नवरोबांना गहन विचारात पाहून पुन्हा प्राजक्ता खुदकन हसली. एरवी तिच्याशी एक शब्दही न बोलता झोपून जाणारा तो आज चक्क तिच्याशी बोलायला जागा होता. प्रजाक्ताने मनोमन स्वतःला शाबासकी दिली.
पराग - आज ऑफिस मध्ये काही विशेष घडल का ग प्राजू?(शेवटची प्राजू म्हणून हाक त्याने कधी मारली होती हे त्यालाही आठवत नव्हत आणि तिलाही नाही. कारण घरात गेले काही दिवस फक्त भांडण, चिडचिड व ओरडण्याचा आवाज येत होता.)
पराग - आज ऑफिस मध्ये काही विशेष घडल का ग प्राजू?(शेवटची प्राजू म्हणून हाक त्याने कधी मारली होती हे त्यालाही आठवत नव्हत आणि तिलाही नाही. कारण घरात गेले काही दिवस फक्त भांडण, चिडचिड व ओरडण्याचा आवाज येत होता.)
प्राजक्ता – नाही,का हो?... आणि आज झोपले नाही तुम्ही अजून.
पराग - नाही,झोप येत नाही आहे...
प्राजक्ता - पण मला मात्र खूप झोप येत आहे.. मी झोपते.(असं म्हणत तिने तोंडावर पांघरूण ओढून घेतले व झोपून गेली. परागला तिचं दुर्लक्ष करणे जिव्हारी लागले.)
दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी छान गुणगुणत प्राजक्ता ने स्वतःसाठी तसेच सासु सासऱ्यांसाठी चहा केला आणी छान बाल्कनीत हँगिंग चैर वर बसून चहाचे घोट घेत कसल्याश्या विचारात रमली. थोड्या वेळात तिचा गुणी बाळ बाहेर आला. तिने त्याला दुध नाश्ता दिला व डब्ब्याकरीता भाजी फोडणीला घातली.
आता घरातल्या सगळ्यांना एकाच विचाराने पछाडले होते ते हे की, ही इतकी आनंदी कशी?नक्की काय झालं आहे जे आपल्याला माहिती नाही. सासूबाईंच्या डोक्यात तर प्राजक्ताच्या एक्स्ट्रा मेरेटल अफेयर पर्यंत चे विचार करुन झाले होते.
लेकासोबतच तीही ऑफिसला जायला निघाली. आता बस मधे ती अन् तिची सखी पुढील कथानक रचणार होत्या.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा