Login

स्वतःला जाणून घे

कणखर बन
कमी समजण्याची
नको करुस चूक
अवहेलना होता
राहू नकोस मूक

थांबवायला येतील वेडे
मध्येच आडकाठी घाली
उधळून टाक चपळाईने
विचित्र त्यांच्या चाली

कणखर बनून स्वतःला
मार्ग तुझा तूच शोध
झालेल्या चुकांतून
नित्यपणे घे बोध

जाणून घे तू स्वतःला
आधी तूच ओळख जरा
ओळखायला शिक आता
समाजाचा चेहरा खरा

© विद्या कुंभार

सदर कवितेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत.

फोटो सौजन्य: साभार गुगल
0

🎭 Series Post

View all