Login

वाचाल तर वाचाल If you read, you will read

If you read, you will read
*वाचाल तर वाचाल*

एकदा पप्पानीं मला विचारलं, “तुला शाळेत शिकवलेले समजते ना?” तसें माझा चेहरे कोमेजला. पप्पानीं हसतच विचारलं, “म परीक्षेत असेच तोंड पाडणार का? मी तरीही खाली मान घालून बसले होते.

तसे पप्पानीं सांगायला सुरुवात केली, “गेल्या आठवड्यात मी एका वाचनालयात गेलो होतो तिथे मला एक पुस्तक दिसलें. पुस्तकाचं नाव होतं ‘आपलं ध्येय कसं साध्य करावं?’ उत्सुकतेपोटी ते घेतले, आणि पहिल्या पानावरच वाक्य होतं – ‘ध्येय साध्य करायचं असेल, तर पहिले स्वतःला ओळखा.’ त्या पुस्तकाचा एकही पान पुढे वाचायची गरज भासली नाही. फक्त त्या एका वाक्यावर विचार करताना लक्षात आलं की आपण स्वतःचं निरीक्षण कधीच करत नाही. स्वतःला ओळखल्यानंतर मी स्वतःसाठी दिवसाचं नियोजन केलं, आणि बघ, आज माझं आयुष्य अधिक सकारात्मक झालंय.”

पप्पा पुढे म्हणाले, “फक्त पुस्तकं वाचून उपयोग नाही; त्या पुस्तकातील विचारांना आपण आपल्या आयुष्यात लागू करत नाही, तोवर त्याचा फायदा होत नाही. एखादा धडा किंवा प्रसंग समजून घेतला, तरी तो जीवनात उतरवणं महत्त्वाचं आहे.”जसे आपण देवाला तर मानतो पण देवाचे मानत नाही.
तेव्हा पासून माझ्या मनावर ही गोष्ट ठसली. त्याच दिवशी शाळेत दिलेल्या धड्याचा अभ्यास पुन्हा केला, त्यातली शिकवण समजून घेतली आणि ते त्यांच्या दैनंदिन आयुष्यात कसं उपयोगात आणता येईल याचा विचार करू लागले.

बोध:
वाचनाचं खरं मूल्य त्यातून मिळालेलं ज्ञान आचरणात आणल्यावरच समजतं. फक्त वाचणं पुरेसं नाही, ते जीवनात उतरवलं तरच त्याचा खरा उपयोग होतो.सौं.जान्हवी साळवे.