Login

मी हार मानणार नाही

One Should made Your Mind To Tackle The Way Of Your Life

मी हार मानणार नाही

जोपर्यंत श्वास आहे

रात्रीला अंधाराचा शाप आहे

पण उगवतीला किरणांचा

साक्षात्कार आहे


माझे जिणे माझे मरणे

खरोखरीच चिरतरुण गाणे होणारा आहे

माझ्या रंध्रा रंध्रातून

आदित्य ही प्रकाश मागणार आहे


माझी स्वप्ने , माझे हसणे

ऋतुचक्र फिरवणार आहे

माझ्या मुक्त आनंदी लहरींमधून

सारी पिडा संपणार आहे

........योगिता मिलिंद नाखरे