Login

हसुनी पुन्हा उमजेन मी ...13

Story Of A Women Who Is Taking Efforts To Change The Atmosphere Of Her House With Beautiful Smile.
हसुनी पुन्हा उमजेन मी...13

प्राजक्ता नी ठरवल्या प्रमाणे 7:45 वाजता जेवायचं वाढून घेतलं आणि सर्वांना आवाज दिला.नवऱ्याला व लेकाला भूक लागली असल्यामुळे दोघेही येऊन बसले. सासरे बुवा म्हणाले मला आता असुदे किंवा नंतर मला जेवायचं तर आहेच,तू म्हणतेस तर आताच बसतो. आता फक्त राहिल्या सासूबाई त्या आपला हेका सोडायला तयार होत नव्हत्या. प्राजक्ताने सगळ्यांची जेवणं करून घेतली आणि उरलेल अन्न झाकून ती थोड आवरून ती खोलीत निघून गेली. लवकर खोलीत आल्यामुळे तिला तिच्या मुलाला आणि नवऱ्याला सोबत छान वेळ घालवता आला. सगळेच आनंदी होते. 10 वाजता निजानीज झाली.
सासूबाई वाट पहात बसल्या होत्या. आता ही मला जेवायला बोलवेल मग बोलवेल पण छे! सगळीकडे अंधार झाला होता सगळे दिवे मालवले होते. त्या उठल्या आणि स्वतः स्वतःला वाढून घेऊ लागल्या. एकटीला घशाखाली घास उतरत नव्हता, तरी कसंबस त्यांनी जेवून घेतलं आणि नंतरची आवारसावर केली. हे काम त्यांच्या खूप जीवावर आलं होतं पण काही पर्याय नव्हता..

दुसऱ्या दिवशी प्राजक्ताची सकाळ छान हसरी झाली होती. रात्रीचा नवऱ्याच्या प्रेमळ शब्दांचा रंग अजूनही गाल गुलाबी करत होता. गुणगुणतच तिने आन्हिक उरकले आणि चहा नाश्ता केला. सासरे अगदी आनंदी होत म्हणाले, "सुनबाई ही लवकर जेवायची कल्पना फार आवडली बघ.अगं काल मी जेवण झाल्यावर शतपावली करायला गेलो तेव्हा कॉलनीतील बरेच जण भेटले छान वेळ गेला." यावर तिनं छान हसून अनुमोदन दिले.
आज 8:30 वाजले तरी सासूबाई काही उठल्या नाहीत आणि जेव्हा उठल्या तेव्हा त्यांना अपचन झाल्याचे जाणवले. डोकं दुखत होतं आणि पोट मुरडून येऊ लागलं. त्यावर सासऱ्यांनी त्यांना लवकर जेवणाचा सल्ला दिला. सुनबाई आणून वाढेल या विचारात त्या काल खरच खूप उशिरा जेवल्या होत्या. तेव्हा त्याचं सासऱ्यांना म्हणाल्या," खरं आहे हो तुमचं काम पुरत ते वेगळच शिवाय जेवणही पचत नाही."प्राजक्ता त्यांना चहा देत छान गोड हसली. तिचं हसणं पाहून त्यांच्या मात्र डोक्यात सनक आणि पोटात गोळा आला. हे प्रकरण काही साध दिसत नाही. का ही अशी गोड हसते तेच कळत नाही. असं चक्र त्यांच्या डोक्यात सुरू व्हायला वेळ लागला नाही.

क्रमशः
वाचत रहा, आनंदी रहा
ऋतुरंग
0

🎭 Series Post

View all