Login

हसुनी पुन्हा उमजेन मी...3

Funny Story Of A woman Having Negative People Around Her
प्राजक्ताच्या सासूबाईंना कळतच नव्हतं आज प्राजक्ता इतकी आनंदी का दिसतें आहे. रोज तर ऑफिस मधून घरी आली अत्यंत निरुत्साही असते, आज गाणे गुणगुणते आहे, देवाचे श्लोक म्हणते आहे. सासूबाईंच्या डोक्याला प्रचंड विचार हे असं झालंच कसं?
तेवढ्यात प्राजक्ताचा मुलगा शौर्य शिकवणी वर्गाहून आला. आल्या आल्या तिने त्याला प्रेमाने जवळ घेतले. त्याला फ्रेश होवून देवाला नमस्कार तसेच घरातील मोठ्यांना नमस्कार करायला सांगितले. शौर्यने आईने सांगितले तसे सर्व केले व त्याने आईला प्रश्न विचारला,"आई आज काही स्पेशल डे आहे का?"त्यावर ती म्हणाली, "हो बाळा इथून पुढचे काही दिवस खूप शुभ आहे, अम्मम शुभ म्हणजे ऑस्पेसिअस. आज जस देवाला आणि घरच्यांना नमस्कार केलास तसा रोज करायचा ह!"
प्राजक्ताचे बोलणे ऐकून सासूबाई लगेच कालनिर्णय बघायला धावल्या, असे नक्की काय शुभ आहे हे त्यांना जाणून घ्यायचे होते. आणि त्यांची उत्सुकता वाढलेली पाहून प्राजक्ता गालातल्या गालात हसत होती. रात्री सगळ्यांचे जेवण झाल्यावर नेहमी प्रमाणे सासूबाई तोंड पडून बसल्या होत्या. नवरोबा कसल्याश्या विचारत गुंतले होते. सासरेबुवा झोपायला निघून गेले होते. प्राजक्ताने मोबाईल वर छान लता -किशोर ची प्ले लिस्ट लावली आणि गाणे गुणगुणत मागची आवरसावर, भांडे घासणे, इत्यादी कामे उरकून घेतली. तोपर्यंत शौर्य होमवर्क करतांना झोपला होता. तिने त्याचे पांघरून नीट केले व तिच्या खोलीत आली.

🎭 Series Post

View all