Login

तुझ्याच आयुष्याची वाटेकरी व्हायचे आहे भाग ५८

सायलीला जावे लागते गैरसमज तर तिच्या आईने दुर केला होता. पण सायलीच मन रात्रीच बैचेन जाण्याने ति रात्रीच विजयच्या घरी जायला निघाली होती,

मागील भागात. 

आत्याच्या गावावरुन विजय परत आला होता. पण सायलीचा मुड खराब झाला होता. रोज विजयच्या कुशीत शिरुन झोपणारी सायली आज बेडच्या दुसऱ्या कोपऱ्यात झोपली होती. विजयने तिला जवळ घ्यायचा प्रयत्न केला होता. पण बर वाटत नाही म्हणून सायलीने ते टाळल होत.

विजयला ही तिची अवस्था समजत होती. पण त्याच्यावर लोड इतका आला होता न की त्याला सायलीसाठी वेळ काढताच येत नव्हता. तिला थोडा वेळ द्यायला म्हणून मग तो ती रात्र तीला काहीच बोलला नाही.

दुसऱ्या दिवशी ऑफीस वरुन सायली डायरेक्ट तिच्या घरी निघुन गेली. विजयला तीने काहीच सांगीतल नाही.

सायलीला अस अचानक घरी आलेल पाहुन तिच्या आईला बर वाटल होत. पण तिचा चेहरा पाहीजे तसा हसरा नव्हता. तो जरा टेन्शन मध्ये होता. पण नंतर विचारु म्हणून त्या काही सायलीला बोलल्या नाही.

इकडे विजयला टेन्शन आल होत की सायली अजुन घरी का नाही आली म्हणून. तो तिला फोनही लावत होता. पण तिने फोन सायलेंट वर ठेवला होता. त्यामुळे तिला कळलच नाही विजयचा फोन आला होता ते. मग त्याने आराध्याला कॉल लावला.

“आरु सायली तुझ्यासोबत आहे का??” विजयच्या आवाजात काळजी होती.

आता पुढे. 

“नाही रे. काय झाल? आज ती तिच्या घरी जाणार होती. तुला बोलली नाही का??” आराध्यालाही आता टेन्शन आल होत.

तसा विजयने सुटकेचा श्वास सोडला.

“भाऊराया निट सांग काय झाल ते” आराध्या

मग विजयने थोडक्यात सांगीतल. आराध्यालाही तिच वागण खटकल. मग आराध्याने सायलीच्या आईला फोन लावला होता. त्यांनाही थोडाफार अंदाज दिला सायलीच्या वागण्याचा. मग रात्रीच जेवण झाल्यावर आई सायलीच्या खोलीत गेली. सायलीला मात्र जेवण गेल नव्हत. ति तिच्या रुममधुन बाहेर आलीच नव्हती.

“काय झाल सायु?? कसलं टेन्शन आहे??” आई

तशी सायली आईच्या मांडीवर डोक ठेवुन पडली. डोळे थोडे ओलावलेले होते.

“म्हणून तुला आधीच बोलली होती. तिथली लाईफ वेगळी राहील. इथल्या सारखी नसणार. मग तुझी चिडचिड होणार. त्याचा परिणाम तुमच्याच नात्यावर होणार.” आई

सायलने तिचे डोळे पुसले.

“पण तिथल्या लाईफ बद्दल मला काहीच तक्रार नाहीये. त्यांना माझ्यासाठी वेळच भेटत नाहीये. हा खरा प्रॉब्लेम आहे.” सायली बारीक आवाजात बोलली.

“अच्छा, मग तुला घरकामात मदत करतात ते काय असत??” आई. सायलीने चमकून पाहील तिच्या आईकडे.

“आपल्यासाठी वेळ काढणे म्हणजे फक्त सोबत राहुन गप्पा मारणे, वेळ घालवणे असा नाही होत बच्चा. आपण पण घरात काम करुन दमतो. तेव्हा आपण काही न सांगताही त्यांची आपल्याला भेटलेली मदत ही आपल्यासोबत वेळ घालवणच असत. आता तु पण तुझ्या ऑफिसमधून काम करुन दमतेस न?? तसे ते पण तर दमत असतील. तरी तुला तुझ्या कामात मदत करतातच न. कधी कधी सकाळी तुला उठायला उशीर झाला तर स्वतः चहा नाश्त्याच बघतात. तरी तुला अस वाटत की ते तुला वेळ देत नाही?? आता त्यांना मानसीक आधाराची गरज असताना तु सरळ इकडे निघुन आलीस तेही त्यांना काही न सांगता. त्यांच्या मनाचा विचार तरी केलास का?? अस आहे का तुझ प्रेम??” आई.

इकडे सायलीच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. आईने सांगीतलेल्या दृष्टीने तीने  विचारच केला नव्हता. तेवढ्याच बाबा तिच्या रुममध्ये आले.

“तु तुझा फोन का उचलत नाहीयेस, आरुचा फोन आलाय माझ्या मोबाईल वर.” बाबा

सायलीने तो फोन घेतला.

“बावळट आहेसं का ग तु??” आराध्या चिडून बोलली. “घरी जायच होत तर विजयला सांगुन जायच न. मुर्ख त्याला किती टेन्शन आल होत माहितीये. तरी तो हेच बोलला की तुला भांडु नको म्हणून. आजच्या दिवस राहु दे म्हणे. जाऊदे तुझ्यासोबत न बोलणच व्यर्थ आहे.” आराध्या ने फोन ठेवुन पण दिला.

“बघितले का?? तु अशी वागली तरी त्याला तुझीच काळजी आहे.” बाबांनी सायलीच्या डोक्यावरुन प्रेमाने हात हात फिरवला. “तु स्वतःला तुझ्या आईसारखी म्हणतेस न?? पण तुझ्या आईने मला कधीच अस एकट्याला सोडले नव्हत.”

सायली फक्त ऐकत होती.

“झोप आता. निट विचार कर. बाकी आम्ही तुझ्या पाठीशी आहोतच.” आई.

आई आणि बाबा दोघही तिला झोपवुन त्यांच्या रुममध्ये निघुन गेले.

एवढं सगळं ऐकल्यावर झोपेनेही तिची साथ सोडली होती. विचार करता करता तिचा कधी डोळा लागला तिलाच कळल नाही. 

रात्री अचानक सायलीला जाग आली. तिच मन अगदीच बेचैन झाल होत. खुप घाबरायला झाल होत. तिला विजयची खुपच आठवण यायला लागली होती. तिने घड्याळात पाहील तर रात्रीचे ३.३० वाजले होते. ति उठली, तिने आंघोळ केली. सगळ आवरुन ति तिच्या घरुन विजयकडे जायला निघाली.

ति तिची स्कुटी खुप स्पीडने चालवत होती. तिला लवकरात लवकर विजयजवळ पोहोचायच होत. त्या दिवशी नेमकी मोहीते साहेब ४ वाजताच निघले होते. हायवेचा रस्ता होता . गाड्यांची जरा गर्दी होती. सायलीने त्यांची गाडी ओव्हरटेक केली.

“साहेब, ही सायली बघा किती जोरात चाललीये” नंदुकाकांनी तिला पाहील होत.

“चल रे, इतक्या सकाळी ती नाही उठत” मोहिते साहेब.

“अहो सायलीच होती. तिची मरुन रंगाची स्कुटी आहे न. **** नंबरची.” नंदुकाका

मग मोहिते साहेबांनाही वेगळच वाटल.

“घे तिच्या मागे” मोहिते साहेब.

मग ते सायलीच्या मागे मागे आले. जी विजयच्या घरी पोहोचली होती.

तिथे पोहोचली तर तिने जियाला पाहील, ती शेजारच्या मावशींच दार वाजवायला चालली होती. सायलीला एवढ्या पहाटे पाहुन तिला नवल वाटल, पण दुसऱ्याच क्षणाला तिचा राग पण आला.

“काय गं एवढ्या सकाळी का दरवाजा वाजवायला चालली आहेस??” सायली गोंधळून विचारत होती.

“ते जाऊदे, तुला सांगुन जाता नाही येत का ग?? तु नव्हती म्हणून तो रात्री जेवला पण नाही. किती टेन्शन मध्ये होता तो माहीतीये का?” जिया रागारागाने बोलत होती. “त्याने टेन्शन घेतल का त्याला ताप भरतो माहीतीये न. आता भरलाय ताप त्याला. काय करायच आता?? त्याला काही झाल न मग बघ.” जियाच्या डोळ्याला धारा लागल्या.

ताप भरल्याच ऐकताच सायली धावतच घरात घुसली. जियाचा तो आवाज ऐकून मावशी ही बाहेर आल्या होत्या. मोहिते साहेब ही येथून पोहोचले होते. जियाने जस त्यांना ताप भरलाय सांगीतल. तस त्यांनी त्यांच्या डॉक्टरांना फोन करुन बोलावून घेतल होत.

सायली विजय जवळ गेली. नेहमीपेक्षा जास्त तापल होत त्याच अंग. त्याला अस तापलेल पाहुन सायलीला अवसान गळाल. तिने विजयचा हात हातात घेतला.

“उठा न विजय, हे बघा मी आलीये. आता नाही जाणार सोडुन तुम्हाला कुठे.” सायली विजयच्या गालावरुन हात फिरवत होती. त्याच्या हाताची किस घेत होती. सोबतीला अश्रुंच्या धारा.

मावशींनी तोवर पटकन मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवायला सुरवात केली होती.

“आता बोलुन काय फायदा. तुम्हा मुलांना जरा म्हणून धीर नाही.” मावशी थोड्या कडक आवाजात बोलल्या.

मोहिते साहेबांनी जियाला काय झाल ते विचारल. तिने सांगुन दिल होत की, “वहीनी विजयला न सांगताच तिच्या घरी गेली. बाकी त्यांच्यात काय झाल ते नाही माहीत.”

तोवर डॉक्टरही आले होते. त्यांनी विजयला तपासल. इंजेक्शन दिल. काही गोळ्या दिल्या. नॉर्मल फिवर आहे बोलत ते निघुन गेले. सायली विजयच्या उशाशी बसूनच होती. तिच्या वागण्याचा आता तिला पश्चाताप आला होता. मोहिते साहेबांनी तिच्या डोक्यावरुन प्रेमाने हात फिरवला. तशी ती त्यांनी बिलगली.

“माझ्याकडुनच चुक झाली, मी अशी वागली नसतील तर ह्यांना ताप भरलाच नसता.” सायली रडतच बोलत होती.

“पण मग तु इतक्या सकाळीच कस काय निघाली??” मोहिते साहेब

“रात्री जाग आली होती, खुप घाबरायला झाल होत. यांची खुप आठवण यायला लागली. मग तशीच उठुन आली.” सायली

“आता अस नको बोलुस की तु घरी सांगुन नाही आलीस म्हणून” मोहिते साहेब

सायलीने नकारार्थी मान हलवली. जिया आणि मोहिते साहेबांनी डोक्याला हात लावला.

मोहिते साहेब थोडावेळ थांबले. त्यांनाही नाशिकला जायच होत.

“परत असा वेडेपणा करु नकोस “ मोहिते साहेबांनी सायलीला दटावले. ते निघुन गेले. सायली मात्र विजयच्या उशाशी बसुन राहीली होती. त्याचा हात हातात घेऊन. त्या दोघांना पाहुन जियाचे डोळे पाणावले. कारण विजयला ताप भरलाय हे समजे पर्यंत अर्धा तास झाला होता. मग ती शेजारच्यांकडे जाईपर्यंत सायली तिथे पोहोचली होती. प्रेमातील ही ताकत जियासाठी नवीन होती.

मोहिते साहेबांनी तिथून निघाल्यावर सायलीच्या बाबांना फोन लावला.

“सायली पोहोचली न व्यवस्थीत विजयकडे?” सायलीचे बाबा

“हो, तुला कस माहीत??” मोहीते साहेब.

“तिचा तो रात्रीचा गोंधळ आम्हाला समजला होता. पण तोवर ती घरातुन निघाली पण होती. मी आलो होतो तिच्या मागे मागे. नंतर मला तु तिच्या मागे जाताना दिसलास. मग मी परत फिरलो. म्हटल आता तु आहेस तर काहीच टेन्शन नाही.” बाबा

“अरे ताप भरला आहे विजयला, मग आपल्या डॉक्टर ला बोलावल होत. इंजेक्शन दिलय होईल बरा लगेच. नॉर्मल होता फिवर.” मोहिते साहेब “सायली स्वतः लाच दोष देत होती. काही बोलली होती का ती??”

मग सायलीच्या वडीलांनी सगळ त्यांना सांगीतल होत.

“आपल्या पोरांना न, जरा म्हणून धीर नाही. एक काम कर विजयची १० दिवसांची सुट्टी मंजूर कर. यांना जरा आपण बाहेर पाठवु. असे तर ते बाहेर जाणार नाही कुठे. बाकीच्यांसोबत मी बोलून घेतो.” मोहिते साहेब.

“ठिक आहे. मस्त हनीमुन पॅकेज बुक करुया. रुद्रला पण सुट्टी घ्यायला सांगतो.” सायलीचे बाबा.

“राधीका अजुनही त्याच टुर्समध्ये काम करते न. तिलाच सांगते मी.” मोहिते साहेब.

दोघांनाही थोडीफार बोलुन फोन ठेवला.

बसल्या बसल्या सायलीचा डोळा लागला होता. ती तशीच झोपून गेली होती. जियाने काही तिला उठवल नाही. थोड्यावेळाने विजयला जाग आली. त्याने सायलीला पाहील. त्याची कळी खुलली. त्याचा ताप उतरला होता. विजय उठुन बसला. त्याच्या हालचालीने सायलीची झोपमोड झाली. तिने विजयला उठलेल पाहील. तसा तिने त्याच्या गळ्याला हात लावला. ताप उतरलेला होता. ती तशीच विजयला घट्ट बिलगली. डोळ्यात अश्रुंच्या अखंड धारा.

“सरकार काय झाल??” विजयने तिचा चेहरा हातात घेतला.

“सॉरी न. आता नाही जाणार सोडुन तुम्हाला कुठे” सायली हुंदके देत देत बोलत होती. “पण परत अस टेन्शन नाही घ्यायचे. तुम्हाला माझी शप्पथ आहे.” ती परत विजयला बिलगली.

इकडे विजय विचारात पडला हिला काय झाल म्हणून. त्याला ताप येऊन गेला हे जाणवले नव्हत. मग जियाच बोलली.

“रात्री तु थंडीने खुप तळमळत होतास. मला आत आवाज आला तशी मी बाहेर आली. बघीतले तर तुला ताप भरलेला होता. एवढी घाबरली होती मी, काहीच सुचत नव्हत. मग मी शेजारच्या मावशींच दार वाजवणार तेवढ्यात मला वहिनी येताना दिसली. तिला एवढ्या पहाटे येताना बघुन आराध्या ताईचे बाबाही हिच्या मागे आले होते. डॉक्टरही त्यांनीच बोलावल होता.” जियाने सगळाच खुलासा केला.

“सरकार, एवढ्या रात्रीच निघायची काय गरज होती?? तुला काही झाल असत म्हणजे?” विजयने तिला घट्ट मिठीत घेतल.

“नाही करमल ओ मला, तुमच्याशिवाय” सायली मुसमुसली.

“बरं” विजय. “आणि मी पण सॉरी. तुझा वेळ तुला नाही देता आला मला.” तिच्या गालावर हात ठेवले.

मग मावशीकडे पाहील. “मावशी यातल कोणाला काही कळु देऊ नका प्लिज.”

मावशी पण पहाटेपासून तिथुन हलल्या नव्हत्या. त्यांनी पण ठिक आहे म्हटल.

“कोणालाही म्हणजे?? कळलं तर प्रोब्लेम होईल का??” जिया तिचे हात एकमेकांवर चोळत बोलली. तसे दोघही तिच्याकडे रोखुन बघायला लागले.

मग जियाच बोलली.

“ते थोड्या वेळापूर्वी आराध्या ताईचा फोन आलेला. दादा बद्दल विचारायला मग मी रागारागात गेली बोलुन.” जिया.

“जिया” विजय.

तोवर बाकीचे येऊन पोहोचले होते.

सायली अजुनही विजयच्या मिठीत होती.

“तुम्हाला रोमान्स करायचा असेल तर जा आतल्या रुममध्ये” आरती

तस दोघांनी एकमेकांना सोडल. मग त्यांना आठवल की मावशी पण समोरच होती. ती परिस्थितीच अशी होती त्यामुळे मावशी दोघांना काहीच बोलली नव्हती. कारण तेव्हा दोघांना एकमेकांची नितांत गरज होती.

कोणी काहीच बोलल नाही म्हणून विजय जरा रिलॅक्स झाला. कारण आराध्या ने फक्त विजयला ताप भरला एवढच सांगीतल होत बाकी कोणाला काहीच सांगीतल नव्हत. शेवटी सगळे सायलीला भांडले असते, जे तिला आवडल नसत. वरुन सायलीला तिची चुक समजुन गेली होती आणि सकाळीच आली होती.

मग जियाने सगळ्यांसाठी चहा टाकला. जो विजयसारखाच बनवला होता.

“बरं तुला असा अचानक ताप कस काय आला रे??” सोनाली

सायलीने विजयकडे पाहील. आता जे काही होईल त्याला ती सामोरी जायला तयार झाली होती. शेवटी चुक तिची पण होती न.

“अरे, ह्या दोन तीन आठवड्यात एवढा प्रवास झालाय न उना उनाचा. मग तेच उन गरम होऊन अंगात उतरल.” विजयने बाजु सावरुन घेतली. तरी सायलीला खुपच वाईट वाटत होत. ती काही बोलायला जाणार तोच विजयने तिला नाही मध्ये इशारा केला.

मग थोड्या वेळाने सर्व आपआपल्या ऑफिसवर निघुन गेले. फक्त आराध्या थांबली होती. सायलीचे कान जे ओढायचे होते.

“बहिणाबाई धन्यवाद.” विजय

तरी ती सायलीकडे रागात बघत होती.

“सॉरी न जान” सायलीने आराध्यासाठीच लाडक अस्त्र बाहेर काढल.

“प्रेम म्हणजे काय, म्हणून आम्ही तुम्हा दोघांना बघतो आणि तुच एवढ्या लवकर हार मानलीस.” आराध्या

“हार अशी नाही ग, पण चिडचिड झाल्यामुळे खुप राग राग होत होता मनाचा. मग म्हटल उगाच यांच्यावर निघायचा त्यापेक्षा घरीच जाते. मग आईने समजावल, तेव्हा ट्युब पेटली.” सायली

“पेटली म्हणून रात्रीच निघायच का?? काही झाल असत तुला मग?? नशीब नंदुकाकांच लक्ष गेल तुझ्यावर.” आराध्या

“खुप घाबरली होती मी. अचानक न मन बेचैन व्हायला लागल होत.” सायली

“म्हणजे तो आजारी पडला हे तुला इतक्या लांब तुझ्या घरी, ते ही रात्रीच्या वेळीही कळल??” आराध्या

ते तर इथे आल्यावर कळल” सायली विजयकडे बघत बोलली.

“तुमच झाल का सांगा, मी झोपतो तोवर” विजय तिरक्या डोळ्यांनी दोघींकडे बघत बोलला.

“बर बाबा, निघते मी. नाही करत तुम्हाला डिस्टर्ब.” आराध्या "चल ग जिया. आता आपण कबाब मध्ये हड्डीच न.” जियाकडे बघत आराध्या बोलली.

“हो न, मी पण उपाशी आहे, याची तर कदरच नाही कोणाला.” जियापण नाटकीपणाने म्हटली.

“बसा, बनवते काहीतरी. सगळ्यांना न त्या सोनाली आणि प्रणालीची हवा लागलीये नुस्ती.” सायली

सायलीने सगळ्यांसाठी नाश्ता बनवला. मग सायलीच्या वडीलांचा विजयला फोन आला.

“कसा आहेस बेटा??” बाबांच्या आवाजातली काळजी बघुन विजयला भरुन आल. वडीलांच्या प्रेमासाठी तो खुप तरसला होता. ते आता त्याला मोहीते साहेबांच्या आणि सायलीच्या बाबांच्या रुपात त्याला भेटत होत.

“एकदम मस्त. काकांनी डॉक्टरच तसा आणला होता.”विजय हसत बोलला.़

“बरं, सायली कडुन मी तुमची माफी मागते” आईच्या आवाजात अपराधीपणा होता.

“काय आई तुम्ही पण. एवढ्या गोष्टी कोणी मनाला लावून घेत का?” विजय

“आता तुम्ही म्हणुन संभाळून घेताय, नाहीतर हिच काय झालेल्या असत न, काय माहीत.” आई

“बरं, ताईचा फोन आलाच, तर काही बोलु नका. ती उगाच टेन्शन घेईल.” विजय “नाहीतर उगाच सायलीला पण तिच्या हातची पडायची.” विजय हसतच बोलला.

“मी तर म्हणते पडलीच पाहीजे तीला. जाम लाडावुन ठेवलय तिला तिच्या बाबांनी.” आई

सायली बारीक तोंड करुन बसली होती. “नको न आई. तशी चुक माझी पण होती. मी पण वेळ नाही दिला तिला. ताईला जर कळल न, तर तिला नाही, ती मलाच वाजवेल.” विजय

तसे मग सगळेच हसतात.

“बरं तु आजचा दिवस आराम कर. आला नाहीस तरी चालेल.” बाबा

“अहो पण, माझ्यामुळे उगाच तुम्हाला हेडऑफीसला उत्तर द्यावी लागतात.” विजय

“त्याच टेन्शन तु नको घेउन. तुझ्यामुळेच तर ती फ्रेनचाईजी टिकली. त्यामुळे तुला कोणी काही बोलणार नाही.” बाबा

ठिक आहे बोलत फोन ठेवुन दिला.

“सायली आज तु पण सुट्टी घे.” आराध्याने सायलीचा हात हातात घेतला. “खुप धावले दुसऱ्यांसाठी आज तुम्ही तुमच्यासाठी जगा.”

“जिया चल.” आराध्या जियाला घेऊन बाहेर पडली.

आता रुममध्ये दोघे होते. सायली नाश्ता केल्याच्या प्लेट्स घेऊन किचनमध्ये गेली. थोड्यावेळाने विजय ही किचनमध्ये गेला.

सायली ने कुडता आणि पायजमा घातलेला होता. एकदम फिटींगमध्ये शिवलेला होता. त्यातील तिच ते मोहक रुप बराच वेळ विजय दारातून पहात होता. मग तो तिच्याजवळ गेला आणि पाठीमागून तिला घट्ट मिठी मारली. त्याने त्याच तोंड सायलीच्या खांद्यावर ठेवल. सायलीने दिर्घ श्वास घेतला.

तिच्या मानेवरचे केस बाजुला सारत तिच्या खांद्यावर त्याने किस घेतली. तशी सायली शहारली.

“अहो” सायली. “करु द्याना काम मला.”

“मी थोडीच तुझे हात पकडले. तु तुझ काम कर मी माझ करतो.” विजयने तिच्या दोन्ही खांद्यावर किसेसचा वर्षावच केला.

सायलीचे काम करणारे हात थांबले. तिने तिची मान तशीच विजयच्या खांद्यावर टाकली. मिटलेले डोळे हलकेच उघडुन केवीलवाण्या चेहऱ्याने विजयकडे पाहीले. मग विजयने तिच्या गालावर किस केल.

“ओके, कर काम” विजय हसतच हॉलमध्ये आला. तेव्हा कुठे सायलीने घरातली सगळी काम आटपली होती.

मग ती विजयजवळ येऊन बसली.

“आता??” सायली

“चल बाहेर जाऊया” विजय

“पण कुठे??” सायली

“पहिले मुव्ही बघुया. मग बाकी नंतर ठरवुया.” विजय

“ओके” सायली तिच आवरायला गेली.

विजय त्याची मोठी गाडी काढणार तोच सायली ने त्याला बाईक काढायला लावली. पहीले दोघांनी एक रोमॅन्टिक मुव्ही पाहीली. तिथुन निघुन आश्रमात गेले. बरेच दिवस झाले त्याला जमले नव्हत तिथे जायला. आश्रमात परीला मनवता मननता निम्मा वेळ गेला होता दोघांचा. जाम चिडली होती ती दोघंवर, इतक्या दिवसांनी आले होते म्हणून.

शेवटी सायली ने कसतरी तिला समजवल तेव्हा कुठे मॅडम खुश झाल्या. तोवर दुपारचे २ वाजले होते. तिथुन दोघ निघाले आणि एका हॉटेलमध्ये जेवायला गेले. जेवण झाल्यावर सायलीने वॉटर पार्कला जायचा हट्ट केला. दुपारची वेळ असल्याने विजयने पण होकार दर्शवला.

दोघांनी पाण्यात खुप मस्ती केली. पाण्यात भिजलेल्या तिच्या त्या मोहक रुपावरुन विजयची नजर हटतच नव्हती. विजयच अस बघत सायलीला अजुन लाज चढवत होत. तिथल्या रुममध्ये फ्रेश होऊन दोघही घरी यायला निघाले.

घरी पोहोचता पोहोचता त्यांना ८ वाजले होते. खुप ट्रॅफिक लागली होती त्यांना. बाईक असल्याने थोड सोप झाल होत त्या गर्दीतून वाट काढताना. घरात पोहोचल्यावर सायलीला शॉक बसला होता. कारण त्यांच ते घर सगळ्या ग्रुपने मिळुन डेकोरेट केल होत, सायलीच्या वाढदिवसाच्या डिझाईनने.

दोघांच्या रिलेशनला आज एक वर्ष पूर्ण झाल होत. सायली तिचा वाढदिवस विसरूनच गेली होती. आज तिला काही कामच करुन दिल नव्हत ग्रुपने. तिला बाहेरच्या खोलीतच थांबवले होत. 

सायलीने केक कट केला. सगळ्यांना चारला. आज पावभाजी पण ग्रुपने बनवली होती. सगळ्यांनी मस्त पावभाजी वर मारला.

मग सगळेच गप्पा मारत बसले.

“आपल्या घरच्यांच न काहीतरी प्लॅनिंग चालु आहे” राहुल

“हो, मलापण जबरदस्ती सुट्ट्या घ्यायला लावत आहेत.” प्रणाली.

“नक्की काय चालु आहे??” विजय

“त्या दिवशी बाबापण गपचुपच राधीकाताईसोबत बोलत होते.” आराध्या

“मला पण सुट्टीसाठी मेसेज आलाय.” विजय मोबाईल कडे बघत बोलला.

“ते कुठे घेऊन बसलात आज” सोनाली “आता फक्त आजचा विचार करा.” सोनाली फुल रोमँटिक ट्युनमध्ये बोलली.

“म्हणजे??” सायली “झाला वाढदिवस माझा. यापुढे काहीच नको हं”

“ते तर आम्ही नाही सांगीतर तरी तु सोडणारच नाहीस.” आरतीने डोळा मारला.

विजय आणि सायली दोघही ग्रुपकडे गोंधळून बघत राहिले. आता सगळेच घरी निघायच्या तयारीत होते.

“बेस्ट ऑफ लक माय जान” प्रणाली आणि आराध्या दोघी एकदम सायलीच्या कानात बोलल्या. सायली गोंधळली.

इकडे विजयच्या कानातही सेम डायलॉग पडला होता, त्याच्या तिघा मित्रांकडून.

“काय आता तुम्हाला केक पण चढतो का??” विजय

“तस समज हवं तर. बाय लव्ह बर्डस” सोनाली.

सगळे निघुन गेले. मग विजय आणि सायलीने एकमेकांकडे पाहीले. दोघांनीही खांदे उडविले.

“अरे जिया कुठे आहे??” विजयला आत्ताशी आठवल होत. त्याने तिला फोन लावला.

“कुठे आहेस ग?? किती वेळ लागेल तुला यायला. उशीर किती झालाय.” विजय काळजीने बोलला.

“मी आज नाहीये घरी, वहिनीच्या घरी आलीये. उशीर झाला होता म्हणून.” जियापण खोडकर हसतच बोलत होती. “आजची रात्र फक्त तुमची आहे. एन्जॉय.”

“अरे झालय काय सगळ्यांना??” विजय. तोवर जियाने फोन ठेवुनपण दिला होता.

सायली तिचे कपडे बदलण्यासाठी आतल्या रुममध्ये गेली. तिथला नजारा बघुन ति तिथेच थिजली.

क्रमशः

0

🎭 Series Post

View all