Login

हसुनी पुन्हा उमजेन मी...14

Story Of A Women Who Is Trying To Concurre The World With Smile
हसुनी पुन्हा उमजेन मी ...14

दोन दिवसांच्या सुट्टी नंतर आज प्राजक्ता आणि साधना दोघींची भेट झाली. आज साधना फारच खुश दिसत होती. न राहवून प्राजक्ताने तिला विचारलंच ,"काय ग आज ओठावरच हसू विरत नाही आहे? काय चमत्कार झाला."
"चमत्कार वगैरे काही नाही ग पण काल पहिल्यांदा हे घरात ठाम पणे माझी बाजू घेऊन बोलले. अग सासूबाईंच्या दूरच्या कोण्या नातेवाईकाकडे लग्न आहे. बरेच वर्ष तसं पाहिलं तर संबंध नव्हते पण आता त्यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नाला बोलावले. सासू बाईंचं म्हणणं अस की आई वडील व मुलगी तिघांनाही सोन्याचा दागिना द्यावा. मी फक्त एवढंच म्हणाले की हे आपल्याला परवडणार नाही. फक्त नवऱ्या मुलीला चांगलं काही तरी गिफ्ट घेऊ. त्यावर सासूबाई व सासरे दोघेही चिडले, आमची अब्रू तुम्ही वेशीवर टांगा वगैरे बोलले.पण आज त्यांना न घाबरता माझ्या नवऱ्याने त्यांचा विरोध केला आणि एवढे पैसे द्यायला जमणार नाही स्पष्ट सांगितले. बाकी तू बोल हरीदासाची गाथा कुठवर आली की आहे अजून मूळ पदावर..." इति साधना

बोलताच दोघी ऑफिसजवळ उतरल्या. प्राजक्ता ऑफिसला येऊन कामाला लागली. तिला काही पेपरवर सुजय सरांच्या सह्या हव्या होत्या. तिने सुजयला फोन करून सांगितले. पण तो आज सुट्टीवर असल्यामुळे त्याने प्राजक्ताला पेपर घेऊन घरी बोलावले. तिच्यापुढे पर्याय नव्हता सह्या होणे गरजेचे होते. म्हणून ती सुजयच्या घरी गेली.

सुजय कडे तिचे योग्य प्रकारे स्वागत केल्या गेले.तेवढ्यात सुजयची आई समोर आली आणि काही क्षण प्राजक्ता स्तब्ध होऊन पाहताच राहिली. जणू तिच्यासमोर तिची असूच उभी होती.
तोच शेलाटी बांधा तेच रूप पण चेहऱ्यावर प्रचंड तेज,आत्मविश्वास, आणि मन मोहून घेईल अस हसू. प्राजक्ताचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. सुजयने तिची व त्याचा आईची ओळख करून दिली. प्राजक्ताने सुजयच्या आईशी बऱ्याच गप्पा मारल्या . त्यातून तिला हवी ती बरीच माहिती विचारून घेतली.

ऑफिसमध्ये आल्यावर देखील प्राजक्ता त्या बाईंच्याच विचारत होती. एका चेहऱ्याचे सात लोक असतात हे ती ऐकून होती पण हे इतक तंतोतंत खर असतं यावर तिचा विश्वास बसत नव्हता. विचारांना लगाम घालून ती घराकडे निघाली.

क्रमशः
वाचत रहा आनंदी रहा
ऋतुरंग
0

🎭 Series Post

View all