Login

तुझ्याच आयुष्याची वाटेकरी व्हायचे आहे भाग ५७

लग्न तर झाल होत, पण तिच्या वाटेचा विजय तिला भेटीतच नसल्याने तिची चिडचिड होत होती, त्यामुळे ती राहात तिच्या घरी निदान गेली होती.

मागील भागात. 

मग सगळ्यांनी हसत खेळत जेवण केली. सगळ घरी जायला निघाले. सोनाली आणि रुद्र त्यांना सोडायला बाहेर आले.

“आता मला भांडुन दाखवच.” सोनाली तिची नसलेली कॉलर ताठ करत बोलली.

“हममममम. थोड्या वेळाने न मावशीचे कॉल येईल. मग बोलु आपण हं” विजय गुढ हसला.

त्याच ते हसणं बघुन सोनालीला टेन्शन आल. कारण विजय सहज कोणालाही बांधणारा नव्हता.

तोवर सोनालीचे फोन वाजला पण.

“आई मी काही नाही केलय. विजयचच काम आहे. पाहीजे तर बाबांना विचार.” सोनाली फोन उचलुन काही ऐकुन न घेता सुरू झाली होती.

“म्हणजे विजय खोट बोलला, तु समझदार झालीये ते” सोनाली ची आई

तशी सोनाली गोंधळली.

“अग त्याने फोन केला होता. आपली सोनुडी आता मोठी झालीये म्हणे. खुप कौतुक करत होता तुझ.” सोनालीची आई बोलत राहीली. सोनाली विजय कडे भरल्या डोळ्यांनी बघत राहीली होती. तिला त्याच क्षणी विजयला मिठी मारावीशी वाटत होती. पण तिने तिच्या मनाला आवर घातला.

“पण एक तक्रार केली त्याने” सोनालीची आई “तु झोपल्याने म्हणे तुझ्या सास-यांनी गुलाबजाम खावुन घेतले. एवढ सगळ निट संभाळतेस तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष नको करु बेटा.”

“अगं माहीती होत, म्हणून तर विदाऊट शुगरचे बनवले होते. आजोबा जसे गावाला हट्टीपणा करतात न, मला सेम त्यांचीच आठवण येते बाबांना बघुन.” सोनालीने तिचे ओलावलेले डोळे पुसले.

सोनालीला विजय कडे भरल्या डोळ्यांनी बघताना रुद्र ने पाहील होत. त्याने कोणत्याही गोष्टी पर्यंत पोहोचण्याआधी सोनाली सोबत बोलण्याचे ठरविले.

आता पुढे. 

मग सगळ्यांना निरोप दिला. ते सगळे निघाल्यावरही सोनाली तिकडेच बघत होती.

“काय गं?? कसला विचार करतेस?? अजुनही आठवण येते का??” रुद्र सोनालीच्या चेहऱ्यावरचे हावभाव वाचत बोलला. नाही म्हटलं तरी त्याला थोड टेन्शन आलच होत.

“आईचा फोन आलेला. ती बोलली की विजयने त्याचा शब्द खरा केला.” सोनाली

“कुठला शब्द??” रुद्रच टेन्शन अजुन वाढल.

मग सोनालीने तिच्या घरी झालेला त्या रविवारचा प्रसंग थोडक्यात रुद्रला सांगीतला.

“तिला आमच्यापेक्षा जास्त सुखात ठेवेल असा मुलगा भेटेल म्हणून. असा बोलला होता विजय तेव्हा. जे आज खर झालय” सोनाली रुद्रच्या मिठीत शिरली.

सोनालीच बोलण ऐकुन रुद्रला खुप भारी वाटल होत. त्याला तर उड्याच माराव्याश्या वाटत होत्या. त्याच्या मनावरच टेन्शनच उतरुन गेलेल होत. त्याच प्रेम जिंकल होत.

“खुप खुप थँक्यू, माझ्या सारख्या आळशीला तुमच्या आयुष्यात येऊ दिल्याबद्दल.” सोनाली

“उलट मीच तुझे आभार मानतो. तुझ्यासारखा प्युर सोल माझ्या आयुष्यात आली. कारण तुझ्या मनात जे असत तेच तु बोलत असतेस. एखाद्याला जीव लावायचा म्हटला की मनापासुन जीव लावतेस.” रुद्र “हा आळशीपणाच बोलशील तर तु तुझ ऑफीसच काम संभाळून हे पुर्ण घर संभाळतेस. कोण बोलेल तुला आळशी??” रुद्रने सोनाली ची नाक खेचल. मग सोनाली जास्तच लाडात आली.

“आपण बाहेर उभ आहोत, जास्त लाड दाखवु नकोस. मग मला कंट्रोल नाही होत.” रुद्रने सोनालीला जवळ खेचल.

सोनालीने तिचे डोळे विस्फारले आणि रुद्रच्या मिठीतुन सुटुन घरात पळाली.

रुद्रने मनोमन विजयचे आभार मानले. कारण त्याच्यामुळेच सोनाली आज त्याच्या आयुष्यात आली होती. नाहीतर एखादी मुलगी मागे लागल्यावर तिचा फायदा घेणारेच खुप बघीतले होते रुद्रने.

विजय सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या घरी सोडत होता.

गाडीत आता फक्त सायली आणि विजय होते. मग सायली विजयचा हात पकडुन बसली.

“येऊ का आत्ताच घरी. मला नाही करमत न तुमच्याशिवाय.” सायली बारीक तोंड करत बोलली.

“म्हणजे आई बाबा माझ्यावर तुझी किडनॅपींगची केस करतील न” विजय मस्करीच्या सुरात बोलला.

सायली गाल फुगवून बसली.

“अग उद्या येणारचं आहे न. फक्त आजची रात्र.” विजय

“ठिक आहे, वाट बघीन मी” सायली

सायलीला सोडुन विजय त्याच्या घरी निघुन गेला. घरी पोहोचेपर्यंत त्याला १०.३० वाजले होते. राधीका प्राजक्ताला हळुहळु चालत तिच्या घरी सोडुन आलेली होती.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी विजय, राधिका आणि जिया सायलीला घ्यायला तिच्या घरी गेले. यावेळेसही सायली तिच्या रुममधुन पटकन बाहेर येऊन दाराकडे जाणार होती. पण हॉलमध्ये बाबा आणि आजोबांना बसलेल पाहुन तिचा मोर्चा तिने किचनकडे वळवला.

सायलीच्या आईने किचनमधुन सर्व पाहील होत. सायली किचनमध्ये पोहोचताच त्या बोलल्या.

“दार उघडा जावईबापु आलेत.” आई बाबांना बोलली. बाबा आणि आजोबा दोघही आईकडे बघत बसले आणि दारावरची बेल वाजली. दोघांना शॉक बसला. मग त्यांनी सायलीकडे बघायला सुरवात केली. ती परत किचनमध्ये पळाली.

“आपण आलेल तर कळत नाही, पण तिचे ते यायच्या आधीच कळत मॅडमला.” आईने खुलासा करत दार उघडल.

सायलीची हिम्मतच झाली नाही त्यांच्यासमोर यायची.

त्यांच जेवण आज तिथेच होत. सायलीने आजपण मेथीची भाजी बनवली होती.

आज सायली जेवण्यासाठी विजयच्या बाजुलाच बसली होती. जेवण करतानाही सायली विजयला जाम त्रास देत होती. काय तर म्हणे संध्याकाळी आले घ्यायला म्हणून. तिथुन निघतानाही आईचे डोळे पाणावले होते. मग ते सायलीला घेऊन घरी आले. राधीकाने दोघांना ओवाळून आत घेतल. आता तरी विजय सोबत वेळ घालवता येईल या विचाराने सायली जरा आनंदाच होती. लग्न झाल्यापासून तिला विजय सोबत बोलायला वेळच भरला नव्हता.

राधिका अंथरुण घेऊन बाहेरच्या खोलीत आली.

“हे काय, नेहमी माझ अंथरुण मीच आणतो न. आज तु का आणल??” विजय गोंधळला. 

“आता नवीन नवरीला घेऊन तु हॉलमध्ये झोपणार आहेस??” राधीका

“तुम्ही तिघी आज आत झोपा.” विजय चाचरत बोलला.

स्वतः ला बेडवर झोपवून ताईला खाली झोपवण विजयच्या मनाला खटकत होत. असही ताई उद्या तिच्या सासरी जाईल म्हणून तो बोलला होता.

“अस कस बोलतो रे तु. तिच्या मनाचा तरी विचार कर.” राधीका

“तस काही नाहीये ताई. तुला खाली झोपवण त्यांना आणि मला पण नाही बघवल जाणार. चल आज आपण तिघी आत झोपु. यांना झोपुदे एकट्यानांच.” सायलीने विजयच्या मनातली चलबिचल ओळखली होती. विजयने नजरेनेच सायलीचे आभार मानले.

“अग पण” राधीका पुढे काही बोलणार तोच सायली तिला घेऊन आत गेली पण.

दुसऱ्या दिवशी राधीकाने तिच्या सासरी जायची तयारी केली. तर विजयने गावी जायची. सायलीला गावची ओळख पण आणि आत्या सोबत बोलणपण करायच होत विजयला.

“पण मग काल का नाही सांगीतले तुम्ही?? आज अचानक??” सायली हिरमुसली होती. तिला वाटल होत आज ताई गेली तर त्यांना निवांत वेळ भेटेल. पण विजयने सकाळीच गावाला जायची तयारी केली होती.

“अग आत्या जियाच ऐकतच नाहीये. दोन दिवस त्यांच्याकडे राहु आणि येऊ परत.” विजय

सायलीनेही मग तिची तयारी केली.

सकाळी ६ वाजताच निघाले होते. विजयने त्याची गाडी घेतली होती. राधीकाला तिच्या सासरी सोडुन ते तसेच गावाला निघुन गेले. जियाची बरीच चलबीचल चालु होती.

गावाला पोहोचल्यावर आत्यांनी दोघांच औक्षण करत आत घेतल. पोहोचेपर्यंत दुपार झाली होती. फ्रेश होऊन त्यांनी जेवण आटपली.ब-याच गप्पा रंगल्या होत्या. आता मुळ विषय कसा काढायचा हा जियाला प्रश्न पडला होता.

संध्याकाळी जियाने सायलीला पुर्ण गाव फिरवुन आणल. मोकळ वातावरण, एक प्रकारची शांतता. शहरासारखी गडबड गोंधळ नाही बघुन तिला खुपच फ्रेश वाटल. जिया तर तिच्या लहानपणीच्या गोष्टी भरभरुन बोलत होती. जिथे जिथे तिने मस्ती केली होती. त्या सगळ्या जागा ती सायलीला दाखवत होती. सायली ते सगळ एन्जॉय करत होती.

“काय ओ मामा, माझ्या बहिणीला हाकलण्याची खुप घाई झालीये काय??” विजयने जिया नसतानाच विषयाला हात घातला.

“म्हणजे??” मामा

“तिच्या लग्नाच्या मागे लागलात.” विजय

“तरीच म्हटल, तिची बाजु घेऊन तिचा भाऊ अजुन बोलला कसा नाही.” आत्या खोडकर ट्युनमध्ये बोलली. “अरे चांगला मुलगा आहे. वरुन आमच्या नजरेसमोर राहील न. बँकेत नोकरी आहे. खुश राहील ती.”

“तिची इच्छा नसताना तिने लग्न केल्यावर ती खुश राहील का?? तुमच्या समाधानासाठी ती करेलही लग्न. पण मग नंतर तिच्या पडलेल्या मनाला बघुन तुम्हाला बर वाटेल??

आत्या न मामा गप्पच होते.

“त्याच म्हणाल तर, त्याची नोकरी तात्पुरती आहे. वरुन तो तिथे वेळेवर जातही नाहीये. त्यालाच कमी करणार आहेत कामावरुन. आता तुमच्यामागे लग्नासाठी घाई करण्याचं कारण तेच आहे. त्याची नोकरी सुटायच्या आत त्याच लग्न करायचे आहे त्यांना, तो नोकरीला आहे सांगुन. वरुन त्याची गर्लफ्रेंड पण होती. आता आजकाल ते नॉर्मल झालय. पण मग फक्त तिला जळवायच आहे म्हणून तो लग्नाच्या मागे लागलाय. एकदा का तो राग ओसरला आणि मग पुढे त्याने जियाला नीट वागवलीच नाही तर काय करणार तुम्ही??” विजय

आत्या न मामा एकमेकांकडे बघत राहिले.

“तुला कस रे एवढी माहीती??” मामा

“ज्या बँकेत कामाला आहे न, त्याच बँकेचा मॅनेजर मला हे बोललाय.” विजय “आणि जळवायची गोष्ट तर त्याच्या मित्राने मला सांगीतली आहे. त्याला पण त्याच वागण आवडल नव्हत म्हणून.”

“पण मग मी तिला शब्द दिलाय रे?” मामा केवीलवाण्या आवाजात बोलले.

“तुमचा अपमान करताना त्यांना शब्द आठवला नव्हता का??” विजय “तेव्हा तर त्यांनीच शब्द मोडला होता ना??

मामांनी चमकून विजय कडे पाहीले. कारण जेव्हा मामांची परिस्थिती बिघडली होती तेव्हा मामांच्या बहीणच्या नव-याने खुप अपमान केला होता. जेव्हा की ते त्यांच्या बहीणीकडे मदत मागायला गेले होते. तिने पण साधा आधार दाखविण्याचे कष्टही घेतले नव्हते.

शेवटी कर्म त्याचा हिशोब कधी सोडतो का?? जशी आत्या विजच्या आईसोबत वागली होती. तेच तिच्या नशीबी आल होत.

“हे बघा. तुम्हाला जर जिया जड झाली असेल. तर तिला मी संभाळतो. अशीही ती सध्या आमच्या घरीच रहाते आहे. पण चुकीच्या ठिकाणी तिला नाही जाऊ देणार.” विजय कडक आवाजात बोलला.

“आता तु सगळच ठरवल आहेस, मग आम्ही तरी काय बोलणार??” आत्याने डोळ्याला पदर लावला.

“अस नको बोलुस न. मुलगा चांगला असता न, तर मीच जियाचे कान पकडुन तिला लग्नाला उभी केली असती.” विजयचा आवाज पण नरमला. “आज तुझा भाऊ असता तर त्याने अस होउ दिल असत?? एवढ सगळ ऐकल्यावर??”

“ठिक आहे. नाही करत तिला जबरदस्ती लग्नासाठी “मामाच शेवटी बोललेच. विजयच बोलण त्यांना पटल होत की तो रागाच्या भरात लग्न करत होता. राग ओसरल्यावर तो कसा वागेल हे कोणीच सांगु शकत नव्हत.

तेवढ्यात जिया आणि सायली दोघीही परत आल्या. मग तो विषय तिथेच बंद केला.

दोन दिवस तिथे राहुन तिघेही परत निघुन आले. जिया तर खुपच आनंदात होती. कारण तिच्या आईने तिच्या लग्नाचा नाद सध्यातरी सोडला होता. बरेच दिवस सुट्ट्या घेतल्याने कामाचा लोड खुप होता. सायलीच्या कामाचा लोड काही प्रमाणात आराध्याने संभाळला होता. पण विजयवर पेंडीग काम खुप आल होत.

त्यामुळे सकाळी निघालेला विजय रात्री १० च्या पुढे घरी यायचा. खुप दमायला व्हायचे त्याला. रात्री घरी आल्यावर जेवण झाली कि विजयपण सायली आणि जियाला घराच्या कामात मदत करायचा. कारण त्याही दिवसभर कामात रहायच्या. मग त्या दोघी दमत होत्या. सगळ आवरे पर्यंत रात्रीचे ११.३० वाजून जायचे.

मग विजय पडल्या पडल्या झोपून जायचा. आता ते दोघ आतल्या रुममध्ये तर जिया बाहेरच्या खोलीत झोपायची. कधी कधी दोघींना उठायला उशीर व्हायचा तर विजय स्वतःच आवरुन दोघींसाठी चहा नाश्ता बनवायचा. आठवडाभराचा कालावधी असाच गडबडीत गेला. सायली आणि विजय दोघांनाही पाहीजे तसा वेळ एकमेकांसोबत घालवताच आला नव्हता.

काही दिवसांनी विजयने दुपारी अचानक सायलीला ती तिच्या ऑफीसला असताना फोन केला.

“सरकार ऐका न. आज तु आणि जिया तुझ्या घरी जाशील का??” विजयचा आवाज जरा टेन्शन मध्ये होता.

त्याचा टेन्शन मधला आवाज ऐकुन सायलीलाही टेन्शन आल.

“का ओ?? काय झाल??” विजय

“अग काकांना हॉस्पीटलमध्ये अॅडमिट केलय गावाला. जाव लागेल. काकु खुप टेन्शन मध्ये आहेत.” विजय

“मग मी पण येते. सोबतच जाऊया. जियाच बघते मी.” सायली

ठिक आहे बोलत विजयने फोन ठेवला.

सकाळी ११ च्या सुमारास काकांच्या छातीत दुखायला लागल होत. मग गावातल्याच लोकांनी मिळुन त्यांना जिल्ह्याच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना अॅडमिट केल होत. मग शेजारच्यांनी विजयला फोन करुन दिलेला होता. कारण काकुंना तर काही सुचत नव्हत.

सायलीने जियाला कॉल केला होता. तर ति ऑलरेडी एका फॅशन शॉच्या मॉडेल्स ला मेकअप करण्यात बिझी होती. मग तीने ती उद्या येईल म्हणून बोलली होती. सायलीने जियाला आजची रात्र तिच्या घरी जायला सांगितले होते.

विजयने सायलीला तिच्या ऑफीसवरुन पिक केल.

“तिथे पोहोचले का फोन करा” आराध्याने दोघांना सुचना केली. दोघे पटापट निघाले. विजय टेन्शन मध्ये होता तर सायली त्याला धीर देत होती. त्यांना गावी पोहोचता पोहोचता रात्र झाली होती.

विजय आणि सायलीला पाहुन काकूंना खुप धीर आला. विजयने काकुंना धीर देत डॉक्टरांकडे गेला. त्या हॉस्पिटलचे डॉक्टरही विजयला चांगलेच ओळखत होते. डॉक्टरांनी जेव्हा मायनर अटॅक असल्याचे सांगितले तेव्हा विजयच्या जीवात जीव आला.

दुस-या दिवशी तर सगळा ग्रुपच धडकला होता तिथे. सगळ्यांना पाहुन काका गोंधळले. रात्रीच त्यांनी डोळे उघडले होते. राधीकाला पण यायच होत. पण विजयने काका ठिक असल्याच सांगीतल होत. दुपारी तर काकांना घरी पण सोडल होत. काकांना घेऊन ते सगळे घरी गेले. संध्याकाळ पर्यंत काका पुर्ण रिकव्हर झाले होते. पण विजयच्या सुचना काही कमी व्हायचे नाव घेत नव्हत्या. काका बारीक तोंड करुन बसले होते. त्याला असणारी काळजी बघुन सगळेच गालात हसत होते.

दुसऱ्या दिवशी दुपारहुन ते सगळे परत घरी यायला निघाले. परत येता येता त्यांनी कोल्हापूरच्या महालक्ष्मीच दर्शन घेतल. घरी पोहोचता पोहोचता त्यांना रात्र झाली. मग सगळ्यांच जेवण विजयच्या घरीच केल. मग बाकी आपआपल्या घरी निघुन गेले.

काही दिवसांनी जियाच्या आत्याने त्यांचा घरी येऊन प्रोब्लेम क्रिअेट केला होती. मग विजय परत आत्याच्या गावी गेला. ते दोन दिवस सायलीला तिच्या घरी जायला सांगितलं होत विजयने. लग्न झाल्यापासून सायलीच्या वाटेला तिचा विजय आलाच नव्हता. सायलीला आता ते खटकायला लागल होत. तिची चिडचिड व्हायला लागली होती. तिच्या होणाऱ्या चिडचिडमुळे तिच्या रागावर तिला नियंत्रण ठेवता येत नव्हत.

आत्याच्या गावावरुन विजय परत आला होता. पण सायलीचा मुड खराब झाला होता. रोज विजयच्या कुशीत शिरुन झोपणारी सायली आज बेडच्या दुसऱ्या कोपऱ्यात झोपली होती. विजयने तिला जवळ घ्यायचा प्रयत्न केला होता. पण बर वाटत नाही म्हणून सायलीने ते टाळल होत.

विजयला ही तिची अवस्था समजत होती. पण त्याच्यावर लोड इतका आला होता न की त्याला सायलीसाठी वेळ काढताच येत नव्हता. तिला थोडा वेळ द्यायला म्हणून मग तो ती रात्र तीला काहीच बोलला नाही.

दुसऱ्या दिवशी ऑफीस वरुन सायली डायरेक्ट तिच्या घरी निघुन गेली. विजयला तीने काहीच सांगीतल नाही.

सायलीला अस अचानक घरी आलेल पाहुन तिच्या आईला बर वाटल होत. पण तिचा चेहरा पाहीजे तसा हसरा नव्हता. तो जरा टेन्शन मध्ये होता. पण नंतर विचारु म्हणून त्या काही सायलीला बोलल्या नाही.

इकडे विजयला टेन्शन आल होत की सायली अजुन घरी का नाही आली म्हणून. तो तिला फोनही लावत होता. पण तिने फोन सायलेंट वर ठेवला होता. त्यामुळे तिला कळलच नाही विजयचा फोन आला होता ते. मग त्याने आराध्याला कॉल लावला.

“आरु सायली तुझ्यासोबत आहे का??” विजयच्या आवाजात काळजी होती.

क्रमशः

0

🎭 Series Post

View all