आता प्राजक्ताला कळून चुकल होत की आपल्या नवऱ्याने आपला पाठलाग केला आणि एवढेच नाही तर बस मधील मुलाशी बोलताना पाहून नाही तो गैरसमज करून घेतला आहे. सासूबाईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून ती नवऱ्याला शांत पणें म्हणाली,"रात्री खोलीत आल्यावर तूम्ही जागे असाल तर बोलील." व पाय धुवून देवापुढे दिवा लावायला निघून गेली.
इकडे पराग व त्याच्या आईची अखंड बडबड सुरु होती. बोलण्या बोलण्यात पराग बोलून गेला,"आता बघ कसा त्या पोरावर लक्ष ठेवतो म्हणून तर तुझ्या ऑफीस समोरच्या कॉम्प्लेक्स मधे त्याच मुलाच्या ऑफिसात नोकरी मिळवली मी." हे ऐकताच प्राजक्ताच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. हेच तर हवे होते तिला की तिचा नवरा चांगला कामं धंद्याला लागावा. घरी दारी आईच कुकुल बाळ म्हणून नाही तर एक जवाबदारी व्यक्ती म्हणून त्याला मान मिळावा.
आज पुष्कळ दिवसाने परागने ऑफीस मध्ये कामं केल्या मुळे आणि घडणाऱ्या घटनांमुळे तो खूप थकला होता. पराग नोकरीला लागला म्हणून प्राजक्ताने गोडाधोडाचा स्वयंपाक केला. कारण जाणण्याची कुणाला विशेष गरज नसल्यामुळे सगळ्यांनी फक्त पोटभर जेवण केले. नेहमी प्रमाणे सगळे आवरून प्राजक्ता खोलीत आली तर पराग गाढ झोपेत घोरत होता. तीने सुटली म्हणून निःश्वास टाकला आणि ती पण झोपली.
दुसऱ्या दिवशी सकाळी तिने तीन डबे पॅक केले. परागशी एक शब्दही न बोलता डबा टेबलवर ठेवला आहे घेऊन जा एवढे सांगत ती लवकर घराबाहेर पडली.
एक महिना असाच उलटला प्राजक्ताला रवीवारी सुटी असायची तर परागला बुधवारी. दोघांना साधा बोलायला वेळ सुद्धा मिळत नव्हता. पराग ज्या कामासाठी त्या कंपनीत कामाला लागला ते काम तो अगदी चोख करत होता पण प्रत्येक वेळी हाती निराशा यायची कारण प्राजक्ताच्या व त्या मुलाच्या विरोधात काहीच पुरावे मिळत नव्हते. आता मात्र त्याला स्वतःलाच वाटू लागले की आपण आईच ऐकून चुकीच्या बाबतीत प्राजक्तावर संशय घेतला. पण जिद्दी मन हेका सोडायला काहीं तयार होईना.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा