शीर्षक : भ्रम आणि अहंकार, माणसाच्या नात्यांतील दोन टोकं
मानवी जीवन म्हणजे नात्यांचं गुंफलेलं जाळं. माणूस एकटा जन्माला येतो, पण जगण्यासाठी त्याला माणसांची, नात्यांची, सोबतीची गरज असते. या नात्यांच्या जगात दोन भावनांचा फार सूक्ष्म पण प्रभावी खेळ चालत असतो भ्रम आणि अहंकार.
“माझी सगळ्यांना गरज आहे हा भ्रम, आणि मला कुणाचीच गरज नाही हा अहंकार” या एका ओळीत माणसाच्या आयुष्याचं सार दडलं आहे.

"माझी सगळ्यांना गरज आहे" हा भ्रम का निर्माण होतो?
माणूस जेव्हा समाजात आपली ओळख निर्माण करतो, थोडं नाव, मान, प्रतिष्ठा मिळवतो, तेव्हा नकळत एक भ्रम त्याच्या मनात घर करतो मीच सर्व काही आहे, माझ्याशिवाय हे चालणारच नाही.
हा विचार काही वेळा आत्मविश्वासासारखा वाटतो, पण तो हळूहळू स्वकेंद्रीपणा बनतो.
लोक आपल्याभोवती असतात कारण आपली किंमत आहे, पण जेव्हा आपणच हे मानायला लागतो की त्यांना आपली गरज आहे तेव्हा आपण “लोकांसाठी” नसतो, तर “लोक आपल्यासाठी आहेत” असा समज निर्माण होतो.

हा भ्रम माणसाला नकळत अभिमानाच्या पायरीवर नेऊन ठेवतो.
तो विसरतो की काळ फिरतो, आणि काळाचं चक्र एकाच ठिकाणी राहत नाही.
आज ज्याला जग गरजेचं वाटतं, त्याच्याविना उद्या जग थांबत नाही.
इतिहासातही अनेक उदाहरणं आहेत राजा महाराजे, उद्योगपती, नेते जेव्हा अस्तित्वाच्या पलीकडे गेले, तेव्हा जग थांबलं नाही; पुढचं पान उलटलं आणि नवा अध्याय सुरू झाला.

म्हणूनच “माझी सगळ्यांना गरज आहे” हा विचार स्वत:वरील प्रेमापेक्षा जास्त स्वतःच्या महत्त्वाच्या अतिरेकी भावनेतून निर्माण होतो.
आणि जेव्हा हा भ्रम फुग्यासारखा फुगतो, तेव्हा वास्तवाच्या सुईने तो फुटलाच पाहिजे.

"मला कुणाचीच गरज नाही" हा अहंकार कुठून येतो?
अहंकार ही भावना सुरुवातीला आत्मसन्मानासारखी वाटते.
“मी स्वतः पुरेसा आहे, मला कुणाची गरज नाही” हे वाक्य ताकदवान वाटतं, पण त्यामागे दडलेली भावना म्हणजे स्वत:ला सगळ्यांपेक्षा वेगळं समजणं.
माणूस जसा जसा भावनिक जखमा अनुभवतो, लोकांच्या बदलत्या वागणुकीमुळे दुखावतो, तसा तो संवेदनेपासून स्वतःला वंचित ठेवण्याचा प्रयत्न करतो.
त्याला वाटतं कोणावर विश्वास ठेवायचा, सगळे स्वार्थीच आहेत, आणि तिथून अहंकाराचं बीज रुजायला लागतं.

पण हाच अहंकार माणसाला एकाकीपणाच्या खाईत ढकलतो.
माणसाला जगण्यासाठी भाकरीइतकीच गरज संवादाची असते.
कुणीतरी आपलं ऐकावं, आपल्याला समजून घ्यावं ही मूलभूत मानवी गरज आहे.
मग ती आईची असो, मित्राची असो, साथीदाराची असो "मला कुणाची गरज नाही" असं म्हणणं म्हणजे माणूस स्वतःच्या हृदयाभोवती भिंत बांधतो आणि त्या भिंतीतून बाहेरचा प्रकाश दिसेनासा होतो.

या दोन टोकांमध्ये ‘संतुलन’ म्हणजेच परिपूर्ण माणूस
जीवनात यशस्वी होण्यासाठी, सुखी राहण्यासाठी माणसाने भ्रम आणि अहंकार या दोन्ही टोकांपासून दूर राहायला शिकायला हवं.
एकीकडे आपल्याशिवाय जग थांबेल असा भ्रम नसावा, आणि दुसरीकडे जगाची गरज नाही असा अहंकारही नसावा.
“मी कोणाच्याही जीवनाचा केंद्रबिंदू नाही, पण काहींच्या जीवनाचा एक सुंदर भाग आहे” हे समजणं म्हणजे माणूस संतुलित झाला असं म्हणावं.

जेव्हा माणूस हे दोन्ही विचार मनातून काढून टाकतो, तेव्हा त्याच्या मनात अहंकाराऐवजी नम्रता, आणि भ्रमाऐवजी वास्तवदर्शन येतं.
तो मग सर्वांचा जीवाभावाचा होतो कारण तो कुणाचं ओझं बनत नाही, पण कुणाचं आधारस्थान जरूर बनतो.

नातं टिकवण्यासाठी "गरज" असणं आवश्यक आहे, पण ती गरज परस्परांची असली पाहिजे एकतर्फी नाही.
जर एकाला वाटलं की सगळं माझ्यामुळेच चालतं, तर नातं एकतर्फी ओढाताणीचं होतं.
आणि जर दुसऱ्याला वाटलं की मला कुणाची गरज नाही, तर नातं रिकामं आणि भावनाहीन होतं.
या दोन अतिरेकी भावनांमध्ये अनेक नाती तुटतात, कारण कुणीही नम्रतेने "मलाही तुझी गरज आहे" असं म्हणायला तयार नसतो.

माणूस नम्र असला की तो नात्यांमध्ये मनापासून उपस्थित राहतो.
त्याला कुणाची स्तुती नको, आदर नको, पण जोडलेपण हवं असतं.
तो स्वतःच्या अस्तित्वाचं ओझं दुसऱ्यांवर टाकत नाही, आणि दुसऱ्यांच्या अस्तित्वाची किंमत कमीही करत नाही.
यालाच आपण "जीवाभावाचा माणूस" म्हणतो जो भ्रम आणि अहंकार दोन्हीच्या पलीकडे असतो.

हेच सूत्र आपण कामात आणि समाजजीवनात लावलं, तर जीवन किती सुंदर होईल.
नेतृत्व म्हणजे "माझ्याशिवाय काही चालत नाही" नव्हे, तर “माझ्यामुळे सगळे एकत्र चालतात” हे समजणं.
आणि यश म्हणजे “मी एकटाच केलं” नव्हे, तर “सगळ्यांनी मिळून साध्य केलं” असं मानणं.

म्हणून जेव्हा आपण भ्रम सोडून वास्तवाकडे बघतो, तेव्हा आपण आपली क्षमता ओळखतो.
आणि जेव्हा आपण अहंकार सोडून नम्रतेकडे वळतो, तेव्हा आपण माणसांशी जोडलेले राहतो.
हेच जोडलेपण आपल्या आयुष्याला अर्थ देतं.

नम्रतेतच माणुसकीचं सौंदर्य दडलेलं असतं.
जीवनाच्या प्रवासात आपण अनेक टप्प्यांतून जातो कधी आपल्याला सगळे हवेसे वाटतात, कधी कोणीच नकोसं वाटतं.
पण शेवटी प्रत्येक माणूस हेच शिकतो की, “कोणालाही कमी समजू नये आणि स्वतःला जास्तही समजू नये.”
यातूनच खऱ्या अर्थाने माणुसकी जन्म घेते.

भ्रम आपल्याला लोकांपासून दूर नेत असतो, आणि अहंकार आपल्याला स्वतःपासून दूर नेत असतो.
या दोघांना दूर ठेवून जर माणूस जगला, तर तो प्रत्येकाच्या मनात स्थान मिळवतो जीवाभावाचा, विश्वासार्ह, आणि साधेपणाने सुंदर.

“जगाला आपली गरज नाही, पण आपल्याला जगाची आहे. कारण प्रेम, नम्रता आणि जोडलेपण यातच खऱ्या माणुसकीचं सौंदर्य आहे.”
©® सचिन कमल गणपतराव मुळे...
परभणी,९७६७३२३३१५
परभणी,९७६७३२३३१५
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा