हसूनी पुन्हा उमजेन मी....15
आज शनिवार होता.प्राजक्ताने घरी सर्वांना आपल्या घरी ऑफिसचे काही लोक सहपरिवार जेवायला येणार असल्याचे सांगितले. पाहुणे येणार ऐकताच छोटा शौर्य खुश झाला. आई मी आजच सगळा अभ्यास करून ठेवतो असे म्हणाला. प्राजक्ताचा देखील दिवस सगळा घरची साफसफाई वर आवर सावर करण्यात गेला. रात्री नेहमीप्रमाणे तिने व शौर्याने श्लोक म्हटले यावेळी पराग पण त्यांच्यासोबत होता.

रविवारी सकाळीच काकू येऊन पोळ्या करून गेल्या होत्या. त्यानंतर प्राजक्ताने चटण्या, कोशिंबिरी, दोन भाज्या ,कढी, भजे, वरण भात सगळा साग्र संगीत स्वयंपाक केला. गोडाला श्रीखंड मागवले आणि पाहुण्यांची वाट पाहू लागली..
बरोबर साडेबारा वाजता सुजय व त्याची आई प्राजक्ताकडे आले. प्राजक्ताने त्यांचे योग्य ते स्वागत केले. पराग तर एकटक सुजयच्या आईकडे पहातच राहिला. त्याचा त्याच्या डोळ्यावर विश्वास बसण्यास कठीण होते.शौर्य देखील दोन दोन आजी म्हणून उड्या मारू लागला.पाहुणे आलेत म्हणून सासूबाई देखील खोलीतून बाहेर आल्या पण क्षणार्धात सासूबाई कडाडल्या .., “चालती हो माझ्या घरातून, मला तुझं तोंडही पहायचं नाही."
आणि त्या आवाजाने सगळेच भानावर आले.
सुजयची आई– एकदा माझं म्हणणं ऐकून घे मग मी निघून जाईल.
आणि त्या आवाजाने सगळेच भानावर आले.
सुजयची आई– एकदा माझं म्हणणं ऐकून घे मग मी निघून जाईल.
प्राजक्ता –आई त्या माझ्या पाहुण्या आहेत. तुम्ही त्यांना अस घराबाहेर नाही काढू शकत.
प्राजक्ताने असे म्हणतात सासूबाई तणतणत आपल्या खोलीत निघून गेल्या व खोलीचे दार बंद करून घेतले. त्या नुसत्या आतल्या आत धुसफुसत होत्या. त्यांना खूप रडायचं होतं पण रडत नव्हत्या.
तितक्यात मोहनराव म्हणजेच प्राजक्ताचे सासरे आले आणि सुजयच्या आईला म्हणजेच रेखाला पाहून म्हणाले ,"आता काय घ्यायला आली आहेस इथे इतके वर्षांनी?"
तेवढ्यात प्राजक्ताने ओळख करून दिली "बाबा, हे सुजय सर माझे बॉस आणि या त्यांच्या आई ."
म्हणजे प्राजक्ता तुला खरच माहिती नाही की ही तुझ्या सासूची सख्खी जुळी बहीण आहे.
हे ऐकून पराग तर एकदम स्तब्ध झाला. आपल्या आईला सखी जुळी बहीण आहे हे आपल्याला माहितीच नाही.इतके वर्ष या संदर्भात आपल्याला कोणीच काही सांगितलं नाही.हा विचार त्याच्या मनात आला.
"अगं हिच्यामुळे तर मला तुझ्या सासूशी लग्न करावे लागले." इति मोहनराव.
मला माहिती आहे भाग यायला खूप उशीर होत आहे पण काही कारणास्तव लिहणं शक्य होत नाही आहे. पुढील भाग लवकरात लवकर टाकण्याचा प्रयत्न करते तरी तुम्ही आपले आहात आहात समजून घ्या.
वाचत रहा, आनंदी राहा
ऋतुरंग
ऋतुरंग