Login

चार दिवसांच माहेरपण हवंच..!भाग-३

स्ञी ला माहेरपण नाविन्य बहाल करत

परतावणीला न्यायला आलेल्या भावांना,सगुणाच वैभव बघून आनंदी आनंद झालेला होता...बहिणीने नशिब काढलं  म्हणून देवाचे ऋण माणत होते...जेवण व सारा सोपस्कार पार पडला.सगुणालाही आता माहेरी जायची घाई झाली होती...


ननंद म्हणाली,"वहिनी खुश दिसता राव आज ,काय?लाली चढली बघा चेहेर्यावर माहेरी निघालात ना? म्हणून,पण आपल्या घरची एक रितं हाय बरं...परतावणीनंतर सून माहेरी कधीच जात नसते..".


इतक्या वेळ आनंदी सगुणाचा चेहेरा एकदम पांढरा फटक पडला.

.तोच आजेसासू म्हणाल्या,"अगं सुनबाई ननंद तुझी ती ..तुला चिडवते बघं...बाईला माहेरपण हवं गं...मी आज म्हातारी झाली पण मलापण माहेरपण हवं असतं बघं...माहेर म्हणजे बाईचं नाविन्य बरं...संसारातला शिन,नाराजगी,व वादविवाद विसरायला माहेरपण हवं बरं...पण म्या एक सांगते,माहेरपण आपणं जपायचं असतं...सासर माहेरचा दुवा आपणच सांभाळायचा असतो... दोन्ही तराजू समान अशी सांभाळायची असतात बघं... कळलं तुलाही...जा आता आनंदात...".


सगुणा ची कळी खुलली...तीने आनंदाने आजीला मिठी मारली .आजीच व सगुणाचं सुत छान जुळेल याची खात्री होती सगुणाला... सासूबाईंनी ओटी भरली.. सासुबाई म्हणाल्या,

"सगुणा माहेरूण काही नाही आणलं तरी चालेल बरं बाई... फक्त ह्यावेळी भरल्या ओटीने ये...मन घट्ट करून आई नाही होऊ शकणार मी पण सासूही नाही होणार बघं...".


सगुणाला जरा हायसं वाटलं .एकतर घरातील पुरुष किती कठोर व ह्या बायका किती भावनिक तीला काहीच कळतं नव्हतं.नव घर व आता तेच तिचं जग..आहे त्याचा आनंदाने स्विकार करायचा होता तिला.. सारं झालं बाहेरून आवाज आला.


"आवरलं का?उतरत्या दिवसाला घरची लक्ष्मी पाठवायची नसते माहित आहे ना?"


सासूबाईंनी,"हो हो आलोच बाहेर"म्हणतं दुजोरा दिला...


सगुणा माहेरी निघाली, सोबत संसाराची नविन स्वप्न व माहेरची ओढ होतीच...माहेरी जाताच तिने आईवडिलांना व वहिणीला घट्ट मिठी मारली.अंगावरचा सारा भार काढून ती लग्नाआधीच्या  तिच्या रूपात आली..पण मंगळसुत्र व जोडव्यांनी तीला संयमाची जाणिव करून दिली... प्रथम ती घरभर फिरली..पण का?कुणास ठाऊक आज तिला जरा चुकल्या चुकल्या सारखं झालं होतं...


"हे घर जरा बदललं का?"


तीने स्वतःलाच प्रश्न केला,पण उत्तर काही सापडतं नव्हतं, तोच वहिनीने सगुणाला आवाज दिला..


"माई..अहो काॅफी झालीय,या पटकन...पाटलीनबाईचा मान जपायला हवा ना?"


सगुणा आली हातात काॅफीचा मग घेऊन ती काॅफी घेऊ लागली.तीला जरा चुकल्यासारखं झालं.वहिणी जरा वेगळीच वागत होती.कप रिकामा झाला तसा वहिनीने हातातून घेतला .


सगुणा म्हणाली,"अगं मी धुते ना?तु कर कि दुसरे काम".


आई म्हणाली,"सगुणा आता तु माहेरवाशीण गं, माहेरी आली तर जगून घे ना?सवय कर आता , तुला हळूहळू कळेलच माहेरपण काय? असतं ते सासर कितीही सदन असलं ना? माहेरच्या त्या प्रेमाला , चटणी भाकरीला,तेथिल माणसांच्या आपलेपणाला कशाची सर नसते बरं..".


पण आई,"वहिनीला नाही बघितलं मी कधी माहेरपण जागतांना ".


सगुणा ची वहिनी शांत झाली.काय ?करणार तीही होतं ना?तिचही माहेर,लाडके आईबाबा,भाऊ सारंच होत पण काळानूसार सारंच बदललं ना?..सगुणा म्हणाली,

"वहिनी तु का? नाही गं जात मगं माहेरपणाला,आता माझीही जबाबदारी वाढेल बघं, माझ्या सासूबाई म्हणे कधीचं जात नाहित माहेरी,पण आजेसासू आजही जातात बरं.. असं त्यांचं बोलल्या मला...म्हणाल्या "माहेर "आपणचं जपायचं असतं पोरी... माझ्या डोक्यावरून गेले बघं सारं...पण वहिनी तु माहेरी का? नाही जात हे नाही आठवतं  गं मला... तुलाही वाटतअसेल ना?माहेरपण अनुभवावं ".


वहिनी शांतच होती पण डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या.आई सगुणावर थोडी चिडलीच..


"काय?गं सगुणा काहीही विषय काढतेस,का? उगाच नको  असलेल्या जखमा खुरडायची सवयच आहे तुला...".


सगुणा शांत बसली पण वहिणीनेच सावरून घेतलं,

"आई ती तरी काय करेल हो...!,तीला कुठे बरं माहित सारं पण आता तिलाही कळायला हवं ना?..तीच ही माझ्यासारखं नको ना? व्हायला.."


आई शांतच झाली,काय बोलणार तीही सुन तशी मनमिळावू, आहे त्यात समाधानी,तीचे आईवडील ही तितकेच स्वाभिमानी व चांगले माणसं पण त्यांच्या जाण्याने सारंच फिसकटल होतं तिचं...


वहिनी म्हणाली,"माई ...अहो मीही लाडकीच होती.आई बाबा किती कौतुक करायचे मी माहेरी जात होती तेव्हा...एका वर्षी जाता नव्हतं आलं...आईंची तब्बेत खुप खालावली होती..तर तेच आले होते माझी दिवाळी घेऊन...पण ते गेले व सारंच संपलं बघा.."


"का?गं जयूदादा व वहिनी आहेत ना?"..


"अहो आहेत कि ...पण गैरसमजाला कोण बरं दुर करेल...आई बाबा तसे दोन महिन्याच्याच गाॅपने गेलेत... नातलगांनी नको तेवढे कान भरलेत ... वर्षश्राध्दाच्या दिवसांनंतर जयाने माझ्याकडे फिरूनही पाहिलं नाही माझ्याकडे..बाबांनी  वारसपञात मला बरोबरीची वाटणी दिली म्हणून नाराज झाला तो...पण मी व तुमच्या दादांनी अजूनही नाही घेतला हो हिस्सा...मी तर त्याला इतकही बोलली ,जया अरे मला हिस्सा नको पण माझं" माहेरपण "असू दे रे...त्यात माझ्या काकांनी जास्तच उफसवलं आता सारेच नातलग तुटलेत... हक्काचं माहेरपण नाही हो उरलं...पण "माहेरपण असावच हो बाईच्या जीवनात पैसा , संपत्ती, घेणं देणं ह्या पलिकडे असतं हे सुख,राञभरचा मुक्काम मनाला उभारी देतो... कुणीतरी आपल्या पाठीशी आहे याची जाणीव असते हो...!,आता मला एकटं एकटं वाटतं बघा.."


डोळ्यातल्या आसवांना आता पुर आला होता.वहिनीला आईने शांत केले..

शमा आत्या म्हणाल्या,"सिमा मी आहे ना?मी करते ना?गं तुझं सारं अस नाराज नको होवूस बरं..."


वहिनीने सिमाआत्याला कवटाळले,"आत्या तुम्ही नसता तर हो...!,मला ती एक राञही स्वर्गिय सुख देऊन जाते बरं....माई सारं काही विसरा पण माहेर विसरायचं नाही हं...हक्कान येत जावा,तुमची वहिनी तुम्हाला विसरूच देणार नाही माहेर...."


सगुणा ने वहिनीला कवटाळलं,"स्वाॅरी गं वहिनी,मी कधीच नाही रुसणार बघं..."


"मी पण तुला विसरू देणार नाही हं..!".

ननंदभावजयींच बोलणं ऐकून आईलाही जरा हायसे वाटलं..


"आता पुरे झालं रामायण..चला स्वयंपाकाला लागा,"


"हो हो.." सगुणा म्हणाली


"पाटलीनबाई बसा जरा परवा सासरी जायचं..सारं बळ सांभाळून ठेवा जवळ,येथे चार लोकांचं होतं हो तेथे पुरा वाडा सांभाळायचा, वाड्यातल्या रितीभाती जपायच्या बघा... सोपं नाही बरं..."


आता ती भानावर आली.. खरंच तसंच होतं.आवघडच असणार सारं...


दोन दिवस भरकन गेलीत .व सगुणा ची पाठवणी आली.रितीभातीप्रमाणे शक्य ते सारंच आईने व वहिनीने बांधलं होतं..व बघता बघता पाठवणीचा तो क्षण आला..

साडी ,त्यावर हातभार बांगड्या,खानदानी दागिने सगुणा पाटलीनबाईच्या रूबाबात शोभुन दिवस होती..आईने पटकन चेहेर्यावरून हात फिरवत हात डोक्यावर नेलीत व कडाकडा मोडलीत...

"पाटलीनबाई भारी दिसतात हं..!"वहिनीने ही दुजोरा दिला..


सासुबाईने सांगितल्याप्रमाणे भरल्या ओटीने आईने सगुणाला निरोप दिला..‌आजपासून नविन संसाराचा श्रीगणेशा होणार होता.. अल्लड अवखळ लाडकी सगुणा पाटलांकडे जबाबदारीने वागणार होती...


संगीताच्या आयुष्यात पुढे काय घडणार बघू पुढिल भागात..

🎭 Series Post

View all