Login

तुझ्याच आयुष्याची वाटेकरी व्हायचे आहे भाग ५९

विजयने सगळ्यांची लाईफ तर सेट केली होती, पण आता सुरज नावाचा धक्का जियाच्या आयुष्यात काय घेऊन येणार होता??

मागील भागात. 

आपल्या घरच्यांच न काहीतरी प्लॅनिंग चालु आहे” राहुल

“हो, मलापण जबरदस्ती सुट्ट्या घ्यायला लावत आहेत.” प्रणाली.

“नक्की काय चालु आहे??” विजय

“त्या दिवशी बाबा राधीकाताईसोबत गपचुपच बोलत होते.” आराध्या

“हे काय, मला पण सुट्टीसाठी मेसेज आलाय.” विजय मोबाईल कडे बघत बोलला.

“ते कुठे घेऊन बसलात आज” सोनाली “आता फक्त आजचा विचार करा.” सोनाली फुल रोमँटिक ट्युनमध्ये बोलली.

“म्हणजे??” सायली “झाला वाढदिवस माझा. यापुढे काहीच नको हं”

“ते तर आम्ही नाही सांगीतल तरी तु सोडणारच नाहीस.” आरतीने डोळा मारला.

विजय आणि सायली दोघही ग्रुपकडे गोंधळून बघत राहिले. आता सगळेच घरी निघायच्या तयारीत होते.

“बेस्ट ऑफ लक माय जान” प्रणाली आणि आराध्या दोघी एकदम सायलीच्या कानात बोलल्या. सायली गोंधळली.

इकडे विजयच्या कानातही सेम डायलॉग पडला होता, त्याच्या तिघा मित्रांकडून.

“काय आता तुम्हाला केक पण चढतो का??” विजय

“तस समज हवं तर. बाय लव्ह बर्डस” सोनालीने सायलीला फ्लाईंग किस दिली.

सगळे निघुन गेले. मग विजय आणि सायली ने एकमेकांकडे पाहीले. दोघांनीही खांदे उडविले.

“जिया कुठे आहे??” विजयला आत्ताशी आठवल होत. त्याने तिला फोन लावला.

“कुठे आहेस ग?? किती वेळ लागेल तुला यायला. उशीर किती झालाय.” विजय काळजीने बोलला.

“मी आज नाहीये घरी, वहिनीच्या घरी आलीये. उशीर झाला म्हणून.” जियापण खोडकर हसतच बोलत होती. “आजची रात्र फक्त तुमची आहे. एन्जॉय.”

“अरे झालय काय सगळ्यांना??” विजय. तोवर जियाने फोन ठेवुनपण दिला होता.

सायली तिचे कपडे बदलण्यासाठी आतल्या रुममध्ये गेली. तिथला नजारा बघुन ति तिथेच थिजली.

आता पुढे. 

तिच ह्रदय कितीतरी वेगाने धावायला लागल होत. तिचा चेहरा लाजेने लाल झाला होता.

सायलीला अस नुसते उभ बघुन तो पण तिच्याजवळ गेला. आत पाहील तर आतली रुम पुर्ण सजवलेली होती. बेडपण गुलाबाच्या पाकळ्यांनी हर्टशेपमध्ये सजवलेला होता.

बाकीच्या ग्रुपचा बोलण्याचा अर्थ आता त्यांना समजला होता. विजयने सायलीला मागुन मिठीत घेतल.

“आता त्यांनी एवढी मेहनत घेतली आहेच तर मग ती वाया का घालवायची??” विजयने त्याचा चेहरा तिच्या खांद्यावर ठेवला.

सायलीने तिच तोंड झाकुन घेतल. तिच्या चेह-यावरची लाली त्याला बरच काही सांगून गेली.

“मग काय विचार आहे तुझा??” विजय सायलीला बोलत करत होता.

सायली फिरुन विजयच्या मिठीत शिरली. तिचा चेहरा तिने विजयच्या छातीमध्ये लपवला.

“रेडी आहेस न??” विजय तिच्या डोळ्यात बघत बोलला. सायली फक्त लाजत होती.

“अग बोल. त्या दिवशी तर खुप घाई झाली होती.” विजय

“तुम्ही चला, मी आली आवरुन बाकी” सायली लाजतच बोलली. 

मग विजय बेडवर जावुन पसरला. सायलीने बाकी घर आवरुन घेतल. ति आतल्या रुममध्ये जाताना तिच ह्रदय खुप जोरात धावत होत.

ति हातात दुधाचा ग्लास घेऊन आली.

“आता हे काय?? त्या फिल्मीची हवा तुलापण लागली का काय?? विजय

“हो, तिने तर एवढ काय काय साांगीतल न हळदीच्या रात्री. बाप रे. जाम नौटंकी आहे तिच्यात. मला तर महेशच हसायला येतय.” सायली

मग विजयने तिला त्याच्याकडे खेचुन घेतल. सायली त्याच्यावर गेली. “आता तीने एवढ सांगितले आहे. तर मग सांग आपण प्रॅक्टीकल करुया.” विजय खोडकर होत बोलला.

“जा ओ तुम्ही.” सायली लाजली.

“आता तुला सोडुन कस काय जाउ सरकार” विजयने तिच्या गालावर किस केली.

तिला गोल फिरवत विजय तिच्यावर आला. तिच्या चेहऱ्यावर येणारी केसांची बट तो बाजुला सारत होता. मग तिच्या गालावरुन त्याने बोट फिरवली. सायलीने शहारुन मान फिरवुन घेतली. तिची जशी मान विजय समोर आली. त्याने त्या मानेवरच किस घ्यायला सुरवात केली.

“त्या दिवशीचा नाईट ड्रेस घातला असता न??” विजय

“का ओ??” सायली “इतका आवडला का तो ड्रेस??”

“त्या ड्रेस मधली तु आवडलीस” विजयची बोट तिच्या चेहऱ्यावरुन फिरत होती. “खुप भारी दिसत होतीस. वरुन माझ काम पण सोप झाल…..” बोलता बोलता विजयने जिभ चावली.

“म्हणजे तुम्हाला सोप जाव म्हणून घालायला सांगत होते का??” लटक्या लटक्या रागात बोलली. “किती बेशरम आहात ओ.” तिने विजयच्या हातावर चापट्या मारल्या. मग विजयची पण मस्ती सुरू झाली.

तशीच दोघांची मस्ती सुरू झाली, मस्ती मस्ती मध्ये सायलीच्या ड्रेसची वरची दोन बटण उघडली गेली. विजयच लक्ष तिकडे गेल, सायलीने तर त्याचे हात पकडुन ठेवले होते. मग विजयने त्याचा चेहरा डायरेक्ट तिच्या मानेत घुसवुन तिथे किस घ्यायला सुरवात केली.

“अहो” सायली शहारुन बोलली.

“काय झाल?? तुला त्रास होतोय का?? तुला हव तर थांबुयात आपण” विजय काळजीने लगेच एका बाजूला झाला.

“तस नाही, फक्त चावु नका. मागच्या वेळेसच माहितीये ना” सायली लाजतच बोलली.

विजयला पण खुप हसायला आल.

मग सायलीने विजयला खाली ढकललं आणि ति त्याच्यावर गेली. क्षणभर विजय ही गोंधळला. त्याच्या गालावरुन हात फिरवत ती त्याला बघु लागली.

“काय बघताय सरकार??” विजय

“खुप त्रास दिलाय न मी. आता नाही करणार परत अस” सायली

विजय पुढे काही बोलणार तोच सायलीने विजयचे ओठ तिच्या ओठांनी बंद केले. खुप अडचणी आणि वाट पाहील्या नंतर तिला तिचा विजय भेटला होता. अगदी आता शेवटचा असलेला त्यांच्यातला कपड्यांचा अडथळा पण आता दुर झाला होता. विजयने कुठलीही घाई न करता त्याच्या प्रत्येक स्पर्शाने सायलीला त्याची केली होती. प्रणयातली ती यातना ही दोघांना गोड वाटुन हवीहवीशी वाटु लागली होती. रात्री ब-याच उशीरा दोघ एकमेकांच्या कुशीत विसावुन झोपी गेले.

