मागील भागात.
“ते ताईच्या लग्नात न, ह्याचा धक्का लागला जियाला. तेव्हापासून तो तिला सॉरी बोलतोय, पण ती फक्त भांडतेय त्याच्याशी” पायलने खुलासा केला.
“म्हणून फक्त सॉरी बोलायला तुम्ही इथे आले??” विजय
“तुझी हिम्मत कशी झाली तिला धक्का मारायची” सायली चिडून बोलली. ती सुरजला भांडायलाच लागली होती.
“अग चुकुन लागला असेल धक्का” विजय तिला सावरायला बघत होता.
“मग आपल्या रिसेप्शनला पण चुकून लागला होता का??” सायली चिडून बोलत होती. सुरजला भांडत होती.
सायलीला एवढ्या रागात बघुन त्याला त्याच प्रेम तुटताना दिसायला लागल होत. त्याच्या डोळ्यात आसव जमा झाले. पायल पण शॉक होऊन बघतच राहीली होती. तिलापण आता सायलीचा राग यायला लागला होता. शेवटी तिचा लाडका भाऊ होता न तो. त्याच्या डोळ्यात पाणी बघुन शेवटी जियालाच कसतरी झाल.
“अग वहिनी थांब” सायली थांबायच नावच घेत नव्हती बघुन जिया बोलली. “अगं चुकून लागला असेल. तरी ती सॉरी बोलतोय न, त्याला एवढं का बोलतोयस तु??”
“आता तु त्याच्याकडे रागात बघत होतीस, म्हणून तुझी बाजु घेऊन त्याला बोलत होती. तर त्याचा त्रास तुला का होतोय??” सायलीचा तिर बसला. जिया गप्पच झाली. तिलाच कळत नव्हतं, त्याच्या डोळ्यात पाणी बघुन तिला का त्रास झाला ते.
“ते एखादा सॉरी बोलतोय न, तर त्याला माफ करायच असत. भांडायच नसत.” जिया बोलायचे म्हणून बोलुन गेली.
“मग तु का केलं नाहीस??” विजय
“कधीचं केल होत. पण जरा भाव खात होती” जिया जराशी हसली.
“प्रणा ऐक न, जियाला सोबत घेऊन जा आणि एवढ सामान घेऊन ये” सायलीने एक लिस्ट त्यांच्या हातात दिली आणि अक्षरशः दोघींना पिटाळल होत. दोघी बाहेर गेल्या.
“जिया आवडते न तुला??” सायली सुरजकडे बघुन बोलली. तसे सगळेच चमकले.
आता पुढे.
“पण तुझ्याकडे बघुन वाटत नाही, की तु पुढे काही होऊ देशील” पायलच्या मनात अजुनही तिचे शब्द गुंजत होते.
“हे बघ सुरज, प्रेमाच्या नावाखाली तिला खुप काही सफर कराव लागलय. त्यामुळे मला नाही वाटत ति या फांद्यात पडेल. असही आम्ही तुमच्या फॅमीलीला ओळखतही नाही. काय ती ओळख फक्त तुमचीच आहे. मग आमच्या बाजूनेही विचार करा न” विजय
“तुला माझ्यावर विश्वास नाही का?? आमचे तीन चार गाणे पण हिट झालेत. आता थोडीफार माझही नाव झालय” सुरज
“मी तुझ्याबद्दल काही बोललो नाहीये. शेवटी फॅमिली पण मॅटर करतेच न. तुझ्या फॅमीलीने तिला नाही स्विकारली तर?? आणि जियाच्या मनाची ही विचार करावा लागेल न.” विजय “तुला जशी तुझ्या भावाची काळजी आहे, तशी आम्हाला आमच्या बहिणीची” विजय पायलकडे बघुन बोलला.
मग पायल जरा शांत झाली
“हा मी एवढचं करू शकतो की, तुमच प्रपोजल त्यांच्या कानावर टाकु शकतो. बाकी तुझ्या आई बाबांना घेऊन तु तिच्या घरी, गावी जाऊन तिला लग्नाची मागणी घाल. त्यांना जर ते पटलं तर झाल मग” विजय
“जियाने सगळ तुझ्यावर सोडले माहीती आहे मला.” सुरज
“तरीही मी असच बोलेन की पहीले तिच्या आई बाबांकडे जा, जियासोबत बोलायला जाशील तर परत ती तुलाच भांडेल” विजय
“ते हो बोलले, तर जिया नाही म्हणणार नाही. अगदी आम्ही सुध्दा” सायली हसली.
“म्हणजे तेव्हा तु जाणूनबुजून सुरजला भांडलीस न, जियाच मन बघायला??” विजय
सायलीने हसतच मान हलवली.
दोघांच अंडरस्टँडींग बघुन पायल आणि सुरज दोघही अचंबित झाले. आजवर त्यांनी फक्त मुव्हीज मध्ये अस प्रेम पाहील होत. ते आज प्रत्यक्षात बघत होते.
“बरं तुमचे बाबा आज कोल्हापुरलाच आहेत. जियाच्या गावापासुन फक्त तासाभरावर. पाहीजे तर आज ते भेटुन येऊ शकतात.” सायली.
आता दोघांनाही झटका बसला. “तुला कस माहीत??” पायलचे डोळे विस्फारलेले होते.
“माहीती काय फक्त तुम्ही काढु शकता काय??” सायली. “एकुलती एक नणंद तर आहे मला.”
जियाच्या डोळ्यात पाणी बघुन सायलीने नंदुकाकांना त्यांची माहीती काढायला सांगीतली होती. तर त्याचे वडील ही कंपनीत मॅनेजर होते. जे त्यांच्या कामासाठी कोल्हापूरला गेलेले होते.
तेवढ्यात प्रणाली आणि जिया परत आल्या. मग तो विषय तिथेच स्टॉप झाला.
मग सुरजने त्याच्या घरच्यांना सोबत घेत जियाच्या घरी जाऊन तिच्या आई वडीलांकडे रितसर मागणी घातली होती. तर तिथेही जियाने विजयवरच ढकलल होत.
“यार काय आहे हे, तो बोलतो घरी जावा. ही बोलते त्याच्याकडे जावा. मी काय बॅडमींटनच फुल आहे का??” सुरज वैतागून बोलला, तो विसरूनच गेला होता की त्याचे आई वडील तिथे आहेत. दोघही त्याला आवरायला बघत होते.
“हे बघ मी तुला स्पष्ट सांगतोय, मला तु आवडतेस. खुप प्रेम करतोय तुझ्यावर. तुझ्याशिवाय आयुष्यच इमॅजीनच करु शकत नाही मी. आणि तसही तुझी वहिनी बोलली होती. तुझे आई बाबा हो बोलले तर ते नाही म्हणणार नाहीत.” सुरज भडाभडा बोलुन गेला.
सगळे त्यालाच बघत राहीले.
“अरे त्याने सांगितलं म्हणून तर तुम्हाला बोलवल” जियाचे बाबा.
सायलीने सगळीच माहीती काढली होती त्यांच्या कुटुंबाची. मुलगा म्हणून तर तो चांगलाच होताच. म्हणून मग विजयने त्याच्या आत्याला सुरजबद्दल सांगुन दिल होत. त्याच्याकडे सोपवलेल काम विजयने कधी सरळ केलय?? म्हणून त्याला पण शॉक देण्यासाठी सुरजला त्याने काहीच सांगीतल नव्हत.
सुरज गोंधळला. तसे सगळेच हसायला लागले, जियानेच त्याला पाणी दिल प्यायला.
“लग्नानंतर जर चिडलास न माझ्यावर, तर बघ मग. सगळा मेकअपच बिघडवेल तुझा” जिया हसतच बोलली.
सुरजला अजुनही कळलं नाही. बाकी सगळ्यांनी आनंदाने पेढे वाटायला सुरवात केली. पायल तर उड्याच मारायला लागली.
“अरे वेडपट, ती काय बोलली ऐकल नाहीस का??” सुरजची आई. तो अजूनही गोंधळलेलाच होता.
थोड्यावेळाने त्याची ट्युब पेटली. तो आनंदाच्या भरात जियाला मिठी मारणार होता. पण सगळ्यांना पाहुन तो कसाबसा थांबला. लग्नासाठी जियाने एक अट ठेवली होती की, तिने ठरविलेले तिच्या कामातले टारगेट पुर्ण झाल्यावरच ती लग्न करेल. त्याला साधारणतः वर्षभराचा वेळ लागणार होता. तरीही सुरज वाट बघायला तयार झाला. मग दोघांचा साखरपुडा उरकून घेण्यात आला होता.
लग्न झाल्यानंतर विजय आणि सायली दोघांनाही कोणाकडे जायला जमलेच नव्हते. जियाची लाईफ सेट झाल्यावर दोघांना जरा उसंत मिळाली होती. विजय आणि सायली पहीले राहुलच्या घरी गेले होते जेवायला.
राहुलच्या घरी त्याची आई सारखी आराध्याला भांडत होती. कामावरुन नाही, तर ती तिच्यापेक्षा तिच्या सास-यांसोबत जास्त रहाते म्हणुन. आता तर ती दोन जीवांची होती. मग तिला घरी राहण्यासाठी राहुलची आई तिला भांडत रहायची.
“विजय तुझ्या बहीणीला समजव हं, नाहीतर मलाच सासुरवास करावा लागेल तिचा” राहुलची आई लटक्या रागात आराध्याची तक्रार विजयजवळ करत होती.
“काय हे आरु, तुझ्या काळजीसाठीच सांगत आहेत न ते.” विजय “सध्या बाबांसोबत सायली तर आहे न काम संभाळयला.”
“अरे कधीच बोंबलतेय मी तिला. पण ऐकेल तर शप्पथ” सायली.
“ही नसेल ऐकत न, तर तिला पुढच्या महिन्यात माहेरी पाठवण्याऐवजी आत्ताच पाठवुन द्या.” विजय
“नको, काही गरज नाही. इथे किमान हालचाल तरी करता येते. तिथे गेली तर कामाची सवयच मोडेल. सगळ हातात आणुन देतील. मी थांबते इथेच.” आराध्याला माहीती होत, की तिच्या घरी तिला कोणत्याच कामाला हात लावून देणार नाही ते. मग बसल्या बसल्या ती कंटाळेल, आता कुठे तिला कामाची सवय लागली होती आणि तिला ती मोडायची नव्हती,
“हा आणि मी हिला इथे काम करु देणार आहे.” राहुलची आई हळुच बोलली. तरी विजयला ऐकु गेलच. त्याला हसायला आल होत. दोघांनी हलकेच ऐकमेकांना टाळी दिली. आराध्याला जरा डाऊट आला. पण मग विजयने लगेचच जेवायला वाढायला सांगीतल होत. जेवण आटपून दोघ घरी निघुन आले होते.
संदेशकडे गेल्यावर तर तुझ माझ जमेना आणि तुझ्या वाचुन करमेना अशी काहीशी गत होती तिथे. कारण सगळ्या ग्रुपच नियमीत त्यांच्या घरात येण जाण चालु होत. त्यामुळे आरतीला तिथे जुळवुन घ्यायला वेळ लागलाच नाही. दोघींच आधीच मायलेकीच नात झालेल होत. त्यामुळे मायलेकीची तुतुमैमै चालुच रहायची. आरतीकडे बघुन वाटतच नव्हत की ती सासरी आलीये. त्यात संदेश मात्र जाम शिव्या खायचा. कारण त्याने कोणा एकाची बाजु घेतली की दोघी सासु सुना एकत्र होऊन संदेशलाच भांडायच्या. दोघे त्याच्या घरी पोहोचल्यावर दोघी सासु सुनाच तोंड एकमेकींच्या विरुध्द होत.
“काय रे डोक्याला हात लावून बसला आहेस??” विजयने संदेशला डोक्याला हात लावून बसलेल पाहील होत, जो दोघींना बाहेरच्या खोलीतून बघत राहीला होता.
“काय करु मी यांच, नेहमीच आहे” संदेश “परत भांडल्या दोघी.”
“अरे मग सोडव त्यांची भांडण” सायली. तसे संदेशने डायरेक्ट हात जोडले.
“तेवढ सोडुन बोला. एकीची जरी बाजु घेतली तर तिच मला भांडते का तर दुसरी ची बाजु का नाही घेतली म्हणून??” संदेश
“चल काहीही बोलु नकोस रे.” विजय
“बघायच तुला??” संदेश. मग दोघांनाही मान हलवली. “आता त्यांची भांडण कशी असतात ते दाखवतो.”
“अग, आरती हळु लागेल न तुला” संदेश मोठ्याने बोलला. तश संदेशची आई पटकन आरतीजवळ गेली. आरती गोंधळली.
“काय गं, लक्ष कुठे असत तुझ” संदेशची आई काळजीने तिला इकडे तिकडे बघु लागली. “कुठे लागल तर नाही न?”
सायली न विजय दोघींना बघत बसले.
“आता त्या माझ्यावर कशा येतात ते बघ” संदेश हळुच विजयला बोलला.
“तिच न हल्ली लक्षच नसत कशात.” संदेश मुद्दाम रागात बोलला. तसा आरतीने त्याला टिपीकल बायको वाला लुक दिला आणि संदेशच्या आईकडे पपी फेस करुन पहायला लागली.
“आणि तुझ राहत का लक्ष जागेवर??” संदेशची आई संदेशवर बरसली. “सगळी काम करुन ती पोरगी तिच ऑफीसच काम संभाळते. आणि हा शहाणा फक्त उंटावरुन शेळ्या हाकतो.” त्यांनी विजयकडे पाहील.
संदेशने केवीलवाण्या चेहऱ्याने विजयकडे पाहील. सायली न विजयला खुप हसायला येत होत.
“अरे तुम्ही कधी आले??” संदेशच्या आईला आत्ता लक्षात आल होत.
“तुमच्या सुनेवरुन तुमच लक्ष दुसरीकडे दिल तर आम्ही गरीब माणस तुम्हाला दिसु न” विजय
“गप रे तु, आला मोठा गरीब म्हणे. तिने सांगितले आहे तुम्ही किती त्रास द्यायचे तिला. आता काही बोला तिला मग बघते तुम्हाला” संदेशची आईच वाक्य थांबल्यावर आरतीने त्यांना पाठीमागून मिठी मारली. आणि दोघांना वाकुल्या करुन दाखवल्या.
“मग आम्ही जेवायला थांबु का नको??” विजय पण नाटकीपणाने बोलला.
“तुम्हाला आजवर कधी उपाशी पाठवले का? बसा थोडा वेळ होईल स्वयंपाक” संदेशची आई बोलुन किचनमध्ये गेली. त्यांच्या पाठोपाठ आरती न सायली पण गेल्या. संदेश परत त्याचे दोन्ही हात गालावर ठेवुन बारीक तोंड करुन बसला. मग सगळ्यांनीच हसत खेळत जेवण केली.
इकडे महेशच्या घरीही महेशपेक्षा प्रणालीचे लाड जास्त व्हायचे. तिने तिच्या सासुलाही फॅशनेबल केलेल होत. मग काय सासरे पण खुश प्रणालीवर. इकडे महेश मात्र डोक्याला हात लावून बसत होता.
“प्रणे तु तर काकुंना बदलूनच टाकलय??” विजयने घरात आल्या आल्या महेशच्या आईला बघुन बेलला होता.
“मग दिसतात की नाही माधुरी दिक्षित” प्रणालीने माधुरी दिक्षित सारखी अॅक्शन केली.
“काही पण ह” महेशची आई लाजली होती.
“काही पण काय?? त्या दिवशी बाबा तर शिट्ट्याच मारत होते ते” प्रणाली. तशी प्रणालीच्या पाठीत चापट पडली. महेशची आई भयंकर लाजल्या होत्या.
“तिला काय मारतेस ग?” महेशच्या बाबांची एन्ट्री झाली. “एकतर तिच्यामुळे मला माझी जुनी बायको भेटलीये.” महेशच्या बाबांनी प्रणालीला जवळ घेतल.
“तु्मही बाप लेक एकत्र झाले न, की मला बोलुच देत नाही. तुम्हीच बसा, मी जाते आपली किचनमध्ये.” एवढ बोलुन त्या किचनमध्ये गेल्या सुध्दा.
“मज्जा आहे बाबा तुझी, नवीन नवीन फॅशनचे कपडे घरच्या घरी मिळतात तुला.” विजय
“कसली मज्जा, कुठे बाहेर गेलो तर ह्या तिघांमध्ये मीच जोकर दिसतो.” महेशने तोंड वाकड केल.
“का रे??” सायलीने मग प्रणालीकडे पाहील. “तु ह्याला काही देत नाहीस काय??”
“तो जागेवर पाहीजे न” महेशचे बाबा. “जरा म्हणून वेळ पाळत नाही. मागे एक दोन वेळा मस्त शिवले होते सुट. पण साहेबच डायरेक्ट प्रोग्राम ला येतात. आमच्या सोबत येतच नाही. मग मीच तिला म्हटल. नको शिवत बसु याच्यासाठी.”
“पण मग ओळख करुन देताना तरी निट द्यायची न.” महेस जसा बोला तरी प्रणाली हसत सुटली. विजयन सायली तिच्याकडे बघत राहिले. मग प्रणाली बोलली.
“त्या दिवशी न आमच्या एका प्रोग्रामला घेऊन गेली होती. तर एक जण आला आणि ह्याच्याकडे बघुन बोलला माझे ड्रायव्हर का म्हणून.” परत सगळे हसायला लागले. महेश बारीक तोंड करुन बसला.
“ह्याची पण अशी ओळख होईल न, की आपल्याला पण त्याच्या नावाने ओळखतील.” विजयने महेशच्या कांद्यावर हात ठेवले. तेवढाच महेशला धीर आला.
“मी त्यासाठी तर कधीची वाट बघतोय.” महेशचे बाबा.
“आणि काय ग. अरे तुरे काय करते ग त्याला. आपल्यात अस बोलत नाहीत. किती वेळा बोललीये तुला मी” सायली प्रणालीला बोलली. प्रणालीने सायलीकडे बघुन कान पकडले.
“सॉरी न बेहेना.” प्रणाली. “चला प्रिन्स अॅन्ड प्रिन्सेस आपले जेवण तयार आहे.” फुल अॅक्टींग करत प्रणाली बोलली.
“हि कधीच सुधारणार नाही.” विजय बोलला तसे सगळेच हसले. तिथेही हसत खेळत जेवण आटपली.
सोनालीच्या सासरी तर ते आधीच जाऊन आलेले होते. काही दिवसांनी दोघही जोडीने आरती, सोनाली आणि आराध्याच्या घरी ही जाऊन आले. त्यांच घर पण आता सुन सुन होत न, त्यांची लेक सासरी गेल्यामुळे. मग विजयचे त्यांच्याकडे पण राऊंड चालुच होते.
एके दिवशी विजय कामावरुन घरी आला. तर सगळा ग्रुपच जमला होता घरी. समोर राधीका उभी होती. तिच्या डोळ्यात अश्रू आणि राग दोघी भावना होत्या. विजयला जरा टेन्शनच आल. तिथेच राजेशपण बसलेला दिसला होता. मग विजय गोंधळला. त्याने ग्रुप कडे पाहिले. तेही गुपचुप बारीक तोंड करुन बसले होते.
“काही झालय का??” विजय
“हो, तुलाच घाई झाली होती न” राधीकाचा आवाज भरुन आलेला. “मला घराबाहेर घालवायची.”
विजय चपापला, “असं काय बोलतोयस ताई. माझी तर इच्छा आहे की मीच तुला आयुष्यभर संभाळाव.”
“हो का?? मग मला न सांगता माझा फोटो माझ्या सासरी का पाठवला होतास??” राधीका
विजय बावरला. त्याने ग्रुप कडे पाहील.
“तिकडे पाहु नकोस, तुझे सगळे क्राईम पार्टनर फुटले आहेत.” राधीका
“माझ्या टेन्शनपाई तु तुझ्या आयुष्यात पुढे जातच नव्हतीस. माझ मलाच वाईट वाटायच. प्राजुताईच्या साखरपुड्यात मला राजेश भाऊजी दिसले. ज्यांनी तुला ताई सोबत साखरपुड्याच्या खरेदीच्या वेळेस पाहीले होते. साखरपुड्यातच मला प्राजुताई बोलली होती की राजेशभाऊजींना तु आवडली आहेस म्हणून. साखरपुड्यात पुर्ण फॅमीलीसोबत ओळख झालीच होती मग बाकीच तर तुला कळलच असेल” विजयचा आवाज जडावला.”जाताना आईने वचन मागीतल होत की ताईच सगळं निट करेल म्हणून. आणि तु फक्त माझाच विचार करत बसली होतीस. म्हणून मग पाठवला.”
“म्हणजे तुझ पण ह्यांनीच जुळवलय??” सायलीला पण शॉक होता हा, तिने राधीकाला विचारल.
काही दिवसांपूर्वी राधीकाच्या घरी सगळे मिळून गप्पा मारत असताना, प्राजक्ता ओघाओघात सगळ काही बोलुन गेली होती, की खरेदी करत असतानाच राजेश भाऊंजींची नजर राधीकावरुन काही हटत नव्हती, मग एकुलत्या एक लाडक्या दिरासाठी तीने विजय सोबत हातमिळवणी केली होती. ते सगळ ऐकुन राधीकाला राग ही आला होता आणि तिचा एवढा विचार केला म्हणून तिचे डोळे पण पाणावले होते. मग राधीकाने सगळया ग्रुपचीच हजेरी घेतली होती. तिचा राग किती डेंजर आहे सगळ्यांना माहीती होती. म्हणून त्यांनी सगळ पटापट कबुल केल होत.
“जे केल ते चांगलच केल न, नाहीतर तुझ्यासारखी बायको भेटणं पण नशीब लागत.” राजेश ने तिला हलकेच मिठीत घेतल.
“तुमच्याबद्दल मला काहीच तक्रार नाही ओ, पण मला सांगायच तरी न” राधीका
“तु नसतं ऐकलस माहितीये मला.” विजय लहान मुलासारखा बोलला.
“शेवटी वरच्याला पण काळजी असेच न आपली. आता बघ न, तुझ्या नंतर त्याला सांभाळणारी लगेच भेटलीच न. तु उगाच काळजी करत बसली होतीस. त्याने तर ठरवलं होत. जर तु नाही म्हटली असतील न तर कोणत्याही मुलीसोबत तो त्याच लग्न ठरवणार होता. पण तु हो म्हणालीस आणि साखरपुड्यालाच भाऊजींनी आमच्या वहिनीच्या मनातली धडपड विजयला सांगीतली. फक्त मावशींना दिलेल वचन पाळल त्याने आणि म्हणूनच आम्ही त्याला मदत केली.” राहुलने मग कान पकडले. “त्याच्याकडून मी सॉरी म्हणतो.”
राधीकाने भरल्या डोळ्यांनी विजयकडे पाहील.
“राहु दे, तुम्ही सगळे न एकमेकांच्या चुका अंगावर घेण्यात खुप एक्सपर्ट आहात.” राधीका तिचे ओलावलेले डोळे पुसले. “तरीच मी विचार करतेय की फक्त एक दोन भेटीतच तुमच न ह्यांच सुत कस काय जुळल.”
तेव्हा कुठे सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आल होत.
राधीकाने विजय आणि सायली दोघांनापण त्यांच्या आई वडीलांच्या फोटो समोर घेऊन गेली.
“बघीतल आई बाबा, आपला विजु लहान असुन पण किती मोठा झालाय. मला वाटत होत की मी त्याची काळजी घेतेय. पण खरं तर त्यानेच माझी काळजी घेतलीये.” राधीका भारावलेली होती. ती विजयकडे वळली.
“हे बघ आता तु आईला दिलेल वचन पूर्ण केले, भावाच वचन पुर्ण केले, मैत्रीतल वचन ही पुर्ण केली, प्रत्येक नात्यातल वचन पुर्ण केल आहेस. खुप धावपळ केलीस आजवर, कोणाला अडचण आली तर पुढेही करशील. पण आता तु फक्त एकटाच नाहीस, तुझ्यावर कोणीतरी अवलंबुन आहे. तिच्या बाबतीतले वचन तर तुलाच पुर्ण करावे लागतील न.” राधीका विजयला समजावत होती. सायली विजयला न सांगता तिच्या घरी गेली होती ते तिला कळल होत.
“ताई तु नको काळजी करुस, तु दिलेल्या टिप्स माझ्या चांगल्याच लक्षात आहेत.” सायली
“म्हणजे??” विजय गोंधळला.
“म्हणजे, तुला वेसण घालायच्या टिप्स ताईने तिला दिलेल्या आहेत.” राहुलने बदला घेतलाच, जेव्हा विजयने त्याला वेसण घालायच्या टिप्स आराध्याला दिल्या होत्या.
“ताई” विजय केवीलवाण्या आवाजात बोलला. तसे सगळेच हसायला लागले.
“त्या शिवाय तु सुधारणार नाहीस” राधीका. तोवर जिया पण येऊन पोहोचली होती.
“वहिनी, तुला परत मोठा मच्छर चावला काय??” जिया बोलुन गेली. सायली न विजय गोंधळले.
सायलीने आरशात पाहील. तर तिला आठवल, “नाही गं, काहीही काय?? ऑफीसमध्ये मुंगी चावलीये मला. आरु पण होती तिथे. विचार तिला.” सायली पटकन बोलुन गेली.
तोवर सगळ्यांनी हसु दाबल होत. सगळ्यांनी आराध्याकडे पाहील.
आपला ग्रुप कधी हातात आलेली चिडवायची संधी सोडेल का?? मग तिनेपण काय माहीत सारखे एक्सप्रेशन दिले, “मला नाही माहीत काही.”
तसा हास्याचा स्फोटच झाला. सायली तर आराध्या कडे बघतच राहीली. “आरे, तुझ्यातर आता.” ती आराध्याच्या मागे लागली. राधीकाने तिला पकडल. “अग हो, ती दोन जीवांची आहे आता. जरा जपुन.” सायलीने आराध्याकडे बघुन तिचे कान पकडले. मग राधीकाकाडे वळुन बोलली.
“अगं ताई खरच मुंगी चावली होती.” सायली केवीलवाण्या आवाजात बोलली.
“आरु, आंबा खायचा आहे न” विजयने त्याचही अस्त्र बाहेर काढल.
“हो खायचा पण आहे आणि तोंडाला पण फासायचा आहे. बस खुश” आराध्याने स्वतः ते सिक्रेट फोडल.
“अरे हो, आम्ही थोडी काही एक्सप्लेनेशन मागतोय. आता नवरा बायको आहात. मुंगी व्हा नाहीतर मच्छर. पण फक्त आता लवकरात लवकर पाळणा हलवा.” राधीकानेही त्यांच्या मस्करीत उडी घेतली.
“काय गं ताई तु पण न” सायली लाजतच तिच्या मिठीत शिरली.
“अरे बापरे, एवढी लाजतेय?? मग पाळणा हलण्याच काही लवकर दिसत नाही बाबा.” सोनालीने पण लाजायची अॅक्शन केली.
“हा न, विजयची तर बोलतीच बंद झालीये. हाय रे ये शरमाना” प्रणाली मागे राहील अस होणारच नाही.
"का?? आमच्या आधी तर तुमचाच नंबर लागेल न??" विजयने प्रणालीकडे पाहील.
"आम्ही तर ठरवलयं, मुलांचा वाढदिवस एकाच दिवशी येईल अस करायच आहे." प्रणाली "म्हणून तर तुमच्या लग्नाची वाट बघत होतो. आता कस सगळ एकदाच होईल" फिल्मी प्रणालीची फिल्मी स्टोरी,
तिच्या ह्या वाक्यावर हसाव की रडाव तेच कोणाला कळत नव्हत. पण बाकी मुलींनी तिला चिमटे भरपुर काढले होते.
"सॉरी न" प्रणाली हात चोळत बोलली. आता सगळेच हसायला लागले होते.
बराच उशीर झाला होता. म्हणून राधीकाने जियालाच येता येता पावभाजी आणायला सांगीतली होती. मग सगळ्यांनीच पावभाजीवर ताव मारला होता. खाऊन झाल्यावर बाकी निघणार तोच रुद्र येऊन पोहोचला होता. तो आईस्क्रीम घेऊन आला होता.
“अरे दादा, लवकर आला असतास तर एकत्रच जेवलो असतो.” विजय
“अरे आत्ताशी सुट्टी भेटली, मग कळलं बायको माहेरी गेलीये. म्हटल रागावली का काय, म्हणून आईस्क्रीम घेऊन आलोय” रुद्र.
“दादाला पण सोनालीची हवा लागलीये” विजय हळुच सायलीच्या कानात बोलला. पण त्यांच्या मागे उभ्या असलेल्या ग्रुपला ऐकु गेलच. सगळेच हसत होते.
मग सगळ्यांनी ती आईस्क्रीम खाल्ली. सगळे बाहेर निघाले होते. आत फक्त रुद्र आणि विजय होता. रुद्र ने विजयला घट्ट मिठी मारली.
“दादा हळु, तुझ्या बॉडी पुढे मी गुदमरून जाईल” विजय हसतच बोलला. खरतर तो गोंधळला होता की रुद्र ने अशी अचानक मिठी का मारली.
“समोरच्यांना आयुष्य देणारा तु, तु बरा एवढुश्या मिठीत गुदमरशील रे” रुद्रचे डोळे थोडे पाणावले होते. "जेव्हा तुम्ही घरातुन निघाले होते तेव्हा सोनाली तुझ्याकडे बघत राहीली होती. मला जरा टेन्शनच आल होत. पण नंतर तिने मला मारलेली मिठी सगळ काही सांगून गेली होती. तेव्हा तुझे आभार तर नाही मानता आले, म्हणून आज आलोय. आज ती माझ्या आयुष्यात आहे याच कारण फक्त तु आहेस.”
“काय दादा, स्वतः कधीच थँक्यू घेत नाहीस आणि मला बरा देतो” विजय हसतच बोलला.
विजय आणि सायली सगळ्यांना बाहेर सोडायला गेले होते. सगळे गेल्यानंतर विजय मागे वळला तर सायलीने त्याच्यापुढे हात केला.
“तुम्ही तुमची वचन पूर्ण केली. आता माझ मला करु द्या.” सायली प्रेमाने बोलली. विजयने त्याचा हात तिच्या हातात दिला.
जियाने खोकायच नाटक केल. दोघांनी जियाकडे पाहील. “मी पण आहे म्हटलं. तुम्हाला हव तर आजपण जाऊ का वहिनीच्या घरी??”
“जिये जाम शेफारलीयेस तु” विजयने तिच्या पाठीत धपाटा घातला.
“आउच, बघा न वहिनी” ज्या तक्रारीच्या सुरात बोलली. “खडूस कुठला.”
“नका ओ मारु तिला” सायलीने तिला कवेत घेतल.
“तिच होऊ दे मग बघतो तिला” विजयने तरी एक टपली मारलीच.
मग तिघेही घरात गेले. जियाने तिच अंथरुण बाहेर आणल. सायली न जिया दोघींनी त्यांचे कपडे बदलले. सायली न विजय आतल्या रुममध्ये झोपायला गेले. बेडवर पसरल्यावर सायली विजयच्या कुशीत शिरली. त्याच्या छातीवर बोटांनी नक्षी काढत होती.
“अहो ऐका न” सायली लाडात येऊन बोलली. “एक मनात आल होत.”
“बोला न सरकार” विजय
“परीला आपण घरी आणल तर??” सायली विजयचा चेहरा वाचत बोलली.
“म्हणजे, दत्तक घ्यायच का??” विजय
“हो” सायली
“अस अचानक कस काय सुचल??” विजयला बर वाटल होत तिच ऐकुन.
“प्रणालीसारख्या प्रत्येक मुलीच्या आयुष्यात विजय सारखा मित्र नसतो न” सायली थोडी भावुक झाली. “असही तिला आपला खुप लळा लागलाय.”
“पण उद्या आपल्याला पण एखाद मुल होईल, तेव्हा तु दोघांना सारखच प्रेम देऊ शकशील न??” विजय
“नक्कीच” सायली निश्चयाने बोलली,
“ठिक आहे, उद्याच त्या तिथल्या मॅडम सोबत बोलुन घेऊया. सगळी प्रोसिजर व्हायला एक आठवडा जाईल. म्हणजे तिच्या वाढदिवसाला आपल्याला तिला घरी आणता येईल.” विजय सायलीच्या हातात त्याचा हात गुंतवत बोलला. “खुश का??”
“हो खुप.” साषलीने विजयला गालावर किस दिली.
“बस एवढच??” विजय.
“मग अजुन काय” सायलीने डोळे मोठे केले. “जास्त गोड शरीराला चांगल नसत.”
“पण मग तिच्यासाठी एक भाऊ तर लागेल न” विजयने तिला अजुनच जवळ ओढली, “चल तयारीला लागुया.” सायली लाजली, मग विजयच लक्ष सायलीच्या नाईट ड्रेस वर गेल.
“अरे तु तर आधीच तयारीत आहेस” विजय खट्याळ झाला.
“आता आमच्या अहोंना जास्त कष्ट पडायला नको न” सायलीपण त्याच्या रंगात रंगली. मग विजयने तिच्या खांद्यावरून तिचा ड्रेस खाली करुन तिथे किस घेतली. आज तर सायली पण त्याला चांगलच प्रतीउत्तर करत होती. दोघही ती रात्र परत प्रणयाच्या रंगात रंगून गेले होते. सुखी संसाराचे स्वप्न बघत निद्रेच्या अधीन झाले.
समाप्त.
(टिप :- विजय आणि सायलीच्या नात्यातील काही गोष्टी काल्पनिक किंवा फिल्मी वाटु शकतात. जसे की, विजय येण्याआधीच सायलीला तो आल्याची जाणीव होणे, विजयला काही झाल म्हणून सायली आजारी पडण, न बोलताही विजयच मन वाचुन जाण. पण या गोष्टी मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहील्या आणि अनुभवल्या देखील आहेत. त्यामुळेच त्या मला ठामपणे मांडता आला. बाकी ज्यांनी प्रेम केलय ते नक्कीच रिलेट करतील.
खरतर ५ ते ६ भागांचीच लघुकथा लिहीणार होतो. पण बघता बघता ६० भाग कसे झाले मलाच कळल नाही. ब-याचश्या चुका झाल्या असतील, क्षमा असावी. भेटूया पुढच्या कथेत.)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा