Login

हसूनी पुन्हा उमजेन मी...5

Story Of A Woman Having Hurdles In Life But Concurring It By Smile
प्राजक्ता ने घरचा सगळा प्रकार घडला तसा साधनाला सांगितला. आज प्राजक्ता साधनाला तिच्या त्रासावर उपाय सांगणार होती. साधनाच्या घरची परिस्थिती बेताचीच होती.एका हातावर कमवून दुसऱ्यावर खाणे हेच त्यांना माहिती. पण तिच्या सासरे बुवांचा बढेजाव एव्हढा मोठा की त्यापुढे साधना आणि तिच्या नवऱ्याच काहीच चालत नसे. प्रजाक्ताने साधनाला काय काय आणि कसं करावं ते सांगितले. प्रत्येक स्त्री मधे काटकसर ही अंगी भिनलेली असते. साधनाही तशीच होती पण प्रत्येक गोष्टीला काही मर्यादा असतात. ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या कराव्याच लागतात. पण सगळा पैसा जर दिखाऊपणा वर खर्च केला तर घर कसं चालणार हा तिचा प्रोब्लेम होता.
ऑफीस मधे देखील प्राजक्ता आज बरीच आनंदी होती. सहकाऱ्यांनी तिला तसे बोलून दाखवले. ती स्वतःच्या मनाशी विचार करू लागली की फार काही बदलले नाही फक्त मी आनंदी राहू लागली. खरंच हे वर्क होतंय का? संध्याकाळी घरी आल्यावर तिने आदल्या दिवशी प्रमाणेच सगळे केले पण आज सासरेबुवा देखील वाकून वाकून तिचा आनंदी चेहरा पाहू लागले. तिच्यामुळे तिचं छोट पिल्लू देखील आनंदी होत.

आज मात्र सासूबाईंनी विचारलं, काय ग प्राजक्ता काय झालं आहे आजकाल एवढी आनंदी दिसतें आहेस ते? आम्ही नाही बाई कधी सासु सासऱ्यांसमोर गुणगुणलो. ना कधी अशी जोरजोराने गाणी ऐकली. सासुबाईंचे शब्द ऐकून खर तर प्राजक्ता दुखावली. आता मी आनंदी राहायचा प्रयत्न करत आहे तेही यांना आवडात नाही असा विचार तिच्या मनात आला पण ती फक्त सासूबाईना पाहून छान हसली आणि कामाला लागली. असे अन् तसे सगळे तिलाच करायचे होते.

🎭 Series Post

View all