Login

आदर्श माता.

जर राजमाता जिजाऊ पुन्हा जन्मल्या आल्या तर?
शीर्षक: आदर्श माता.


ऐतिहासिक पात्र जर पुन्हा आताच्या काळात आणायचे असेल तर ते "राजमाता जिजाऊ" यांचे. राजमाता जिजाऊ ह्यांनी छत्रपती शिवाजी महाराज ह्यांना लहानपणापासून प्रत्येक गोष्टीचे शिक्षण दिले होते. पौराणिक कथा सांगून त्यांनी त्यातून संस्कार मूल्ये शिवरायांना दिलीत.

आपली मातृभूमी ही आपली आईच असते आणि तिचे संरक्षण करण्यासाठी काय करायला हवे ह्याचे धडे दिले.
सर्वधर्मसमभाव ही त्यांची विचारसरणी जेव्हा मावळे कोणत्या जाती धर्माचे आहेत हे न विचारता त्यांची सैन्यात भरती केली त्यातून दिसून येते. हे सर्व त्यांची जडणघडण, हे एका कणखर आईने केल्यामुळे शक्य झाले.

आज वाढत असलेले अत्याचार असो की स्त्रियांचा होणार अवमान, परस्त्री ही मातेसमान असते हे त्यांनी आपल्या शिवबांना उत्तमरीत्या समजावून सांगितले.

शहाजीराजे भोसले ह्यांच्या अनुपस्थित त्यांनी आई आणि वडिलांचे दोघांचे प्रेम दिले आणि त्यांना सक्षम बनवण्यात त्यांनी कोणतीच कसूर सोडली नव्हती.

एक आई जेव्हा कणखर असते तेव्हा तिच्या मुलाच्या जीवनावर सकारात्मक परिणाम कसा होऊ शकतो, ह्याचे उत्तम उदाहरण म्हणून राजमाता जिजाऊ आहेत.
तसेच स्त्रियांनी सुद्धा प्रसंगी प्रत्येक संकटाला कसे सामोरे जायला हवे हे त्यांनी त्यांच्या जीवनकार्यातून सांगितले आहे.

ज्या वेळेस शंभू राजांना त्यांच्या आईची गरज होती, तेव्हा राजमाता जिजाऊ ह्यांनी सुद्धा त्यांच्यानुसार त्यांना अनेक गोष्टी शिकवण्यास मदत केली.

असे म्हंटले जाते की बाळ जेव्हा आईच्या पोटात असते तेव्हा त्याच्यावर गर्भसंस्कार होणे गरजेचे असते. ते राजमाता ह्यांनी शिवाजी महाराज जेव्हा त्यांच्या पोटात होते, त्यावेळी तलवारबाजी, अनेक शस्त्रांचा जमेल तसा सराव हा गर्भसंस्कार म्हणून केला होता. म्हणूनच शिवरायांची कुशाग्र बुद्धी आणि दूरदृष्टी हा गुण त्यांच्यात असण्याचे मुख्य कारण म्हणजे राजमाता आहेत.

स्वराज्य स्थापना करणे त्यावेळी शक्य नसताना लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी मावळ्यांची फौज तयार केली. असे कित्येक कठीण प्रसंग आले ज्यात जीव धोक्यात घालून अनेक वीर धारातीर्थी पडले त्यातही त्यांनी आपल्या राजासाठी जीव देताना मागचा पुढचा विचार केला नव्हता. हा विश्वास आणि माणूस जपण्याची कला, हे संस्कार राजमाता जिजाऊ ह्यांनी छत्रपती शिवाजी महाराज ह्यांना दिले.

म्हणून एक आदर्श आई आणि राजमाता म्हणून त्यांनी पुन्हा जन्मला यावे आणि तेव्हाच समाजात भेद मिटतील आणि एक चांगल्या आचरणाची पिढी त्यांच्या उपस्थितीत घडली जाईल म्हणून त्यांनी पुन्हा जन्म घ्यावा असे वाटते.

एक स्त्री कणखर तर असतेच पण जेव्हा ती योग्य संस्कार आपल्या मुलांवर (मुलगा/ मुलगी) करते, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांसारखे थोर राजे नक्कीच जन्माला येतात ते त्यांच्या आदर्शवादी मातेमुळेच !

© विद्या कुंभार

लेख कसा वाटला हे लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा.
0

🎭 Series Post

View all