हसुनी पुन्हा उमजेल मी 16
रेखाताई आता सारख्या रडत होत्या. अगं एकदा माझा ऐकून घे विनवणी करत होत्या. शेवटी मोहनराव प्राजक्ताच्या सासूबाईंना म्हणाले,"अग बाहेर ये... असं आत मध्ये कोंडून घेऊन काहीही होणार नाही. समोरासमोर बसून सगळ्या गोष्टी बोलल्या जाव्या लागतील. परागच्या मनातही खूप प्रश्न आहेत त्यांचेही उत्तर आपल्याला त्याला द्यावे लागतील .ये बाहेर..."
मोहनराव चे एकूण प्राजक्ताच्या सासूबाई बाहेर आल्या आवाजात एक ठाम निर्धार आणि बहिणीला म्हणाल्या बोल, काय बोलायचं तुला... कुठल एवढ आभाळ तुटून पडलं होतं की भर लग्नातुन पळून गेलीस आणि तुझ्या जागी मला लग्नाला उभा राहावं लागलं. तुला कळतय का तू माझ्या आयुष्याशी खेळली आहेस. अग प्रेम होतं माझं एका मुलावर.. लग्न करायचं होतं मला त्याच्याशी.. पण तुझ्या फक्त तुझ्या पळून जाण्याने आई व बाबांनी जबरदस्तीने माझं लग्न मोहन सोबत लावून दिलं. माझं नशीब चांगलं म्हणून ते चांगले आहेत. माझ्याशी चांगले वागले. पण तुला खरं सांगते अजूनही मी माझं खरं प्रेम विसरून नाही शकली आहे. प्रत्येक क्षणी माझ्या मनात विचार असतो की मी त्याच्यासोबत असती तर कदाचित माझा आयुष्य काही वेगळं असतं आणि माझ्या आयुष्याशी खेळ करून तू सरळ पळून गेलीस.
त्यावर रेखाताई म्हणतात बाबी मला माहिती आहे की माझ्यामुळे तुझ खूप मोठा नुकसान झाला पण माझा विचार कर मला पुढे शिकायचं होतं मला डॉक्टर व्हायचं होतं बारावी पास झाली होती मी, काय माझं लग्नच वय होतं का? पण तरीही बाबांनी माझं लग्न लावून द्यायचा ठरवलं का,तर म्हणे मुलाकडे त्यांना मी पसंत आहे आणि समोरून मागणी घातली. मोहन मला खरं सांगा जर तुमच्याशी माझं लग्न झालं असतं तर मी लग्नानंतर शिकू शकली असती का? डॉक्टर होऊ शकली असती का? दिली असती का मला तसं करायला परवानगी तुम्ही किंवा तुमच्या घरच्यांनी?
मोहनराव नकारार्थी मान हलवतात.
म्हणूनच म्हणते माझ्या आयुष्यातल पहिल ध्येय मी डॉक्टर होणे होत. आणि माझ्या हिमतीवर मी गायनॅकॉलॉजिस्ट झाली. तुला माहिती आहे की नाही माहिती नाही पण वेळा रोडला माझा मोठा दवाखाना आहे. गेले कित्येक वर्ष मी तो चालवते. मी प्रॅक्टिस करत असताना माझी सूजयच्या वडिलांशी भेट झाली. ते माझे सीनियर डॉक्टर होते त्यांनी आणि मी मिळूनच हा दवाखाना सुरू केला. पण दोन वर्षांपूर्वी त्यांचा निधन झाला आता मी एकटी सगळं सांभाळते आहे मला वाटलं होतं मी पळून गेल्यानंतर आई-बाबा लग्न मोडतील पण माझ्या जागी ते तुला उभं करतील हे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. मला ठाऊक होतं मागच्या गल्लीतल्या त्या रत्नाकर जावकर वर तुझं प्रेम होतं. त्यावेळीही मी तुला बरेचदा सांगितलं होतं की त्याच्यापासून दूर राहा... पण तू माझा ऐकलं नाहीस. तो काय करतो कुठे आहे काही माहिती आहे तुला?

प्राजक्ताचा सासूबाई नकारार्थी मान हलवतात.
अगं तीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळले इतकेच नाही तर तिघींबरोबरही लग्न करून त्यांच्या मुलांना जन्माला घातलं आणि त्यांचे पैसे घेऊन फरार झाला सध्या पोलीस स्टेशनमध्ये आहे तो. तिघींनीही त्याच्या विरोधात तक्रार केलेली आहे. अग तुझं नशीब खूप चांगला म्हणून तुला मोहन भेटले तुझं जर लग्न रत्नाकर सोबत झालं असतं तर काय झालं असतं याचा विचार कर मला माहिती आहे. मी तुझी गुन्हेगार आहे. आणि माझा गुन्हा कमी होत नाही. पण खरं सांगते बाबी माझ्याजागी तुला उभं राहावं लागेल असं मला खरंच वाटलं नव्हतं. आणि जेव्हा मला हे कळलं मला खरंच खूप वाईट वाटलं. पण मी परत वापस येऊ शकत नव्हती. कुठल्या तोंडाने घरी परत येऊ म्हणून नाही आली कधीच नाही आले.
"अगं किती मोठी गोष्ट घडलेली आहे, हे तुला कळते आहे का बाली. अगं मी कधीच मोहनरावांना नवऱ्याचा दर्जा दिला नाही. नेहमी हळतुर करून त्यांच्याशी वागले.ना त्यांना ना त्यांच्या घराला सांभाळलं. त्यांच्यासोबत मनाविरुद्ध संबंध झाला म्हणून परागला ही मी स्वतः पासून दूरच ठेवलं. एका घरात राहत असलो तरी मनाने खूप दूर होतो आम्ही तो बिचारा प्रेमाच्या अशाने आई आई करत माझ्याजवळ यायचा. पोटचा पोरगा असला तरी अंतर ठेवूनच वागले मी त्याच्याशी नेहमी. त्याला मोहनराव बद्दल त्यांच्या घरच्या बद्दल आणि बायको बद्दल सतत भडकवत आले. पराग द्वारे सर्वांना होणारा त्रास पाहून मला आनंद वाटत होता. असं वाटत होतं माझ्या आयुष्याची रांगोळी केल्यानंतर यांना असंच व्हायला हव. यांना असंच मिळायला हव. आयुष्य सरल ग माझ पण मी सुखाने संसार नाही केला. त्यांनी मात्र नेहमी मला प्रेमाने समजून घेतलं. नेहमी माझ्यासाठी उभे राहिले. आयुष्यात कसले म्हणून उणे राहू दिले नाही त्यांनी माझ्यासाठी. अशा देव माणसाला मी फक्त आणि फक्त तुझ्यामुळे त्रास दिला. त्यावेळी आई-बाबांना त्यांच्या अब्रूची चिंता होती. मोठी मुलगी घरातून पळून गेली मग लहानेशी लग्न कोण करणार? हा विचार तू मांडवात नसताना सतत होता. त्यामुळे त्यांनी मला जबरदस्ती बोहल्यावर उभं केलं. ना कुठली हाऊस ना कुठली मौज सासुबाईंनी तर अगणित टोमणे मारले. तरी सगळे ऐकून स्वतःला सावरत या घरात राहिले.माहेर माझे तेव्हाच संपलं. मोहन म्हणायचे मला चालते का आईकडे भेटते का त्यांना.. त्यांना भेटून तुला बरं वाटेल पण कधी म्हणून कधी मी माहेरी गेली नाही. त्यानंतर राग इतका होता की आई बाबा गेले तरीही नाही गेले. दोनच मुली होतो ग आपण त्यांना पण शेवटच्या क्षणी आपण दोघेही त्यांच्याजवळ नव्हतो शेजार पाजारच्यांनी काकू काकांनी सगळ केलं त्याचं."
रेखाताई,"माझा नाईलाज होता ग बाबी. मी तरी काय करू मी आई-बाबांना किती वेळा सांगून पाहिलं की मला डॉक्टर व्हायचं आहे. मला शिकायचा आहे. पण ते ऐकायला तयार नव्हते. त्यांचा आपला एक चांगला स्थळाला लग्न करून घे चांगला स्थळ आलं लग्न करून घे. कशी करणार होते मी लग्न आणि म्हणून मी शेवटी हा पर्याय निवडला तुझं कुठेही नुकसान व्हावं असं माझ्या मनातही नव्हतं.

मुलांसमोर खरं तर ह्या गोष्टी बोलू नाही बाली पण तुला सांगते लग्नानंतर दोन वर्षानंतर मी आणि मोहन एकत्र आलो दोन वर्ष मी त्यांना आजूबाजूला फिरकू सुद्धा दिल नाही. अगं मी पण बारावीच झाले होते ना तुझ्यासारखे मी पण लहानच होते. मग का माझ्या खांद्यावर जबाबदाऱ्यांचा ओझं पडल. प्राजक्ताच्या सासूबाई मनातली सल बोलून दाखवत होत्या आणि पराग, प्राजक्ता व सुजय फक्त विस्मित भावाने सर्व ऐकत होते.
क्रमशः
वाचत रहा, आनंदी रहा
ऋतुरंग
क्रमशः
वाचत रहा, आनंदी रहा
ऋतुरंग
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा