Login

हसुनी पुन्हा उमजेन मी....6

Story Of A woman Who Want's To Win Hurdles Of Life And Smile Again
पाहिले प्राजक्ताचा प्रोब्लेम सोडवायच ठरल्यामुळे साधना तग धरून होती. प्राजक्ता घरून निघाल्यावर तिच्या सासूबाईंनी तिच्या नवऱ्याच्या मनात नाही नाही ते भरवले व तोही आईचा शब्द प्रमाण मानून प्राजक्ताचा पाठलाग करत गेला.

प्राजक्ताच्या ऑफिस समोरच्या कॉम्प्लेक्स मधील एका कंपनी मधे
आज इंटरवह्यू होते. एका मुलाने बस मधून उतरताच प्राजक्ताला पत्ता विचारला. प्राजक्ताने व साधनाने त्या मुलाला रीतसर पत्ता समजाऊन सांगितला शिवाय एकाच दिशेने जात आहे,तुम्ही आमच्या सोबत येऊ शकता असे ही म्हटले. प्राजक्ता हे सर्व माणुसकीच्या नात्याने करत होती पण तिला कुठे माहिती होते तिचा नवरा तिचा पाठलाग करतो आहे.

इकडे परागने लगेच आईला फोन लावला व आईला प्राजक्ता एका मुलासोबत बोलतं ऑफिसला गेली म्हणत सगळा वृत्तान्त सांगितला. आता आईने त्या मुलाचा पाठलाग करायचा सल्ला दिला. पराग त्यांचा पाठलाग करत तो मुलगा गेला त्या कंपनी मधे आला. तिथे त्याला वेगवेगळ्या डिपार्टमेंटसाठी इंटरव्ह्यू सुरू असल्याचे तसेच आता आलेला मुलगा रजत याला अकाउंट डिपार्टमेंटला नोकरी लागल्याचे कळले. इथे राहून या मुलावर लक्ष ठेवता येईल या हेतूने परागने तिथे मुलाखत दिली पण त्याचा आधीचा अनुभव सेल्स मधील असल्यामुळे त्याला त्याच क्षेत्रातील नोकरी मिळाली. डिपार्टमेंट वेगळे असले तरीही एका कंपनी मधे राहून रजत व प्राजक्ता दोघांवरही लक्ष ठेवता येईल या हेतूने परागने जॉब स्वीकारला शिवाय येथे पगारातही थोडी बढत मिळणार होती.

परागने लगेचच आईला फोन करुन सर्व काही सांगितले. परागचे बाबा त्या दोघांचे बोलणे ऐकून न ऐकल्यासारखे करत होते. आता आईच्या डोक्याला एक विषय मिळाला होता. म्हणतात ना, "खाली दिमाग, शैतान का घर." ही म्हण आता खरी होत होती.

🎭 Series Post

View all