून तर विदाऊट शुगरचे बनवले होते. आजोबा जसे गावाला हट्टीपणा करतात न, मला सेम त्यांचीच आठवण येते बाबांना बघुन.” सोनालीने तिचे ओलावलेले डोळे पुसले.

सोनालीला विजय कडे भरल्या डोळ्यांनी बघताना रुद्र ने पाहील होत. त्याने कोणत्याही गोष्टी पर्यंत पोहोचण्याआधी सोनाली सोबत बोलण्याचे ठरविले.

क्रमशः

0

🎭 Series Post

View all