Login

हसुनी पुन्हा उमजेन मी...11

It's An Emotional But Funny Story
वाचकांनो मला माहिती आहे भाग खूप उशिरा येत आहे त्यामुळे तुमची वाचण्याची लिंक लागत नाही आहे. पण जस शक्य होईल तसा लगेच भाग टाकायचा प्रयत्न करते आहे थोड समजून घ्या. इथून पुढे खऱ्या विनोदी कथेला सुरुवात होते आहे. थोडा तब्येतीचा प्रोब्लेम असल्यामुळे रेगुलार आणि मोठे पार्ट लिहिणे शक्य होत नाही आहे. तुंम्ही माझे आपले आहात समजून घ्याल अशी आशा करते.

आता पुढे

परागला आता खरी परिस्थिती लक्षात आली होती. प्राजक्ताने देखील सुरुवातीपासून आता पर्यन्त सगळे परागला सांगितले. तो ही घरची परिस्थिती बदलण्यासाठी तिला साथ द्यायला तयार झाला.
प्राजक्ता परागला घेऊन घरी आली.परागची अवस्था बघून सुधाताई जणू कोलमडल्या. कितीही झालं तरी आई होती ती, पण क्षणभरा पुरतीच. जसं त्यानी प्राजक्ताला पराग सोबत पाहिलं त्या तिच्यावरच धावून आल्या. तुझ्यामुळेच माझ्या मुलाची ही अवस्था झाली ही दूषणे देऊ लागल्या. क्षणात पराग सावरला व आपल्या आईला म्हणाला,"आई तीने आपल्या विरोधात पोलिसात तक्रार नोंदवली आहे. आता तिच्या केसाला जरी धक्का लागला तरी आपल्याला जेल मध्ये जावे लागेल."
तश्या सुधाताई एकदम मागे सरकल्या पण पुन्हा त्यांचा तोंडाचा पट्टा झाला. हीचं काही होऊ शकत नाही या आविर्भावात मदनराव खोलीत निघून गेले. प्राजक्ता देखील परागचा हात धरून खोलीत निघून गेली. यांची वाफ दवडण सुरूच होत.

तू खरंच पोलिस कंप्लेंट केली आहे हे आईला पटवून द्यावे लागेल. त्याशिवाय ती विश्वास ठेवणार नाही.- पराग
मग तू बोल आईशी तसे- प्राजक्ता
हमम थोडा आराम करतो मग जातो - पराग
चालेल, पण वाद वाढवू नको. एवढं बोलून प्राजक्ता किचन मध्ये गेली.
थोड्या वेळाने पराग आई जवळ जाऊन उभा राहिला."आई आता आपण काय करायचं ग? तीने पोलिस कंप्लेंट केली आहे. आपण जर तिला काही केलं तर सरळ तुरुंगात रवानगी करण्यात येईल असे म्हणाले इन्स्पेक्टर." पराग
"तू स्वतः बोलला पोलिसाशी?" आई
"हो आई! मी स्वतः बोललो." पराग
आता मात्र सुधा ताईंची भांबेरी उडाली."मी तिच्याशी प्रेमाने वागून बघते. पहाते जमतं का?”आई
"पहाते नाही आई जमवावचं लागेल." पराग
तेवढ्या वेळात प्राजक्ताने सासऱ्यांना विश्वासात घेऊन सगळ सांगितलं . आपण आपल्या बायको पुढे हतबल झाले आहो याचं त्यांना फार वाईट वाटत होतं. पण ज्या घरात ते राहत होते ते बायकोच्या माहेरच्यांनी तिला दिले होते. फक्त मुलांना आई व वडील दोघांचेही प्रेम मिळावे यासाठी ते अपमान सहन करत होते व तिथे रहात होते. त्यानी सुनेला तिच्या कार्यासाठी भरभरून आशीर्वाद दिले.

आज बरेच दिवसांनी प्राजक्ताची पहाट परागच्य मी मिठीत झाली. चेहरा आनंदाने फुलला होता. स्वतःच आवरून ती बाहेर आली.सगळ्यांसाठी चहा मांडला. तेवढ्यात सुधाताई आल्या त्यांनी प्राजक्ताला कसंनुस तोंड करत बेटा म्हणून हाक मारली. बिचारी प्राजक्ता तिचा तिच्या कानावर विश्वास बसत नव्हता. नाईलाजाने का होईना पण हे "बेटा"तिच्यासाठी होत.

क्रमशः
0

🎭 Series Post

View all