"चॅम्पियन्स ट्रॉफी 2025"
जगायचंय मला
भाग २.
मी त्या क्षणी काही बोलले नाही. माझ्या चेहऱ्यावर काहीच न दाखवता मी सरळ स्वयंपाकघरात गेले. पण आतून मन दुखावलं होतं. डोळ्यांत पाणी दाटलं होतं, ते मात्र मी कुणालाच दिसू दिलं नाही. घरात माझं मत मांडायला मी कधीच सरावलेली नव्हते. पण मनात एकच भीती कायम रेंगाळत होती “जर कुणी काही कठोर निर्णय घेतला, आणि त्याचा फटका माझ्या बाळाला बसला तर?” ह्या विचाराने मी गप्प बसून राहायचे.
त्या रात्री दिवा विझल्यावर मी बराच वेळ उशीमध्ये चेहरा लपवून रडत राहिले. हुंदके दाबून धरले होते, कारण कुणाला ऐकू जाऊ नये. हात वारंवार पोटावर जात होता, जणू त्या बाळाला घट्ट कवटाळून ठेवावं असं वाटत होतं.
दुसऱ्या दिवशी सकाळी हे चहा पित बसले होते. नेहमीसारखा निर्विकार भाव त्यांच्या चेहऱ्यावर होता. काकूने पुन्हा टोमणा मारला,
“बघ रे, वेळेवर बघ बरं का. मुलगा असेल तरच घराचं नाव टिकेल. नाहीतर… माझ्या ओळखीचा एक डॉक्टर आहे. गुपचूप सगळं करतो. पैसे जास्त घेतो पण काम खात्रीचं करतो.”
“बघ रे, वेळेवर बघ बरं का. मुलगा असेल तरच घराचं नाव टिकेल. नाहीतर… माझ्या ओळखीचा एक डॉक्टर आहे. गुपचूप सगळं करतो. पैसे जास्त घेतो पण काम खात्रीचं करतो.”
ते शब्द ऐकताच माझं हृदय धडधडलं. माझे डोळे आणि कान ह्यांच्याकडे खिळले. “कदाचित हे काहीतरी बोलतील, माझ्या बाजूने उभे राहतील,” असं मनातल्या मनात मी म्हणाले. पण त्यांनी मात्र वर्तमानपत्राची पानं उलटली, एवढंच. एक शब्दही तोंडातून बाहेर पडला नाही ह्यांच्या.
त्या क्षणी मला उमगलं ही लढाई आता मला एकटीला लढायची आहे.
जसजसं पोट वाढत होतं, तसतशी भीतीही चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागली. शेजारच्या बायका आल्या की कुजबुज सुरू व्हायची “ह्या वेळीनं नक्कीच मुलगा असेल गं!”
तेव्हा माझ्या मनात ओरडून सांगावंसं वाटायचं “अरे, जन्माला येणारं मूल म्हणजे माझं लेकरू आहे. मुलगा असो वा मुलगी, माझ्यासाठी ते सारखंच आहे!” पण समाजाच्या भीतीनं, घरच्यांच्या दबावानं मी गप्प राहायला शिकले होते.

रात्र झाली की मी पुन्हा माझ्या पोटावर हात ठेवून माझ्या बाळाशी गप्पा मारायचे. हळू आवाजात कुजबुजत म्हणायचे “बाळा, काहीही होवो तू माझं लेकरू आहेस. कुणी काहीही बोललं तरी तू माझं रक्त आहेस, माझं हृदय आहेस. मुलगी असलीस तरी माझ्यासाठी तूच माझं बळ आहेस, माझा खरा आधार आहेस”
त्या शब्दांमध्ये माझं संपूर्ण ममत्व आणि भीती मिसळलेली असायची.
क्रमशः
©️®️जान्हवी साळवे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा