जसा जसा पराग माईक हातात घेऊन बोलू लागला तसा तसा त्याला त्याच्या वागण्यातला आणि बोलण्यातला विरोधाभास जाणवायला लागला. एक स्त्री आणि आई म्हणून आपण आपल्या आईला योग्य तो मान दिला पण आपल्या पत्नीचं काय??? तिला तर आपण कधीचं मानाने वागवल नाही. त्याचे शब्द घरंगळू लागले. चेहऱ्यावर पुन्हा उदासीनता दिसू लागली. या वेळी मनात आलेल्या विचाराने तर त्याला अंतरबाह्य हादरवून सोडले. प्राजक्ता ज्यावेळी पहिल्यांदा प्रेग्नेंट होती त्यावेळी डॉक्टर वर दबाव आणून त्याने व त्याच्या आईने तिचे अबोर्शन करवले होते. कारण तिच्या पोटात मुलीचा गर्भ होता.
बोलता बोलता पराग एकदम शून्यात गेला. सगळे आजू बाजूचे त्याला आवाज देत होते पण त्याचा मेंदू बधीर झाला होता. त्याला काहीच ऐकू येत नव्हते. त्याच्या डोळ्यापुढे नाचत होते ते इवले इवले पाय, हसरा खेळकर गोंडस चेहरा, ते सुंदर बाळ ज्याला या जगात येण्या अगोदर त्याने नाकारले होते. आणी अचानक धाडकन जमिनीवर कोसळला. प्राजक्ता ने हे तिच्या ऑफीस मधून पाहिले होते. ती धावतच परागच्या ऑफीस मधे आली. तोपर्यंत त्याच्या ऑफिसच्या लोकांनी अँब्युलन्स बोलावली होती. परागला दवाखान्यात भरती करण्यात आले. आत डॉक्टर त्याला तपासत होते. बाहेर प्राजक्ता सोबत तिच्या ऑफिसच्या दोन मैत्रिणी तसेच परागचे दोन कलिग होते. सगळे परागच्या शुद्धीवर येण्याची वाट पाहत होते.
इकडे घरी प्राजक्ता फॅन्सी कपडे घालून घरून निघाल्यावर जे सासूबाईंच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला तो अजून थांबला नव्हता. ऐकणार कोणीच नव्हत तरी त्या बोलतच होत्या. कधी कधी बऱ्याच वेळा अस होत की माणसाच्या मनात तस काही नसत पण मनावर अहंकार हावी होतो आणि माणूस स्वतः वरील नियंत्रण गमावून तोंडाला येईल ते बोलतो. शब्द आणि मेंदू यांचा अर्थाअर्थी काहीही संबंध नसतो. सुखावत असतो तो फक्त अहंकार.
परागला हळू हळू शुद्ध आली. त्याही अवस्थेत समोर प्राजक्ताला असे कपडे आणि स्टायलिश लूक मधे पाहून त्याला आश्चर्य वाटलं. त्याने हातानेच तिला सुंदर दिसतेस असे सांगितले. खरतर रडून रडून तिचे डोळे सुजले होते. काजळ पसरले होते. पण तरीही आज त्याला ती सुंदर दिसत होती. पण क्षणात त्याला आपण तिचे गुन्हेगार असल्याची जाणीव झाली आणि त्याच्या चेहऱ्याचे हावभाव बदलले. त्याचा ब्लडप्रेशर पुन्हा वाढल.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा