प्राजक्ता घरी येई पर्यंत तिच्या सासूबाईंच्या डोक्यात नाही नाही त्या गोष्टी तिच्या व त्या मुलाच्या संदर्भात येऊन गेल्या.
शेजाऱ्याच्या दिघे काकू नेहमी घरात सूनेला मदत करताना दिसत. पण प्राजक्ताच्या सासूबाई नेहमी त्यांना म्हणत,"अहो ताई आपण सून घरात आणली ती काय आपण घरकाम करायचं म्हणून का? आपण घर काम करायचं अन् या मॅडम खांद्याला पर्स लाऊन याच्या त्याच्या सोबत गाव हुंदडतील."
त्यावर दिघे काकू मात्र ठाम राहून सांगायची,"माझी सून नाही हो तशी.लेक जसा घरासाठी खपतो तशीच तीही खपते. मग आपल्याच मुलाच्या संसाराला आपण मदत केली तर बिघडते कुठे." यावर प्राजक्ताच्या सासूबाई नाक मुरडत निघून जायच्या.
त्यावर दिघे काकू मात्र ठाम राहून सांगायची,"माझी सून नाही हो तशी.लेक जसा घरासाठी खपतो तशीच तीही खपते. मग आपल्याच मुलाच्या संसाराला आपण मदत केली तर बिघडते कुठे." यावर प्राजक्ताच्या सासूबाई नाक मुरडत निघून जायच्या.
प्राजक्ता घरी यायला निघाली तेव्हा वाटेत तीने भाजी दूध इत्यादी सामान घेतले. आज गुरुवार असल्यामुळे ती व साधना ऑफिस जवळच्या स्वामींच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आल्या व बसने घरी यायला निघाल्या साहजिकच त्यांना घरी यायला उशीर झाला तोपर्यंत पराग घरी येऊन पोचला होता. आपल्या पुढे काय वाढून ठेवलंय याची पुसटशी कल्पनाही प्राजक्ताला नव्हती.
घरात पाय ठेवताच पराग तिच्यावर ओरडला.,"कुठे हिंडत होतीस त्या नालयका बरोबर... सगळ पाहिलं मी आज माझ्या डोळ्यांनी.. म्हणूनच इतक्यात एवढी आनंदी राहतेस... गुणगुणते काय.. गाणी काय ऐकते, आरामात बसून चहाचे घोट काय रीचवते शी..शी.. शी.." तेवढ्यात सासूबाई बोलतात,"तरी.. तरी..पराग मी तुला सांगत होते हिची लक्षण काही ठीक दिसत नाही.." सासरे मात्र येऊन फक्त डोकावून गेले जसा झाल्या घटनेशी त्यांचा काही संबंध नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा