भाग ११
प्रिशा बाबांसोबत घरी पोहोचली.घरी कोणीतरी आलेले होते.
प्रिशा गाडीवरून उतरून सँडल काढून हॉलमध्ये गेली.विनयराव देखील आले.तिथे कोणीही नाही हे पाहून कदाचित कोणीतरी आईची मैत्रीण मध्ये बसलेली असेल असे तिला वाटले.त्यामुळे विनयराव देखील हॉलमध्येच पेपर वाचत बसले.
सोफ्यावर जरा रिलॅक्स बसत प्रिशा म्हणाली,
“ आई,कोण आलंय?”
“ आई,कोण आलंय?”
“ मी आले आहे.”
अचानक एक घोगरा तरीही ओळखीचा आवाज प्रिशाला ऐकू आला.
अचानक एक घोगरा तरीही ओळखीचा आवाज प्रिशाला ऐकू आला.
तिने मागे वळून पाहिलं आणि तिला आश्चर्याचा सुखद धक्का बसला.
“ आजी तू? अशी मध्येच कशी काय आलीस? तुझ्या कॉलेजला सुट्ट्या आहेत की काय?अन् काय गं काल रात्री तर फोनवर तसं काही बोलली देखील नाहीस.”प्रिशा
“ आजी तू? अशी मध्येच कशी काय आलीस? तुझ्या कॉलेजला सुट्ट्या आहेत की काय?अन् काय गं काल रात्री तर फोनवर तसं काही बोलली देखील नाहीस.”प्रिशा
“ अगं हो हो.. सगळे प्रश्न एकदाच विचारशील का?जरा श्वास देखील घे..” वसुधाताई
“ विचारू दे तिला प्रश्न! माझी परफेक्ट नात आहे ती.आली मोठी तिला शिकवणारी!”आजी
“ अहो सासूबाई मी तर तिला फक्त..”आजींनी रागाचा कटाक्ष वसुधाताईंवर टाकला आणि त्या मध्येच बोलायच्या थांबल्या.
“ स्वयंपाकाचं बघा आता.पोरीला भूक लागली असेल.” आजी
“ हो.चल आई मी तुला मदत करते.आधी फ्रेश होते मग सुरू करूया.”प्रिशा
“ कशाला? प्रिशा तू जरासा आराम कर अन् मग वाचन कर.ती करेल तिचं तिचं..”आजी
घरात अचानक सर्वांना हिटलर आल्याचं फिलिंग येत होतं. वसुधताई, विनयराव,हर्षु एकमेकांकडे बघू लागले..
“ बघता काय एकमेकांकडे? लागा आपापल्या कामाला.” आजी
“ आई मी आलो असतो ना तुला घ्यायला? कशाला इतकी वणवण केलीस?” विनयराव
“ मी काय इतकी म्हातारी नाही झाले अजून. समजलं? तुझं काय ते काम बघ.”आजी
“ आजी मी काय करू?” हर्षु
“ तू का?.. इकडे ये बरं जरा. माझं डोकं चेपून दे.”आजी
हर्षु दिलेल्या कामाचा विचार करू लागला.
‘ बापरे नको हे काम मला.मागच्या वेळी आजीचं डोकं मी १ तास चेपत बसलो होतो, तेव्हा आजीने मला फ्री केलं होतं..’ त्याच्या अंगावर भीतीचा शहारा आला.
‘ बापरे नको हे काम मला.मागच्या वेळी आजीचं डोकं मी १ तास चेपत बसलो होतो, तेव्हा आजीने मला फ्री केलं होतं..’ त्याच्या अंगावर भीतीचा शहारा आला.
“आजी,मला एक आठवलं. अगं,मला ना महत्वाचा गृहपाठ करायचा आहे. तो मी करून घेतो अन् मग येतो.तूच म्हणतेस ना आधी अभ्यास महत्वाचा असतो म्हणून!”हर्षु
“ हो.जा पळ मग इथून.” आजी
हर्षु पटकन रूममध्ये पळाला.
प्रिशाची आजी, शांता,विनयरावांची आई.एकदम उषा नाडकर्णी यांची कार्बन कॉपी.अगदी त्यांच्यासारखे कडक, खोचक टोमणे मारणारे एक सोफिस्टिकेटेड व्यक्तिमत्व हा पण जितक्या बाहेरून कडक तितक्याच आतून कोमल.त्या एका मोठ्या महाविद्यालयात प्रोफेसर म्हणून कार्यरत होत्या.
आता हॉलमध्ये प्रिशा आणि आजी दोघीच होत्या.प्रिशा फ्रेश होऊन आली आणि वाचन करत बसली.तोपर्यंत आजी स्वामींच्या नामाचा जप करत बसली.विनयराव देखील पेपर वाचत बसले.
थोड्या वेळाने वसुधाताई जेवणासाठी सर्वांना बोलवायला गेल्या.आज डायनिंग टेबलवर सर्व आजीच्या आवडीचे पदार्थ होते.
सगळे जेवायला बसले.
“ आज,येताना आम्हाला समीर नावाचा प्रिशाचा कलिग भेटला.छान मुलगा वाटला मला तो.”विनयराव
“ आज,येताना आम्हाला समीर नावाचा प्रिशाचा कलिग भेटला.छान मुलगा वाटला मला तो.”विनयराव
“ म्हणजे?”आजी
“ अगं,तो आपल्या प्रिशाकडून सॉफ्टवेअर शिकायचे आहे असे म्हणत होता.दुसरं काही नाही..” विनयराव
“ ह्ममम्..” आजीने प्रिशाकडे रागाचा कटाक्ष टाकला.
प्रिशाने मान खाली घातली.वसुधाताई देखील समीर नावाच्या मुलाचे नाव घेताच अचंबित झाल्या होत्या पण असेल तिचा कलिग असे समजून शांत बसल्या.
सारे आपल्या आपल्या रूममध्ये गेले.
“ वसुधा,ए वसुधा..”आजी
“ वसुधा,ए वसुधा..”आजी
“ आले आले..” वसुधाताई
“ जा आता तू.आराम कर.बाकीचे सारे काही मी आवरते.”आजी
“ नको आई.मी आवरते ना.तुम्ही कशाला उगाच दमत बसता?” वसुधाताई
“ जा म्हंटलं ना?” आजी वसुधाताईंवर खेकसून बोलल्या.
“ बरं.” वसुधाताई घाबरून रूममध्ये गेल्या.
सगळी आवरासावर करून आजी प्रिशाच्या रुममध्ये गेल्या.
प्रिशा वाचनात दंग होती.
“ प्रिशा..”आजी
प्रिशा दचकली आणि आजी समोर पटकन उभी राहिली.
“ क,क..काय?” प्रिशाचा कापरा,घाबरलेला आवाज वातावरणात भीतीचा दरारा वाढवत होता.
“ हे समीर प्रकरण बंद करणार आहेस की नाही? “ आजीने डायरेक्ट विषयाला हात घातला.
“ आजी,तू त्या दिवशी रात्री मला फोनवर सांगितले तसे मी त्याला ट्रीट केले पण तरीही तो माझ्या मागे मागे येतो कॉलेजमध्ये.उलट आज तर त्याने मला मोठ्या संकटातून वाचवले.”प्रिशा
“ प्रिशा.. तुला किती वेळा सांगितलं की हे सगळे बेस्ट टीचर अवॉर्ड मिळवण्यासाठीचे पॉलिटिक्स आहे.कसं समजत नाही तुला?मी तुला त्या दिवशी इतक्या खोलवर जाऊन माहिती देऊनसुद्धा तुझ्या डोक्यात काहीच शिरलेलं दिसत नाही.तू ना उगाच परफेक्ट असण्याचा हा ससेमिरा डोक्यावर मिरवत असतेस बाकी व्यवहारज्ञान तर तुला अजिबात नाही. अगं एवढे साधे विचार सोड.जरा हजरजबाबीपणाने वाग म्हणजे कळेल कोण कसे आहे ते!”आजी
ज्या व्यक्तीला आपण आपला आदर्श गुरू मानले,जिच्या पावलावर पाऊल ठेवून आपण या क्षेत्रात आलो तिच व्यक्ती आज आपल्याला असे बोलते आहे हे पाहून प्रिशाचे मानसिक खच्चीकरण झाले आणि ती ओक्साबोक्सी रडायला लागली.आपलीच चूक आहे असे समजून ती स्वतःला मनोमन दोष देऊ लागली.
आता काय होईल पुढे? प्रिशाच्या मनातील प्रेमाचे द्वंद्व कसे थांबेल? समीर आजीचा निशाणा का बनलाय?आजीच्या मते, यामागे खरंच परफेक्ट टीचर पॉलिटिक्स आहे की आणखी काही?
जाणून घ्या पुढील भागात..
जाणून घ्या पुढील भागात..
स्टे ट्यूनड टू इम्परफेक्टली परफेक्ट बाँड ऑफ लव्ह..
भाग ११ समाप्त..
क्रमशः
©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा