Login

हसूनी पुन्हा उमजेन मी...1

ही एक विनोदी कथा आहे ज्यात एक साधारण मध्यमवयीन महिला घरातील नकारात्मक स्वभावाच्या लोकांसोबत राहत त्यांना सकारात्मक बनवते.
रोजच्याच सारखी आजची पण संध्याकाळ तीला नकोशी वाटू लागली होती. पुन्हा तेच ऑफिस मधून घरी गेल्यावर सगळ्यांचे उतरलेले चेहरे, ढीगभर पसरलेले खरकटे भांडे, सोफ्याआडून कपाटाआडून भोsssकरणारा पसारा.... जीव नुसता रडकुंडीला आला होता. तेवढ्यात बस स्टॉप वर शेजारची साधना तिला दिसली.
आता हि ती कोण?.. तर ती म्हणजे देशमान्यांची थोरली सून. नाव तिचं प्राजक्ता... प्राजक्ता एका मोठं ब्रँड असलेल्या नावाजलेल्या कंपनी मधे पॅकेजिंग मॅनेजर होती. दिवसभर काम करुन वरद तिचा नवरा जसा थकून घरी यायचा तशी ती देखील कष्ट करून थकून घरी यायची. पण तिच्या थकण्याची मात्र कोणाला जाणीवच नव्हती. त्यामुळं तिला जेवढं घराबाहेर राहील तेवढंच छान वाटायचं. आज बस मधे ती आणीं साधना दोघीही सोबतच होत्या.

🎭 Series Post

View all