दुसऱ्या दिवशी जरा उशीराच जाग आली सायलीला. तिने विजय कडे पाहील. एकदम लहान निरागस मुलासारखा दिसत होता तो. तिने परत त्याच्या गालावर किस घेतली. ती उठणार तोच तिला जाणवल की तिच्या अंगावर तर कपडेच नाहीयेत. तीने आजुबाजुला पाहीले तर ते सगळे खाली पसरलेले होते आणि त्या बेडवर चादर पण एकच होती. सायलीच्या हालचालीने विजयला पण जाग आली. त्याने सायलीला पाहीले.

“गुड मॉर्निंग सरकार.” विजयने तिला परत जवळ ओढल.

“अहो, कपडे सगळे खाली आहेत. अस कोण खाली टाकत.” सायली बारीक आवाजात बोलली.

“मग घे ना. उठुन” विजय चावट होत बोलला.

“तुम्हाला काही शरम. मी अशीच उठु??” सायली

“हा मग आता असही आपण दोघे आहोत न” विजयने तिची खेचायला सुरवात केली. “नव-यापुढे कसली शरम??”

“जा बाबा, मला लाज वाटते.” सायली लाजतच बोलली.

दोघही अजुन चादरीत होते. मग विजयने सायलीला चादरीसकटच त्याच्या हातावर उचलल.

“अहो काय करताय??” सायली लाजेने तिचे पाय झाडत होती.

“जास्त पाय चालवु नकोस. चादर खाली पडेल अंगावरुन.” विजय. सायली बावरुन हात पाय हलवायचे थांबली. विजयने तिला बाथरुममध्ये नेल. आंघोळीसाठी गिझर चालु केल. पाणी भरे पर्यंत काय करायच म्हणून विजयचा खोडकरपणा चालु झाला. तिचे हात चादरीला घट्ट पकडलेले असल्याने, विजयने तिला परत मिठीत घेतल.

“अहो, वेळ बघा न.” सायली विजयला थांबवायला बघत होती. पण त्याच्या मिठीतुन तिला बाहेरपण पडावस वाटत नव्हते. तिच्या ओठांची होणारी हालचाल विजय बघतच राहीला. सायलीला अंदाज आला पुढचा.

“अजुन ब्रश पण न…” पुढे सायली काही बोलणार तोच विजयने तिच्या ओठांवर किस घ्यायला सुरवात केली. आता सायलीची चादरी वरची पकड सुटत चालली होती. एका क्षणाला ति सुटलीच. सायली पटकन तिच्या हाताला छातीवर क्रॉस मध्ये ठेवत भिंतीकडे वळली. विजयने तिला मागूनच मिठी मारली.

“उशीर होईल न ऑफिसवर जायला.” सायली अस्पष्ट बोलली. पण तिच्या अंगावर फिरणाऱ्या त्याचा हाताला तिने मात्र थांबवल नाही. त्याच्या त्या उबदार स्पर्शात तिला खुप सिक्युअर वाटत होत.

विजयनेही वेळेच भान राखत भरलेल्या बादलीतुन पाणी घेत तिच्या अंगावर गरम पाणी ओतल. अंग दुखत असल्याने गरम पाण पडल्यावर एकदम बर वाटायला लागल होत. दोघांनी सोबतच आंघोळ केली.

विजय त्याच आवरुन बाहेरच्या खोलीत बसला होता. सायली चहा घेऊन आली. नाश्ता करायला त्यांना वेळच नव्हता.

“सरकार, मला बोललात चावु नका आणि तुम्ही काय केलात??” विजयने त्याच्या गळ्यावरचे निशाण दाखवले. सायली भयंकर लाजली.

“सॉरी न, मी तुम्हाला क्रिम लावुन देते.” सायली ने पटकन तिच्याकडे असलेली क्रिम विजयला लावुन दिली.

घरातुन निघुन दोघांनी बाहेर हॉटेलला नाश्ता केला. मग आपआपल्या ऑफिसवर निघुन गेले.

विजय शॉरुमवर पोहोचून त्याच्या कामाला लागला. त्याने पाहील तर टिना टेन्शन मध्ये दिसत होती.

“क्या हुआ??” विजय 

टिनाला कोणी खास मित्र किंवा मैत्रीण नव्हती. जे काही मनात असायचे ते विजय जवळच मन मोकळे करत होती. तसा तिला एक भाऊ होता, पण त्याच जस लग्न झाल तसा तो वेगळा रहायला गेला होता. मग टिनानेच तिच्या आईचा संभाळ केला होता. जेव्हा पासुन विजय भेटला तेव्हा तिला हक्काचा माणुस भेटला होता. ज्याच्याजवळ ति तीच मन मोकळ करु शकत होती. पण यावेळेस तिला बोलायला कसतरीच होत असल्याच विजयला जाणवल. मग विजयने तिला एका साईडला नेल, जिथे कोणीच नव्हत.

“बोल अब” विजय

“वो पिछले महीने मे, हम बाहर गये ते न. तो जरा बेहेक गये थे और जो नही होना चाहिये वो सब…” टिना चाचरत बोलली.

“तुम शादी तो करनेवाला हो न, तो टेन्शन किस बात की??” विजय

“अब कैसे बताऊँ?” टिना जरा घाबरली “तु चिल्लायेगा तो नहीं न??”

विजयला आता थोडा डाऊट यायला लागला. “डोन्ट से के, प्रोटक्शन युझ नही किया.”

टिनाने नाही मध्ये मान हलवली.

“पिरेड्स मिस हो गये??” विजय. टिनाने होकारार्थी मान हलवली. पण तिची मान तिने खालीच ठेवली.

“कन्फर्म किया??” विजय.

“आज सुबह ही” टिना.

मग विजयने मिहीरला बोलावल. मिहीरही जरा चाचरत आला. त्याला कळल होत की विजय का बोलवत होत ते.

“क्या यार, थोडा तो सब्र रखना था.” विजय थोड्या कडक आवाजात बोलला.

“सॉरी न, अब हो गया” मिहीर बारीक आवाजात बोलत लहान मुल हातवारे करतात तस केल त्याने.

“आज के आजही जाके टिना के माँ से मिल.” विजय

“क्युँ?” मिहीर

“सब्र तो तुझे है नही, फिर भी फल तो आगया न” विजय चिडून बोलला.

“मिन्स??” मिहीर, नंतर त्याची ट्युब पेटली. त्याने तर आनंदाने उड्याच मारायला सुरवात केली होती.

“आजही जाता हु. सबसे बढीया गिफ्ट दिया है तिने मुझे” मिहीरने तिला मिठी मारली.

टिनाला थोड बरं वाटल, पण घरात कळल तर तिची आई काय रिअॅक्ट करेल तिला माहीत नव्हत. त्यांच रिलेशन माहीती होत तिला. पण आजच ऐकुन काय करेल यातच टेन्शन तिला होत. मग मिहीरने तिच्या घरी जाऊन लग्नाची बोलणी केली. तिच्या आईने चांगलच झापल दोघांना.

“इसी दिन के लिये मैने तुझे छुट दि थी?” टिनाची आई रागात बोलली. टिना आणि मिहीर दोघही गपचूप मान खाली घालुन उभे होते.

“बोल अब जुबाँपे क्यु ताला लगाया है?? बाकी टाईम तो बकबक करनेसे तुझे फुरसत नही मिलती??” टिनाची आई

“अब हो गयी गलती बच्चोंसे.” विजयने टिनाच्या घरात एन्ट्री मारली. “शादी तो करनेवाले है न दोनो.”

टिनाच्या आईने विजयला पाहील. “तु तो चुप ही बैठ. तुनेही इसे सर पे चढाके रखा है. मालुम है शादी तो करनी है. थोडा तो सब्र रखना चाहिये न??”

“हां मैने भी बहोत दाटां दोनोंको. इतनी भी क्या जल्दबाजी थी करके” विजय “अब एक गलती हो गयी तो दुसरी भी करनेवाले थे.” टिना ची आईने विजयकडे आश्चर्यकारक पाहील.

“और दुसरी कौनसी??” टिना ची आई टेन्शन मध्ये आली.

“अबोर्रशन करने जा रहे थे” विजयच वाक्य ऐकताच टिना आणि मिहीर दोघही विजयकडे गोंधळून पहायला लागले.

“अबे क्या बके जा रहा है” टिना हळूच विजयच्या कानात बोलली. “अब घरसे भी निकलाओगे क्या??”

“”क्या??” टिनाची आई ओरडलीच, “पागल हो गये क्या दोनो?? उस भगवान ती देन को मिटाना चाहते थे?? कुछ लोग माँग माँगकर थक जाते है, उन्हे मिलता नहीं. तुम्हे मिला है तो उसकी कदर नहीं?? पाहिले किसीसे पुछ तो लेते. मुझे ना सही तो विजयसे.”

“हा वही तो, मै समझा रहा था. की जाके मां से बात करलो, वो जादासे ज्यादा मारेगी. लेकीन मान भी जायेगी.” विजय दोघांकडे वळला. “देखों मान गयी न??”

तेवढ्यात टिनाच्या आईने विजयचा कान पकडला. “तभीं मै सोचु, इतके दिनो तक अपनी दोस्त की साईडलेनेवाला मेरे साईडसे क्यु बोल रहा है, इतना भी झुठ बोलने की जरुरत नहीं थी.” आता कुठे त्या हसल्या होत्या.

टिनाच्या आईला विजय अबोर्शनबाबात खोट बोलतोय ते कळल होत. आपल्या मुलांना त्यांच्या आईपेक्षा जास्त कोण ओळखले बरं??

“अब मुहँ ही देखते रहोगे क्या? अपने मां और पिताजी को कब भेजोगे??” टिनाची आई

त्यांनी पण जास्त आढेवेढे न घेता लग्नासाठी तयार झाल्या होत्या. मिहीरच्या घरी ही दोघांना पहीले झापल. मग लगेचच लग्नाच्या तयारीला लागले होते. दोघांनी वेळच कुठे ठेवला होता, तयारीसाठी म्हणून सगळ थोडक्यात आटपायच ठरल होत.

इकडे सायलीच्या ऑफीसमध्ये.

ये चांद सा रोशन चेहरा, ज़ुल्फ़ों का रंग सुनहरा
ये झील सी नीली आँखें, कोई राज़ है इनमें गहरा
तारीफ़ करूँ क्या उसकी, जिसने तुम्हें बनाया
तारीफ़ करूँ क्या उसकी, जिसने तुम्हें बनाया ...

सायलीचा उजळलेला चेहरा बघुन सोनालीने गाण म्हटल होत.

ती आज कामानिमीत्त तिच्या ऑफीसला आली होती. आल्या आल्या तीने सायलीला पाहील होत जी स्वतः शीच हसत होती. आराध्याकडे पाहील तर ती बोलली, “सकाळपासून असच चालु आहे.”

मग सोनाली, आरती आणि आराध्या तिच्या मागुन जात हे गाण बोलल्या.

“झाल का सुरू तुमच, आपण ऑफीसमध्ये आहोत याच भान ठेवा.” सायली हसतच बोलली.

“नाही न, आम्हाला तर पुर्ण स्टोरी ऐकायची आहे.” आराध्या

सायली ने तिला पाठीवर चापट मारली.

“तुझ्या जिभेला काही हाड, काहीही काय बोलताय??” सायली

“आता तुमची लव्हस्टोरी सांगायला लावते तर त्याला जिभेला का हाड लावतेस??” आरती

“एक मिनीट, तुला नक्की कुठली स्टोरी वाटली??” सोनालीने तिच मुळ रुप दाखवलच. 

तसे सायलीचे डोळे विस्फारले. तिने तिची जीभ चावली.

“अच्छा अच्छा, कालची होय. ओय होय. मॅडमचे गाल तर बघा. कसे ब्लश करतायेत” सोनाली. “आम्हाला काय ती पण चालेल.” सोनालीने डोळा मारला. तशी सोनालीच्या पाठीवरपण एक पडली.

“जाम चावट झालेत सगळे, लग्न झाल्यापासून.” सायली लाजतच बोलली. “आणि तुला तर सगळी स्टोरी माहितीये. तरी परत का ऐकायची आहे??” सायली

“सगळी कुठे, कालची बाकी आहे न” आराध्या पण हसायला लागली. सायलीने तिला मारायची अॅक्शन केली.

“अग आत्तापासुन तुझ्या भाच्याला घाबरवतेस का??” आराध्या पटकन बोलुन गेली.
सगळ्याच हसल्या. 

“एक मिनीट आरु काय बोललीस तु??” सायली.

“तुमची स्टोरी मला नाही, तुझ्या भाच्याला ऐकायची आहे.” आराध्या तिच्या पोटावर हात ठेवत बोलली.

“व्हॉट??” तिघी एकत्रच ओरडल्या.

मग तिघी आराध्या भोवती फेर धरुन नाचायला लागल्या. सगळा स्टाफ त्यांच्याकडेच बघत राहीला होता. राहुलच्या वडीलांनी ते बघुन डोक्यालाच हात लावला.

‘देवा सुधरव रे यांना. नाहीतर यांच्या मुलांच पण आम्हाला पहाव लागेल.’ राहुलचे वडील मनातच बोलत त्यांच्या कॅबीनमध्ये गेले.

राहुल आणि आराध्याने गुड न्यूज दिली होती. तिकडे प्राजक्तानेही गोंडस परीला जन्म दिला होता. प्राजक्ताची डिलीव्हरी झाल्यावर सगळा ग्रुप त्यांच्या वडिलांनी ठरविल्याप्रमाणे दहा दिवसांसाठी शिमला, मनालीला फिरुन आले होते.

राहुल, महेश आणि संदेशची मेहनत फळाला आली. त्यांच्या ब्रांच रुपांतर आता सेपरेट कंपनीत होणार होत. या वेळेसही विजयने पुढाकार घेत त्यांचा कंपनीला लोन पास करुन दिलेल होत. आता तर त्यांनी आरती आणि सोनालीलाही जॉईन करुन घेतल होत.

राहुलने नवीन कंपनी ही त्याच्या वडीलांच्या नावावरच सुरू केली होती. ते तिघ त्या कंपनीचे एप्लॉईज म्हणूनच तिघही सगळ्यांना सांगायचे. 

आराध्येनेही सायलीच्या मदतीने बाबांची कंपनी अजुन वरच्या पोजीशनला नेऊन ठेवली होती. आराध्याच्या प्रेग्नन्सी मध्ये तिचे दिवस भरत आल्यावर तो बिझनेस सायलीने राहुलच्या बाबांच्या मदतीने समर्थपणे संभाळला होता.

देशातल्या सगळ्यात मोठ्या फॅशन शोमध्ये प्रणालीचे डिझाईनर ड्रेस चांगलेच गाजले होते. त्याच शोमध्ये जियाने केलेले मेकअप्सने सगळ्यांनाच भुरळ घातली होती. दोघींनाही त्यांच्या परफॉर्मन्स साठी अवॉर्ड भेटला होता.

प्रणाली आणि जिया दोघीही त्या दिवशी विजयजवळ आल्या.

“आजचा दिवस फक्त तुझ्यामुळे बघतोय.” जिया भावुक होऊन बोलली.

“अग मेहनत तुमची होती. मी काय केल??” विजय

“तु सपोर्ट नसता केलास न तर आज मी त्या हेंमतच्या घरातच पडून राहीली असती.” जिया

“आणि माझी ओळख तु तुच मला करुन दिली होतीस न??” प्रणाली. 

विजय काही बोलणार तोच दार वाजल. तिकडे सगळ्यांनी पाहील तर सुरज आणि पायल आलेले होते. त्यांचा ग्रुपचे ही बरेच गाणे गाजत होते. सुरजचे नाव ब-यापैकी पसरलेल होत. पण सुरजला पाहुन जियाच्या चेहऱ्यावर थोडा राग आला. ते राधीकाच्या लग्नात त्याचा धक्का लागला होता. तेव्हापासून तो तिला सॉरी म्हणतोय पण ती ऐकतच नव्हती. वरुन विजयच्या रिसेप्शनलापण सुरज तिला सॉरी बोलायला जाणार तर ति अचानक फिरली आणी परत सुरजला धडकली होती. जियाला वाटल होत की परत मुद्दाम धक्का मारला म्हणून ती परत त्याला भांडवली होती. पण अशा धडकाधडकीत जिया त्याच्या मनाला धडकली होती.

“काय ग आज अचानक??” विजय

“हममममम, तु तर विसरलास न आम्हाला.” पायल नाराजीतून बोलली.

“नाही ग, असा कसा विसरेल.” विजय

सुरज मात्र गप्प गप्प बसला होता.

“सुरजला काय फेवीकॉल लावुन आणले का??” सायली

“बिचा-याची बोलतात बंद केलीये तुझ्या बहिणीने” पायल

विजयने प्रणालीकडे पाहील.

“मी काही नाही केल.” प्रणाली गोंधळली

विजयपण गोंधळला. सायलीला आता थोडा अंदाज आला. तिने जियाकडे पाहील. ति त्याला रागातच बघत होती. तिला रागात बघुन तो इकडे तिकडे बघायला लागला होता.

“ते ताईच्या लग्नात न, ह्याचा धक्का लागला जियाला, तेव्हापासून तो तिला सॉरी बोलतोय, पण ती फक्त भांडतेय त्याच्याशी” पायलने खुलासा केला.

“म्हणून फक्त सॉरी बोलायला तुम्ही इथे आले??” विजय

“तुझी हिम्मत कशी झाली तिला धक्का मारायची” सायली चिडून बोलली. ती सुरजला भांडायलाच लागली.

“अग चुकुन लागला असेल धक्का” विजय तिला सावरायला बघत होता.

“मग आपल्या रिसेप्शनला पण चुकून लागला होता का??” सायली चिडून बोलत होती. सुरजला भांडत होती. सायलीला एवढ्या रागात बघुन त्याला त्याच प्रेम तुटताना दिसायला लागल होत. त्याच्या डोळ्यात आसव जमा झाले. पायल पण शॉक होऊन बघतच राहीली होती. तिला आता सायलीचा राग यायला लागला होता. शेवटी तिचा लाडका भाऊ होता न तो. त्याच्या डोळ्यात पाणी बघुन शेवटी जियालाच कसतरी झाल.

“अग वहिनी थांब” सायली थांबायच नावच घेत नव्हती बघुन जिया बोलली. “अग चुकून लागला असेल. तरी तो  सॉरी बोलतोय न, त्याला एवढ का बोलतोयस तु??”

“आता तु त्याच्याकडे रागात बघत होतीस, म्हणून तुझी बाजु घेऊन त्याला बोलत होती. तर त्याचा त्रास तुला का होतोय??” सायलीचा तिर बसला.

जिया गप्पच झाली. तिलाच कळत नव्हत, त्याच्या डोळ्यात पाणी बघुन तिला का त्रास झाला ते.

“ते एखादा सॉरी बोलतोय न, तर त्याला माफ करायच असत. भांडायच नसत.” जिया बोलायचे म्हणून बोलुन गेली.

“मग तु का केल नाहीस??” विजय

“कधीच केल होत. पण जरा भाव खात होती” जिया जराशी हसली.

“प्रणा ऐक न, जियाला सोबत घेऊन जा आणि एवढ सामान घेऊन ये” सायलीने एक लिस्ट त्यांच्या हातात दिली आणि अक्षरशः दोघींना पिटाळल होत.

दोघी बाहेर गेल्या.

“जिया आवडते न तुला??” सायली सुरजकडे बघुन बोलली. तसे सगळेच चमकले.