आज रंग आभाळाचे
पुन्हा हसरे झाले
प्राजक्ताचे हृदय माझे
पुन्हा दंवात भिजले
पुन्हा हसरे झाले
प्राजक्ताचे हृदय माझे
पुन्हा दंवात भिजले
मीच माझ्या प्रतिबिंबाला
पुन्हा नव्याने भेटले
ओळखीच्या रेशीम धाग्यात
पुन्हा नव्याने अडकले
पुन्हा नव्याने भेटले
ओळखीच्या रेशीम धाग्यात
पुन्हा नव्याने अडकले
मूक होते ओठ माझे
परी डोळे बोलले
स्वप्नांचे अमृतमेळे
पुन्हा नव्याने सजले
परी डोळे बोलले
स्वप्नांचे अमृतमेळे
पुन्हा नव्याने सजले
इंद्रधनुचे रंग सारे
डोळ्यांपुढे नाचले
तव स्पर्शाच्या ओढीने
अंग अंग शहारले
डोळ्यांपुढे नाचले
तव स्पर्शाच्या ओढीने
अंग अंग शहारले
......योगिता मिलिंद नाखरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा