Login

हसूनी पुन्हा उमजेनं मी...9

It's A Funny Story
गेल्या महिना भरात प्राजक्ताच्या घरचं सुतकी वातावरण जरी बदललं असल तरी त्याची जागा आता कटकट आणि संशयानी घेतली होती. प्रजाक्तासाठी हे खरंच अग्निदीव्य होत की अशा परिस्थितीतही शांत आणि संयमी राहणे व हसून गोष्टी टाळणे. सोपं नसतं मनाला एव्हढी मुरड घालणं, प्रचंड संयम आणि तटस्थ पणा अंगी बाळगावा लागतो.

रोजप्रमाणे सगळी कामे उरकून प्राजक्ता वरहांड्यात चहा घेत बसली. आज ऑफिसमधे वुमेन्स डे ची पार्टी असल्याने सगळ्या महिला वर्गाला फक्त समारोह साजरा करण्याकरिता ऑफीस मध्ये जायचे होते. कामाला जायला निघालेला पराग निवांत बसून चहा घेत असणाऱ्या प्राजक्ता कडे पहात तिरकसपणाने म्हणाला,"हे काय आज ऑफिसला नाही जायचं का तुला? की तुझं प्रकरणं आल सगळ्यांसमोर म्हणून काढून टाकल तुला ऑफीस मधून."आणि खांदे उडवत तिनेच सकाळीं उठून खपून केलेला डबा घेऊन निघून गेला.

खरंतर प्राजक्ताची तळपायची आग मस्तकात गेली होती पण तिची बडबड ऐकून घ्यायला पराग तिथे नव्हताच त्यामुळे ती पुन्हा शांत बसली आणि आज रात्री सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावायचाच हे तीने मनोमन ठरवले आणि पार्टीसाठी तयार व्हायला निघून गेली.

बरेच दिवस आधी मैत्रिणीनं सोबत शॉपिंगला गेली असताना तीने एक छान वाइन कलरचा वन पीस घेतला होता पण घरचे लोक काय म्हणतील म्हणून कधी घातलाच नाही. पण आज तीने आवर्जून तो ड्रेस घातला. त्यावर साजेसा मेकअप केला. केस स्टाईल केले. कानात स्टड्स घातले. खोलीतून बाहेर आली तर दोन मिनिट सासु सासरे तिला ओळखू नाही शकले. खूप छान आणि स्टायलिश दिसत होती ती.

पार्टी खूप छान झाली गेम्स खेळायला सगळ्यांना खूप मज्जा आली. मनमुराद गप्पा गोष्टी झाल्या. प्राजक्ता ज्यूस घेऊन खिडकीतून बाहेर बघत होती तेवढ्यात तिला समोर काही तरी दिसल्यासारख वाटल. म्हणून तीने आणखी लक्षपूर्वक पाहिले तर तिचा नवरा हातात माईक घेऊन काहीतरी बोलत होता.

पराग ऑफिस मधील सगळ्यांना महिलांचं प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचं स्थान या विषयावर भरभरून बोलत होता. फक्त त्याचे शब्द, त्याची नजर आणि त्याचा मेंदू एकमेकांना साथ देत नव्हते अन् हे योगेशच्या चाणाक्ष नजरेने लगेच हेरले.

🎭 Series Post

View all