प्राजक्ताच्या घरच्या परिस्थितीवर साधनाने तीला एक छान उपाय सुचवला होता आणि प्राजक्ता देखील विचार करुन लवकरच साधनाला तिच्या त्रासावर उपाय सांगणार होती. आज घरी गेल्या नंतर प्राजक्ताचे आयुष्य पूर्ण बदलणार होते. रोज प्रमाणे प्राजक्ता घरी आली. घरात तेच सुतकी वातावरण पाहून पाहिले तर तिच्या कपाळावर आठ्या पडल्या पण लगेच तिला तिच्या मिशनची आठवण झाली. ती पाहिले बाथरूम मधे जाऊन फ्रेश होवून कपडे बदलून आली.अंगात घरचे कपडे घालून किचन मधे आली काकूंनी पोळ्या करुन ठेवल्या होत्या व त्या निघून गेल्या होत्या. प्राजक्ताने वरण भाताच कूकर लावला व आदल्या दिवशी मोडून ठेवलेल्या वालाच्या शेंगाची भाजी केली . देवापुढे दिवा लावून स्तोत्र पठण करत तिने स्वतःसाठी छान आल्याचा चहा केला आणि आपल्या खोलीत जाऊन मोबाईल बघत आरामात बसून चहा घेऊ लागली. सासूबाई, सासरे व नवरा जणू आज तीच्याकरिता घरी हजरच नव्हते.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा