हसून पुन्हा उमजेल मी...12
आता प्राजक्ता देखील सासू कडे हसून बघत आपली कामे आवरत होती. परागला नुकतंच दवाखान्यातून सुट्टी मिळाल्याने तो पुढील 10 दिवस घरीच राहणार होता.प्राजक्तानेही दोन दिवस सुट्टी टाकली होती. आज तिचे हात जरा आरामात आवरत होते तिने नाश्त्याला सगळ्यांसाठी मिश्र भाजीचे थालीपीठ केले. व प्रत्येकाच्या आवडीनुसार दही.. लोणी.. लोणचे सर्व टेबलवर मांडून ठेवले.
तेवढ्यात सासूबाई नाश्त्याला आल्या आणि थालीपीठ पाहून नाक मुरडले. आमच्याकडे नाही बाई असले पदार्थ कोणी खात. नाश्त्याला कस पोहे,उपमा, उकडपेंडी हेच पदार्थ बरे वाटतात. पण प्रत्यक्षात मात्र घडलं निराळाच काही... सगळे थालीपीठ भरभर संपू लागले . सासूबाईना आणखी हवे होते पण आधी एवढ सगळं बोलल्यावर पुन्हा स्वतः कस घेणार म्हणून गप्प बसल्या.पण प्राजक्ताने त्यांना आग्रहाने एक थालीपीठ जास्तच वाढले आणि त्यांच्या कडे पाहून गोड हसली.सगळ्यांच झाल्यावर तिने सर्वांसाठी पुन्हा चहा केला व आपला कप घेऊन तिच्या नेहमीच्या जागी जाऊन बसली.

आता सासूबाईंच्या डोक्याला नवीन विचार पोखरू लागला की हिला काहीही बोलल तरी काहीच फरक पडत नाही आहे आणि त्यावर ही गोड हसते आहे. अस कसं प्राजक्ताला काहीच वाटत नसेल.
तिकडे प्राजक्ताच्या डोक्यात वेगळेच विचार येत होते, ती जाणून होती की मुळात कुणीच वाईट नसत परिस्थिती माणसाचा स्वभाव घडवते. म्हणून तिने सासूबाईंच्या वागण्याचं कारण शोधायचे ठरवले.
दुसऱ्या दिवशी तिने सगळ्यांना सांगितले ,"आज पासून आपण सर्वजण रात्रीच जेवण एकत्र डायनिंग टेबलवर मांडून करत जाऊ." सासरे आणि नवऱ्याचे लगेच समर्थन मिळाले पण सासूबाई हेका सोडायला तयार नव्हत्या.त्यांच्या म्हणण्यानुसार सुनेने सर्वात शेवटी जेवायचे आणि नंतर सगळी आवरा आवर करायची. पण प्राजक्ताने ठणकावून सांगितले मी रात्री पावणे आठ वाजेपर्यंत सुमारास सर्वांचे पान घेईल आणि मी देखील जेवायला बसेल त्या वेळी जर सर्व जण जेवायला बसले तर सर्वांच झाल्यावर मी मागची आवारसावर करेल नाही तर जे कोणी शेवट जेवायला बसतील त्यांनी ती करावी. आता सासूबाईंजवळ पर्याय नव्हता काही सांगून कुणी ऐकणार नाही हे त्यांना समजून चुकले. रोज रात्री आता सर्वांची एकत्र गप्पागोष्टी करत जेवणं होत होती.

क्रमशः
वाचत रहा, आनंदी रहा
ऋतुरंग
वाचत रहा, आनंदी रहा
ऋतुरंग